फुसके बार – २० फेब्रुवारी २०१६

Submitted by Rajesh Kulkarni on 19 February, 2016 - 14:44

फुसके बार – २० फेब्रुवारी २०१६

१) वाघाटी या वाघाच्या पिलाप्रमाणे दिसणा-या प्राण्याचा महाबळेश्वमधील वेण्णा लेकच्या रस्त्यावर वाहनाची धडक बसल्यामुळे मृत्यु झाल्याची बातमी पाहिली. या प्राण्याचे नाव प्रथमच ऐकण्यात अले. त्याबद्दल कोणी माहिती देऊ शकेल काय?

२) राजदीप सरदेसाईचा खोडसाळपणा – पुन्हा एकदा

सुमारे २३,००० लोकांकडून केलेल्या सर्व्हेमध्ये काढलेला निष्कर्ष. ४०% लोकांना मोदी हे आपले नेते वाटतात. तर २२% लोकांना पप्पू हवा आहे. पण राजदीप सरदेसाईला आनंदी व्हायला - हा आनंद त्याच्या चेह-यावरून निथळत होता - मुद्दा काय मिळाला तर अगदी काही आठवड्यांपूर्वीच केवळ ८% लोकांना पप्पू हवा होता. त्यातही त्याच्या उत्साहाला भरते कशामुळे आले तर पप्पू, सोनिया आणि प्रियांका यांच्यात मिळून ५०%पेक्षा अधिक लोकांनी कल दिला आहे. त्यामुळे तर तो आणखीच खुश झाला होता. त्यामुळे पुढची लढाई थेट मोदी व कॉंग्रेसमध्येच लढाई होईल इथपर्यंत वल्गना करण्यापर्यंत त्याची मजल गेली.

आता बेशुद्ध व्हायला तयार व्हा. हा सर्व्हे कशासाठी आहे, तर २०१९मध्ये मोदींना पंतप्रधानपदासाठी लढत देण्यास कोण लायक उमेदवार आहे? हो तुम्ही चुकीचे वाचले नाहीत, २०१९मधल्या निवडणुकांसाठी. २०१६ आता कोठे सुरू झाले हो.

राजदीप सरदेसाई, देशात लाळेचे पाट कोठे वाहिले असतील हे आज सहज कळले.

३) उत्तर प्रदेशमधली रानटी संस्कृती

उत्तर प्रदेशात गेल्या दोन आठवड्यात कुठल्याशा विजयोत्सव वा तत्सम कारणांमुळे केलेल्या गोळीबारामध्ये तीन जणांचा मृत्यु झाला आहे. मागे एका लहान मुलाचा, त्या नंतर एका प्रौढाचा तर काल लग्नसमारंभाच्यावेळी झालेल्या अशा गोळीबारात तर चक्क नवरामुलगाच ठार झाला.

उत्तरप्रदेशात अराजक चालू आहे याचे यापेक्षाही अनेक दाखले देता येतील. कोणी अशा गोळीबारात मारले गेले न गेले, तरी मुळात भर रस्त्यावर असा गोळीबार करण्यास परवानगी असणे, मुळात अशा प्रकारे शस्त्रे बाळगणे हेच किती भयानक आहे याची आपल्याला कल्पना येत नाही का? तिकडे पेशावरमध्ये रस्त्या-रस्त्यावर असे चालते असे ऐकण्यात येते. इतके भयानक प्रकार चालू असूनही अखिलेश, त्याचा दळभद्री व भुईला भार असलेला बाप, तेवढाच भुईला भार असलेला त्याचा काका आणि आझम खान नावाचा त्यांनी पाळलेला दैत्य (कधी कधी यांच्यापैकी कोण कोणाच्या आधारावर तगत अहे हेच कळत नाही हे वेगळे) यांच्यापैकी कोणालाही त्यामध्ये काही वावगे वाटत नाही यातच सारे काही आले.

मुलायमकडून मधूनमधून संसदेमध्ये मिळत असलेल्या सहकार्याच्या बदल्यात केन्द्र सरकारदेखील उप्र सरकारविरूद्ध काही कारवाई करताना दिसत नाही. एकूण सगळे कसे आलबेल असल्यासारखे चित्र आहे.

