

एबीसी वाहिनीवरच्या 'शार्क टँकचा' प्रेक्षक ह्या शो चा चाहता नसेल असे चित्र कदाचित दिसणार नाही.
अमेरिका - हे स्वप्न बघणार्या आणि ते स्वप्न जगू पाहणार्या लोकांच्यात दडलेला ऊद्योजक शोधतांना त्याला करमणूकीचा तडका देवून एक अतिशय वेगळा आणि ऊत्साह वाढवणारा कार्य्क्रम लोकांसमोर आणल्याबद्दल वाहिनीचे धन्यवाद आणि अभिनंदन.
ईनोवेशन, बिझनेस स्ट्रॅटेजी, बिझनेस मॉडेल अश्या क्वालिटेटिव तर सेल्स, एक्विटी, कॅश फ्लो, रेवेन्यू, नेट, ग्रोस, प्रॉफिट अश्या क्वान्टिटेटिव फायनान्शिअल शब्दांचा भडिमार असलेला का कार्य्क्रम बिझनेस शार्क्स आणि प्रेझेंटर ऊद्योजक त्यांच्या प्रश्नांनी आणि ऊत्तरांनी अतिशय रोमांचक बनवतात.
शो बद्दल जास्त काही सांगून त्याची मजा घालवत नाही पण २००९-१० पासून माझा हा अतिशय आवडता कार्यक्रम शेअर करावा असे वाटले.
आपण इथे, फेमस ऑफर्स, शार्क्स, कॅपिट्ल सीकर्स, मिस्ड ऑफर्स ह्या आणि अनेक विषयांबद्दल गप्पा मारू शकतो.
मला वाटते हा शो भारतात सुद्धा कुठल्याशा वाहिनीवर येतो. यू ट्यूब वरही जवळ जवळ सगळेच एपिसोड्स ऊपलब्ध आहेत. सध्या भारतातले ऊद्योजकांसाठीचे फेवरेबल वातवरण पहाता नवीन ऊद्योजकांसाठी हा शो निश्चितच माहितीवर्धक ठरेल.
आमचं आख्खं कुटुंब फॅन आहे
आमचं आख्खं कुटुंब फॅन आहे शार्क टॅन्क चं ! आम्ही बघताना एकमेकात पैजा लावतो, या माणसाला/ बाईला कोण ऑफर करेल / करणार नाही. किंवा मल्टिपल ऑफर्स असतील तर त्याने कोणासोबत जावे !
मला त्यांच्यात रॉबर्ट सग़ळ्यात जेन्युइन माणूस वाटतो समहाऊ. मार्क आणि केविन लॉट्स ऑफ अॅटिट्युड आणि एन्टरटेनमेन्ट पण. लोरी आणि बार्बराची फार अॅग्रेसिव्ह पर्सनेलिटी नाहीये. प्रेडिक्टेबल. डेमन्ड बोर आहे. कुणाला काही ऑफर करतच नाही बहुधा.
वेगळ्य अलोकांचे वेगळे
वेगळ्य अलोकांचे वेगळे पर्सेप्शन आहे शार्क्सच्या बाबतीत. आणि ते खरेच आहे कारण प्रत्येक शार्कचे बॅकग्राऊंड आणि एक्स्पर्टीज वेगळे आहेत.
माझा पर्स्नल फेवरिट मार्क क्युबन आणि त्यानंतर केविन (कामाच्य निमित्ताने माझा केविनच्या कामाशी (केविनशी नव्हे) जवळचा संबंध आहे त्यामुळे त्याच्या बोलण्यामागचा हेतू आणि विचार लगेच कळून येतात. माझ्या मते हा एक प्रचंड हुशर मेहनती पण श्रूड आणि ग्रीडी माणूस आहे) फायनान्स डोमेन मधल्या अभ्यासाच्या बाबतीत तो ईतरांपेक्षा बरीव पावलं पुढे आहे)
क्यूबन बाबत सविस्तर लिहावं लागेल.
लोरी चेहरा बदलून? आल्यापासून
लोरी चेहरा बदलून?
आल्यापासून जरा शांत आणि प्लेफुल असते.
