सर्वोत्कृष्ट चित्रपट बाहुबली - राष्ट्रीय पुरस्कारांवर एक प्रश्नचिन्ह !

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 March, 2016 - 17:06

बाहुबलीने यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार म्हणजेच सुवर्णकमळ पटकावले आहे.

शाहरूख खान हा भारताचा प्रधानमंत्री आणि सलमान खान राष्ट्रपती झाला ही बातमी अचानक कानावर पडल्यास जसे वाटेल तशीच भावना ही बातमी ऐकून मनात दाटून आली.

भारताचा प्रधानमंत्री वा राष्ट्रपती कोणीही होऊ शकतो तसेच राष्ट्रीय पुरस्कार कोणत्याही चित्रपटाला मिळू शकतो हे कबूल. फक्त ज्युरींचे मत त्याच्या पारड्यात पडायला हवे. हे ही कबूल. पण तरीही आजवरचे राष्ट्रीय विजेते चित्रपट, भले त्यातील काही बघितले का नसेना तरी त्यांची कथा पटकथा ऐकून सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरवण्याचे काही निकष माझ्या मनाशी ठरवले गेले होते. आज त्याच्या ठिकर्या उडाल्या. म्हणजे मी माझ्या मायबोलीवरील लेखांना आणि त्याखाली आलेल्या मनोरंजक प्रतिसादांना एकत्र करून एक पुस्तक छापावे आणि त्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळावा असे झाले.

सिरीअसली, अश्या बालबोध (पण बालचित्रपट नसलेल्या) चित्रपटाला सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट ठरवून आपण नेमके काय साधले? उद्या जर हा चित्रपट ऑस्करच्या रांगेत उभा ठेवला तर त्याचा नंबर कितवा असेल. काही हास्यास्पद प्रकार तर नाही ना वाटत हा.

या चित्रपटाबद्दल मनात काही आकस नाहीये. अगदी या चित्रपटात माझा आवडता शाहरूख असता तरी माझे प्रामाणिक मत हेच असते. कारण प्रश्न एखाद्या चित्रपटाचा नाही तर राष्ट्रीय पुरस्काराच्या स्वत:च्या सन्मानाचा आहे. द्यायचाच होता तर तांत्रिक विभागातीलच पुरस्कार दिला असता. मनोरंजक चित्रपट पुरस्कार जो बजरंगी भाईजानला दिला तो याला दिला असता. पण नाही. चक्क सुवर्णकमळ.. अंह, नाही पटत हे..

राहून राहून वाटतेय यामागे काही व्यावसायिक गणित तर नाही ना.... भाग दुसरा लवकरच येतोय

चूकभूल ...
ऋन्मेष

ईतरांची मते ऐकण्यास उत्सुक

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मलाही अजिबात पटलेलं नाही. बाकी ऑस्करचे नाव काढू नका, एका वर्षी सैफलीखानचा कुठ्लातारी टुकार पट गेलेला ऑस्करला. त्याच्या आगेमागे शर्मिला टागोर सेन्सॉर बोर्डाची अध्यक्ष का कायतरी होती. ऑस्करला आपल्याकडून 4 टुकार जातात तेव्हा कुठे 1 चांगल्याची वर्णी लागते.

साधनाजी, ऑस्करला आपण काय पाठवतो ते नाही तर तिथे ईतर देशांचे जे चित्रपट आलेले असतात, तेथील जे विजेते असतात त्यांच्या संदर्भाने म्हटले आहे ते..

>>भारताचा प्रधानमंत्री वा राष्ट्रपती कोणीही होऊ शकतो तसेच राष्ट्रीय पुरस्कार कोणत्याही चित्रपटाला मिळू शकतो हे कबूल.

हे नाही पटले ! काही तारतम्याने लिहित जा बुवा.