४) बिहारमधील मृत्युंची काहीच किंमत नाही?

श्रीकृष्ण उमरीकर यांनी त्यांच्या पोस्टद्वारे नजरेस आणून दिलेली घटना.

काल बिहारच्या गोखलापूरमधील एका आश्रमशाळेत पाचवीतल्या मुलीने जेवणाच्या वेळी अधिक अन्न मागितले तेव्हा तिला वाढप्याने मारले. त्यावरून त्या मुलीचे वडील तक्रार करायला गेले, तर त्या वडलांना लाथ मारली गेली व त्यात त्यांचा मृत्यु झाला.

पोहोचली का हो ही बातमी आपल्यापर्यत? आता पुढे वाचा. तो बाप मुस्लिम होता.

एका मुस्लिमाच्या मुलीने अन्न कमी पडले म्हणून थोडे अधिक द्या म्हणून विनंती केली तर त्यावरून तिला मारले गेले, एवढेच नव्हे तर त्याबद्दल तक्रार करणा-या तिच्या वडलांना ठार मारले गेले ही बातमी खरे तर किती करूण. पण हेच जर महाराष्ट्रात व तेही फ़डणवीस सरकारच्या कारकिर्दीत झाले असते, तर या लोकांनी या बातमीवरून काय काय केले असते याची कल्पना येते का हो?

तर यापुढे नीतिश-लालूच्या राज्यातील गुन्हे हे केवल गुन्हेच. कायदा गुन्हेगारांचे काय करायचे ते ठरवेल. फडणवीस सरकारच्या महाराष्ट्रात असे काही झाले तर मात्र असंवेदनशील सरकार, सामाजिक अन्याय वगैरे कारणांवरून बोंब ठोकायची.

५) सतिनाथ सारंगी – देशद्रोह्यांचे प्यादे?

टीव्हीवरील चर्चांमधून काही जणांचे पितळ उघडे पडते. आज टाइम्स नाऊ वरील चर्चेमध्ये अर्णबने एक प्रश्न विचारला की माओइस्ट हिंसाचार आणि काश्मिरी दहशतवाद यांच्यात काय समान सूत्र आहे? त्याआधी मारूफ रझा यांनीही देशाला अस्थिर करण्यामागचे कारस्थान व्यवस्थित समजावून सांगितले.

अर्णबने हा प्रश्न विचारल्यावर हा सारंगी इतका बिथरला की सनातन संस्था, मोदी, वगैरें असंबद्ध मुद्द्यांवरून वरून तारे तोडू लागला. हाच सारंगी भोपाळ गॅस दुर्घटनेतील पीडितांना नुकसानभरपाई मिळवून देण्यात अग्रेसर होता. त्यामुळे त्याचे असे विचित्र वागणे केवळ संशयाला वाव देणारे होते.

त्याचे बिथरणे पहाण्यासाठी तरी आजचा हा कार्यक्रम पहा. भरपूर आरडाओरडा असला तरीही.

६) हे फटकारणे?

मुंबई भाजपच्या आशीष शेलार यांना बेकायदेशीरपणे होर्डिंग लावण्यावरून उच्च न्यायालयाने फटकारले अशी बातमी वाचली. त्यांना तब्बल २५,००० रूपयांचा दंड करून ती रक्कम नाम फाउंडेशनला देण्यात यावी असा आदेश दिला.

२५,००० रूपयांचा दंड करण्याला फटकारणे म्हणायचे काय?

मागेही एका गणपती मंडळाला उच्च न्यायालयाने एक लाखाचा दंड करून ती रक्कम अशीच शेतक-यांना मदत म्हणून द्यावी असा आदेश दिला होता. अशा प्रकारे कायदेभंग करणा-यांना दंडाच्या रकमेची भीती वाटत नाही इतके ते निर्ढावलेले आहेत.

अडथळा होऊ नये असे मांडव घालू नयेत असा उच्च न्यायालयाचा आदेश अस्तित्वात असतानाही केवळ एक लाख रूपयांचा, पंचवीस हजार रूपयांचा दंड करण्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशांचा भंग करणा-यांना पुन्हा तसेच करण्यास फूस मिळण्याचीच शक्यता आहे.

