वाघनखांना आमच्या धार आहे

Submitted by चिंतामण पाटील on 14 February, 2016 - 03:46

नेहरू विद्यापीठातल्या घटने नंतर अनेक वर्षे झोपलेला माझ्यातला कवी जागा झाला-
-चितामण पाटील

आहोत आम्ही थोडे भावनिक,
आहोत थोडे उदार
सतरावेळा सोडूनही
शेवटी झेलली तलवार

सुराज्याच्या आडवे याल तर
तलवार आरपार आहे

सावध रहा आमच्यापासून
वाघनखांना आमच्या धार आहे ।।धृ।।

आम्ही आमचा देश घडवू
तुम्ही काय मजा मारायला?
आमच्या हाडांचा करु अग्नि
तुम्ही काय अंग शेकायला?
विसरु नका लाल महाल
शिवाचा बोटावरचा वार आहे

सावध रहा आमच्यापासून
वाघनखांना आमच्या धार आहे ।।१।।

आम्ही केलं स्वागत तुमचं
आमचा तो मोठेपणा
म्हणूनही काही अभिमानाचा
मोडला नाही कणा
कोणापुढेही वाकायचं नाही
आमच्यात शिवरायाचा खार आहे

सावध रहा आमच्यापासून
वाघनखांना आमच्या धार आहे ।।२।।

येथे राहून पाक आपला
म्हणू नका
सगळं जग सोशील तुमचं
त्यात आम्हाला गणू नका

चालतील नखरे सगळीकडे
पण हा हिंदुत्वाचा अंगार आहे

सावध रहा आमच्या पासून
वाघनखांना आमच्या धार आहे ।।३।।

८८०५२२१३७२

Group content visibility: 
Public - accessible to all site users