बोलू कौतुके - बया दार उघड - avani1405

Submitted by संयोजक on 28 February, 2016 - 08:13

पाल्याचे नाव :अर्चित वैद्य वय : 4 वर्षे 3 महिने

शुभंकरोती : १ ते २ मि.

पसायदान : ३ मि. २० से.

मनाचे श्लोक : २७ सेकंद

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्चितला मोठ्ठी शाब्बासकी.
प्रत्यक्ष भेटीत खाऊ देणार हं Happy
न अडखळता आणि अगदी स्पष्ट शब्दोच्चार.
अवनी आणि मि. अवनी यांचे अभिनंदन Happy

अर्चित नक्कीच गायक होणार आहे, मनात येईल तेव्हा मस्त मस्त ताना घेतल्या आहेत. अगदी परत परत ऐकावेसे वाटणारे..... खरेच मस्त.
पसायदान अतिशय गोड गायलेय, खूप एन्जॉय केलेय त्याने गाताना. पाठांतर जबरी आहे.

कसलं गोड पसायदान म्हटलं आहे. ताना मारल्यात अगदी. पाठांतर पण जबरी आहे. मधला आग्रह ( तु पण म्हण माझ्याबरोबर) कसला स्वीट : Muah :

मी घरात सगळ्यांना ऐकवायच्या निमित्ताने परत परत ऐकते आहे. त्याने म्हणताना खुप एंजॉय केलं म्हणुन ऐकणार्यांना पण मजा येते आहे. Happy

खरच ग मनीमाऊ. मी पण ऐकतेय. हसूही आवरत नाहीय आणि त्याच्या निरागसतेचे कौतुकही वाटतेय. आणि किती सहज गायलाय. अजिबात टेन्शन नाही.

हे भारी आहे. असं प्रशस्तीपत्रक पहिल्यांदाच दिलं ना बहुतेक. छोट्या छोट्या पार्टीसिपंट्सना असं कौतुक फार आवडेल.

संयोजक, छान उपक्रम आहे.