हा प्रश्न केवळ मुंबईपुरता मर्यादित नाही तर पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद अशा शहरांमध्येच नाही तर पूर्ण राज्यासाठी लागू आहे. सरळसरळ कायदेभंग करणा-या कार्यकर्त्यांवर अनेकदा कसलीही कारवाई केली जात नाही, ज्यांच्यावर केली जाते, त्यांच्यावरील खटलेही कालांतराने काढून घेतले जातात. या प्रकारांमुळे या लोकांची भीड चेपते आणि कोणीही सत्ताधारी असला तरी जनतेला होणारा उपद्रव बंद होत नाही.

त्यामुळे उच्च न्यायालयाची ही कारवाई केवळ नावालाच आहे व अशी बेशिस्त वाढण्यास कारणीभूत ठरणारी आहे.

यापुढे असा कायदेभंग करणा-यांना तुरूंगात टाकायला हवे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

४.<पोहोचली का हो ही बातमी आपल्यापर्यत?>
ही बातमी कालच्या इंडियन एक्स्प्रेसच्या फ्रंट पेजला होती. बातमीतला एक परिच्छेद देतोय : According to her, a school teacher named Z N Ansari, also known as Mastan, rushed out shouting and threatening him, “Cheer denge (will tear you apart)”. “Hardev Ram (the school headmaster) also joined in, saying ‘maaro’. Mastan hit my father between his legs.”

महाराष्ट्रात असं काही झालं तर गदारोळ होतं असं नुसतं म्हणायचं असतं कारण महाराष्ट्राला पुरोगामी मानायची पद्धत आहे. खैरलांजी, खर्डा-जामखेड प्रकरणी आवाज उठवणारे लोक मोजकेच असतात. त्यांना गप्प करणं किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणंही फार कठीण नसतं.

२. हा मूड ऑफ द नेशन राजदीपने पहिल्यांदाच तपासलाय का? २०१४ पूर्वीसुद्धा तो असे सर्व्हे करून कार्यक्रम करायचा. तेव्हा काँग्रीसची घसरण आणि मोदींची वाढती लोकप्रियता त्यात दिसायची. त्याला खोडसाळपणा म्हणतात का? की तेव्हा तो लाळ गिळून स्टॉक करून ठेवत होता? अमेरिकेतसुद्धा राष्ट्राध्यक्षांच्या लोकप्रियतेबादल वेळोवेळी असे सर्व्हे केले जातात.

कन्हैयाच्या भाषणाचे डॉक्टर्ड व्हिडियो दाखवणार्‍या न्युज चॅनेल्सना काही लोकांमध्ये खोडसाळपणा न म्हणता उचंबळून आलेली देशभक्ती म्हणतात.

३. उत्तरप्रदेशात समारंभांत गोळीबार हा काही आजचा प्रकार नाही. त्याच उत्तरप्रदेशातल्या सध्याच्या सरकारशी सरळ काय संबंध ते कळले नाही. गेल्या सहस्रकाच्या शेवटी माझा त्यावेळचा बॉस एका विवाहसमारंभासाठी झाशीला गेला होता. त्या समारंभात असाच प्रथेप्रमाणे गोळीबार केला गेला आणि खुद्द नवरदेवच बळी पडला होता. आता ही प्रथा वाईट आहे हे उघडच आहे. शिकले सवरलेले, कायद्याचे नुसते ज्ञानच असणारे नव्हे तर ते चरितार्थाचे साधन असणारे लोक प्रत्यक्ष न्यायालयात आरोपी, त्याचे वकील , समर्थक आणि पत्रकारांना आधी ठरवून, सांगून सवरून सलग दोन दिवस मारहाण करू शकतात हे जंगलराज आणि उत्तरप्रदेशातले जंगलराज यात गुणात्मक फरक असला तर मारहाणीचा प्रकारच अधिक भयंकर वाटतो.

दरम्यान फुसक्या बारांत स्थान न मिळालेल्या काही ठुसक्या बातम्या.

