प्रॉन्स फिंगर फूड (नॉन व्हेज)

Submitted by अमेय२८०८०७ on 18 March, 2016 - 14:10

साहित्य:-

जम्बो प्रॉन्स (10-12)
पांढरी मिरीपूड एक टी स्पून
अर्धा टे स्पून मस्टर्ड पेस्ट (ऑप्शनल)

हिरव्या चटणीसाठी
आले, लसूण, हिरवी मिरची, रॉक सॉल्ट, चिमूटभर ओवा, कोथिंबीर, किंचित तेल
मिक्सरमधून वाटून घ्यावे

दोन अंडी किंचित तिखट-मीठ घालून फेटून

मैदा- 2-3 टेस्पून

कृती:-
प्रॉन्स साफ करून शेपट्या शाबूत ठेवाव्यात.
दोरा काढतो तिथेच आणखी थोडे कापून नंतर प्रॉन्स चपटे करून घ्यावेत. दोन्ही भागांवर सुरीने आडव्या चिरा मारून घ्याव्यात.
प्रॉन्स अगदी कोरडे करून घ्यावेत.

एकाच भागाला मीठ मिरपूड, थोडी मस्टर्ड पेस्ट आणि हिरवी चटणी लावून पाच दहा मिनिटे प्रॉन्स मॅरीनेट करत ठेवावेत

IMG_20160318_213534.jpg

एका थाळीत मैदा घेऊन हिरवी चटणी लावलेला प्रॉन्सचा भाग मैद्यात घोळवून नंतर सर्व प्रॉन्स फेटलेल्या अंड्यात पूर्ण बुडवून घ्यावेत.

प्रॉन्स तव्यावर शॅलो फ्राय करून आवडीच्या डिप किंवा सॉससोबत गरम गरम स्वाहा करावेत.

IMG_20160318_231747.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेसेपी मस्त आहे.
हिरवी चटणी लावून टुथपिक लावून बंद करून, रव्यात घोळवून शॅलो फ्राय केलेलेपण चांगले लागतात. शाकाहरी लोकांनी पनीरवर प्रयोग करावेत :).

जळवा.

आय मीन लीचेस नाही, तर तुमचा जलवा दाखवून आम्हाला जळवा. इथे प्रॉन्सही मिळत नाहीत. अन शेलफिशचं पथ्य आहे Sad

मस्त.
हि चटणी किंवा नुसतंच ह मी ति लावुन रव्यात घोळवुन तळले तरी झक्कास लागतात.
अंड्यात प्रॉन्स घोळवायला मला थोडा धीर करावा लागेल.

ही रेसीपी जम्बो पोटॅटो घालुन केली तर चालेल का?

<<

चालेल की. तुम्हाला हवं ते घालून करू शकता. अगदी ढेमशी घालून केलीत तरी चालेल.

शेवटी केल्यावर तुम्हालाच खायची आहे Rofl