कुत्रे पालन दोन अनुभव

Submitted by अश्विनीमामी on 9 February, 2016 - 06:40

कुत्रेपालनावर स्वतंत्र धागा आहेच पण आज मिपावर मुविंचा छान पैकी लेख वाचून राहवले नाही म्हणून दोन अनुभव शेअर करत आहे.

१) वाइट अनुभवः कुत्र्यांचे रजिस्ट्रेशन रिन्यू करण्यापूर्वी त्यांचे परत लसीकरण करावे लागते. हे दर वर्शीच करावे लागते. तर आमच्या व्हेट बाईंकडॅ गेले. संध्याकाळी तिथे खच्चून गर्दी होते. व मला दोन कुत्रे परत आणणे जरा अवघड होते. शेजारीच पेट सामान विकणारे दुकान आहे. तिथून एक मुलगा आला व म्हणे आमच्या इथे परळ हॉस्पिटल मधून आलेला व्हेट आहे तुम्ही इकडे या. तर मी गेले. पोर गेला डॉक्टर होता. त्याला लसीकरण करायचे आहे असे सांगून बसले. तर त्याने परत त्या पोराला बोलवले जो बाहेर स्काउटिंग करत होता. त्यालाच औषधे शोधून इंजेक्षन बनवायला सांगितले व दोघांनी मिळून इंजेक्षने दिली.

ती दिली म्हणून कुत्र्याच्या प्रगती पुस्तकात नोंद केली जाते व व्हेट ने सही शिक्का मारायचा असतो. त्या पोरगेल्या डॉक्टरने काच कुचत सही केली. पण शिक्का नव्हताच. एका डॉ.चे व्हि जिटिंग कार्ड दिले.
माझ्या कुत्र्याचे नुकतेच कॅन्सरचे ऑपरेशन झाले असल्याने मी हिची लाइफ एक्स्पेक्टन्सी किती वगैरे जुजबी प्रश्न विचार ले तर तो म्हणे सोळा सतरा वर्शे असते कुत्र्यांचे लाइफ. ( तेव्हा मला शंका आली की समथिंग इज नॉट राइट. ) पण पैसे देउन घरी परतायची घाई होती.

काही दिवसांनंतर कुत्र्याला केनेल मध्ये दोन दिवस ठेवावे लागले व तिथे केनेल फीवर म्हण़ जे फ्लू ची लागण झाली. वीनी( डॅशुंड कुत्री) आजारी झाल्याने परत नेहमीच्या व्हेट बाई कडे गेले तर ती म्हणे की तिला स्पर्धा म्हणून ते दुकानदार कोणालाही आणून बसवतो. तो पोरगेलासा डॉकटर परळ
अ‍ॅनिमल हॉस्पिटल मधील कंपाउंडरचा मुलगा होता. काहीच क्वालिफिकेशन नस्ताना तिथे बसवला होता.
ते व्हॅक्सिनेशन ही ग्राह्य धरले जाणार नाही. ही शुद्ध फसवणूक झाली व पैशापरी पैसे गेले. व्हेट चे सर्टिफिकेट क्लिनिक मध्ये लावलेले हवे. व रेप्युटेड व्हेटकडेच कुत्र्यांना न्यावे हे शिक्षण झाले.

आजकाल जराशी जागा असलेले लोक केनेल काढतात पण शास्त्रशुद्ध पद्धतीने कुत्र्यांना ठेवत नाहीत.
आपण मजबूरी म्हणून एक दोन दिवस कॉम्प्र माइज करतो पण ते कुत्र्यांना त्रासदायकच ठरते. ठाण्यातील एक केनेल मध्ये असा अनुभव आला. कुत्र्यांना व्यवस्थित खायला दिले गेले नाही व त्यांच्या घरातील जे दोन कुत्रे होते ते व्यवस्थित वॉक ला नेउन आणले गेले होते व केनेल मधील कुत्रे बांधून घातलेले. पैसे अवाच्या सवा घेणार. अगदी तिडीक आली. अश्या केनेल मध्येच आपल्या पाळीव कुत्र्यांना केनेल फीव्हर, टिक ची लागण होउ शकते. व पुढे त्रास उद्भवतात.

