वैयक्तिक पातळीवर ताण तणावाचे व्यवस्थापन कसे करता ??

Submitted by अंकु on 3 March, 2016 - 01:12

आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या पातळ्यावर येणारर्या ताण तणावाचे व्यवस्थापन तुम्ही कसे करता.जसे की,
१) नात्यांमधील ताण
२) नोकरीमधील ताणतणाव
३) कुटुंबातील ताणतणाव.
४) सामाजिक ताणतणाव.

मागच्या आठवड्यात एका मित्राच्या मित्राच हार्टअ‍ॅटक ने निधन झाल.कारण त्याला ताण हॅंडल करता येत नव्हता अस त्याच्या मित्रमंडळीच मत.एकुणच माझ्या पिढीला ह्या व्यवस्थापनेची गरज आहे म्हणुन हा धागा.कृपया आपले मत्,व्यवस्थापन च्या पदध्ती इथे लिहा. धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. शॉपिंग (कानातले, कमी खर्चात भरपूर मनोरंजन)
२. मायबोली
३. फ्रेंड्स किंवा हाऊस एम डी ची डी व्हि डी आणि एक कप आले गवती चहा तुळस पाने घातलेला मसाला चहा
४. व्हॉ अ‍ॅ क्लासमेट ग्रुप वर गप्पाटप्पा

ताणाच्या कारणाचा शोध घ्यायचा.

जर त्यावर उपाय करणे शक्य असेल तर तो करायचा.
नसेल तर जी गोष्ट आपल्या हातात नाही,त्याचा त्रास करून घ्यायचा नाही. फार तर त्या गोष्टीच्या परिणामांची तीव्रता कशी कमी करता येईल हे पाहायचे.

कधीकधी ताणाच्या कुकरच्या शिट्या होऊ देणंही बरं असतं , नाहीतर वाफ आत साठत राहून स्फोट व्हायची भीती असते. वाफ निर्माण होणारच नाही, हे होणं जरा अशक्यच वाटतं.

टेन्शन असताना ब्रीदिंग एक्झरसाइजेस, स्ट्रेचिंग करणं याने फरक पडलेला अनुभवला. मात्र करताना पूर्ण लक्ष त्यावरच केंद्रित करायला हवं.

मेडिटेशन (ध्यान).
आवडते संगित ऐकणे वा गुणगुणणे.

अर्थात हे ताण निर्माण झाल्यावर त्याला ताब्यात ठेवण्याचे उपाय झाले. पण मुळात ताण कमीत कमी निर्माण व्हावेत या साठी उपाय केले पाहिजेत.

सिरीयसली नन्तर लिहीन. पण अगदी मनापासुन लिहीते की घरात/ बाहेर कुठलाही तणाव वाटत असेल तर सरळ मायबोलीवर येऊन मन शान्त करते. एकदम रीलॅक्स वाटते. कारण हीच एकमेव जागा आहे माझ्याकरता की मनातले चित्र-विचीत्र विचार निघुन जातात. नाहीतर मग नेटवरुन कॉमेडीची बुलेट ट्रेन बघुन हसत बसते.:फिदी:

खूप सुंदर धागा. ताण हा तर रोज येतोच. तो कमी व्हावा किंवा त्याचे परिणाम विपरित होऊ नये म्हणून मी खालिल गोष्टी करतो:

१) योगाभ्यास - योगासने तर आहेतच पण खास करुन श्वसनक्रिया जेणेकरुन मेंदुला भरपुर प्रमाणात प्राणवायू मिळून डोके शांत होते आणि ही शांतता हा ताण नष्ट करण्यास त्वारीत मदत करते. आपल्यातील उर्जेचे रुपांतर चांगल्या विचारात होते. म्हणून कपालभाती, उज्जेयी, प्राणायाण ह्या श्वसनक्रिया ताण घालवण्यासाठी फार उच्च मानल्या गेल्या आहेत.

२) शास्त्रिय संगीत ऐकणे - तबल्याचा आवाज आणि सितारीचे सुर आणि जो राग ऐकत आहोत त्यातील सुर कानावर पडले की आपला मेंदु शांत होत जातो. चांगल्या संगीताचा भावनेवर संयम राखण्यास खूप चांगला परिणाम होतो.

