फुसके बार – २० फेब्रुवारी २०१६

Submitted by Rajesh Kulkarni on 19 February, 2016 - 14:44

फुसके बार – २० फेब्रुवारी २०१६

१) वाघाटी या वाघाच्या पिलाप्रमाणे दिसणा-या प्राण्याचा महाबळेश्वमधील वेण्णा लेकच्या रस्त्यावर वाहनाची धडक बसल्यामुळे मृत्यु झाल्याची बातमी पाहिली. या प्राण्याचे नाव प्रथमच ऐकण्यात अले. त्याबद्दल कोणी माहिती देऊ शकेल काय?

२) राजदीप सरदेसाईचा खोडसाळपणा – पुन्हा एकदा

सुमारे २३,००० लोकांकडून केलेल्या सर्व्हेमध्ये काढलेला निष्कर्ष. ४०% लोकांना मोदी हे आपले नेते वाटतात. तर २२% लोकांना पप्पू हवा आहे. पण राजदीप सरदेसाईला आनंदी व्हायला - हा आनंद त्याच्या चेह-यावरून निथळत होता - मुद्दा काय मिळाला तर अगदी काही आठवड्यांपूर्वीच केवळ ८% लोकांना पप्पू हवा होता. त्यातही त्याच्या उत्साहाला भरते कशामुळे आले तर पप्पू, सोनिया आणि प्रियांका यांच्यात मिळून ५०%पेक्षा अधिक लोकांनी कल दिला आहे. त्यामुळे तर तो आणखीच खुश झाला होता. त्यामुळे पुढची लढाई थेट मोदी व कॉंग्रेसमध्येच लढाई होईल इथपर्यंत वल्गना करण्यापर्यंत त्याची मजल गेली.

आता बेशुद्ध व्हायला तयार व्हा. हा सर्व्हे कशासाठी आहे, तर २०१९मध्ये मोदींना पंतप्रधानपदासाठी लढत देण्यास कोण लायक उमेदवार आहे? हो तुम्ही चुकीचे वाचले नाहीत, २०१९मधल्या निवडणुकांसाठी. २०१६ आता कोठे सुरू झाले हो.

राजदीप सरदेसाई, देशात लाळेचे पाट कोठे वाहिले असतील हे आज सहज कळले.

३) उत्तर प्रदेशमधली रानटी संस्कृती

उत्तर प्रदेशात गेल्या दोन आठवड्यात कुठल्याशा विजयोत्सव वा तत्सम कारणांमुळे केलेल्या गोळीबारामध्ये तीन जणांचा मृत्यु झाला आहे. मागे एका लहान मुलाचा, त्या नंतर एका प्रौढाचा तर काल लग्नसमारंभाच्यावेळी झालेल्या अशा गोळीबारात तर चक्क नवरामुलगाच ठार झाला.

उत्तरप्रदेशात अराजक चालू आहे याचे यापेक्षाही अनेक दाखले देता येतील. कोणी अशा गोळीबारात मारले गेले न गेले, तरी मुळात भर रस्त्यावर असा गोळीबार करण्यास परवानगी असणे, मुळात अशा प्रकारे शस्त्रे बाळगणे हेच किती भयानक आहे याची आपल्याला कल्पना येत नाही का? तिकडे पेशावरमध्ये रस्त्या-रस्त्यावर असे चालते असे ऐकण्यात येते. इतके भयानक प्रकार चालू असूनही अखिलेश, त्याचा दळभद्री व भुईला भार असलेला बाप, तेवढाच भुईला भार असलेला त्याचा काका आणि आझम खान नावाचा त्यांनी पाळलेला दैत्य (कधी कधी यांच्यापैकी कोण कोणाच्या आधारावर तगत अहे हेच कळत नाही हे वेगळे) यांच्यापैकी कोणालाही त्यामध्ये काही वावगे वाटत नाही यातच सारे काही आले.

मुलायमकडून मधूनमधून संसदेमध्ये मिळत असलेल्या सहकार्याच्या बदल्यात केन्द्र सरकारदेखील उप्र सरकारविरूद्ध काही कारवाई करताना दिसत नाही. एकूण सगळे कसे आलबेल असल्यासारखे चित्र आहे.

४) बिहारमधील मृत्युंची काहीच किंमत नाही?

श्रीकृष्ण उमरीकर यांनी त्यांच्या पोस्टद्वारे नजरेस आणून दिलेली घटना.