बाकी पुरस्कारांचे म्हणाल तर निवड समितीमधे असलेल्या लोकांच्या मानसिकतेवर बरेच अवलंबून असते. उद्या तुम्ही स्वतः जर तिकडे असाल तर शा.खा. किंवा. स्व.जो.च्या चित्रपटांना झुकते माप देणार नाही का ? Wink

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार लिलासुता ला मिळालाच की....काय अकलेचे दिवाळे काढले होते त्याने बा.म. मधे तरी ही त्याला मिळालाच.... ज्याचा मोठा वशिला..त्याचं कुत्रं काशी ला Sad

द्यायचाच होता तर तांत्रिक विभागातीलच पुरस्कार दिला असता. मनोरंजक चित्रपट पुरस्कार जो बजरंगी भाईजानला दिला तो याला दिला असता. पण नाही. चक्क सुवर्णकमळ.. अंह, नाही पटत हे.. >>>>> पहिल्यांदाच आयाम विथ यु ऋन्मेष... अज्जिबात पटलेला नाहीये हा निर्णय. तु म्हणतोस तस ग्राफिक्स वै साठी द्यायचा असेल तर टेक्निकल भागात या पिक्चरचा नंबर लागला असता. पण यांनी तर डायरेक्ट अख्खा पिक्चरच उत्कृष्ट आहे अस म्हटलय.....

महेश..अहो, मला पण ऐकुन माहिती आहे ही म्हण...पर आप भावनाओं को समझो !!! प्रचंड राग आला मला ह्या वेळची लिस्ट वाचल्यावर्....चिडचिड झाली आहे माझी Sad
लिलासुता चे गुजारीश किंवा ब्लॅक सारखे चित्रपट वेगळ्या धाटणीचे असल्यामुळे मला फार आवडले होते, पण वोह सात दिन ची चकचकीत कॉपी असलेला हम दिल दे के चुक गये सनम [आम्ही मित्र असेच म्हणतो त्या चित्रपटाचे नाव :D] पण त्याने छान च हाताळला होता...पण बा.म. नक्कीच नाही..आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळण्याइतका तर नाहीच नाही

महेश भारताचा कोणीही नागरीक होऊ शकतो या अर्थाने ते म्हटले होते. त्या पदाचा अपमान करायचा हेतू नाही. तसे वाटत असल्यास क्षमस्व. पण एक्झॅक्टली हेच म्हणायचेय की पात्रता नसलेली व्यक्ती जर तिथे गेली तर जसा त्या पदाचा अपमान होईल तेच राष्ट्रीय फिल्म पुरस्कारांबाबतही म्हणता येईल.

@ बाम, भन्साली वगैरे आणि ईतरही पुरस्कारांची यादी पाहिली तर येस्स.. हे राष्ट्रीय पुरस्कारच आहेत की बॉलीवूड टॉलीवूड फिल्मफेअर एवार्ड हे मला धागा काढायच्या आधी पुन्हा एकदा चेक करावे लागले.

आणखी एक गोष्ट मी चेक केली ते बाहुबली फॅन असलेल्या माझ्या गर्लफ्रेंडला या न्यूजचा मेसेज टाकून तिची प्रतिक्रिया घेतली. ती सुद्धा कायच्या कायच म्हणाली.

आणि हो, मी असतो आणि समजा मी माझ्यातर्फे स्वजो शाखाच्या चित्रपटांना झुकते माप दिलेही असते तरी ज्युरी हा मी एकटाच नसतो. त्यामुळे अंतिम निकालात जर ते चित्रपट डिजर्व्ह करत नसते तर आलेच नसते. पण इथे सर्व ज्युरींनी मिळवून हे ठरवलेय.

पिंग्याच्या नृत्यदिग्दर्शकाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला हे वाचुन आत्ता या क्षणी डोळे मिटावे अशी इच्छा झाली.>>> पुरस्कार पिंगाला नसून दिवानी मस्तानी ला आहे.

{ भारताचा कोणीही नागरीक होऊ शकतो या अर्थाने ते म्हटले होते. त्या पदाचा अपमान करायचा हेतू नाही. तसे वाटत असल्यास क्षमस्व. पण एक्झॅक्टली हेच म्हणायचेय की पात्रता नसलेली व्यक्ती जर तिथे गेली तर जसा त्या पदाचा अपमान होईल }

एकदम एचडीडींचीच आठवण झाली.

ऋ, +१
कायच्या काय लिस्ट आहे.
बाहुबली काय, ती भैताड कंगना काय, दिवानी मस्तानी काय, बा. म. - सलिभ आणि इतर मसान वैगेरेसोडुन पिकुसाठी अमिताभ?
कुछ जम्या नही.