स्कॉली अॅपच्या डील चा एपिसोड बघ, तुझे डेमंड आणि लोरी बद्दलची मतं कदाचित बदलू शकतील.
लोरीची ग्रीड आणि बॅक स्टॅबिंग बघून रॉबर्ट (मला तो रॉबिन विल्यम्सचा कुंभमेळ्यात हरवलेला भाऊ वाटतो) तो शो सोडून निघून गेला होता.
आम्ही पण टोटल फॅन क्लब मधे.
आम्ही पण टोटल फॅन क्लब मधे. मस्त इंटरेस्टिंग प्रोग्रॅम आहे. हुलू वर उपलब्ध आहेत बरेच भाग.
घरी नॉर्मल चर्चेतही, ".. and with that, I am out!" अशी वाक्ये ऐकू येतात
शार्क टँकचे ब्रिटिश वर्जन
शार्क टँकचे ब्रिटिश वर्जन 'ड्रॅगन्स डेन', तिथले ड्रॅगन्स आणि येणारे ऊद्योजक एवढे सुस्त असतात की मी तो शो १० मिनिटंही बघू शकलो नाही. त्यांची कॉमेंट्रीही फार पांचट असते.
ड्रॅगन - वॉट वेर योर लास्ट ईअर्स सेल्स फिगर्स
बॉब- (चाळीस सेकंद विचार करून) आय थिंक फोर थाऊजंड पाऊंड्स
ड्रॅगन - दॅट्स नॉट वेरी एक्साईटिंग, ईज ईट बॉब?
(कॉमेंट्री - द डेन ईज गेटिंग हॉट, ड्रॅगन्स हॅव स्टार्टेड ब्रीदिंग फायर. विल बॉब गेट बर्न्ट ऑर सर्वाईव धिस फायरी राऊंड ऑफ क्वेस्चन्स)
अर्र्र्र्रे!! त्याने त्याला फक्त सेल्सची फिगर विचारली राव?
रॉबर्ट / रॉबिन विलियम्स - >>>
रॉबर्ट / रॉबिन विलियम्स - >>> हो हो
खुप साम्य आहे .
स्कॉली अॅपच्या डील चा एपिसोड >>> हा नाही आठवत. बघेन.
तो एक टीनेजर्स साठी काढलेल्या किस एन्हान्सिंग (!)लिप बाम च्या भागात केविन आणि बार्बराने चक्क किस केले ते बघून हहपुवा झाली होती.
माझ्यामते हा शो आता मंडेन
माझ्यामते हा शो आता मंडेन झाला आहे. ओपनिंग पिच झाल्यावर शार्क्सची बॅकग्राउंड, बाॅडि लॅंग्वेज, कमेंट्स सुरु केल्यावर काहि सेकंदातच तो/ती इन/आउट आहे कि नाहि याचा अंदाज बांधता येतो...
मला चांगला लक्शात असलेल्यांपैकि एक एपिसोड; ज्यात पार्टिसिपंट मिस्टर वंडरफुलला म्हणालेला - यु आर डेड टु मी...
आणि बर्याचदा क्युबन आपल्या पैशाच्या जोरावर बाकि शार्क्सवर दबाव टाकतो, प्रसंगी बुलींग करतो. हर्जेवॅकची हतबलता/असहाय्यता, झालेला तिळपापड नजरेतुन सुटत नाहि...
राज खरं आहे... सेम भावना माझे
राज खरं आहे... सेम भावना माझे पण पण म्हंटलं धाग्याचा सुरूवातीलाच कश्याला नकार घंटा वाजवा.
मला चांगला लक्शात असलेल्यांपैकि एक एपिसोड; ज्यात पार्टिसिपंट मिस्टर वंडरफुलला म्हणालेला - यु आर डेड टु मी... >> हा बहूतेक टेलरमेड शर्ट अॅप वाला स्टॅनफर्ड ग्रॅज्युएट होता का? काही काही खरंच पुरून ऊरले आहेत ह्या अॅरोगंट शार्क्स ना! तो एक ग्लास वाईन प्रोड्यूसर सेकंड टाईम टँक मध्ये आला आणि तरी मि. वंडरफूल आणि क्युबनची ऑफर दुसर्यांदा धुडकवून गेला. तेव्हा सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे होते.