काल बिहारच्या गोखलापूरमधील एका आश्रमशाळेत पाचवीतल्या मुलीने जेवणाच्या वेळी अधिक अन्न मागितले तेव्हा तिला वाढप्याने मारले. त्यावरून त्या मुलीचे वडील तक्रार करायला गेले, तर त्या वडलांना लाथ मारली गेली व त्यात त्यांचा मृत्यु झाला.

पोहोचली का हो ही बातमी आपल्यापर्यत? आता पुढे वाचा. तो बाप मुस्लिम होता.

एका मुस्लिमाच्या मुलीने अन्न कमी पडले म्हणून थोडे अधिक द्या म्हणून विनंती केली तर त्यावरून तिला मारले गेले, एवढेच नव्हे तर त्याबद्दल तक्रार करणा-या तिच्या वडलांना ठार मारले गेले ही बातमी खरे तर किती करूण. पण हेच जर महाराष्ट्रात व तेही फ़डणवीस सरकारच्या कारकिर्दीत झाले असते, तर या लोकांनी या बातमीवरून काय काय केले असते याची कल्पना येते का हो?

तर यापुढे नीतिश-लालूच्या राज्यातील गुन्हे हे केवल गुन्हेच. कायदा गुन्हेगारांचे काय करायचे ते ठरवेल. फडणवीस सरकारच्या महाराष्ट्रात असे काही झाले तर मात्र असंवेदनशील सरकार, सामाजिक अन्याय वगैरे कारणांवरून बोंब ठोकायची.

५) सतिनाथ सारंगी – देशद्रोह्यांचे प्यादे?

टीव्हीवरील चर्चांमधून काही जणांचे पितळ उघडे पडते. आज टाइम्स नाऊ वरील चर्चेमध्ये अर्णबने एक प्रश्न विचारला की माओइस्ट हिंसाचार आणि काश्मिरी दहशतवाद यांच्यात काय समान सूत्र आहे? त्याआधी मारूफ रझा यांनीही देशाला अस्थिर करण्यामागचे कारस्थान व्यवस्थित समजावून सांगितले.

अर्णबने हा प्रश्न विचारल्यावर हा सारंगी इतका बिथरला की सनातन संस्था, मोदी, वगैरें असंबद्ध मुद्द्यांवरून वरून तारे तोडू लागला. हाच सारंगी भोपाळ गॅस दुर्घटनेतील पीडितांना नुकसानभरपाई मिळवून देण्यात अग्रेसर होता. त्यामुळे त्याचे असे विचित्र वागणे केवळ संशयाला वाव देणारे होते.

त्याचे बिथरणे पहाण्यासाठी तरी आजचा हा कार्यक्रम पहा. भरपूर आरडाओरडा असला तरीही.

६) हे फटकारणे?

मुंबई भाजपच्या आशीष शेलार यांना बेकायदेशीरपणे होर्डिंग लावण्यावरून उच्च न्यायालयाने फटकारले अशी बातमी वाचली. त्यांना तब्बल २५,००० रूपयांचा दंड करून ती रक्कम नाम फाउंडेशनला देण्यात यावी असा आदेश दिला.

२५,००० रूपयांचा दंड करण्याला फटकारणे म्हणायचे काय?

मागेही एका गणपती मंडळाला उच्च न्यायालयाने एक लाखाचा दंड करून ती रक्कम अशीच शेतक-यांना मदत म्हणून द्यावी असा आदेश दिला होता. अशा प्रकारे कायदेभंग करणा-यांना दंडाच्या रकमेची भीती वाटत नाही इतके ते निर्ढावलेले आहेत.

अडथळा होऊ नये असे मांडव घालू नयेत असा उच्च न्यायालयाचा आदेश अस्तित्वात असतानाही केवळ एक लाख रूपयांचा, पंचवीस हजार रूपयांचा दंड करण्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशांचा भंग करणा-यांना पुन्हा तसेच करण्यास फूस मिळण्याचीच शक्यता आहे.

हा प्रश्न केवळ मुंबईपुरता मर्यादित नाही तर पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद अशा शहरांमध्येच नाही तर पूर्ण राज्यासाठी लागू आहे. सरळसरळ कायदेभंग करणा-या कार्यकर्त्यांवर अनेकदा कसलीही कारवाई केली जात नाही, ज्यांच्यावर केली जाते, त्यांच्यावरील खटलेही कालांतराने काढून घेतले जातात. या प्रकारांमुळे या लोकांची भीड चेपते आणि कोणीही सत्ताधारी असला तरी जनतेला होणारा उपद्रव बंद होत नाही.