पटियाला कोर्टात सलग दोन दिवस मारहाणीचे सत्र चालवणार्‍या वकील महोदयांच्या नावे दिल्ली पोलिसांनी समन्स जारी केले आहे. दरम्यान ते वकील महोदय अन्य वकिलांकडून सत्कार करून घेत असल्याच्या बातम्या आणि फोटो छापून आलेत. दिल्ली पोलीसमात्र ते आपल्याला भेट देऊन कधी उपकृत करतील याची वाट पाहताहेत.
त्यांनी फेसबुकच्या व अन्य साधने वापरून या `उपक्रमा'साठी लोकांना उद्युक्त व आमंत्रित केल्याचेही स्पष्ट दिसते आहे. पण मारहाण करणे हा काही घोषणा देण्याइतका गंभीर गुन्हा नाही. नाही का?

काल झी न्युजवरचा एक कार्यक्रम दोन मिनिटे पाहिला. सेंट्रल युनिव्हर्सिटीजमध्ये तिरंगा फडकवायला विरोध करणारे लोक शहीद सैनिकांच्या बलिदानाचा अपमान करत आहेत अशी थीम होती. सैनिकांच्या अंत्यविधीप्रसंगी शोक करणार्‍या त्यांच्या बायकामुलींची तीच दृश्ये पुन्हा पुन्हा आदळत होती.
कोणी विरोध केला, का केला, खरंच केला का? याच्याशी आम्हाला काही देणेघेणे नाही. अमक्याने देशविरोधी घोषणा दिल्या अशी ओरड करून मग त्याच्या मागे लागायचे, त्यातलाच हा प्रकार.
आदिवासी लोक जंगली जनावरांची शिकार करण्यासाठी मोठ्या समूहाने रानात जाऊन वेगवेगळे आवाज करून त्या जनावराला पळता भुई थोडी करून घेरून मारतात, त्याची आठवण होते आहे ही रोहित, कन्हैया, इ. प्रकरणे पाहताना. निवडलेली शिकार स्वतंत्र विचार करू शकणारे आणि स्पष्ट शब्दांत निडरपणे ते मांडणारे तरुण असावेत हा काही योगायोग नाही.

५ अर्णवच्या शोमध्ये येऊन आरडाओरडा करतो म्हणजे काय? हिंमत होतेच कशी असं काही करायची?

<त्याआधी मारूफ रझा यांनीही देशाला अस्थिर करण्यामागचे कारस्थान व्यवस्थित समजावून सांगितले.>

आणीबाणीच्या वेळच्या परिस्थितीबद्दल कुमार केतकरसुद्धा असंच व्यवस्थित समजावून सांगतात. निक्सन, जॉर्ज फर्नांडिस, रेल्वेचा संप, धान्यटंचाई.....

या इथे लिहायचं नाही म्हणून रवीशकुमारच्या कालच्या ऐतिहासिक एपिसोडविषयी वेगळा धागा काढावा लागला. सततचा अपप्रचार इग्नोर करता येत नाही म्हणून या सदरावर मी अधून मधून लिहीत होतो. शिवीगाळ होणार, शिवीगाळ झाल्यानंतर काही लोक मानभावी प्रतिक्रिया देणार या तयारीसहीत. पण सामाजिक आशय वगैरे गोष्टी वेशीवर टांगून ज्यांनी आपल्या वैयक्तिक इगोला कुरवाळत शुभेच्छा दिल्या आणि अपेक्षाभंग केला त्यांनीच आता पुढाकार घेऊन इथून पुढे या विषयात लिहीत रहावे.

राकु

एकदम मस्त लेख, तुम्हाला विरोध करायचेच म्हणुन तुमच्या विरोधात लिखाण होते आहे हे स्पष्ट दिसत आहे.
तुम्ही लिहित राहा.

जय हिंद जय महाराष्ट्र, जय श्रीराम

मोदीची लोकप्रियता कमी दाखवली म्हणून सरदेसाई खोड्या करणारा कसा ठरतो? Uhoh
केजरीवाल बरोबर बोलले होते संघ भाजपा यांना विरोध करणार्‍या लोकांना काही दलाल लोक देशद्रोही ठरवत आहे.

सकुरा - त्या फोटो मधे गळ्याभोवती जे उपरणे आहे त्यात केवळ तिन रन्ग (लाल, हिरवा, पान्ढरा) आहेत तो राष्ट्रद्वज नसावा.

राष्ट्रद्वज वापरला गेला असेल तर योग्य नाही. जाणकारान्नी खुलासा करावा.

