दार्जीलिंग सहल - भाग २ - रॉक गार्डन

Submitted by दिनेश. on 9 March, 2016 - 06:28

दार्जीलिंग सहल - प्राथमिक माहिती http://www.maayboli.com/node/57963

दार्जीलिंग सहल - भाग १ प्रयाण आणि डेकेलिंग रिसॉर्ट http://www.maayboli.com/node/57965

आम्ही मुंबईहून अगदी पहाटेच निघालो होतो आणि तो सर्व दिवस प्रवासातच गेला होता, त्यामूळे दुसर्‍या दिवशी जरा निवांत उठायचे असे ठरवले होते. पण तिथले वातावरण एवढे जादुई होते कि अंथरुणात लोळणे मला रुचण्यासारखेच नव्हते.

रात्रीची फायरप्लेस बराच वेळ जळत होती, शिवाय हीटरही होता, त्यामूळे छान झोप झाली. अंघोळीलाही गरम पाणी मिळाले ( या सर्व गोष्टी तिथे अत्यावश्यक आहेत, काही हॉटेल्स त्या देऊ शकत नाहीत. )

ब्रेकफास्टची ऑर्डर दिली पण त्याला थोडा वेळ लागणार होता म्हणून खाली उतरून रस्त्यावर गेलो. प्रचंड उतार आहे तिथे ते जाणवलेच. गाव नुकतेच जागे होत होते. तिथली स्थानिक माणसे नेपाळी तोंडावळ्याची असली तरी नाकी डोळी नीटस आहेत. . परदेशात पर्य्टकाना जसे आपणहून ग्रीट केले जाते, तसे मात्र तिथे नव्हते..

ब्रेकफास्टला ब्रेड टोस्ट, बटर मार्मलेड एवढेच होते. सोबतीला भरपूर चहा. दार्जीलिंगची संत्रीही उत्तम चवीची असतात पण त्यांचा सिझन थोड्या दिवसांचाच असतो. मार्मलेड बहुदा त्यांचीच होती.

आम्ही साडेनऊला संदीपला बोलावले होते, तो वेळेवर हजर झाला. आजचा पहिला टप्पा होता रॉक गार्डन. दार्जीलिंग पासून जवळच हे रॉक गार्डन आहे. दोन डोंगरांच्या खोबणीतून टप्प्याटप्प्याने उतरणारा एक ओहोळ
आणि त्याच्याशी आटापाट्या खेळत वर जाणारी वाट, असे याचे स्वरुप. बरीच उंची गाठल्यावर हि वाट त्यापैकी एका डोंगराच्या दुसर्‍या बाजूला जाते आणि तिथे दुसर्‍या ओहोळाच्या साथीने खाली उतरते.

आपण बरीच उंची गाठत असलो तरी हि वाट दमछाक करणारी नाही. आल्हाददायी हवामानामूळे थकवाही येत नाही. ओहोळाचे पाणी बर्फासारखे थंडगार असल्याने त्यात डुंबायचा प्रश्नच नाही. इथेच नेपाळी ड्रेस घालून फोटो काढायची सोय आहे पण मग मात्र विक्रेत्यांचा काच नाही. तळाशीच काही टपर्‍या आहेत आणि तिथे
थोडेफार खाणे पिणे मिळू शकते.

या गार्डनची सुरवात दरीच्या खालच्या टोकापासून होत असल्याने तिथे जायचा रस्ता फारच उताराचा आहे. एका बाजूला चहाचे मळे आणि दुसर्‍या बाजूला खोल दरी. शिवाय अत्यंत धोकादायक वळणे ( व्हर्टीगोचा त्रास
असणार्‍यांनी जपून )

या रॉक गार्डनची वाट आणि तळाशी असणारी काही झाडे सोडल्यास सर्व नैसर्गिकच आहे. तिथली फुलेही
नैसर्गिकच त्यामूळे काही खास रानफुलांचे फोटो मिळाले.

१) जायची वाट

२)

३) रॉक गार्डन चे पहिले दर्शन

४)

५) हिच ती कातळावरची फुले !

६)

७) समोरचा डोंगर.

८)

९)

१०)

११)

१२)

१३)

१४)

१५) उजवीकडच्या फुलांच्या पाकळ्यांचा रंग चक्क धुवून गेला होता !