३) दुर चालायला जाण. ताण आला की थोडा ब्रेक घेऊन बाहेर मोकळ्या वातावरणात अलिप्त ठिकाणी विहार केल्यामुळे आपल्या डोक्यातील विचार .. विचारांची गती कमी कमी होत जाते. परिणामी, ताणसुद्धा कमी होतो.

४) सात्विक आहार - खूप जड आहार घेतल्यानी शरिर जड होते. अशा शरिराला व्यायाम झेपत नाही. व्यायाम न झेपल्यामुळे शरिरातील प्राणवायू सगळीकडे संचार करत नाही. ताण वाढतो. म्हणून हलके अन्न सकस अन्न!!!

५) झोप - रोज कमीतकमी ६ ते ८ तास अखंड झोप. ही जरा कमीच मिळते आयटीमधे काम करणार्‍यांना.

६) गप्पा मारणे, वाचन करणे - हे माझ्यासाठी फार दुय्यम उपाय झाले.

७) अयोग्य व्यक्तिजवळ आपले मंत मांडणे टाळतो. शक्यतोवर आपल्या भावना कुणाकडे मांडत नाही. जर कुणी अगदे प्रेमळ संमजस असेल तर त्याशी बोलतो पण उगाच कुणाकडे बोलून दाखवत नाही काय झाले आहे.

ह्या सर्व उपायांमधे मला योगाभ्यासाचा सर्वात जास्त फायदा होतो. त्यामुळे एकूणच आपले जीवन आनंदी रहावे ह्यासाठी मी योगाभ्यास करणे सोडत नाही.

हिरवळ, झाडे असलेल्या पार्क मध्ये भरपूर चालणे, आणि मग तिथेच थोडावेळ आराम.
प्राणायाम, योग निद्रा.
मानसमित्र वटी (डॉक्टरांच्या सल्ल्याने).

तसेच हृदयानिगा बद्दल, डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित लिपीड्सची तपासणी (सध्या वर्षातून एकदा सांगितलीय), आहार व्यवस्थापन, कमीत कमी ७ तास झोप.

केबल टीव्ही आणि रोजचे वर्तमानपत्र वाचन

दोन्ही बंद केल्यापासून मला वैयक्तिक पातळीवर ताण जाणवणे एकदम कमी झाले आहे.

उगाच्च नकारात्मक बातम्या, मनोरंजनाच्या नावाखाली बघायचो ते फालतू कार्यक्रम (जे बघताना आनंद कमी आणि चिडचिड जास्त व्हायची) हे बंद झाल्यावर बाकीच्या आयुष्यात आपोआपच सकारात्मकता आली.

निसर्गाच्या सानिध्ध्यात काही वेळ घालवावा. शहरात निसर्ग कुठून आणणार तर सकाळी लवकर उठलो की भर वस्तीतही निसर्ग आपले काम चोख करत असतो त्याकडे लक्ष जाते. काही झाडे असतात त्यावर पक्षी असतात खारी असतात त्यांचे निरिक्षण करत बसलो तरी खूप फायदा होतो.

मला स्वतःला दररोज लवकर उठून पळल्यामुळे अतिशय फायदा होत आहे. तसे अगदी दररोज पळत नाही तरीही.

पळण्याच्या ऐवजी चालणे सायकल चालवणे योगासने करणे ह्या कुठल्याही प्रकारांनीही तोच फायदा होतो. सकाळी लवकर ऊठून शुद्ध हवेत शक्यतो मोकळ्या जागेत केलेल्या व्यायामामुळे शारिरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य उत्तम रहाते. दिवस चांगला (च) जातो.

मग ताण येतच नाही Happy

माझे सध्याचे उपाय Happy
१) मौन व्रत धारण करणे -- मला वाटायच,,मला कधीच जमणार नाही.गप्प राहाण फार अवघड असत.(माबो वर नसलो तर) पण जमल..अगदी छान जमल.खुप शांतता मिळते डोक्याला.अर्थात विचारांचा पूर डोक्यात येत असतो..पण तरीही शांत राहता येत.आनि थोड्या वेळानी डोक मो़कळ झाल की आपण मेन ट्रॅक वर येतो.

