आडवाटेची भ्रमंती - जांभे धरण

Submitted by मुरारी on 26 March, 2016 - 10:35

धुळवडीला दर वर्षी ट्रेक होतोच, पण या वर्षी अति उन्हाळा असल्याने ट्रेक न करता नुसतेच कुठे फिरून येत येईल का या विचारात होतो, ठिकाण पण हटके हवे, म्हणून गाडगीळ काकांशी बोलणे झाले, त्यांनी सुचवलेला जांभे धरणाचा प्रस्ताव आवडला.यावेळी बाईक ने जायचे नाही असे ठरवले होते.
मध्य रेल्वेच्या आसनगाव स्टेशन पासून शहापूर,तिथून नेहरोली गावापर्यंत बस(२०किमी),पुढे दीड दोन किमी चालत असा मार्ग होता. पहाटे ६.१४ ची आसनगाव पकडली,काका,मी आणि माझा एक मित्र असे तिघेच होतो.आसनगाव ते शहापूर रिक्षा मिळाली (१० रुपये सीट).तोथून शहापूर डेपो ला पोचलो.लगेचच ७.२० ची बस मिळाली.साधारण अर्ध्या तासात नेहरोली गावात पोचलो.वातावरण मस्त गार होते.बसमधून उतरल्यावरच मन एकदम प्रसन्न झाले.अशा चेंज ची खूप गरज असते.
फ्स्दफ्स
गाव जेमतेम २०-३० घरांचे असावे.एक माणसाला धरणाचा रस्ता विचारून पुढे निघालो.सगळीकडे पक्षांची किलबिल सुरु होती.धरण क्षेत्राखालचा परिसर असल्याने सगळीकडे छान हिरवेगार होते.मार्च महिना सुरुये असे अजिबात वाटत नव्हते.

rfesfxcddasd

वाटेत काका बरीच पक्षांची माहिती देत होते.पाणी भरपूर असल्याने शेते चांगलीच डवरलेली होती.असेच पाणी सर्वांनी वाचवले तर मराठवाडा, विदर्भ देखील असाच हिरवागार दिसेल असे वाटून गेले.या शेतकर्यांनी केलेली एक चांगली गोष्ट म्हणजे झाडे अजिबात न तोडता आजूबाजूने शेती केलेली होती.मध्येच वाट वाकडी करून एका शेतात घुसलो.

सडसडds

एका बाजूला ज्वारी आणि दुसर्या भागात भरपूर भाजी लावलेली होती, एका आंब्याखाली दोन गायी एक म्हैस बांधलेली होती,चिकूची दहा बारा झाडे लगडलेली होती.एकूण एकदम पिक्चर परफेक्ट दृश्य होतं

ggफड

मग पुढे धरणाकडे कडे निघालो,मध्येच मोहाचा सुगंध आला.बाजूलाच मोहाचे झाड होते,त्याची टपोरी फुले खाली पडत होती.हि खायला भारी लागतात, गोडसर आणि एक स्पेसिफिक सुगंध.

मोहाचे झाड
स्फ्दफ्द

फुले
qssd

काही वेळातच धरणावर पोचलो,इथे जर झाडी जास्तच दाट झालेली होती.सगळी कडे धुक्याची चादर लपेटली गेली होती.भरपूर पाणी होते.महत्वाची गोष्ट म्हणजे "शांतता". पक्षांचा सोडला तर अजिबातच कसला आवाज नव्हता.इथे बराच वेळ बसलो.

सडसडदावडwdd

खाली मासे पकडणाऱ्यांचे एक घर होते, कसलेसे ऑफिस सुद्धा होते.तिकडे चहा मिळेल का म्हणून चौकशी केली पण नाही मिळाला.

sds

धरणातले पाणी वरून खाली येत होते.

क्फ्द्फddsadsds

थोड्यावेळाने निघालो, आता पोटपूजेची सोय बघायची होती.येताना परत त्याच शेतात आंब्याखाली पसरलो.बांधावर मस्त हातपाय तोंड धुवून फ्रेश झालो. वेज चिज सॅन्ड्विच,लसून चटणी-पोळ्या,द्राक्ष, केळी, लाडू,आणि अजून काय काय असा भारी बेत होता.खाऊन झाल्यावर मस्त पैकी तिथेच आडवे झालो, आता करण्यासारखे काहीही नव्हतेच.शांतता ऐकत कसा वेळ गेला समजला नाही, काका त्यांच्या भटकंतीचे भरपूर किस्से सांगत होते, त्या मानाने आपण काहीच फिरलो नाही याचीची खंत वाटत होती.थोड्यावेळाने सगळे आवरून परतीला लागलो. आता भयंकर उन्ह तापलेले होते.सकाळचा गारवा कुठच्या कुठे गेलेला होता.बस येते त्या जागी आलो.अजून एक तास वेळ असल्याने तसेच उगाच बसून राहिलो. गावात धुळवड असल्याने सोंग नाचत आली.फुल तर्राट.
आमच्या सोबतच्या एका गावकर्याने मग "अरे ए पावन हैती, जा गावात हिगडे नगा त्रास देऊ" म्हणत त्यांना पळवून लावले. बस येईस्तोवर मग उगाच गप्पा मारत बसलो.बरोबर एक ला बस आली. आणि परतीचा प्रवास सुरु झाला.

ffg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान. रिक्शाचा फोटो भारी आलाय.

मोहाच्या झाडाचा कलर फोटो टाकला असता तर मोहाचे झाड कसे दिसते ते कळले असते.

धरणाचे पाणी कालव्यातून सोडतात ना? इथे तर ते झर्‍यासारखे वाहताना दिसतेय.

व्वा, मस्त वर्णन, फोटोंनी मजा आली.
नशिबवान आहात काकांसोबत (माहितगारासोबत) असे जाता येतय...
इथे दिल्याबद्दल धन्यवाद. Happy