LIC मधे चाळिशीनंतर गुंतवणूक करायची असल्यास योग्य की अयोग्य?

Submitted by हर्ट on 7 March, 2016 - 06:48

LIC चे असे काही प्लान्स आहेत का जे ४० पेक्षा वय असलेल्या व्यक्तिला उपयोगी ठरू शकतील?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

युलिपमध्ये जीवन विमा (तुमचं काही बरंवाईट झालं तर मागे राहिलेल्यांना लॉटरी) आणि गुंतवणूक (तुम्ही भरलेले पैसे थोडेफार वाढवून , क्वचित घटवून मिळणं) हे दोन प्रकार एकत्र केलेले असतात.

गुंतवणूक सुद्धा कर्जरोख्यांत किंवा शेअरमार्केट मध्ये करायचे पर्याय असतात.

मी आत्ता एल. आय. सी. च्या टर्म पॉलिसीबद्दल वाचले आहे.

LIC's e-Term policy is a pure life cover policy. Under this insurance policy, against payment of regular premium, the insurer agrees to pay your beneficiaries the sum assured in event of your premature death during policy term. However, if you survive till the end of the policy term, nothing is payable to you.

ह्या प्लान्सचा तोटा हा आहे की सुदैवाने तुम्हाला काहीच झाले नाही तर तुमच्या वयाच्या अमुक अमुक वर्षी (५०/६०/७०) तुम्हाला काहीच पैसे परत मिळणार नाही. मग तुम्ही भरलेले सर्व मासिक हप्ते वाया जाणार. पण जर मधे काही झाले तर कुटुंबियांना एक घाऊन रक्कम मिळेल.

मला तरी हा प्लान फार आवडला नाही. तुम्ही जर महिन्याचे ५० हजार समजा भरत असाल तर आणखी २५ वर्षांनी तुम्ही १२ लाख ५० हजार रुपये भरले असाल. मग ते पैसे असेच वाया जातिल.

हा प्लान्स घेणारे इथे कुणी आहेत का? आपले पैसे वाया जाणार ह्याची काळजी नाही वाटत का जरी ह्या प्लान्स चा मरणोत्तर फायदा मिळत असेल तरी.. ?

खरा लाइफ इन्शुरन्स म्हणजे टर्म प्लान.

तुम्ही काहीएक प्रीमियम देऊन तुमचा विमा उतरवायचा. ठरावीक वयाचे होईतो खपलात तर वारसांना ठरलेली रक्कम मिळेल. ते वय गाठेतो काही झालं नाही, तर काही मिळणार नाही.

आधी टर्म आणि एन्डोमेंट असे दोन प्रकार असायचे.
एन्डोमेंटमध्ये अशा विम्याच्या जोडीला मुदतपूर्तीच्या वेळी तुम्ही जिवंत असाल तर काही रक्कमही परत मिळायची. पण ही रक्कम बहुतेक स्पष्टपणे किती ते ठरलेली असायची.
युलिप्स बहुतेक मार्केट लिंक्ड असतात. म्हणजे शेअर मार्केटप्रमाणे त्यांची रक्कम वरखाली जाऊ शकते. तसंच मुदतीआधी बाहेर पडायची सोयही आजकाल सगळ्याच गुंतवणूक प्रकारांत असते, जी आधी फारशी नसे.

धन्यवाद भरत सर.

विमा उतरवणे म्हणजे काय ते सोपे करुन सांगाल का?

आणि जसा टर्म प्लान आहे तसा लाईफ प्लान पण आहे का? की टर्म लाईफ प्लान असा एकच प्लान आहे?

बी सर ,लाइफ प्लान म्हणजेच टर्म प्लान.

विमा उतरवणे म्हणजे काही अघटित घडलं तर नुकसानभरपाईची सोय विमा कंपनीमार्फत करणं.
म्हणजे तुम्हाला काही झालं तर तुमच्या वारसांना तुम्ही ठरवलेली रक्कम मिळून त्यांचं आर्थिक भविष्य सुरक्षित ठेवणं.

विमा आयुष्याचा उतरवता येतो, घर, वाहने यांचा उतरवता येतो. अपघाताबाबत, आरोग्याबाबत आणि व्यवसायाबाबतही उतरवता येतो.