२) इग्नोरास्त्र -- हा उपाय पन बराच कामी येतो.एखाद्या त्रास देणार्या गोष्टीकडे सरळ सरळ दुर्लक्ष करायच.

अर्थात वरचे उपायांनी मुळ प्रश्नावर कायमस्वरुपी उत्तर नाही मिळत.पण चिडचिड होऊन आदळआपट करण्यापेक्षा हे बरं .

अंकु: बरोबर आहे, मलाही आधी जमले नाही. धारणा म्हणजे डोक्यात जे काही विचार येतात त्यांना न अडवता, येऊ देणे आणि तटस्थपणे त्यांच्याकडे पहाण्याचा प्रयत्न करत रहाणे मग हळुहळु मन शांत होत जाते.या सरावाने, जमु लागलेय.

हर्पेन +११११११११११११११११
म्हणले तर कठीण म्हणले तर सोपा विषय आहे.... वेळ मिळाला तर लिहिन....

ही प्रार्थना रोज म्हणायची
" हे परमेश्वरा, ज्या गोष्टी माझ्या हातात आहेत त्या बदलण्यासाठी मला शक्ती दे
ज्या गोष्टी माझ्या हातात नाहीत त्या सहन करण्याची मला ताकद दे
आणि या दोन्ही गोष्टीतला फरक समजण्यासाठी मला बुद्दी दे"

God grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. - Reinhold Niebuhr

सर्व घटना आपल्या इच्छेप्रमाणे घडत नाहीत. आपण स्वत:विषयी केलेल्या कल्पना किंवा अंदाज अपुरा असू शकतो. पण वेळ येईल तेव्हा स्वत:मध्ये बदल घडविण्यास तयार रहा. काही वेळा असे आढळेल की, आपण काही बदल करू शकत नाही. आपल्याला परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागते. त्या वेळी-
१- प्रसंगाकडे तटस्थपणे पहा.
२- स्वत:ला शांत ठेवायचा प्रयत्न करा.
३- व्यक्तिव्यक्तिंमध्ये भिन्नता असते, हे लक्षात ठेवा.
४- टोकाच्या प्रतिक्रिया देणे टाळा.
५- जेव्हा ताणाशी मुकाबला अशक्य वाटेल, तेव्हा अनुभवी व्यक्तिंची मदत घ्या.
- विकास व्यक्तिमत्व विकास इ. दहावी,
प्रकरण ५ पान नं.- ६२

वॉव संशोधक!हे पुस्तक परत वाचलं पाहिजे. मोठे मोठे आर्ट ऑफ लिव्हिंग वाले पण याच गोष्टी सांगत असावेत.

ऑफिस मधे एकदा "सहजयोग" चा सेशन झाला होता. त्यानी बेसिक सहा स्टेप्स शिकवल्या होत्या...
त्या केल्यावर प्रचंड शान्त वाट्ले होते..
मनामधे सतत उकळणारे त्रासदायक विचार खुप कमी झाले..
अजुनपण सकाळी ५-६ मिनिटे करते त्या स्टेप्स... मन आतून शान्त होत जाते..

त्या त्या क्षणी डोकं बधीर झाले की, बाहेर जाते एकटीच. खूप चालत रहायचे मॉल मधून पण एकही वस्तू घ्यायची नाही. Wink नाहितर मोकळ्या जागेत.
बरेच सबंध जे त्रास देतात ते तोडलेत, बोलून नाही पण कमी करून.
नातेवाईकांच्या वॉटस अ‍ॅप ग्रूप मधून बाद केले. वेळ नाही हो सांगून. ते एक भांडण्याचं आणि टोमणे मारायचे ठिकाण असे काही नातेवाईकांना वाटते.
आवडती डिश खाणे बाहेर जावून एकटीच.

