वैयक्तिक पातळीवर ताण तणावाचे व्यवस्थापन कसे करता ??

Submitted by अंकु on 3 March, 2016 - 01:12

आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या पातळ्यावर येणारर्या ताण तणावाचे व्यवस्थापन तुम्ही कसे करता.जसे की,
१) नात्यांमधील ताण
२) नोकरीमधील ताणतणाव
३) कुटुंबातील ताणतणाव.
४) सामाजिक ताणतणाव.

मागच्या आठवड्यात एका मित्राच्या मित्राच हार्टअ‍ॅटक ने निधन झाल.कारण त्याला ताण हॅंडल करता येत नव्हता अस त्याच्या मित्रमंडळीच मत.एकुणच माझ्या पिढीला ह्या व्यवस्थापनेची गरज आहे म्हणुन हा धागा.कृपया आपले मत्,व्यवस्थापन च्या पदध्ती इथे लिहा. धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या विशीष्ट जबाबदारीमुळे माझी जीवनशैली फार वेगळी आहे आणि त्यामुळे मी आठवड्यातून एखाद-दोन दिवस बाहेर जाऊ शकते त्यामुळे घरीच ताण कमी करण्याची आवडती साधनं म्हणजे गाणी ऐकणं, वाचन. जास्त करून मायबोली वाचन. विशेष उल्लेख करेन 'आम्ही कोल्हापुरी' आणि 'निसर्गाच्या गप्पा', इथे नियमित जातेच. w a वर गप्पा मारते. रात्री जागरण करताना मायबोलीवर इतर अनेक आवडीचं वाचन करते. पेपर घरी एकच येतो, बाकीचे नेटवर वाचते. फेसबुकवर जाते. स्वतःशीच खूप संवाद साधते हल्ली मी, मनातले विचार स्वतःशीच बोलते, गप्पा मारते कारण कधी कधी मला बोलायचं असेल ती वेळ दुसऱ्याला सोयीची असेल असं नाही म्हणून हा मार्ग. ह्यानेही होतो तणाव थोडा दूर. कधी देवाशीपण गप्पा मारते.

जेव्हा एकटी बाहेर पडते तेव्हा मात्र निवांत झाडांशी गप्पा मारत अगदी मैलोनमैल चालत जायला खूप आवडतं. आई-बाबा, भाऊ, बहिण जवळ राहत असल्याने त्यांना भेटायला जाते. माझी छोटी भाची (४ वर्षाची), तिला भेटून खूप फ्रेश वाटतं, तिची बडबड, गंमतजम्मत आवडते. शेजाऱ्यांची विचारपूस करते, शेजारचेपण वेळ असला तर येतात गप्पा मारायला. Happy

चांगला विषय.

१) नात्यांमधील ताण
कमी महत्वाची किंवा ज्यांची तोंडं आपल्याला रोज पाहावी लागत नाहीत त्या नात्यांना इग्नोरास्त्र मारू शकता. कमीत कमी गुंतणे म्हणजे कमीत कमी जबाबदार्^या अंगावर येऊन पडतात. तुम्हाला जे झेपतं तेच करा.
जवळच्या नात्यांना हाच उपाय लागू होणार नाही. त्याच्याशी प्रसंगानुरुप डील करावे लागेल. संबंध टोकाला गेले असतील तर सल्लागार वगैरेही असतात. तरीदेखील झेपेल तेच करा/बोला. उगाच आता नातं टिकवायचं म्हणून मी चंद्रावरचा डाग पुसेन वगैरे म्हणून ते काय करणे होईल का? शिवाय काही जवळच्या नात्यांसाठी केदारभौनी मंत्र दिला आहेच Proud
२) नोकरीमधील ताणतणाव
दिस इज जस्ट अ जॉब हे जमतं का पहा. मला ते जमायला भरपूऊऊऊउर वर्षे लागली. आपण आपलं काम प्रामाणिकपणे करत असाल तर नोकरीत जनरली हाय-लो होत असतं त्याचा तणाव नको यायला. मी एका नोकरीच्या वेळी काम फार आवडत असतानाही तणाव मॅनेज करायला थोडा लो प्रोफाइल पण वर्क लाइफ बॅलंन्स देणारा जॉब घेतला होता. तुम्हाला तेही जमत असेल तर पहा.
३) कुटुंबातील ताणतणाव.
कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांसाठी अनडिव्हायडेड अटेंशन देणे हा एक खात्रीशीर उपाय आहे. आपल्या नकळत आपण इंटरनेट या प्रकाराशी इतके बांधले असतो की इट टेक्स यु ओव्हर हे लक्षात येईपर्यंत बरेच प्रॉब्लेम्स निर्माण झालेले असतात. जेवणाच्या टेबलाशी मोकळेपणाने बोलणे, सर्वांनी एकत्रपणे चित्रपट किंवा खेळ खेळणे, व्हेकेशन्स इ.इ. करत राहाणे. याचं प्लानिंग करणे हा सर्वोत्तम मार्ग. माझा एक कलिग जानेवारीला नवीन रजा सुरु झाल्या की सगळ्या बुकिंग्ज वगैरे करून त्या अप्रुव्ह करून घेतो. नेहमीच काय तो फार भारी करत असतो असं नाही पण तो वेळ त्याने काढलेला असतो हे महत्वाचं.
४) सामाजिक ताणतणाव.
माहित नाही. मला येत नाही. मी समाजाला इतकंही माझ्यावर राज्य करू देणार नाही असं माझ्या व्यक्तिमत्वावरून मला वाटतं. मला कुणी इग्नोर केलं तर मला फरक पडत नाही आणि त्याच सहजतेने मी समाजाला पण इग्नोर करू शकते. यासाठी केलेले आणखी काही उपाय अतिशय व्यक्तिगत असल्यामुळे सध्या इतकंच.

आणखी फक्त एकच सांगावंसं वाटतं म्हणजे ताणतणावामुळे होणार्^या आजारांची लिस्ट इतकी मोठी आहे की त्यापेक्षा आपण इथे- तिथे थोडा विनोदाचा आधार घेऊन आपला त्या त्या ठिकाणचा वेळ तणावाचा न होता हलका करू शकतो का हे पाहावं. हे अगदी सगळीकडे नाही पाळता येणार पण बिलिव मी शंभर टक्केवेळा आपण फक्त हसतच राहू शकणार नाही आहोत हे आपल्यालाही माहित आहे.

शुभेच्छा Happy

Pages