हॅरिंगट्न ला नारळ देवून क्युबन ला आणला तेव्हा मस्तंच जान आले होती शो मध्ये. रॉबर्ट ही आजकाल कमी दिसतो त्याच्या एवजी क्रिस साचा येतो पण तो बोअर आहे. कुचर वगैरे लोक आले की शो एकदम फिल्मी वाटायला लागतो. नवीन डायनॅमिक चेहरे पाहिजेत आता. आणि शार्क्सच्या मिस्टेक्स ही दाखवायला पाहिजेत की ग्रीडी होवून ऑफर दिली नाही पैसे कमावण्याची संधी घालवून बसले.
बार्बरा ला कायमचा डच्चू द्यायला हवा. पण केविन आणि क्युबन हवेतच त्यांच्याशिवाय मजा नाही.
>>बहूतेक टेलरमेड शर्ट अॅप
>>बहूतेक टेलरमेड शर्ट अॅप वाला स्टॅनफर्ड ग्रॅज्युएट होता का?<<
नक्कि आठवत नाहि पण तो बर्यापैकि सिनीयर होता आणि बहुतेक ठरवुनच आला होता कि केविनला टशन द्यायची.
केविन, मार्क बरोबर राॅबर्ट हि एंटरटेनिंग आहे. त्याच्यातल्या लहान मुलाला नेहेमी नविन प्राॅडक्ट/गॅजेट, सगळ्यांच्या आधि ट्राय करायचं असते...
शार्क टॅंक हा एक असा प्लॅटफाॅर्म आहे कि जिथे डिल मिळालेल्यांना फायदा होतोच, त्याचबरोबर डिल न मिळालेल्यांना हि एक्स्पोजर मिळत असल्याने एखाद्या विसी कडुन फंडिंग मिळण्याची शक्यता जास्त असते...
शार्क टॅंक हा एक असा
शार्क टॅंक हा एक असा प्लॅटफाॅर्म आहे कि जिथे डिल मिळालेल्यांना फायदा होतोच, त्याचबरोबर डिल न मिळालेल्यांना हि एक्स्पोजर मिळत असल्याने एखाद्या विसी कडुन फंडिंग मिळण्याची शक्यता जास्त असते... >> ऑफकोर्स, सगळ्यात मोठ्ठं ऊदाहरण म्हणजे तो रिंग विडिओ डोअरबेल चा ईन्वेंटर. शार्क टँक मध्ये ऑफर मिळाली नाही तरी वर्जिनच्या रिचर्ड ब्रॅन्सन कडून त्याला २०+ मिलिअन्सची ईन्वेस्टमेंट मिळाली.
डिसकाऊंटेड कॅश फ्लो काढून त्याचा आस्किंग प्राईसवरचा पी/ई काढला आणि तो ५ च्या खाली असेल तर ऑफर मिळण्याचे चांसेस बरे अस्तात पण पी/ई ५ च्या वर असेल तर प्रॉड्क्ट खूप्पच प्रॉमिसिंग असायला हवं. असं माझं आजवरचं निरिक्षण आहे. सर्विस प्रॉडक्ट्समध्ये सहसा ऑफर येत नाहीत. फूड प्रॉडक्ट मध्ये ६०-८० के च्या वर कोणी रिस्क घेत नाहीत. टेक प्रॉड्क्ट म्हंटलं की फक्त क्यूबन आणि रॉबर्ट.. बार्बरा फूल्ल ईमोशनल डिसिजन घेते आणि तिचे खूप सारे प्रिज्युडिस्ड मतं असतात. लोरी डॉलर स्टोअरमध्ये टाईप्स विकणारेप्रॉड्क्ट्स जास्त घेते.
केविनला शक्यतो कॉन्स्टन्ट कॅश फ्लो हवा असतो मग ७ टक्क्याच्य वर तो अगदी लोन द्यायला ही तयार असतो. क्यूबनच्या डील मला खूप डेअरिंग पण थॉट्फुल्ल आणि ईंट्रेस्टिंग वाटतात ... तो बर्याच वेळा केवळ पार्टिसिपंटच्या पोटेंशिअलला बघूनच डील करतो असे वाटते.