खूप चालत रहायचे मॉल मधून पण एकही वस्तू घ्यायची नाही.>>> माझ्यासाठी बिग नो. घरी जोरदार तडके लागले की मी बाहेर जाउन शॉपिंग करते उगीच्च. Sad

थंडीत किंवा पावसाळ्यात कुठेतरी छान कॅफे मध्ये बसून रस्ता बघत फिल्टर कॉफी पिणे.
(हा आनंद मला कुठेही मिळू शकतो पण 'फिल्टर कॉफी, साखर कमी' किंवा दुर्गा मध्ये 'साधी कॉफी, वर चॉकलेट पावडर नको,साखर कमी' ही कस्टमायझेशन्स ऑर्डरी घेता घेता विसरणारे माठ लोक तो बरेचदा घेऊ देत नाहीत.)
अमानोरा मॉल लांब असल्याने जाणे होत नाही पण तिथले आतले कॅफे खूप छान आहेत. तसे जागोजागी कमी पैशात व्हावेत.

आवडती डिश खाणे +१>>
हे चुकिचे आहे, काही मेडिकल स्टडीज पाहिल्या तर हे लक्षात येइल की वजन वाढायचं स्ट्रेस हे एक मोठ कारण आहे, लोक्स स्ट्रेस असताना खुप खातात आणि नंतर स्ट्रेस तर असतोच पण वजन वढल्यामुळे बाकिच्या समस्याही वाढतात..

अजुन एक राहिलच, तणाव कमी वाटण्यासाठी काही लोक्स शॉपिंग करातात असं वाचलय, ते व्य्सन व्हायला जास्त वेळ लागत नाही. मग उगाचच गरज नसलेल्या वस्तुंची खरेदी आणि त्यामुळे आर्थिक तणाव हे ही होउ शकत.
तणाव हाताबाहेर जात आहे असं वाटायला लागलं तर चांगला मनोविकार तज्ञ गाठायला काहिच हरकत्/लाज नाही.
तणावामुळे (हार्मोनल\केमिकल लोच्यामुळे) झालेले परिणाम शरिरावर दिसायला लागतातच, तेव्हा मनोविकार तज्ञ उत्तम मदत करु शकतो.

अग्निपंख, बरोबर की चूक मार्ग सांगायचा असे कुठे म्हटलेय?
काय करतो ते फक्त लिहायचेय ना?
Wink अरे हो ते वाचलच नाही Wink
जाउ द्या तरीही माझा एक फुकटचा टक्का..

मी माझ्या ताणाचे व्यवस्थापन करते पहिल्यांदा ध्यान करुन. मी शक्तिपात योगाची दिक्षेत ध्यान कसे करावे हे शिकले आणि ते अतिशय उपयुक्त ठरले.

खुप गोष्टी आता मी चक्क डिलिट करते डोक्यातल्या. ज्या लक्षात ठेवून उपयोग नाही त्या सरळ डिलिट. कारण मला विसरच पडायचा नाही. आणि विसरणार्‍या लोकांचा मला चक्क हेवा वाटायच. पण आता मी ती गोष्ट माझ्यात आणली. खूप हलके वाटते. आत डोक्यात फार गुंता आणि अडगळ झाली होती. ती कमी झाली.

तिसरी गोष्ट म्हणजे सात्विक आहार. खुप गरम मसाले तिखट खाणे कमी केलेय. आहारावर योग्य नियंत्रण आणल्यामुळे मी अंतर्यामी शांत राहू शकते.

संगीत ऐकणे हाही एक उपाय मी अंलात आणते. मला वाटते तो शकतो कुठल्याही ताणावर , तणावावर फार छन उपाय ठरतो.

मी चित्र ही काढते काय होते मग त्याच्या नादात ताण पळून जातो लांबवर

असे अनेक आहेत लिहिल अजून. मी माझ्या जीवनशैलीच्या धाग्यावर हि लिंक देऊ का...कारण ही जीवनशैली सेट करण्याची पहिली पायरी असेल . माझा धागा इथे http://www.maayboli.com/node/57742

मी माझ्या जीवनशैलीच्या धाग्यावर हि लिंक देऊ का...कारण ही जीवनशैली सेट करण्याची पहिली पायरी असेल .>>>>>> चालेल. तुम्ही स्वतःच माझी रिक्षा फिरवताय... पळेन की Wink Happy

अंकु, नेटवर बरीच माहिती आहे सहजयोगावर.
त्यान्ची सेन्टर्स आहेत, पत्ता अन फोन नंबर आहेत. तिथे फी न घेता शिकवतात..

