घटकेत ऊन पोळे घटकेत चांदणे मज -

Submitted by विदेश on 1 April, 2016 - 05:42

घटकेत ऊन पोळे घटकेत चांदणे मज
आयुष्यमार्ग अवघड समजे न चालणे मज

विश्वात जीव इतके मी एक बिंदु साधा
विश्वास ओळखाया किति जन्म जन्मणे मज

बागेतल्या फुलांची गणती उगाच केली
येता सुगंध नाकी का वेड मोजणे मज

तो सूत्रधार वरचा कळसूत्र हाति त्याच्या
हातातले बनवले त्यानेच खेळणे मज

हातावरील रेषा सुखदु:ख सांगती जर
पुसणार कोण आहे आलेच शोधणे मज ..
.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users