छान सोपे करुन सांगितले अगदी. त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही मला हे ज्ञान दिले म्हणून मी तुम्हाल सर म्हंटले. मी तुमचा विद्यार्थी इथे. म्हणून मला सर वगैरे म्हणून लाजिरवाणे करु नका.

सर्वांचे धन्यवाद.

अजून अभ्यास करतो आहे. वाचन सुरु आहे. तुम्ही जी काही उत्तरे लिहिलीत त्याचे वाचन करुन आकलन करण्याचा प्रयास करत आहे. मुळात परिभाषा जितक्या अगम्य वाटतात तितक्याच त्या समजायला किचकट वाटतात. पण एक दोन सोपे उदाहरणे घेऊन शिकलो तर चटकन कळतात.

मयेकर +१ सगळ्या पोस्टींना

बी...

तुम्हाला नक्की काय करायचय?
तुमच्या लाईफ वर जीवन वीमा काढायचा आहे की पुतणीच्या?
तुमच्या वर वीमा काढला तर तुम्ही ती पॉलीसी पुतणी किंवा इतर कोणालाही नॉमिनेट करु शकता. त्या करीता तुमचे वय जर ४०+ असेल तर टर्म इंशुरन्स घेणे चांगले. म्हणजे तुमच्या मरणा नंतर वारसांना ती रक्कम मिळु शकते. वारसांचे वय लक्षात घेता विम्याची रक्कम ठरवता येते. उदा. जर वारस २० ते ३० वयात आहे तर साधारण २ कोटी चा विमा उतरवला तर तुम्ही मेल्यावर त्यांना २ कोटी मिळतिल. तुमचे अत्ताचे वय जर ४५ ते ५० धरले तर साधारण वर्षाला ६० ते ७० हजार प्रिमियम येइल. टर्म इंशुरन्स ला वय जितके लहान तेवढा प्रिमियम कमी. इकडे जी कमावती लोकं आहेत ज्यांच्यावर फॅमिली अवलंबुन आहे, लोन आहे त्यांनी टर्म इशुरंन्स काढावा. एचडीएफ्सी... झकास आहे. त्या बाबतीत एल.आय.सी. मधे दम नाही...

पुतणी कितीही वयाची असली तरी तिचा इंशुरन्स महणजे तिच्या वरसां साठी केलेली तरतुद..... त्याचा तिला काय फायदा?
त्यापेक्षा चांगल्या म्युचल्फंडात पैसे ठेवल्यास व गरजे प्रमाणे फिरवल्यास ( दर ३ महिन्यांनी बघायचे.. मार्केट वर तर कमी इक्क्वीटी जास्त डेट.... मार्केट पडलेले तर जास्त इक्वीटी कमी डेट) अगदी १७ ते २० % किंवा कधी कधी खुप जास्त ( ३०--४०% सुध्धा) परतावा मिळु शकतो. अगदी फिरवले नाही तरी १२ ते १३ % सहज मिळतात......

कोणतीही इंशुरन्स कंपनी काहीही केलं तरी १२ % पेक्षा जास्त परतावा देवु शकत नाही. खुप चांगला फंड मॅनेजर असेल तरच हे शक्य आहे. बहुतांशी सगळ्या पॉलिस्या ( कोणताही प्लॅन असो) ८ ते १० % पेक्षा जास्त देवु शकत नाही. एखादा प्रिमियम माफ होणे वगैरे शुल्लक गोष्ती आहेत. असे अनेक प्लॅन एल.आय.सी. मधे आहेत जे गंडलेले आहेत. ते जर विकले तर एजंट ला कमीशन जास्त मिळते. मग ते कमीशन तो क्लायेंटला लालुच दाखवायला पास करतो. पर्यायाने त्याचा धंदा वाढतो.

युलिप पॉलिसीज एकदम नीट पाहुन कराव्यात. माझी बिर्ला सन्लाईफ मधे खुप गोची झाली होती. कसेबसे थोडास्सा प्रॉफिट घेवुन बाहेर पडले. नीट पारखुन घ्यायला हवी. अत्ता खुप छान छान वाटत.... नंतर आपण गंडलो आहोत ते कळत

भरत म्हणाले ते " भरतवाक्य" लक्षात ठेवा...... इंशुरन्स ही गुंतवणूक नाही.......

मॅचुरीटी वर मिळणारा बोनस वगैरे बोगस शब्द आहेत. कारण शेवटी कोणत्याही लोन मार्केट मधे कोणालाही १० ते १२% पेक्षा जास्त परतावा देणे परवडणारच नाही!!!!