व्वा! राकु,
एकदम जबरदस्त लेख. असेच लिहित राहा. आणि ह्या वरच्या सर्व 'सोकॉल्ड सेक्युलर' ट्रोलभैरवांकडे अजिबात लक्ष देऊ नका.
शुभेच्छा!

राजदीप सरदेसाई, देशात लाळेचे पाट कोठे वाहिले असतील हे आज सहज कळले.
<<
हा माणुस एकनंबरचा कॉंग्रेजी भाट आहे. ह्याला न्युयॉर्कला तिथल्या लोकांनी उगाच धुतले नव्हते.

राकुंच्या धाग्यांवर आता भक्तजनांची भजने सुरू झाली, म्हणजे त्यांच्या माऊथपीसगिरीवर शिक्कामोर्तब झाले म्हणायचे.

काय विदूषक, बरोबर ना?

निव्वळ तिन रन्गाचे उपरणे जे चित्रात दिसत आहे आणि राष्ट्रद्वज यात फरक आहे. राष्ट्रद्वजात केशरी/ भगवा, पान्ढरा आणी हिरवा असे तिन पट्टे हवेत, मधातल्या पाढर्‍या पट्ट्यात निळे अशोक चक्र, २४ स्पोक्स आणि लाम्बी-रुन्दी यान्चे प्रमाण (३:२) असे असायला हवे .

चित्रात अशोक चक्र 'दिसत' नाही आणि लाम्बी-रुन्दी आकारमान ३:२ नाही म्हणुन त्याला राष्ट्रद्वज म्हणता येणार नाही (असे मला वाटते). जाणकारान्नी प्रकाश टाकावा.

३ रन्गाचे पट्टे चेहेर्‍यावर लावलेले, डोक्यावर रन्गवलेले (अर्थात चित्रात - क्रिकेटच्या सामन्यात) अनेक्काना बघितले आहे तेव्हा तो राष्ट्रद्वजाचा अपमान होत नाही.

Prasad. | 20 February, 2016 - 03:36 नवीन
काय पण गोळी एकदम निशाण्यावर लागलेय, फिदीफिदी 21.gif

>>>>>>>

अगदी, तरी खोड आहे ती जाणार नाही.

ऊदय

Happy

उदय, ज्या कोणी त्यांच्याविरुद्ध तक्रार केली आहे ती सभ्यास करताच केली असेल का?

लिटल जिमी , हे कुलकर्णी काका आहेत. नमस्कार कर त्यांना.
आज इथं गर्दी झालीय. त्यांना बातम्या वाचून दाखव.

http://teekhimirchi.in/2015/10/hindu-to-wear-langot-not-underwear-togadia/

मी निघतो. काळजी घ्या म्हण सर्वांना.

उदय,
ते उपरणेच आहे. तरीही कोणाला काहीही निमित्त पुरते एवढेच.
मागे एका कार्यक्रमात मोदींना एका मुस्लिम व्यक्तीने स्कलकॅप डोक्यावर घालण्यासाठी दिली होती, निव्वळ भेट देण्यासाठी नव्हे. एखाद्या मुस्लिम व्यक्तीला कोणी सार्वजनिक कार्यक्रमात उपरणे दिले व ते त्याने परिधान करावे अशी अपेक्षा केली तर तेही असभ्यपणाचे ठरेल. पुन्हा एकदा सांगतो एखादी गोष्ट भेट म्हणून देणे वेगळे आणि त्याने ते परिधान करणे हे वेगळे. तेव्हा ज्या कोणी मोदींना स्कलकॅप घालण्याचा प्रयत्न केला, ते निषेधार्हच होते. दुसरा कोणी असता तर त्याने ती टोपी घातलीही असती, तेव्हा हा प्रत्येकाच्या याबाबतीतल्या स्वातंत्र्याचा भाग आहे. तरीही आता सकुरा ज्याप्रमाणे तिरंग्या उपरण्याचे खुसपट काढत आहेत, त्यांच्यासारख्या मोदीफोबिया झालेल्या लोकांनी तेव्हाही रान उठवले होते आणि हा मूलभूत मुद्दा लक्षात न घेता तसाच फोबिया झालेल्या लोकांनी त्यावरूनही राळ उठवली होती.