ईथे काही माहिती दिली की त्याला फार फाटे फुटतात... तस्मात् ... Happy

कोणतीही मानसिक वाटणारी बाब ही पुढे शारीरिक होऊ शकते व कोणतीही शारीरिक वाटणारी व्याधी ही काही अंशी मानसिक असते ह्यावर मी विश्वास ठेवतो. त्यामुळे, मानसिक (वाटणारा) ताणतणाव शारीरिक हालचाली करून घालवता येतो असा स्वानुभव आहे.

मी सध्या जमेल तेव्हा दिवसातून तीन वेळा चालतो. सकाळी साडे नऊ ते सव्वा दहा घरात, संध्याकाळी पाच ते पावणे सहा घरात आणि सव्वा सहा ते सहा चाळीस बाहेर! ह्यामुळे श्वास फुलतो, घाम येतो व शरीर हलके होते. असे हलके शरीर ताण नष्ट करते. रात्री सामसूम झाल्यावर मी एका खुर्चीत बसून खूप हसतो. एकटाच! हसण्यासाठी उपाय म्हणून (ह्यावर कृपया हसू नयेत) अ‍ॅडमीनच्या विपूतील काही (अगदी माझ्याहीविरुद्ध असलेल्यांसकट) तक्रारी, काही वादोत्पादक धाग्यांवरील त्वेषाने लिहिलेले प्रतिसाद, दिवसभरात प्रत्यक्ष आयुष्यात कोणी अतिशय वैतागाने काहीतरी बडबडलेला असेल तर ते आठवून वगैरे हसतो. दोन, तीनदा तर हसतानाचे सेल्फीही काढले होते व असे तीन, चार सेल्फी मोबाईलमध्ये स्टोअर करून ठेवलेले आहेत. ते नुसते पाहिले तरी हसू येऊ लागते. हसण्यामुळे ताण त्वरीत नष्ट होतो असा स्वानुभव आहे. आवडते गाणे म्हणण्यानेही ताण कमी होतो असा अनुभव आहे. (इतरांचा वाढत असल्यास कल्पना नाही).

-'बेफिकीर'!

बहुतेक वेळा ताण येण्याचे नक्की कारण समजणे अवघड असते, उगाचच कशाचीतरी भीती वाटऊन ताण येवू शकतो.तसा मला फार अनुभव नाही पण काही फूकटचे सल्ले -
आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर गप्पा मारत भरपूर वेळ घालवणे , मन हलके करणे .
आपले छंद जोपासणे , मग तो चित्रपट पाहण्याचा का असेना.
शाळा कॉलेजातली अभ्यासक्रमातली आवडत्या विषयाची पुस्तके वाचणे. यातून आपण आपल्या शालेय जीवनात काही काळाकरिता प्रवास करतो, वाचताना खूप चांगल्या आठवणींना उजाळा मिळ्तो तेवढेच माईंड फ्रेश.

शक्य असेल तर आसपास राहणा-या गरजू मुलांना मदत करावी शैक्षणिक साहित्य,कपडे या स्वरुपात किंवा शिकविण्याची आवड असेल मोफत क्लासेस चालवावे. कुठलेही समाधान मनावरचा ताण नक्कीच कमी करु शकेल.

घरामध्ये सकारात्मक उर्जा ठेवावी , जसे पुरेसा सुर्यप्रकाश आणि हवा, नात्यामधील आदर आणि गोडवा , परमेश्वरावर श्रद्धा इत्यादि.....

खूप छान धागा आहे. निवांत वाचण्यासाठी सेव्ह करुन ठेवत आहे.