केविनचे थोडे scripted असते शो
केविनचे थोडे scripted असते शो entertaining करायला असे वाटते.
असामी, मलाही तसेच वाटते. गुड
असामी, मलाही तसेच वाटते. गुड कॉप बॅड कॉप सारखे एक ब्लंट बोलणारा, एक फ्रेन्डली, एक विनोदी असे मुद्दामच करत असतील.
इतक्यातच युट्यूबवर भारतातल्या
इतक्यातच युट्यूबवर भारतातल्या शार्क टँकचे एपिसोडस पहायला सुरूवात केली.
(एक पाहिला कि आपोआप युट्यूब शार्क टँकने भरून गेलंय ).
मायबोलीवर धागा कसा निघाला नाही ? देश बदल रहा है.
कंपनीचं व्हॅल्युएशन हा ग्रे एरिया आहे का ? शार्क पाडून एक्विटी मागतात. पण रिस्क आहेच.
एकाने मार्शल स्पीकर्सची रिप्लिका बनवून बजेट कॅटेगरीत अॅमेझॉनवर विकायला ठेवली. बोट च्या अमन गुप्ताने त्याच्या कंपनीत ५० टक्के भागीदारी घेतली. पण नंतर हा स्पीकर उल्हासनगर पेक्षा वाईट आहे असे रिव्ह्यूज आढळले.
हे सगळे कपिल शर्मा शो मधे आले होते तेव्हां कधीच न हसणार्या आणि सर्वात जास्त अपमान करणार्या फटकळ अशमीर ग्रोव्हरला कपिलने हसता हसता रोस्ट केलं ते भारी होतं.
धंदा करणे हा पिंड नाही माझा. पण या कार्यक्रमातून खूप माहिती होतेय. काही काही कॉमर्सच्या टर्म्स शार्क्स समजावून सांगतात ते खूप छान आहे. वेळ सत्कारणी लागतो. ज्यांना काही करायचंय त्यांनी नक्कीच पहावा असा शो आहे.
शार्क टॅंक मधुन गुंतवणुक
शार्क टॅंक मधुन गुंतवणुक मिळालेल्या कंपन्या आता कुठे आहेत ह्याचा शोध घेतला गेला का? पाटील काकी नावाच्या ब्रँडची उत्पादने मला तरी कुठल्याही दुकानात दिसली नाहीयेत.
पाटील काकीचा व्यवसाय बहुदा
पाटील काकीचा व्यवसाय बहुदा चालू आहे. काही महिन्यांपूर्वी उर्मिला निम्बालकरने घेतलेली त्यांची मुलाखत यूट्यूब वर पाहिल्याचे आठवते. तसेही त्यांचा व्यवसाय खूप छोटा होता.
मीही पाहतो भारतीय शार्क टॅंक. नवीन कल्पना कळतात, व्यवसाय कसे चालू केले, उभे केले, त्यातील समस्या, उपाय इत्यादींची माहिती मिळते. आणि सादरीकरण रोचक असते.
जुगाडू कमलेश चा एपिसोड छान होता. त्याला लेन्स्कार्ट वाल्याने मदत केली होती. पुढे काय झाले कळले नाही. सायकलला ब्याटरीची अटॅचमेंट तयार करणाऱ्या सरदारजींचा एपिसोड पण छान होता.
पण नंतर फूड आणि फॅशन यांचेच व्यवसाय जास्त येऊ लागल्याने सध्या बोअर होऊन थांबवलंय.
एक बाब मला लक्षात आली कि, शार्क पैसे गुंतविण्याचा महत्वाचा निकष म्हणजे तो व्यवसाय नफ्यात आहे का किंवा नजीकच्या काळात नफ्यात येण्याएव्हडा रेव्हेन्यू तयार होत आहे का. हे नसेल तर शक्यतो शार्क गुंतवणूक करत नाहीत. पण कारणे मात्र जगभरची देतात. ते थोडेसे विचित्र आणि ढोंगी वाटते.
पाटील काकी डन्झो मार्फत
पाटील काकी डन्झो मार्फत डिलिव्हर करतात. त्यांचं स्वतःचं दुकान काढायचा त्यांचा बेत होता.