मयेकर, मीदेखील ती बातमी एक्सप्रेसमध्येच वाचली. पण ज्यावरून राळ उठवली जाते त्या टीव्ही चॅनल्सना चर्चा करण्यासाठी ही बातमी किरकोळ वाटली असती. हेच जर महाराष्ट्रात झाले असते, तर कुमार केतकर,शिवसेनेतून लग्नसंबंधांमुळे भ्रष्टगुंडवादीत गेलेले नार्वेकर वकील यांना बोलवून इंग्रजी-हिन्दी चॅनल्सवर चर्चा झडलीच असती की नाही?
बाकी "उत्तरप्रदेशात समारंभांत गोळीबार हा काही आजचा प्रकार नाही. त्याच उत्तरप्रदेशातल्या सध्याच्या सरकारशी सरळ काय संबंध ते कळले नाही." हा तर तुमचा सिक्सरच आहे. मी मागेही म्हटले होते, की तुमच्याकडून जशा कमेंट्स पूर्वी यायच्या, भलेही माझ्या मताविरूद्ध असोत, त्या प्रकारच्या आताशा येत नाहीत. तुमचे अकाउंट इथली खोडसाळ त्रयी चालवत आहे की काय अशा या कमेंट्स वाटतात. एरवी तुम्ही हे विधान केलेच नसते. हे जर चालूच आहे तर मग कॉंग्रेस-भ्रष्टगुंडवादीच्या कारकिर्दीत शेतक-यांच्या आत्महत्या ज्या प्रमाणात चालू झाल्या त्या थांबवण्यासाठी आताच्या सरकारने जलशिवार ही योजना जोमाने चालवायची गरजच राहिली नाही की हो. बर रस्त्यावरून अशी शस्त्रे घेत मिरवणे यात तुम्हाला काहिच वावगे वाटत नाही काय?
अमेरिकेत तसे सर्व्हे केले जातात म्हणजे ते येथेही योग्य ठरतात की काय? बरे ते सर्व्हे केले तरी आजच्या घडीला कोणाची लोकप्रियता किती इतके ठिक आहे. पण अाजपासून तीन वर्षांनंतर होणा-या निवडणुकांबद्दल निष्कर्ष काढणे यावरून मी लाळेचे पाट म्हटले. ही गोष्ट तुमच्या लक्षात आली नाही?
मारूफ रझा यांनी तुमचा भगव्यांना विरोध असेल तर तो दुस-या पद्धतीने करा, येथे देशविरोधी कारस्थान चालले आहे, त्याला बळी पडू नका असेही सांगितले. मारूफ सगळ्याच पक्षांवर कोरडे ओढतो हेही तुम्हाला माहित असावे. त्यांच्या बरोबर कुमार केतकरांच्या प्रवचनाची तुलना करता म्हणजे कमाल आहे की नाही. मी कॉंग्रेससमर्थक आहे असे केतकर उघडपणे कबूल करतात, तेव्हा त्यांची सारी विद्वत्ता (ते खरोखर विद्वान आहेत हेही मी कोणताही पूर्वग्रह न बाळगता सांगू शकतो) त्यातच खर्ची पडते, तरी तुम्ही त्यांचे उदाहरण देता, शिवाय सध्याच्या मुद्द्याशी संबंध नसताना.

इथले काही जण त्यांच्या इग्नोरन्समुळे असेल, विचार न करता सवंग कमेंट करण्याच्या सवयीमुळे असेल किंवा सगळे कळूनही असेल, त्या सतिनाथ सारंगीचे मित्र आहेत हे अगदी स्पष्ट दिसते. तुम्ही त्या मार्गाने जाऊ नयेत ही इच्छा. दूध का दूध या न्यायाने.

पुन्हा लिहितोय. समारंभात बंदुकीच्या फैरी झाडण्याची प्रथा तिथे अनेक वर्षांपासून आहे. ती आताच्या अखिलेश यादव सरकारच्या काळातच फैलावलीय असे नाही. त्यामुळे त्या सरकारचा कारभार या प्रकाराला कसा कारणीभूत ते सांगा.
समाजवादी पार्टीच्या सरकारवर माझाही रागच आहे. गेली दोन-अडीज वर्षे तिथे दंगे होऊ देऊ देण्यात त्यांची दंगेखोर पक्षाला साथ आहे असेच माझे मत आहे. पण या समारंभातल्या गोळीबार प्रकरणाशी त्यांचा कसा संबंध येतो ते सांगा.

