संध्याछाया..

Submitted by अत्रुप्त आत्मा on 18 February, 2016 - 08:59

https://scontent-lax3-1.xx.fbcdn.net/hphotos-xpf1/t31.0-8/fr/cp0/e15/q65/11700956_972982042788082_3452425137241717189_o.jpg?efg=eyJpIjoiYiJ9

संध्यासमयी देवालय हे आकाशाशी सरते..
एक अशी हि अबोल संध्या मनामधेही उरते.

माहीत नाही तिचे नि माझे कुण्या जन्मीचे नाते
ओळख नसता जन्मखुणा ती कुठल्या कसल्या देते!?

दूर देशीचा वाटसरू मी आलो या संध्येशी
नकळत नाते कसेच जुळले हिच्या मग्न छायेशी?

हिशोब मी हि कशास बांधू? उरतो तिच्याच पाशी
देवाघरचा मी हि मानव नाते आकाशाशी

घेऊन जातो जन्म खुणा मी माझ्या या संध्येशी..
अशीच भेटो संध्या छाया पुनः पुन्हा या देशी..

झाले लिहून सुचले जितुके अता जरा मी 'येतो!'
मिळालेच जे दान हाताला तुमच्या हाती देतो.
-----०-----०-----०------०----
शुभ संध्याकाळ..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users