मी यासाठी पुढील गोष्टी करते-

I share my tensions with family members and seek advice and support.
I spend quality time with my kid as nothing like a child's infectious laughter and energy to lift your spirits
music especially old hindi marathi

सगळ्यांनी छान उपाय सांगितलेत
माझीही भर
1) एखादा छानसा सिनेमा पाहणे (माझे ऑल टाईम फेवरिट अशी ही बनवा बनवी , बावर्ची , खट्टा मीठा (जूना ) ,आनंद ,अंदाज अपना अपना )
2) सध्या रोज सकाळी ६. ३० ते ७. १५ असे पाऊण तास सायकलिंग आणि संध्याकाळी पाऊण तास स्विमिंग करते
3) टीव्हीवर डेलीसोप पहात नाही ,आमच्याकडे फक्त 'चल हवा येऊ द्या ' अधून मधून 'तारक मेहता का उलटा चष्मा '
आणि इतर वेळी फ़क्त फॉक्स लाइफ , एन डी टीव्ही गुड टाइम्स , हिस्ट्री आणि डिस्कव्हरी
4) दोन महिन्यातून एकदा सहकुटुंब दोन दिवसांसाठी बाहेर फिरायला जाणे , माझ आवडत ठिकाण नागाव किंवा सज्जनगड
5) संगीत ऐकणे
6) रोज रात्री सगळ्यांनी एकत्र जेवण करणे ,
7) महिन्यातून किमान एकदा तरी सहकुटुंब एखादा छानसा सिनेमा पाहायला जाणे
8) कॅमेरा घेऊन जवळच्या बागेत किंवा सायकलने खडकवासल्याला जाऊन मनसोक्त फोटो काढ़ते
9) घरात एकटी असेन तेव्हा संतुरची सीडी लाऊन पु . ल . किंवा चि . वि . जोशींच पुस्तक वाचणे
10) गरमा गरम वरण , भात तूप लिंबू ,पापड ,तळलेल्या मिरच्या अस आवडीच जेवण करून मोबाईल स्विच ऑफ करून मस्त ताणून देणे .
11) अधून मधून घराच्या अंतर्गत रचनेत थोडे बदल करणे , घराला नवीन लूक येतो आणि त्यामुळे घरात प्रसन्न वाटत
12) घरात चौघ जण आहोत , प्रत्येक रविवारी एकाच्या आवडीचा मेन्यु केला जातो
13) घरात काही वादविवाद झाले तर ते चर्चा करून सोडवतो , समस्या कितीही गंभीर असली तरी घरात कुणीही एकमेकांशी अबोला धरत नाही

ऋन्मेऽऽष चे धागे वाचा , त्याचे एक सो एक विनोदी धागे आहेत ,मनावरचा सगळा ताण जाईल....;) Wink Wink

ऋन्मेऽऽष ...:दिवा:

एखाद्या व्यक्तीला ताण आहे हे आपल्याला कळतं आणि त्याला त्यातून बाहेर पडायला हवे हेही कळतं, पण नेमके हे कळत नाही कि आपल्याला चाललेले किंवा इतरांना उपयोगी पडलेले उपाय त्याला लागू होतीलच असे नाही.
जर काही काळानंतरही हाच ताण राहिला तर समुपदेशक किंवा डॉक्टर यांची मदत घ्यावी हे उत्तम. ताण तणाव हे मेंदूतील रासायनिक घटकांमूळे / प्रक्रियांमूळे निर्माण होतात आणि त्यापैकी बहुतेकांवर आजघडीला औषध उपलब्ध आहे. ( मी स्वतः अशी मदत मिळवून दिली आहे आणि ती उपयोगी देखील पडली आहे. ) अनेकजणांनी सुचवलेले उपाय हे अगदी आत्मियतेने सुचवले असले तरी ते त्या व्यक्तीला उपयोगी पडतीलच असे नाही, मग ह्यानी नाही बरं वाटलं तर ते कर असे सुचवले जाते आणि त्यात बराच वेळ जातो, शिवाय तो इतरांच्या इगोचाही इश्यू होऊन बसतो.

तीन गोल्डन रुल्स.

1) छंद जोपासा. प्रत्येकाच्या आयुष्यात एक वा अनेक छंद असतात. नव्हे असलेच पाहिजेत. ईतरवेळीही ते आनंद देतात तसेच ताणाच्या वेळी औषधाचे काम करतात.

माझ्या छंदात सध्या लेखन, किडे आणि मायबोली यांचा समावेश होतो..
एकेकाळी फ्लर्टींग, किडे आणि ऑर्कुटींग होते.
किडे कॉमन .. आणि आयुष्यभर राहणार Happy

2) प्रॉब्लेम शेअर करा. धीर मिळतो, समदुखी मिळतात, सोल्युशन मिळतात जे बरेचदा साधेसोपे असते पण ताणामुळे आपले डोके चालायचे बंद झाले असते वा आपण एकाच द्रुष्टीकोनातून त्या प्रॉब्लेमकडे बघत असतो.