मला अजुन कळाले नाही
राष्ट्रीय पुरस्कार सोबत अजुन कुठल्याही पुरस्कारांच्या लिस्ट मधे "मांझी" आणि "बदलापुर" या दोन चित्रपटांचा कुठे ही समावेश केला नाही. अगदी वाळीत टाकल्यासारखे केले .

त्यातल्या त्यात आवडलेले पुरस्कारः-

Best Debut Film of A Director: Masaan
Best Popular Film Providing Wholesome Entertainment: Bajrangi Bhaijaan (आवड आपली आपली)
Best Female Playback Singer: Moh Moh Ke Dhaage : Monali Thakur
Best Lyrics: Moh Moh Ke Dhaage : Varun Grover
Best Special Effects : Baahubali : The Beginning : V. Srinivas Mohan
Special Jury Award : Margarita with a Straw : Kalki Koechlin (सॉलीड डिजर्विंग कलाकार आहे ही)

Best Female Playback Singer: Moh Moh Ke Dhaage : Monali Thakur
Best Lyrics: Moh Moh Ke Dhaage : Varun Grover>>>>>
हे आवडलं.

मित + १

राष्ट्रीय पुरस्कार सोबत अजुन कुठल्याही पुरस्कारांच्या लिस्ट मधे "मांझी" आणि "बदलापुर" या दोन चित्रपटांचा कुठे ही समावेश केला नाही. अगदी वाळीत टाकल्यासारखे केले >>> + १०००

नॅशनल अवार्ड आणि फिल्म फेअर आता सारखेच वाटायला लागली .

बाहुबली मला काय कळलाच नाय ब्वा मूवी, पिंगाचं नृत्यदिग्दर्शन पुरस्कार पण पटला नाही. तलवार, माझी सारख्या मूवी डायरेक्टरना पुरस्कार मिळायला हवा होता भन्साळीपेक्षा असं उगाच वाटलं ब्वा मला.

आजवरचे राष्ट्रीय विजेते चित्रपट, भले त्यातील काही बघितले का नसेना तरी त्यांची कथा पटकथा ऐकून सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरवण्याचे काही निकष माझ्या मनाशी ठरवले गेले होते. आज त्याच्या ठिकर्या उडाल्या.>> माझं पण असंच झालं. कैच्याकै. Uhoh

पिन्गाला नाही मिळाला का पुरस्कार, ओके. लिस्ट बघुन येते परत. >>>> नाही अन्जु, दिवानी मस्तानीच्या कोरिओग्राफीसाठी मिळाला.

दिवानी मस्तानी या गाण्याला सुध्दा पुरस्कार मिळाला असेल यात असे काय वैशिष्ट्य होते ? यावर एक पीएचडी प्रबंध यायला हवा. महागडा चकाचक आरशामहलची आठवण करून देणारा सेट या व्यतिरिक्त काय खास होते. मला तर काहीही दिसले नाही.

बाहुबलीने ६०० कोटींचा गल्ला जमविला तेव्हा कोणी पब्लिकच्या अभिरूचीवर प्रश्नचिह्न उपस्थित केलेलं नाही. मग जर त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तर त्यावर प्रश्नचिह्न का?

पब्लिकला कुठल्या चित्रपटाला सपोर्ट करायचा त्याचं स्वातंत्र्य आहे आणि त्याच चित्रपटाला पुरस्कार देण्याचं ज्युरींना स्वातंत्र्य नसावं का?

उलट असं समजा की यावेळी आम पब्लिकच्या प्रतिनिधींनीच ज्युरी बनून हा पुरस्कार दिलाय.

पूर्वी तिकीटबारीवर फ्लॉप ठरलेल्या समांतर / कलात्मक चित्रपटांना असले पुरस्कार मिळत तेव्हाही ज्युरी पब्लिकची मर्जी जाणून घेत नसल्याचा आरोप होतच असे.

बिपिन,

पटकथा नाविन्य, डायरेक्शन, अ‍ॅक्टिंग आदीत बाहुबली नॉर्मल आहे, माझ्यमतेतरी. निव्वळ अ‍ॅनिमेशन तंत्राचा उत्तम उपयोग केला म्हणुन द्यायचे असेल तर माझी ना नाही.

Pages