माझ्या नवर्‍याला व मला वडिलांनी लग्नाच्या वेळी २ लाख प्रत्येकी च्या २० वर्ष टर्म असणार्‍या दोन पॉलिसी गिफ्ट केल्या. आज २० वर्षांनी आम्हाला प्रत्येकी ३३७,००० मिळणार आहेत. आम्ही दोघांनी २० वर्ष त्याचा प्रिमियम भरला.त्यावेळेस १९९६ ला मला ८००० पगार होता आणि नवर्‍याला १५००० तेंव्हा हे आकडे आकर्षक वाटले. कारण तेंव्हा आम्ही ८ लाखात घर घेतलं होतं.

त्याच वेळी माझ्या गुजराथी सरांनी ( जिथे मी सी.ए. करत होते) लग्नाचे गिफ्ट म्हणुन मला टाटा मोटर्स चे शेअर दिले होते ज्याची तेंव्हाची किंमत सधारण ५१०० होती. सध्याची त्याची किंमत ३५ ते ४० हजार आहे.. बोनस शेअर धरुन!!!!!

सरळ हिशोब आहे..... अगदी रुपयाची आजची किंमत, विम्याच्या हप्त्या चा वार्षिक भरणा, त्याने मिळणारा रेस्टींग पिरीयेड, वगैरे...वगैरे... जरी धरलं तरी ही शेअर्स मधली गुंतवणू़ नक्कीच चांगली. परत ते तुम्ही कधीही विकु शकता. तारण ठेवु शकता.... पॉलिसी चे तसे नाही.... ती डेड इन्वेस्ट्मेंट आहे.....

<<विमा आयुष्याचा उतरवता येतो, घर, वाहने यांचा उतरवता येतो. >>
---- कशाचाही विमा उतरवता येतो... जुलिया रॉबर्ट्‌स या अभिनेत्रीने तिच्या स्मितहास्याचा विमा उतरवला आहे असे वाचल्याचे लक्षात आहे. तसेच अनेकान्नी त्यान्ना शरिराच्या विविध भागान्चा देखिल विमा घेतला आहे... असो.

बी - तुम्ही भारतात आहात का ? भारतात प्रत्येक प्रमुख शहरात LIC चे (किमान एक) कार्यालय आहे. LIC चे ऑफिस गाढायचे आणि एकाद्या चान्गल्या एजन्टला गाढायचे. पुढील सर्व माहिती त्या एजन्टला द्यायची
(अ) तुमचा पॉलिसी घेण्याचा उद्देश काय आहे
(ब) तुमची आर्थिक परिस्थिती, तुम्ही महिना किती $$ रुपये गुन्तवणार आहात
(क) तुमच्या गरजा आणि अपेक्षा
(ड) किती काळासाठी तुम्हाला विमा हवा आहे...

तो तुम्हाला २-३ पॉलिसी सान्गेल. बहुतेक वेळा ज्यात त्यान्ना जास्त कमीशन आहे त्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करेल. दुसर्‍या एकाचा पण सल्ला घेणार आहात याची त्याला जाण द्यावी म्हणजे तो निव्वळ कमिशन्वर डोळा ठेवणार नाही.

प्रत्येक पॉलिसीची विस्तृत माहिती LIC च्या सान्केतिक स्थळावर आहे. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते, मी ज्या परिस्थितीत एखादी पॉलिसी घेतली असेल (एजन्टच्या मताला डावलुन) तशी परिस्थिती (आणि मानसिकता) दुसर्‍या कुणाची असेलच असे नाही.

हा महत्वाचा निर्णय घेण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा.

आधी तुम्हाला स्वतःला तुमचा विमा उतरवायची गरज आहे का हे तपासा?

या वयापर्यंत बर्‍याच जणांकडे बर्‍यापैकी गंगाजळी साठलेली असते. तुमच्यावर अवलंबून असलेल्यांपैकी तुमच्या पालकांच्या गरजा भागवायला ती पुरेशी असते. पुढच्या पिढीतले लोक असतील तर ते आता कमावते होण्याच्या वाटेला असतील.

घ्यायचाच झाला, तर त्याची रक्कमही ठरवावी लागेल. ती ठरवताना पुन्हा, तुमच्या गंगाजळीचा विचारही करा. तेवढी रक्कम वजा करा.