ते विकतात ते पदार्थ बहुतेक सगळ्या ठिकाणी अनब्रँडेड मिळतात आणि बरेच स्वस्त असतात. क्वालिटी सगळीकडे साधारणतः सारखीच असते.
भ्रमरजी,
भ्रमरजी,
शोध का घ्यावा हे समजलं नाही. या शो मधून अनेक गोष्टी समजतात. अनेक अभिनव आयडिया समजतात. कुणाला तरी प्रेरणा मिळेल ना?
पण कारणे मात्र जगभरची देतात.
पण कारणे मात्र जगभरची देतात. ते थोडेसे विचित्र आणि ढोंगी वाटते. >>> अमेरिकेतील कार्यक्रमात तरी थेट व स्पष्टपणे सांगतात. भारतातले माहीत नाही. दुसरे म्हणजे आधी शार्क्सनी फंडिंग केलेल्या काही कंपन्यांचे सध्या काय चालू आहे याचाही एक रिकॅप अधूनमधून असतो. त्यातील यशस्वी कंपन्यांचेच उदाहरण घेत असतील पण ते ठीक आहे.
भारतात सुद्धा थेट पणे सांगतात
भारतात सुद्धा थेट पणे सांगतात. पण त्यावरून शार्कना रोस्ट केलं जातं.
फेक टँक, दोगलापण अशी टीका होते. काहींनी तर रिजेक्ट झालेले कसे आता करोडपती आहेत हे सांगितलं आहे.
पैसे शार्कचे असतील तर कुणाच्या धंद्यात ते गुंतवायचे हा त्यांचा निर्णय असेल ना ? भारतात अलिकडे मोठ्या संख्येने स्टार्ट अप्स निघत असताना दिशा देणारा असा कार्यक्रम असणे हे चांगलेच आहे. शेवटी धंदा आहे. चालेल किंवा नाही चालेल हे कुणालाच सांगता येत नाही.
अंबानी अडाणी मेगॅलडॉन का?
अंबानी अडाणी मेगॅलडॉन का?
अंबानी अडाणी मेगॅलडॉन का?
अंबानी अडाणी मेगॅलडॉन का?
ते कशाला येतील टीव्हीवर ?
ते कशाला येतील टीव्हीवर ?
क्षणभर अंबानी , अदानी, टाटा समोर बसलेत आणि त्यांच्या पुढे माझ्या इमिटेशन ज्वेलरीच्या घरगुती उद्योगाचं प्रेझेंटेशन चालू आहे असं चित्र तरळून गेलं. २५ रू खर्च विक्रीची किंमत १२५. शंभर रूपये नफा, महिन्याला तीन हजार रूपये मिळतात
त्यांच्या पुढे चटण्या, लोणची, पापड बनवायच्या उद्योगाचं प्रेझेंटेशन द्यायचं म्हणजे अवघडच आहे.
(No subject)
मला आवडत> फार शार्क टँक
मला आवडतं फार शार्क टँक बघायला. भारतातलं, अमेरिकेतलं दोन्ही.
भारतातल्या गेल्या सिजन ४ मध्ये आलेल्या बिझनेसेसमधली मला आवडलेली उत्पादने मी एपिसोड बघितल्यावर लगेच नोंदवून ठेवली. पुढील भारतवारीत त्यातील काही जमतील तशी घेण्याचा विचार आहे. माझी यादी अशी आहे. कुणी वापरुन पाहिलेत का हे प्रॉडक्ट्स?
