मला आवडलेले साय-फाय फिक्शन्स!

Submitted by kulu on 25 February, 2016 - 03:24

साय फाय फिक्शन वरती एकही धागा शोधुनही सापडला नाही. म्हणुन हा उपद्व्याप! आपल्याला आवडलेले असे मुव्हीज जर इथे दिले तर चांगली यादी होईल.

मी माझी यादी देतोय!

१. इन्टरस्टेलार
फादर ऑफ साय्फाय असं मला वाटतो. इतका अभ्यासपुर्ण सायफाय पुर्वी कधीच आला. सायन्सलाच एक वेगळा ग्लॅमर या चित्रपटाने आणले यात वादच नाही! रेटिंगवर जाऊ नका. ज्याना मुव्ही समजला नाही त्यानी रेटिंग कमी दिले!

२. ज्युरॅसिक पार्क
ज्या गोष्टी अजुन प्रोसेस मध्ये होत्या त्या गोष्टीन्चा अभ्यास करुन करुन मायकेल क्रिश्टन ने एक अतिशय सुंदर कथानक लिहिले आणि त्यावर आधारीत तितकाच सक्षम चित्रपट! सध्या अ‍ॅन्शन्ट डीएनए वर काम करतोय तेव्हा कळतय की मायकेल चा विचार किती पुढचा होता! (त्याच्या सगळ्याच कादंबर्‍या वाचनीय )

३. मार्शिअन
विज्ञानाच्या दृष्टीने काही गोष्टी चुकल्या असल्या तरी फिक्शन म्हणुन वाह्यात स्वातन्त्र्य घेतलेले नाही!

४. सनशाईन
विज्ञाच्या कसोटीत बराच उतरणारा हा चित्रपट फारसा गाजला नाही. मध्येच आणलेल्या ड्रामा ने कथानकाला स्पॉइल केले असले तरी बघायलाच हवा!

५. वर्ल्ड वॉर झी
लोक झॉम्बी ला साय फाय म्हणत नसले तरी त्याला सायंटीफीक बेस आहे! इथे कॅमॉफ्लोजचा वेगळ्या दृष्टीने केलेला वापर आवडला.

६.अ‍ॅवॅटार
७. ग्रॅव्हीटी
८. इन्डीपेन्डन्स डे
९. डीप इम्पॅक्ट
१०. इन्सेप्शन
११. इटर्नल सन्शाईन ऑफ द स्पॉटलेस माईंड

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओ माय गॉड माझे इंग्रजी मराठी धाटणीचे वाटेल पण

मॅट्रिक्ष ट्रिलजी,
इन्सेप्शन,
मेन इन ब्लॅक तिन्ही
डॉ. हू सर्व सीझन्स
२००१ स्पेस ओडेसी.
फिफ्थ एलिमेंट
ग्रॅविटी.
इंटर स्टेलर.

Race to the witch mountain.
Mars needs mom
pixels
Spy kids(total 4 parts)
Narnia(total 4 parts)
Percy Jackson(total 2 parts)

खुsssssssssप आहेत!!
minority report. (2002)
predestination (2014)
source code (2011)
I, Robot (2004)
Inception (2010)
Man from the earth (2007)
Gravity (2013)
interstellar (2015)
WallE (2008)
Thirteenth Floor (1999)
Matrix (1999)
Eternal sunshine of spotless mind (2004)
Independence day (1996)
Men in black
predetor (1987)
Butterfly effect (2004)
Iron man( 2008)
Paycheck (2003)
Limitless (2011)
Lucy (2014)
Hollow Man (2000)
October sky (1999) not a sci-fi but real story about rocket engineer
Armageddon (1998)
the Prestige (2006)

I am totally ashamed of myself for not mentioning man from the earth! What a reasoning!

Jurassic World - २०१५

वर हा एक सिनेमा लिहिला नाही कुणी म्हणून लिहितो इथे. मला जुरॅसिक वल्ड फार नाही आवडला.

मॅन फ्रॉम अर्थ बर्‍याच वेळा पाहिलाय, तस त्यात नेहमीच्या साय-फाय सारख चकचकित असं काहिच नाही, (तो एका नाटकावर आधारित आहे असं वाचल्याच आठवतय) पण खुप आवडला तो सिनेमा, कारण फक्त एकच reasoning.
predestination ही असाच हटके आहे Happy

मी मॅट्रिक्स दोनदा पाहिला आला होता त्यावेळी मुंबईमधे स्टर्लिन्गमधे. पण, दोन्हीवेळा बघूनही मला मॅट्रिक्सचे आकलन झाले नाही. त्यातला तो अ‍ॅक्टर Keanu Reeves मात्र खूप सही अ‍ॅक्टिंग करतो त्यात. नंतर कळले हा सिनेमा बराचसा Franz Kafka ह्यांच्या metamorphosis बेतलेला आहे.