एजंटला मला टर्म प्लानच हवा हे ठणकावून सांगायला हवे. र तुमचे वय व अन्य बाबी तपासून किती रकमेच्या विम्यासाठी किती प्रीमियम पडेल हे सांगायची सोय नेटवर आहे.

मीरा, मला माझ्यासाठी आणि पुतणीसाठी दोघांसाठी एल. आय. सी. मधे चांगले प्लॅन्स असतील तर घ्यायचे आहे. पण पैसे परत न मिळण्याचा प्लान मला आवडला नाही. मला असा प्लॅन हवा आहे ज्यात आपण हयात असताना एक रक्कम आपल्याला कुठल्याही परिस्थितीमधे मिळेलच मिळेल.

उद्य नाही मी भारताबाहेर आहे.

खूप छान माहिती मिळत आहे पण ती आकलन व्हायला माझी मति कमी पडत आहे.

पैसे परत हवेतच? मग तुम्ही कोणत्याही विमा कंपनीकडे न जाता म्युचल फंड, बँक, पोस्त ऑफिस यांच्याकडे जा. इन्शुरन्स कंपन्यांकडे जाल तर फक्त एजंटचं भलं होईल.

मात्र आयुर्विम्याला पर्याय नाही. तुम्हाला आवडत असो वा नसो. तुम्ही कमावते असाल व तुमच्यावर अवलंबून असणारे कोणी असतील तर विमा हवाच. तुम्हाला काही झालं, तरी त्यांच्या आर्थिक गरजा भागल्याच पाहिजेत. पण आधी लिहिलं तसं, तुम्ही पुरेशी (सापेक्ष) गंगाजळी जमवली असेल, तर नाही घेतला तरी चालेल.

पैसे परत हवेतच? मग तुम्ही कोणत्याही विमा कंपनीकडे न जाता म्युचल फंड, बँक, पोस्त ऑफिस यांच्याकडे जा. इन्शुरन्स कंपन्यांकडे जाल तर फक्त एजंटचं भलं होईल.>>>> पीपीएफ हा देखील एक चांगला पर्याय आहे.मात्र १५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पैसे मिळतात.मधे गरज लागल्यास ३ वर्षे पूर्ण झाल्यावर ठराविक रक्कम कर्ज म्हणून काढू शकतो.

<<पीपीएफ हा देखील एक चांगला पर्याय आहे.>>
---- NRI साठी PPF योजना नाही आहे. भारतात राहुन, भारतात कमावलेला पैसा गुन्तवता येतो.

भारतात असताना PPF सुरु केले असेल, आणि नन्तर काही वर्षान्नी NRI बनले असाल तर १५ वर्षे पुर्ण करायची आणि मग खाते बन्द करायचे. बाहेरच्या देशात कमावलेला पैसा PPF मधे गुन्तवता येत नाही (ते धोरण योग्य आहे) असा माझा समज आहे.

मला ह्याबद्दल गाईड कराला का?

मी २ वर्षापुर्वी Manu Life चा एक प्लान घेतला. ह्यामधे मला दर महिन्याला २०० (१०,००० भारतीय रुपये) सिंगापुर डॉलर भरावे लागतात. अजून १७ वर्षांनी मी अ‍ॅट बार्/ऑन पार असेल. म्हणजे मी जेवढे पैसे भरले तेवढेच माझ्या खात्यात असतील. सध्या मी ४८०० डॉलर भरले आहेत पण मी जर आत्ता हे पैसे काढले तर त्याची किंमत फक्त ८०० डॉलर इतकीच आहे. ह्या प्लान मधे एकूण ३० आजार क्व्हर केले आहेत. त्यातला कुठलाही एक आजार जर मला झाला तर मला १५०,००० सिंगापुर डॉलर मिळतील. जर मधेच मला काही झाले तर माझ्या आईलाच फक्त १५०, ००० ही रक्कम मिळेल कारण मी अविवाहीत आहे. इतर कुणाला नॉमिनेट करु शकत नाही. वडील नाहीत. भाऊ बहिण पुतणी भाचे चालत नाहीत नॉमिनेशनला. जर मी २० वर्षांनी हा प्लान रद्द केला तर मला साधारण १० ते २० हजार डॉलर जास्त मिळतील.