२) चांगला अनुभवः

अचानक टोकाला गेलेल्या किडनी डिसीज मुळे आमची वीनी २३ तारखेला वारली. व्हेट बाईंनी अँब्युलन्स चे नाव देउन ठेवले होते. त्याला फोन केला तर तो नेमका पुण्याला. त्याने दुसरा एक नंबर दिला. त्याला फोन केल्यावर तो लगेच दादर मधून निघाला. त्याला आमचे काँप्लेक्स माहीतच होते कारण इथे खूप लोकांनी कुत्री पाळली आहेत. व बरीच वेग वेगळी ब्रीड्स आहेत. तरतरीत काळा सावळा मराठी तरूण घरी आला. स्वतः बॉडी उचलून लिफ्ट मधून नेली. व सीएनजीवर चालणारी मारूती व्हॅन अँब्युलन्स होती त्यात मागे ठेवली. आम्ही परळ मधील प्राणी हॉस्पिटल मध्ये गेलो. तिथे दहनाची
पावती घेतली.

सर्व वातावरण अगदी साधे व स्वच्छ आहे. तिथे काम करणारे सर्व मराठीच लोक्स. त्यांनी मला विचारले पूजा करायची का? काही लोक करतात. त्याने उदबत्ती पण पेटवून आणून दिली. गंगाजल दिले. ( एक बाई आहेत त्या गंगाजल आणून देतात असे तो म्हणाला. ) इलेक्ट्रिक क्रिमेटोरिअम मध्ये
पुढील क्रियाकर्म आटोपून बाहेर आले. हे कायम चालू असते सकाळी आठ ते दुपारी चार परेन्त. माझ्या मागे नंबर लागलेच होते. अश्या ठिकाणी आपण फार वेळ राहू शकत नाही. विचित्र वातावरण
असते ते व मनःस्थिती ही उद्विग्न असतेच.

अ‍ॅम्ब्युलन्स वालया मुलाला परत पवईला जायचे होते. मी सोडतो तुम्हाला म्हटला. व कांजूर परेन्त सोडले पण. एका नव्या चांगल्या केनेलचा पत्ता दिला. अगदी रात्री दोन वाजता पेट इमरजन्सी आली
तरी आम्ही जातो तेवढीच प्राण्यांची सेवा होते असे म्हणाला. सच अ काइंड सोल.!!

मुविंच्या लेखाला पूरक असा हा लेख आहे. सर्व पत्ते फोन माझ्याकडे आहेत. लागल्यास विपू करावी.
मी आता काही दिवसांनी रेस्क्यू किटन/ पपी अ‍ॅडॉप्ट करणार आहे. मिस यू वीनी. यू वेअर लव्हड.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अग टिना , १९८७ नंतर २०१५ उजाडल आमच्याकडे आणता आणता.
पण निरपेक्ष पणे जिव लावणारे अवतीभवती कोणी अस्णे हे फार छान फिलिंग असतं Happy अगदी आमचा बोकोबाही .

अमा, विनी तुमच्या लिखानात आढळायचीच. मीही अजून दहा-बारा वर्षाने गावाकडे कायमचे रहायला गेल्यावर कुत्रा पाळणार आहे. मुलीची मांजरीची आवड आहे, पण तवर तिचे लग्न होऊन जाईल म्हणून मला मांजर संभाळावे लागणार नाही. Happy मला मांजरी घरात आवडत नाहीत.

पण निरपेक्ष पणे जिव लावणारे अवतीभवती कोणी अस्णे हे फार छान फिलिंग असतं >> अगदी खरं.. पण जीव अजुनही टांगलेला आहे त्याच्या जाण्याने.. त्यातही आईचा.. मग त्याच्या जागी कुणाला रिप्लेस करण तिला जीवावर येत आहे..

आमचा पामेरिअन sam पण २८ जाने. गेला. आम्हि सगळे खुप रडलो. पण मुलगा ( ९ वय) न रडता मनात दुखः दाबुन राहिलाय.

अमा Sad

प्राणी जातात तेव्हा एकदम चटका लावून जातात.विनीला पी आय पी.
केनेल म्हणजे आपण गावाला जाताना प्राणी ठेवायचे पाळणाघर ना?

कुत्र्या विशयी माहीती जमा करीत होतो तेव्हा हा धागा सापडला खुपच छान लिहीले आहे.
पिट बुल कुत्र्या विशयी माहीती कोनाकडे उपलब्ध असल्यास येथे द्यावी.