मी ज्या झाशीतल्या गोळीबार प्रकरणाचा उल्लेख केला तेव्हा तिथे भाजपचे सरकार होते. अत्ताचे देशाचे गृहमंत्रीच तिथे मुख्यमंत्री होते .आज उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे सरकार असते तर हे असले गोळीबार लगेच बंद होतील असं तुम्हाला खरंच वाटतंय का?
"आता ही प्रथा वाईट आहे हे उघडच आहे" असे मी लिहिलेले असताना "बर रस्त्यावरून अशी शस्त्रे घेत मिरवणे यात तुम्हाला काहिच वावगे वाटत नाही काय?" हे विचारायचे प्रयोजन?

----
मूड ऑफ नेशन : आजपासून तीन वर्षांनी कोण मोदींना आव्हान देऊ शकेल असा प्रश्न त्या सर्व्हेत विचारला. तसा तो का विचारू नये?
-----------
आता जशी कारस्थानाची थिअरी मांडली जातेय तशीच आणीबाणीच्या बाबतही मांडली जायची हा संबंध.
-------.

तुमच्या आधीच्या एका धाग्यावर तुम्ही मध्यप्रदेशातले व्यापम प्रकरण काँग्रेसच्या काळापासून चालू आहे असे म्हटलेत. पण या प्रकरणाशी संबंधित साक्षीदार, आरोपीं, पत्रकार असे पटकी लागल्यासारखे कधीपासून मरायला लागलेत याकडे सोयिस्कर दुर्लक्ष केलेत.

जिथे मुद्द्यांवर उत्तरे नसतील तिथे तुम्ही पर्सनल होता, लिहिणार्‍याला आणि त्याने जे लिहिलेय त्याला शेलकी विशेषणे वापरता हे पुन्हा पुन्हा दिसतेय. माझ्या आयडीची , तो कोण चालवतो, मी कोणत्या मार्गाने जावे याची काळजी नाही केलीत तरी चालेल. ते पाहायला मी समर्थ आहे. मी होताहोईतो पर्सनल कमेंट करणे टाळतो. मुद्द्याला मुद्द्यानेच उत्तर द्यायचा माझा प्रयत्न असतो. आता तुम्ही नाईलाजच केलात म्हणून हे असे दुसर्‍यांदा लिहावे लागतेय.

यापुढे सिक्सर, खोडसाळपणा, आयडी भलत्याच्या हवाली असलं, हद्द झाली काही लिहिण्यात वेळ नाही घालवलात तर चालेल. माझ्या प्रतिसादांतल्या काही मुद्द्यांना उत्तरे द्यायचे टाळलेत तसेच अन्य बाबतींतही केलेत तरी चालेल. त्यातून मला लावायचा तो अर्थ मी लावेन.

जेएनयु घटनेनंतर सगळा फोकस कन्हैया कुमारवर आहे, ज्याने वादग्रस्त घोषणा दिल्याच नाहित. व्हाय नो वन (इंक्लुडिंग कुलकर्णि, मयेकर हियर) इज टाॅकिंग अबाउट धिस एलिफंट (उमार खलिद) इन द रुम?..

कन्हैया तिहारमधून बाहेर आला का? त्याला मारणारे कआळाकोटवाले कोठडीत सोडा, पोलीस.चौकीत चौकशीला तरी आले का? एक सावज निसटत नाही तर तुम्ही दुसर्याच्या मागावर. Wink