मी जेंव्हा हा प्लान घेतला त्यावेळी जी मुलगी होती ती एक मराठी मुलगी आणि माझी आणि तिची उत्तम मैत्री होती म्हणून तिने मला घेच घेच म्हणत शेवटी मी तो घेतलाच. पण आता मला थोडी अक्कल आली आहे आणि मी जे केले ते चुक की बरोबर? माझा हा प्लान योग्य की अयोग्य ह्याबद्दल विचार करताना माझी खूप तारांबळ उडत आहे.

मी हा प्लान ठेवावा की मोडावा?

त्यातला कुठलाही एक आजार जर मला झाला तर मला १५०,००० सिंगापुर डॉलर मिळतील.>> हा हेल्थ इन्शुअरन्स आहे का? तर ते वेगळे चक्र आहे. हेल्थ इन्शुअरन्स असेल तर ठेवला तर ठीक कारण ५० ते ६० ह्या वयात आजार होण्याचे चान्सेस वाढतात आपले. जरी तब्येत चांगली असली तरीही लॉ ऑफ अ‍ॅवरेजेस कॅन कॅच अप. तर तेव्हा आपल्याला काही एक सेफ्टी नेट हवे. नाहीतर अ‍ॅडमिट करताना पार रूम रेंट पासून हजामत करते हेल्थ सिस्टिम. तुम्ही परदेशात व एकटे असल्याने ती तरतूद महत्वाची आहे. शिवाय तुम्हाला प्री/ पोस्ट ऑप हेल्थ केअर, केअर अ‍ॅट होम पण लागू शकते ते त्या हेल्थ इन्शुअरन्स मध्ये कवर आहे का ते ही बघून घ्या. नसेल तर त्याची तजवीज करून ठेवा हेल्दी असतानाच.

मध्येच काही झाले ह्यात सिव्हीअर हार्ट अ‍ॅटॅक, किडनी व मेजर ऑर्गन्स फेल्युअर, किंवा अपघात हे आले. तर अ‍ॅक्सि डेंट कव्हर आहे का ते देखील तपासून घ्या. हा सर्व विचार करताना अगदी हलून जायला होते पण मजबूरी है. वरना कोई और अपने लिये सोचेगा नही. आपल्या नंतर घरच्यांचे काय ही आपली इमोशन वापरून इन्स्युअरन्स वाले बरोब्बर काय पण गळ्यात अडकवतात.

दुसरे म्हणजे जी पंचविशीची मुलगी आहे तिला रेग्युलर इन कम चे साधन आहे का? जसे नोकरी?
ते ती करणार आहे का नाहीतर लग्न झाले व सो डली असे झाले तर तिचा होणारा पती ते प्रीमीअम भरेल का कटकट करेल? ४६के खूप असतात.

माझ्य एजंट ने एक फर्स्ट क्लास स्कीम आणली होती मुलीच्या साठी त्यात ती ३५ची होईपरेन्त प्रीमीअम भरायचे होते वगैरे. ती अजून भुईत आहे. व चित्रपट निर्मिती सारख्या अनसर्टन इनकम असलेल्या क्षेत्रात काम करणार आहे. तिच्या कडे दर महिन्याला प्रीमीअम भरायला पैसे असतीलच असे मी कसे सांगणार म्हणून मी कमिट केले नाही. त्या ऐवजी सिंगल प्रीमीअम पॉलिसी घेतली आहे ज्यात तिलाच
वाढ दिवसाच्या आसपास दर पाच वर्शांनी कायतरी मिळेल. इफ यू हॅव लूज चेंज सिंगल प्रीमीअम मध्ये अडकवावी किंवा भरतवाक्य प्रमाणं डेट फंड, एन एस सी. इत्यादि कन्सिडर करा.

अमा, पहिला दुसरा उतारा छान माहिती. बहुतेक अपघात कव्हर आहे. प्री पोस्ट काय ते विचारावे लागेल. मला ह्यात रायडर पण आहे. नक्की रायडर काय ते माहिती नाही पण रायडरचा फायदाच असतो.

दुसरे म्हणजे जी पंचविशीची मुलगी आहे तिला रेग्युलर इन कम चे साधन आहे का? जसे नोकरी?
ते ती करणार आहे का नाहीतर लग्न झाले व सो डली असे झाले तर तिचा होणारा पती ते प्रीमीअम भरेल का कटकट करेल? ४६के खूप असतात.>> हो ती नोकरी करते. वर्ष होत आहे नोकरीला लागून. नंतरही नोकरी करणार आहे पण पुढे मुल झाली की आपले प्राधान्य क्रम बदलतात.