1. Gud world (मराठी उद्योजिका- गूळ brand by Shinde sisters)
2. Nurturing green (plants)
3. Kyari (plants)
4. Pretty little shop (customized gifts)
5. Shyle (चांदीचे दागिने)
6. Ro:sha (lamps)
7. Woolah green tea
8. EM5 perfumes
9. Woman like u (कपडे- vacation-wear)
10. Ruby’s organic make up
11. Clapstore toys - busy board (मराठी उद्योजक)
12. Repeat gud (sauces)
13. Naturik (healthy breakfast mixes)
14. Joyspoon (Mukhawas)
15. Eriweave Silk (from Meghalaya)
16. Chokhat (home decor items)
17. Zenma coffee
18. Madmix (snacks)
19. Palmonas (दागिने)
20. Eat Better Co (healthy snacks)
21. Exclusivelane (lifestyle home decor)
22. Kavi- the poetry art project - upcycled gifts
23. Ivory - cognitive memory app
24. Krishna sakhi (ornaments for god)
25. Fit Feast (peanut butter, protein snacks)
26. Rescript (sustainable stationery products)
27. Tintbox (glass lunch boxएस)
त्यांच्या पुढे चटण्या, लोणची,
त्यांच्या पुढे चटण्या, लोणची, पापड बनवायच्या उद्योगाचं प्रेझेंटेशन द्यायचं म्हणजे अवघडच आहे. >>>> खरं आहे, ते प्रेझेंटेशन पहायला जेवढा त्यांचा वेळ लागेल त्याची किंमत त्यांच्याकडून अपेक्षित असलेल्या गुंतवणुकी पेक्षा जास्त असेल. त्यामुळे ते जर म्हणाले कि पैसे घेऊन जा, परत करू नको, पण हे प्रेझेंटेशन नको तर ते त्यांना फायद्याचे ठरेल.
भारतात सुद्धा थेट पणे सांगतात. पण त्यावरून शार्कना रोस्ट केलं जातं. >>>> भारतात फक्त अशनीर ग्रोवर सांगायचा आणि शादी डॉट कॉम वाला कधीतरी. बाकीचे शक्यतो इतर कारणे सांगत बसायचे, इसमे मेरी एक्स्पर्टीज नही है, अँड फॉर द्याट रिजन एम आउट.
भारतात एकाने सार्वजनिक पाणी, दारू पिताना ग्लास ला ओठांचा स्पर्श होऊ नये म्हणून एक प्लास्टिकचे पट्टीसारखे उपकरण (?) तयार केले होते. त्या भागात अशनीर ने त्याची खूप खिल्ली उडवली होती.
माबो वाचक
माबो वाचक
अशनीर स्पष्ट सांगत असेल. पण तो अपमानास्पद बोलतो. स्पष्ट सांगणं वेगळं.
मी आता पाहिलेल्या एपिसोड मधे बिझनेस का चालणार नाही हे सुद्धा सांगितलेलं पाहिलं आहे.
मला यातलं कळत नाही असं सांगण्यात काहीच चूक नाही.
एखादा बिझनेस अर्ध्या पाऊण तासात जज्ज करून त्यात इन्व्हेस्टमेंट करणं किंवा त्याला मोडीत काढणं हे जास्त आव्हानात्मक काम आहे.
निर्णय चुकू शकतो.
देसी वूडचा एपिसोड बघा. त्यात त्याला जनता का मार्शल स्पीकर बनाया है असं सुनावलं. मार्शल स्पीकरचा लुक कॉपी करून धंदा करत असशील तर तो त्यांच्या पेटंट्सचा भंग आहे हे ही सांगितलेलं.
अर्ध्या पाउण तासात आपल्या
अर्ध्या पाउण तासात आपल्या समोर येतात. त्याआधी त्यान्च्या २-३ राउन्ड्स झालेल्या असतात.
रेडी टु ड्रेप साडी विथ पॉकेट हि माझि मैत्रीण आहे. तिला बोट वाल्याकडुन २५ लाखाची गुन्तवणुक मिळाली
रेडी टु ड्रेप साडी विथ पॉकेट
रेडी टु ड्रेप साडी विथ पॉकेट हि माझि मैत्रीण आहे >>> ग्रेट प्रॉडक्ट. गेम चेंजर आहे. पाहिलाय तो एपिसोड.
भ्रमर ,तुम्ही जो प्रश्न
भ्रमर ,तुम्ही जो प्रश्न विचारला होता तो आधी अस्थानी वाटला होता , म्हणजे प्रेरणा घ्यायला काय हरकत आहे म्हणून.
पण आता पाहिलं, वाचलं त्यावरून स्टार्ट अप्सची अवस्था हा गंभीर प्रश्न आहे.