टॉम क्रूझ चा ऑब्लिविअन म्हणून एक आहे. मस्त वाटतो बघायला कधी मधी
पॅसिफिक रिम,
काँटॅक्ट
एलिअन्स सीरीज
एक्स मेन सीरीज.
मार्व्हेल कॉमिक सीरीज. सर्व हे मेन ते मेन वगैरे.

एक्स मेन सीरीज.
मार्व्हेल कॉमिक सीरीज. सर्व हे मेन ते मेन वगैरे. >> Biggrin

मला खुप आवडतात या सिरीज..

मॅट्रिक्स सुद्धा खुप आवडीची..आणि कियानु रिव्ह्ज पन Wink

टॉम क्रूझ चा ऑब्लिविअन म्हणून एक आहे. मस्त वाटतो बघायला कधी मधी>>>
मस्त आहे, पण मी फक्त 'Andrea Riseborough' साठी परत पाहिला Wink

ल्युसी आणि अर्मॅगेडॉन मला आवडले नाहीत फारसे. तसाच अजुन एक द कोअर म्हणुन एक मूव्ही आहे. तो पण भंकस. सायफाय मध्ये स्टोरी व्यवस्थित डेव्हेलप नाही केली की असे मुव्हीज तयार होतात.

नुसते सायफायच नाही तर मस्त विनोद असलेले

हिच हायकर्स गाईड टू गॅलेक्सी (एकदम वेगळ्या प्रकारचा विनोद). यात दिली जाणारी शिक्षा अल्टीमेट आहे. त्यापेक्षा कैदी जीव गेला तरी चालेल असे म्हणतात.

कोनहेडस
मेन इन ब्लॅक

अरे तो अर्नोल्ड शिवाजीनगरचा एक चित्रपट कोणता ? ज्यामधे त्याच्या डोळ्याच्या रेटिनावरून त्याचा क्लोन केलेला असतो ?
तो बिचारा संध्याकाळी घरी येतो तर आतमधे तोच मुलांबरोबर खेळताना दिसतो त्याला, इ. इ.

Short Circuit (1986) of a robot No. 5 hit by lightening and become alive. Nice romantic fantasy kind of Sci-Fi.
I like the scene in which the scientist try to prove he is robot asks him to analyze coffee stain. The robot promptly explains its chemical composition and just when the scientist gives a look to heroine No.5 says and the stain looks like butterfly. And the scene when the robot asks the heroine he wants input and she opens her bookshelf of 100s of books and the robot finishes reading all those in few hours and ask for more input.

द ट्रू-मन शो.
बॅक टू द फ्युचर सिरीज,
डिस्ट्रिक्ट ९

वरती अग्निपंख ने लिहिलेला 'मॅन फ्रॉम अर्थ' एकदम 'सायफाय' पठडीतला असा नाहीये पण एक अप्रतिम सिनेमा आहे. ह्यात पूर्ण सिनेमा एकही घटना घडत नाही, कॅमेरा एकदाही घराच्या बाहेर जात नाही, फक्तं आणि फक्तं बोलकी पात्रं आणि त्यांच्या संवादाचा सायफाय- विषय ह्यावर पूर्ण सिनेमा बेतलेला आहे. एकही ग्राफिक ईफेक्ट नसलेला पण प्रचंड थॉट प्रोवोकिंग सिनेमा. माझ्या ऑलटाईम फेवरिट सिनेमांपैकी एक.

सुपरहीरो सिनेमांना साय-फाय म्हणायचं का? अं.... माझ्यासाठी तरी ते सायफाय नाहीत तर अँटी-साय-फाय आहेत. त्यात सायंसचा एकही नियम एक्स्ट्रापोलेट करून स्टोरी बनवलेली नसते तर नियम वाट्टेल तसे मोडलेले असतात, नुसते कूल ग्राफिक्स वापरले म्हणजे सायफाय कसा होईल, त्यामागे काहीतरी सायंटिफिक विचार हवा ना? मग तर रजनीकांतचे सिनेमे सुद्धा साय-फाय म्हणायला हवेत.

अलिकडेच बघितलेला एक्स-मकिनाही एक मस्तं सायफाय थ्रिलर होता.
पुन्हा सुपर-८, ईटी, साईन्स, वॉर ऑफ वर्ल्ड्स वगैरेना साय-फाय म्हणावेसे वाटत नाही.