Bee,
Dont go for Life Insurance + ULIP. Go for Term Insurance.
Term Insurance Premium is not much as compared to endowment policies.

If u want the money back, then go for MFs. Mutual Funds will give u more returns depends on how u invest it. MF has 3 types. Equity, Balanced & Debt.

हा प्लान्स घेणारे इथे कुणी आहेत का? आपले पैसे वाया जाणार ह्याची काळजी नाही वाटत का जरी ह्या प्लान्स चा मरणोत्तर फायदा मिळत असेल तरी.. ?>>>>>>>>>>>>>

मी टर्म इन्शुरन्स घेतला आहे. वयाच्या 30 व्या वर्षी काढला, LIC चा.

आधी 2 एन्डोवमेंट प्लॅन चे पैसे भरत होतो. त्या दोन पॉलिसीचे जितके हप्ते जात होते तितक्याच रुपयांमध्ये मला मी मेलो तर माझ्या घरच्यांना आधीच्या पॉलिसी पेक्षा दुप्पट रक्कम देणारी पॉलिसी मिळाली.

माझे लॉजिक:- आपण जे पैसे भरतो त्यावर पॉलिसी mature झाली कि मिळणारा परतावा, बोनस, रुपयाचे अवमूल्यन (मिळणार्या रकमेची त्या वेळेसची किंमत) याचा काहीच ताळमेळ बसत नाही. तेवढे पैसे दर महिन्याला दुसरी कडे गुंतवले तर जास्त परतावा मिळेल
विम्याचा फायदा मी मेलो तरच आहे. तर मग कमीत कमी हप्ते भरून जास्त पैसे देणारी टर्म पॉलिसी जास्त उपयोगी आहे.

साधे उदाहरण घ्या आई वडिलांनी त्यांच्या तरुणपणी विमा काढला, त्याचा हप्ता, आणि आता त्यांना मिळालेली रक्कम. त्या रकमेचे आताचे बाजारमूल्य किती आहे?

मी हे tax बाबतीत हे वाचले ते इंशुरन्स संपताना जाणून घेणे गरजेचे आहे.

Tax Benefits

Insurance Policy – Sec 10(10D)
As per Section 10(10D) of the Income Tax Act, 1961, any sum received under a Life Insurance Policy, including the sum allocated by way of bonus on such policy is exempt from tax.

Also As per:-- Under the Finance Act 2012 the exemption under Sec 10 (10D), on benefits you receive under life insurance policies issued on or after 1st April, 2012, shall be available only if the premium payable in any of the years is not more than 10% of the Sum Insured. & in the above details we are also eligible for the Tax benefit.

तसेच कोणी max चा टर्म प्लान घेतला आहे का? तो कसा आहे.
कोणी मला mediclaim विषयी सांगू शकेल का..
सध्या मला 5lac कंपनी कडून मिळतो तो २+२ साठी योग्य आहे का?
पूर्वी मी LIC चा कोमल जीवन मुलांसाठी घेतला होता त्याचे आत्ताचे इतर प्लान compare करता मला कमी मिळतात असे वाटते.. कोणी या बद्दल माहिती देवू शकेल का?

<हा प्लान्स घेणारे इथे कुणी आहेत का? आपले पैसे वाया जाणार ह्याची काळजी नाही वाटत का जरी ह्या प्लान्स चा मरणोत्तर फायदा मिळत असेल तरी.. ?>

ते पैसे वाया जाण्याच्या काळजीपेक्षा आपल्या कुटुंबियांचं आपल्यामागे बरंच चालेल ही निश्चिंती कितीतरी पट मोठी असते.
२५ वर्षे वयाच्या महिलेला पन्नास लाखाच्या विम्यासाठी एका विमा कंपनीच्या ऑनलाइन कॅल्क्युलेटरनुसार महिना ७२९ रुपये प्रीमियम बसेल. तिचे उत्पन्न करपात्र असेल तर त्यावर काही कर वजावटही मिळेल.