भारतातल्या स्टार्ट अप पैकी २००० स्टार्ट अप बंद पडले. तर १०० स्टार्ट अप्स युनिकॉर्न बनण्यात यशस्वी झाले. यातले १५% युनिकॉर्न्स नफ्यात आहेत.
बायजु मधे आधी नोकरकपात आणि आता सगळाच डोलारा कोसळला. शेअरचेटने २०% कामगार अचानक काढून टाकले. अशा प्रकारे स्टार्ट अप्समधून रोज १६०० नोकर्या गमावण्याची पाळी येते.
झोमॅटो ही स्टार्ट अप कंपनी युनिकॉर्न बनली. तिने दहा हजार कोटी रूपयांचा आय पी ओ आणला. तो यशस्वी पण झाला. तरी देखील झोमॅटो वर ते फक्त २२५ शहरातच सर्व्हिस देणार. झोमॅटो हे उदाहरण आहे. कारण याच शहरात त्यांचा कस्टमर आहे.
टू टीअर किंवा थ्री टीअर शहरातला कस्टमर हा स्टार्ट अपकडून गृहीत धरला जातो. पण त्याची क्रयशक्ती कमी आहे. तसेच थोडी जास्त किंमत या शहरात चालत नाही. ही प्राईस सेंसिटिव्ह शहरं आहेत.
क्विक कॉमर्स कंपन्यांना सध्या एक समस्या भेडसावतेय. ती म्हणजे कस्टमर अॅक्विझिशन कॉस्ट टू सेल रेशो. हा तीन पट योग्य समजला जातो. पण यांचा दीड सुद्धा नाही. सीएसी म्हणजे मार्केटिंग साठी ते थ्री टीअर शहरात डिस्काउंट देतात. पण डिस्काउंट संपले कि कस्टमर जवळच्या वाण्याच्या दुकानात जातो. त्याच्या डोक्यात क्विक कॉमर्स म्हणजे डिस्काउंट हे पक्के बसलेले आहे.
थोडं जे प्रिमिअम मार्केट आहे ते फक्त दहा ते बारा शहरात आहे. हा अभ्यास नसल्याने स्टार्ट अप बुडतात.
१४० कोटी लोकसंख्या ।आ आकडा गृहीत धरल्याने असं होतं.
एका सर्वेनुसार भारतात मध्यमवर्ग फक्त २% आहे. या मध्यमवर्गाची व्याख्या महिना २५ हजार ते ४५ हजार अशी केली आहे.
झोमॅटोकडे वळूयात. त्यांचा साठ टक्के रेव्हेन्यू फक्त ८ शहरातून येतो. ८०० शहरात त्यांना रेव्हेन्यू मिळत नाही.
मोदींना एका अर्थतज्ञाने जीडीपी वाढवण्यासाठी जो रिपोर्ट सादर केला आहे त्यात भारतियांचं उत्पन्न २५००० रूपये महिना नेण्याचं उद्दीष्ट सुचवलं आहे. म्हणजे जीडीपी वाढेल. जीडीपी हा फक्त मूठभर लोकांवर अवलंबून आहे.
हे वास्तव भयंकर आहे.
तरी सुद्धा शार्क टँक हा
तरी सुद्धा शार्क टँक हा कार्यक्रम आवडतो. २००० स्टार्ट अप बुडाले असले तरी १०० यशस्वी झालेच ना ? म्हणजे कुठला धंदा भारतात यशस्वी होईल याचा आडाखा बांधून उतरलं तर यशस्वी होता येईल. पूर्वी असं फंडिंग मिळत नव्हतं. तसंच धंदा शिकवणारा असा कार्यक्रम पण नव्हता. एखाद्याला जरी फायदा झाला तरी चांगलेच आहे. शार्क्सने पैसे गुंतवले तरी त्या स्टार्ट अपला बूस्ट मिळेल. त्यांचं नाव, नेटवर्क वापरता आलं तर पुढे जाता येईल. अर्थात त्या बिजनेस मधे दम असावा.नाहीतर आडात नाही तर अशी गत होईल. ज्या धंद्याला स्कोप नाही त्यात शार्क्स आले काय न आले काय तो चालणारच नाही.
Pages