मयेकर,
व्यापमं घोटाळ्यात काही मंत्र्यांवर खतले चालू आहेत. त्यामुळे ते चौहान राजवटीच्याअाधीपासून चालू असले तरी त्यावर ही कार्यवाही व कारवाई चालू आहे. त्यामुळे या घोटाळ्याचे समर्थन करण्याचा वा त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रश्नच नाही. तुम्ही तसा समज करून घेतला त्याला मी काय करू शकतो?
तुमच्या कुठल्या मुद्द्याला माझ्याकडे उत्तर नाही असे आजवर झालेले नाही. शिवाय मी तुम्हाला इतर काही नगांसारखे खोडसाळ समजत नाही म्हणूनच मागच्या कमेंटमध्ये तसे लिहिले होते. तुम्ही त्याचा चुकीचा अर्थ काढलात हे दुर्दैव.
उघडपणे शस्त्रे घेऊन जाण्यावर बंदी असेलच, ती अंमलात आणण्याबद्दल काही करू शकते की नाही अाताचे सरकार. की तुम्ही म्हणता तसे झाशीमध्ये मागे काही झाले नाही म्हणून आता जे होते आहे त्याबद्दल काही करायचे नाही? शिवाय मी एक म्हणले की तुम्ही कुठले तरी दुसरे उदाहरण काढता हे योग्य आहे का? आताही समाजवादी सरकारला तुमचा जो आक्षेप अाहे तो केवळ काही दंगलींच्याबाबतीत त्यांनी काही कारवाई केली नाही म्हणून. बाकी त्यांचे जे जंगलराज चालले अाहे त्याबद्दल तुमचा आक्षेप दिसत नाही. म्हणूनच मी समारंभांमधील वेगवेगळ्या गोळीबाराच्या घटनांमध्ये जे झाले ते सांगितले त्यात तर तुम्हाला काही वावगे वाटत नाही, वर तुम्ही दुस-याच कुठल्यातरी घटनेबद्दल लिहिणार.
ज्या वकिलांनी मारहाण केली वगैरे आरोप अाहेत त्यांच्यावर अद्याप काही कारवाई झाली नाही तर मी काय करू? तुम्ही काहीही कमेंट करायची व माझ्याकडून उत्तरे मागायची असा तुमचा प्रकार चालू आहे. शिवाय जसे काही या वकिलांच्या वर्तणुकील माझा पाठिंबा आहे असा समज तुम्ही करून घ्यायचा व त्यावरून काहीही लिहायचे.
ही तुमची पद्धत मी व्यवस्थितपणे दाखवलेली आहे. मात्र तुमच्या मागील कमेंटमध्ये तुम्ही लिहिल्याप्रमाणे तुम्हाला हे दिसण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे तुमची कमेंट करण्याची अशी पद्धत पाहता यापुढे तुमच्या कमेंटवर काही लिहिणार नाही.
नमस्कार.

काल झी न्युजवरचा एक कार्यक्रम दोन मिनिटे पाहिला

धन्य तुमच्या पेशंस ची.

फोकस कन्हया कुमार वर आहे कारण तुरुंगात तो आहे. आणी उमर खलीद ने तशा घोषणा दिल्या असतील (जे अजूनही सिद्ध झालेले नाहिये ) तरीही तो देशद्रोहाचा गुन्हा होत नाही. दरम्यान उमर खलीद चे वडील सिमि चे ( बंदी येण्यापूर्वी) सदस्य होते याचा गवगवा सुरु आहे.

When fascism comes to America it will come draped in the flag हे अका अमेरिकन लेखकाचे वाक्य आठवले.

>>२०१४ पूर्वीसुद्धा तो असे सर्व्हे करून कार्यक्रम करायचा. तेव्हा काँग्रीसची घसरण आणि मोदींची वाढती लोकप्रियता त्यात दिसायची. त्याला खोडसाळपणा म्हणतात का?

प्रखर ज्वलंत राष्ट्रवाद आणी खोडसाळपणा यातला फरक कळत नाही? आर्णब ची शिकवणी लावा.

विजय कुलकर्णी,
२०१४मध्ये निवडणुका जवळ होत्या की नाही? मग काहीही प्रश्न काय विचारता?
झी न्यूजवर काय चालते त्याचे समर्थन मी कधी केले?
तुम्ही देशद्रोहाची कोर्टाची व्याख्या चिवडत बसा. देशविरोधी घोषणा देणे जे चालू आहे मग ते जेेनयू किंवा जादवपूरमधले असू दे त्यात तुम्हाला काही वावगे वाटतच नसेल तर तुम्ही धन्य आहात. आणि जर वावगे वाटत असेल तर त्याचा निषेध करायल हवा की नको?

Pages