मयेकर,

त्यांनी गुंतवणूक, तीही इक्विटीवर भर देऊन सुरू करायला हवीच. पण हे हवे आणि ते नको असे म्हणताना आपण पुन्हा विमा आणि गुंतवणूक यांची गल्लत नाही का करत? >>>>

मी इक्विटीमध्येच गुंतवणूक करा असं म्हणलं नाही आहे.
सध्या गडबडीत आहे. नंतर सविस्तर बोलू.

बी, मला या प्रकरणांतलं फार काही कळत नाही. पण मला माहीत असलेला एक एलआयसी प्लॅन आहे तो सांगतो.
पर ईअर प्रिमिअम अंदाजे ४८,०००/- ते ५००००/-. टर्म २० वर्षे १००००००/- चा विमा.
या वीस वर्षांत काही बरं वाईट झालं तर वारसाला २००००००/- मिळणार (डबल कवर). जर मी वीस वर्षे जगलो तर टर्म पूर्ण झाल्यावर मला १००००००/- मिळतीलच + माझ्या हयातभर ६०००/- प्रतिमहीना पेन्शनही मिळेल.

योकु, आकडे लिहिताना मध्ये स्वल्पविराम द्या हो.

थोडं गणित केलं.
दरसाल एक जानेवारीला ५०००० रुपये ८% द.सा.द.शे.च्या चक्रवाढव्याजाच्या दराने गुंतवले.
विसाव्या वर्षाच्या शेवटी हातात २४,७१,१४६ (साधारण २५ लाख) आले.
त्यातल्या १० लाखांत केसरी टूर्स बरोबर फिरून आलो.
उरले १४.७१ लाख. ते पुन्हा ८% व्याजाने गुंतवले. वर्षाला १,१७,६९१ रु. = मासिक ९,८०७ रुपये मिळतील.

यात पण विमा काढलाच नाहीये. तोही काढू. वीस लाखाच्या टर्म प्लानला वर्षाला ५००० रुपये प्रीमियम पडेल असे धरले आहे. (हे टेबल बघा. यापेक्षा जास्त प्रीमियम पडू नये)

आता आपल्याला दर वर्षी ४५,००० रुपयेच गुंतवता येतील.
या हिशेबाने पुन्हा ८% दसादशेने विसाव्या वर्षाच्या शेवटी २२,२४,०३१ बावीस लाख चौवीस हजार हाती येतील. त्यातलेही दहा लाख लगेच खर्च करून टाकू. उरले सव्वाबारा लाख. त्यावर ८% दराने वर्षाला ९७,९२२ तर महिन्याला ८,१६० रुपये आठ हजार व्याज मिळेल.

आता यात कुठेही टॅक्स लागत नाही असे गृहित धरले आहे. तरीही फरक पहा. पहिल्या उदाहरणात ६३% अधिक.
दुसर्‍यात ३६% अधिक.
तसंच ८% चक्रवाढव्याज वर्षाच्या शेवटीच जोडले जाईल असं धरलं आहे, ते जर दर तिमाहीला काढलं तर आणखी फरक पडेल.

सहा हजार रुपये प्रतिमाह मिळायला पोस्टाच्या मंथली इन्कम स्कीममध्ये रुपये ९ लाख गुंतवायला लागतात. तसंच १० लाख एकहातीही मिळणार आहेत. म्हणजे मॅच्युरिटी एकूण १९ लाख.

प्रश्न : २० वर्षांनी १९ लाख रुपये मिळवण्यासाठी दरवर्षी ४५,००० रुपये किती टक्के चक्रवाढव्याजाने गुंतवावे लागतील?

उत्तर : ६.६८%. पुन्हा व्याज तिमाही मोजले तर व्याजदर आणखी कमी पडेल.

म्हणजे त्या योजनेचा परतावा ६.६८% बसतोय.

पण मला माहीत असलेला एक एलआयसी प्लॅन आहे तो सांगतो.>> योकु, ह्या प्लॅनचे नाव आठवत का?
इतर अभिप्राय नंतर वाचेन खरे तर समजवून घेईन. हा सगळा भाग समजायला वेळ लागतो. भरत ह्यांचा अभ्यास फारच गाढा दिसतो. एक स्काईप कार्यशाळा घेऊ शकाल का?

भरतजी धन्यवाद. ही आकडेवारी काढायचीच तुम्हाला विनंती करणार होतो.
तात्पर्य: विमा आणी गुंतवणूक यात गल्लत करू नये. होल लाईफ मध्ये एजंटाचाच जास्त फायदा होतो.

Pages