जसे कृष्ण राधा

Submitted by संतोष वाटपाडे on 3 March, 2016 - 02:18

मला सावली सावली वाटते ना
असे भोवताली तरी का दिसेना
तुझ्यावाचुनी श्वास राही अधूरा
जसे कृष्ण राधा जसे शाम मीरा...

मनी वाजते सावळी रोज वीणा
दिवा लावते.. लावलेला कळेना
किती जीवघेणी तुझी प्रेमबाधा
जसे शाम मीरा जसे कृष्ण राधा...

तुझी आठवण वेड लावी जीवाला
मनाची व्यथा रोज सांगू कुणाला
तुझी आठवण..स्पर्श..ओला शहारा
जसे कृष्ण राधा जसे शाम मीरा...

जसे कृष्ण राधा जसे शाम मीरा
झरु दे कधी श्रावणातील धारा
विझू दे सख्या तापलेला निखारा
जसे कृष्ण राधा जसे शाम मीरा...

जसे शाम मीरा जसे कृष्ण राधा....
जसे शाम मीरा जसे कृष्ण राधा...

-- संतोष वाटपाडे (नाशिक

Group content visibility: 
Public - accessible to all site users