१६) बहरू लागलेला र्‍होडेंडीयमचा वृक्ष ( आपल्या हिमालयाची खासियत )

१७)

१८)

१९)

२०)

२१) ही सर्व झाडे नैसर्गिकरित्याच वाढलेली आहेत.

२२)

२३) वरून खाली बघताना लक्षात येते आपण किती उंचीवर आलो ते.

२४)

२५)

२६)

२७)

२८)

२९)

३०) एका फर्नच्या झाडाच्या कोवळ्या पानांचा, बेबी गोरीलासारखा आकार झाला होता.

३१)

३२)

३३)

३४) आपण अगदी त्या डोंगराच्या माथावर जात नाही. आपण जातो त्यापेक्षाही बर्‍याच वरून तो ओहोळ येताना दिसतो.

३५)

३६)

३७)

३८)

३९)

४०)

४१) ही एकाच झाडाला लागलेली फुले आहेत. आकाराने फारतर दीड सेमी व्यासाची

४२)

४३) अनोळखी पक्षी !

४४)

४५) पंचवटी ( किंवा जे काय असेल ते !! )

४६)

४७)

४८)

४९)

५०) रॉक गार्डनच्या समोरच्या बाजूला हे कारंज आहे.

५१)

५२)

५३) त्या वरच्या गुलाबी फुलांच्या झाडाचे पान ( माझ्या हाताच्या तूलनेत त्याचा आकार पहा )

५४)

५५)

नेमके कुठल्या ते मुद्दाम सांगत नाही, पण वरीलपैकी काही फुलांचे फोटो मी मायक्रोमोड वापरून काढलेले आहेत.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव..हे ही फोटो सुरेख आहेत. बेबी गोरिला.. अगदी खरं.. Happy

खाण्याचे असे का हाल आहेत.. टूरिस्ट सीझन नसल्यामुळे का??

वर्षू, ती प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. तिथे रेग्यूलर किचन नाही. ऑर्डर दिली तर घरून बनवून आणून देतात. पण खाली उतरल्यावर मात्र भरपूर चॉईस आहे.

हो जिप्सी, तेच ते ( मला भारतीय नाव आठवत नव्हते ) हे झाड मूळात आपलेच पण इथून जगभरातील संग्राहकांनी नेले. याचे सुंदर कलेक्शन मी न्यू झीलंडला बघितले. तिथे याचे विविध रंग बघायला मिळतात.

वाह, सर्व फुलांचे फोटो केवळ सुंदर.

बेबी गोरीला, अनोळखी पक्षी हे तर विशेष सुंदर.

अशा नैसर्गिक सुंदरतेला या कृत्रिम कारंजे वगैरेने बाधा येते असे माझे वै मत. Happy

सहल हळुहळू अतिशय रंगतदार, मनमोहक होत चाललीये की !! Happy

सगळेच फोटो सुंदर पण ती ३९ मधली पिवळी फुल फार आवडली. एखाद्या छोटीच्या स्वेटरची बटण शोभावित Happy

वा! रंगांची नुसती बौछार आहे. ' फागुन आयो रे ' शीर्षक द्यायला हवे होते. फक्त एकदोनच पाकळ्यांवरच गुलाबी स्प्रे पेंटिंग केल्यासारखी मोतिया रंगाची फुले आणि छोटा छबुकला पक्षी खूप गोड .

क्लास ..
फुले कसली मस्त मस्त आहे.. आणि काही पाना फुलांचे आकार तर मार्व्हलस..
पहिला फोटो बघुन पि एस आय लव्ह यु आठवला..
तिथं आपली कंबरमोडीची फुलं बघुन छान वाटलं..
त्याखालची २७ नं दगडफुलासारखं दिसतयं..
तो पक्षी कसला फुरंगटून बसल्यासारखा वाटतोय Wink
डोळे सुखावले रान्फुले बघुन.. Happy _/\_

दिनेश....

~ कातळफुलांच्या सौंदर्याने तर वेडावून गेलो असेच म्हणेन...त्या प्रचित्रावरून नजर हटेना. ही चित्रे मनाला जर इतकी आनंद देत आहेत तर तुम्ही तर प्रत्यक्ष त्यांच्या सहवासात राहिला म्हटल्यावर तुमचे मनही किती भरून गेले असेल समाधानाने, हे समजून येते.