त्यामुळे उच्च न्यायालयाची ही कारवाई केवळ नावालाच आहे व अशी बेशिस्त वाढण्यास कारणीभूत ठरणारी आहे.

यापुढे असा कायदेभंग करणा-यांना तुरूंगात टाकायला हवे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विकु , सगळे निमूटपणे वाचायचे आणि मान्य करायचे. विरोध करायचा नाही. वेगळे मत मांडायचे नाही. प्रो काँग्रेस तर आज्याबातच नाय . अन्यथा तुम्हाला, इग्नोरपूर्वक नमस्कार. तुमची समजायची लायकी नाही. केवळ की बोर्ड बडवायचाच अधिकार आहे एवढे बरे नाहीतर तुम्हाला फाशीही दिली असती.

आणि पुन्हा हे आणीबाणीवर टीका करणार... भै वाह.

<उदय,
ट्रायकलरचा अपमान करता येत नाही. फ्लॅग कोड मिळवून वाचा जरा.>
------
गृहमन्त्रालयाच्या वेब साईट वरुन फ्लॅग कोड बद्दलची माहिती वाचण्याचा प्रयत्न केला...
http://www.mha.nic.in/national

http://www.mha.nic.in/sites/upload_files/mha/files/flagcodeofindia_07021...

राष्ट्रध्वज म्हणजे सारख्या आकाराचे केशरी, पान्ढरा आणि हिरव्या रन्गाचे तिन आडवे पट्टे आणि मधातल्या पान्ढर्‍या पट्यामधे अशोक चक्र, ३:२ अशा आयताकृती अकार. विविध ९ आकारमान दिले आहेत.

ट्रायकलर म्हणजे राष्ट्रद्वज वजा अशोकचक्र.

आता मोदी यान्नी गळ्याभोवती घातलेला स्कार्फ चे आकारमान ३:२ या प्रमाणात नाही आणि त्यावर अशोक चक्र पण नाही म्हणुन त्याला राष्ट्रध्वज म्हणता येणार नाही. पान क्रमान्क ६ वर स्पष्टीकरण#२ आहे. त्यानुसार मोदी यान्च्या गळ्याभोवतीचे tricolour हे राष्ट्रध्वजाचे प्रतिक मानता येते का?
Explanation 2.
The expression “Indian National Flag” includes any picture, painting, drawing, or photograph or other visible representation of the Indian National Flag, or of any part of parts thereof, made of any substance or represented on any substance.

वरिल स्पष्टीकरणा नुसार त्याला राष्ट्रध्वज मानता येत नाही. अनेक राजकिय पुढार्‍यान्नी, खेळाडुन्नी असे तिरन्गी स्कार्फ घातलेले किव्वा गालावर रन्गवलेले फोटो गुगलल्यावर मिळतात. नरेन्द्र मोदी (योगा दिवस), दिग्विजय सिन्ह, राहुल गान्धी, सोनिया गान्धी... राष्ट्रपती मुखर्जी. तर या सर्वान्नी राष्ट्रध्वजाचा अपमान केला आहे असे आपण मानतो का?
http://indiablooms.com/PhotoFeatureDetailsPage/photoFeatureDetails060910...

माझे मत - असे तिरन्गी उपरणे किव्वा स्कार्फ वापरणे सर्वान्नीच टाळायला हवे. नैतिकदृष्ट्या असे करणे योग्य नाही. प्रत्येक भारतीयाने तसेच सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीने आपल्या कर्तव्याची जबाबदारी ओळखावी आणि राष्ट्रध्वजाचा यथोचित सन्मान करावा अशी अपेक्षा.

अहो उदय,
जसे शिवसेना भगा ध्वज वापरून त्याचा अपमान करते व जसे काही आपणच धर्माचे पाईक आहोत असा भास करते, तसेच कॉंग्रेसच्या ध्वजातच तिरंगा आहे. ते त्यांचा ध्वज बदलतील असे तुम्हाला वाटते का?

माझे मत - असे तिरन्गी उपरणे किव्वा स्कार्फ वापरणे सर्वान्नीच टाळायला हवे.
>>

आपले हे मत अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणारे आहे हे नमूद करू इच्छितो. अर्थात हे माझे वैयक्तिक मत.
(लोकांनी विविधरंगी कपडे उपरणे घालणे ही त्यांची व्यक्त होण्याचीच इच्छा आहे)

Pages