पिट बुल कुत्र्या विशयी माहीती >> मी अजूनही एक दोन धागे काढले आहेत. ते बघा.
पिट बुल चांगले ब्रीड आहे. पण खूप शक्तिशाली व त्याला व्यायामाची फार गरज आहे. रोज दोन तास तरी वॉक न्यायला पाहिजे पळवायला पाहिजे. दमलेला कुत्रा सर्वात बेस्ट!!! १००-१०५ वर्शांपूर्वी अमेरिकेत पिट बुल कुत्रे बेबीसिटींग करत असत. पण आता त्यांची इमेज जरा खराब झाली आहे. कुत्र्याचे बि हेविअर खरे तर मालक त्याला कसा वागवतो व त्याला ट्रेनिन्ग कसे मिळते ह्या वर अवलंबून आहे अति शय चांगल्या स्वभावाचे व प्रेमळ असतात पण हायपर होउ शकतात. काहीतरी सतत चावायला लागते जुने शूज पुस्तके बेड शीट खेळनी वगैरे.

काहीतरी सतत चावायला लागते जुने शूज पुस्तके बेड शीट खेळनी वगैरे.>>>

काहीच नाही मिळालं तर मालकाचा चेहरा , हात, पाय सुद्धा चालतो.

जैसे पुष्पामाजी पुस्प मोगरी, तसा कुत्र्यांमध्ये पिट बुल.

https://www.denverpost.com/2017/12/17/two-dogs-mauled-owner-pit-bulls-vi...

http://fox2now.com/2018/05/09/police-release-graphic-video-of-dog-attack...

पाय - जर्मन शेफर्ड नंबर एक आहे , उगाच काही पण लिहू नका. :). नाहीतर तुम्हाला पाय बाय टू करीन.

पण सध्या आमच्या कडे १ महिन्यासाठी गोल्डन रिट्रीवर आलाय. पाहुणा म्हणून. Happy

पिट बुल चांगले ब्रीड आहे. पण खूप शक्तिशाली व त्याला व्यायामाची फार गरज आहे.

धन्यवाद @अमा सध्यातरी एक तास मिळतो चालवतो त्याला, दोरी घेउन पकडायला लावतो उडि मारुन, त्या शीवाय कय काय खाण पीण द्याव या विशायी शोध घेतोय सध्या तो १ ली. दुध, ८-९ चा पा त्या, पेडीग्री अस रोज आणि आठ व ड्या तुन ३ वेळा बुध - शुक्र - रवी चिकन / मटण / अन्डी ई.
फोतो टो मा मध्ये हा माझा आम् चा रूओ रॉनी :
IMG_204756.jpgIMG_205328.jpgIMG_205259.jpgIMG_204756.jpg

खो ब्र्य ब र्या चे तुकदे डे चा वा य ला आ व ड ता त ल्लल ला

@ π आमचा रॉनी रागीट अजिबात नाही.

give him love. lot of tummy scratches . socialize him properly from.a young age. preferably two walks. evening walk can be smaller as we are also tired. but fun. and do not be afraid to talk to him constantly. they know the tone of your voice. my dog really understands words like stop. look up there us a squirrel and bath. all in Marathi. i searched facebook for you there is a pit bull fan club india group where you can ask breefd specific questions. also followdr. shirin merchant pet therapist for guidsnce. she us great trainer plus vet. love to Ronny furbaby.

I want my children to have a dog
Or may be two or three
They'll learn from them more easily
Than they will learn from me.

A dog will teach them how to love,
And have no grudge or hate
I'm not so good at that myself
But a dog will do it straight

I want my children to have a dog,
To be their pal and friend
So they may learn that friendship
Is faithful to the end.

There never yet has been a dog
That learned to double cross
Nor catered to you when you won
Then dropped you when you lost.

- Martin Hale (I am not 100% sure about the poet.)

सध्या तो १ ली. दुध, ८-९ चा पा त्या, पेडीग्री अस रोज आणि आठ व ड्या तुन ३ वेळा बुध - शुक्र - रवी चिकन / मटण / अन्डी ई.
>>> खतरनाक खुराक.

रॉनी मस्त आहे. तिसरा फोटो तर एकदम मॉडेलिन्ग चालुये. Happy

वरची कविता छान आहे. खरंय. पाळीव प्राणी आपल्यात बदल घडवुन आणु शकतात.

Pages