सध्या यासाठी माझ्या आयुष्यात आई आणि गर्लफ्रेंड आहेत. रोजचे छोटेछोटे टेंशन दर संध्याकाळी शेअर करतो. आणि रात्री निश्चिंत झोपतो.

अवांतर - भिन्नलिंगी व्यक्तीशी प्रॉब्लेम शेअर करायचेही काही एक्स्ट्रा फायदे असतात. त्याबद्दल सविस्तर पुन्हा कधीतरी..

3) काळ हे सर्वात प्रभावी औषध हे कायम लक्षात ठेवा. आणि त्यासाठी आपल्याला काही करावे लागत नाही. तोच स्वता आपसूक पुढे सरकतो.

सेक्स हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. अ‍ॅंक्साईटीमुळे ताण वाढतो. आणि सेक्समुळे अ‍ॅंक्साईटी कमी होते.

आपापल्या पार्टनर बरोबरच, नाहीतर जाल इकडे तिकडे. Happy

ताण कमी करण्याचा प्रभावी उपाय म्हणजे एन्डुरंस स्पोर्ट्स. पळणे, सायकल व स्विमिंग जर रोज तुम्ही ह्यापैकी काही करत असाल ( आणि सकाळी सकाळी) तर दिवसभर कितीही स्ट्रेस असेल तर तो जाणवत नाही. हर्पेनने आधीच लिहिलेले आहे, ते मी मम म्हणतो.

शिवाय फिजिकल एन्डुरंस वाढत असताना, तुमच्याही नकळत तुम्ही मेंटली स्ट्राँग होत जाता. आणि हे स्ट्रॉंग होणे प्रत्येक वेळी कामाला येते. "इट्स ओके" ही फेज यायला मदत होते असे मला वाटते.

असं करूनही ताण असतोच. पण हे जर केले नाही तर त्याचा त्रास जास्त होईल. ऑलमोस्ट गेले काही वर्षे ताण खूपच कमी झाला आहे.

ताण येण्याचे प्रमुख कारण म्हणजे जी गोष्ट, जे काम, जो प्रसंग ज्यास मला सामोरे जायचे असते वा काही एक करत रहायचे असते, तेव्हा कायमच माझे मनात "हे सगळे मी करणार कीम्वा करु नाही शकणार" अशी भावना असते.
ज्याक्षणी यातील "अहंभाव" मी त्यागतो, व हे सगळे "मी" करणार नसुन, इश्वरी ताकद माझेकडुन करवुन घेणार आहे असे पूर्ण श्रद्धेने, बौद्धिक विश्वासाने मानतो, तेव्हा त्या त्या कृती करण्यामागिल, यशापयशामुळेचे, भविष्यकालिन चिंतांचे सर्व ताणतणाव तत्काळ नाहिसे होतात असा माझा अनुभव आहे. Happy

अमा, Happy
माझे दोन पैसे :
१.What really matters? हा प्रश्न विचारणे. बर्‍याच गोष्टी ह्या इतक्या महत्वाच्या नसतात जितके महत्त्व आपण त्यांना देत असतो.
२.दैनंदिन जीवनात 'च' कमी करणे :अमुक एक गोष्ट हवीच किंवा असेच व्हायला हवे ह्या अट्टाहासमुळे ताण येतो.
३. ही गोष्ट थोडी विचित्र वाटेल पण याचा उपयोग होतो. सतत आनंदी राहणारी व्यक्ती वेडी असेल किंवा ती खोटं बोलत आहे. त्यामुळे तुम्हाला कधी उदास वाटलं तर वाटू दे. रडावसं वाटलं तर रडा ( मी सिनेमा पाहते किंवा पुस्तक वाचते). भावनांचा निचरा होत राहीला पाहिजे.
४. ताण घ्यायला शिका : जितके स्वतःला आजमावू तितके आपण अधिक सक्षम होतो. Anything that doesn't kill you, makes you stronger.

Pages