बाहुबलीने यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार म्हणजेच सुवर्णकमळ पटकावले आहे.
शाहरूख खान हा भारताचा प्रधानमंत्री आणि सलमान खान राष्ट्रपती झाला ही बातमी अचानक कानावर पडल्यास जसे वाटेल तशीच भावना ही बातमी ऐकून मनात दाटून आली.
भारताचा प्रधानमंत्री वा राष्ट्रपती कोणीही होऊ शकतो तसेच राष्ट्रीय पुरस्कार कोणत्याही चित्रपटाला मिळू शकतो हे कबूल. फक्त ज्युरींचे मत त्याच्या पारड्यात पडायला हवे. हे ही कबूल. पण तरीही आजवरचे राष्ट्रीय विजेते चित्रपट, भले त्यातील काही बघितले का नसेना तरी त्यांची कथा पटकथा ऐकून सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरवण्याचे काही निकष माझ्या मनाशी ठरवले गेले होते. आज त्याच्या ठिकर्या उडाल्या. म्हणजे मी माझ्या मायबोलीवरील लेखांना आणि त्याखाली आलेल्या मनोरंजक प्रतिसादांना एकत्र करून एक पुस्तक छापावे आणि त्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळावा असे झाले.
सिरीअसली, अश्या बालबोध (पण बालचित्रपट नसलेल्या) चित्रपटाला सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट ठरवून आपण नेमके काय साधले? उद्या जर हा चित्रपट ऑस्करच्या रांगेत उभा ठेवला तर त्याचा नंबर कितवा असेल. काही हास्यास्पद प्रकार तर नाही ना वाटत हा.
या चित्रपटाबद्दल मनात काही आकस नाहीये. अगदी या चित्रपटात माझा आवडता शाहरूख असता तरी माझे प्रामाणिक मत हेच असते. कारण प्रश्न एखाद्या चित्रपटाचा नाही तर राष्ट्रीय पुरस्काराच्या स्वत:च्या सन्मानाचा आहे. द्यायचाच होता तर तांत्रिक विभागातीलच पुरस्कार दिला असता. मनोरंजक चित्रपट पुरस्कार जो बजरंगी भाईजानला दिला तो याला दिला असता. पण नाही. चक्क सुवर्णकमळ.. अंह, नाही पटत हे..
राहून राहून वाटतेय यामागे काही व्यावसायिक गणित तर नाही ना.... भाग दुसरा लवकरच येतोय
चूकभूल ...
ऋन्मेष
ईतरांची मते ऐकण्यास उत्सुक
{{ बाहुबली नॉर्मल आहे
{{ बाहुबली नॉर्मल आहे }}
मान्य आहेच. मग पब्लिकने इतक्या मोठ्या प्रमाणात का बघितला? मसान किंवा मांझी का नाही पाहिले?
ज्युरींची बहुदा (बहुसंख्य) पब्लिकसारखीच अभिरूची असावी. तसेही "शोले" कार रमेश सिप्पी ज्युरी आहेत.
मान्य आहेच. मग पब्लिकने
मान्य आहेच. मग पब्लिकने इतक्या मोठ्या प्रमाणात का बघितला?
>>>>>>
आयपीएलचे सामने बघायला पब्लिक जर तिथल्या चीअरगर्ल्स बघायला जात असतील तर त्यांना मॅन ऑफ द मॅच द्यायचे का
जोक होता हं. हे उदाहरण लागू गैरलागू चर्चा नको
जर पब्लिकची आवड हा महत्वाचा निकष असेल तर ज्युरींवर पैसा खर्च करायची गरज नाही. बॉक्स ऑफिसचे आकडे बघून थेट मेरीट लिस्ट काढायची.
जर पब्लिकची आवड हा महत्वाचा
जर पब्लिकची आवड हा महत्वाचा निकष असेल तर ज्युरींवर पैसा खर्च करायची गरज नाही. बॉक्स ऑफिसचे आकडे बघून थेट मेरीट लिस्ट काढायची. >>>> करेक्टे.
दुसऱ्या एका धाग्यावर या
दुसऱ्या एका धाग्यावर या धाग्याची लिंक मिळाली.
सध्या मायबोलीवर राष्ट्रीय पुरस्कार वातावरण असल्याने वर काढतो.
बाहुबली या चित्रपटाबद्दल माझे मत कालांतराने बदलले होते. आधी मला हा अचाट आणि अतर्क्य चित्रपट वाटलेला. पण नंतर हळूहळू आवडू लागलेला. पण ते माझे वैयक्तिक मत झाले. आज शाहरुखला जवान चित्रपटानिमित्त जो पुरस्कार मिळाला त्या अनुषंगाने सगळी जुनी नवी मते आणि बदलणारा ट्रेंड चाचपडून घ्यायला हवा.
Pages