कुत्रे पालन दोन अनुभव

Submitted by अमा on 9 February, 2016 - 06:40

कुत्रेपालनावर स्वतंत्र धागा आहेच पण आज मिपावर मुविंचा छान पैकी लेख वाचून राहवले नाही म्हणून दोन अनुभव शेअर करत आहे.

१) वाइट अनुभवः कुत्र्यांचे रजिस्ट्रेशन रिन्यू करण्यापूर्वी त्यांचे परत लसीकरण करावे लागते. हे दर वर्शीच करावे लागते. तर आमच्या व्हेट बाईंकडॅ गेले. संध्याकाळी तिथे खच्चून गर्दी होते. व मला दोन कुत्रे परत आणणे जरा अवघड होते. शेजारीच पेट सामान विकणारे दुकान आहे. तिथून एक मुलगा आला व म्हणे आमच्या इथे परळ हॉस्पिटल मधून आलेला व्हेट आहे तुम्ही इकडे या. तर मी गेले. पोर गेला डॉक्टर होता. त्याला लसीकरण करायचे आहे असे सांगून बसले. तर त्याने परत त्या पोराला बोलवले जो बाहेर स्काउटिंग करत होता. त्यालाच औषधे शोधून इंजेक्षन बनवायला सांगितले व दोघांनी मिळून इंजेक्षने दिली.

ती दिली म्हणून कुत्र्याच्या प्रगती पुस्तकात नोंद केली जाते व व्हेट ने सही शिक्का मारायचा असतो. त्या पोरगेल्या डॉक्टरने काच कुचत सही केली. पण शिक्का नव्हताच. एका डॉ.चे व्हि जिटिंग कार्ड दिले.
माझ्या कुत्र्याचे नुकतेच कॅन्सरचे ऑपरेशन झाले असल्याने मी हिची लाइफ एक्स्पेक्टन्सी किती वगैरे जुजबी प्रश्न विचार ले तर तो म्हणे सोळा सतरा वर्शे असते कुत्र्यांचे लाइफ. ( तेव्हा मला शंका आली की समथिंग इज नॉट राइट. ) पण पैसे देउन घरी परतायची घाई होती.

काही दिवसांनंतर कुत्र्याला केनेल मध्ये दोन दिवस ठेवावे लागले व तिथे केनेल फीवर म्हण़ जे फ्लू ची लागण झाली. वीनी( डॅशुंड कुत्री) आजारी झाल्याने परत नेहमीच्या व्हेट बाई कडे गेले तर ती म्हणे की तिला स्पर्धा म्हणून ते दुकानदार कोणालाही आणून बसवतो. तो पोरगेलासा डॉकटर परळ
अ‍ॅनिमल हॉस्पिटल मधील कंपाउंडरचा मुलगा होता. काहीच क्वालिफिकेशन नस्ताना तिथे बसवला होता.
ते व्हॅक्सिनेशन ही ग्राह्य धरले जाणार नाही. ही शुद्ध फसवणूक झाली व पैशापरी पैसे गेले. व्हेट चे सर्टिफिकेट क्लिनिक मध्ये लावलेले हवे. व रेप्युटेड व्हेटकडेच कुत्र्यांना न्यावे हे शिक्षण झाले.

आजकाल जराशी जागा असलेले लोक केनेल काढतात पण शास्त्रशुद्ध पद्धतीने कुत्र्यांना ठेवत नाहीत.
आपण मजबूरी म्हणून एक दोन दिवस कॉम्प्र माइज करतो पण ते कुत्र्यांना त्रासदायकच ठरते. ठाण्यातील एक केनेल मध्ये असा अनुभव आला. कुत्र्यांना व्यवस्थित खायला दिले गेले नाही व त्यांच्या घरातील जे दोन कुत्रे होते ते व्यवस्थित वॉक ला नेउन आणले गेले होते व केनेल मधील कुत्रे बांधून घातलेले. पैसे अवाच्या सवा घेणार. अगदी तिडीक आली. अश्या केनेल मध्येच आपल्या पाळीव कुत्र्यांना केनेल फीव्हर, टिक ची लागण होउ शकते. व पुढे त्रास उद्भवतात.

२) चांगला अनुभवः

अचानक टोकाला गेलेल्या किडनी डिसीज मुळे आमची वीनी २३ तारखेला वारली. व्हेट बाईंनी अँब्युलन्स चे नाव देउन ठेवले होते. त्याला फोन केला तर तो नेमका पुण्याला. त्याने दुसरा एक नंबर दिला. त्याला फोन केल्यावर तो लगेच दादर मधून निघाला. त्याला आमचे काँप्लेक्स माहीतच होते कारण इथे खूप लोकांनी कुत्री पाळली आहेत. व बरीच वेग वेगळी ब्रीड्स आहेत. तरतरीत काळा सावळा मराठी तरूण घरी आला. स्वतः बॉडी उचलून लिफ्ट मधून नेली. व सीएनजीवर चालणारी मारूती व्हॅन अँब्युलन्स होती त्यात मागे ठेवली. आम्ही परळ मधील प्राणी हॉस्पिटल मध्ये गेलो. तिथे दहनाची
पावती घेतली.

सर्व वातावरण अगदी साधे व स्वच्छ आहे. तिथे काम करणारे सर्व मराठीच लोक्स. त्यांनी मला विचारले पूजा करायची का? काही लोक करतात. त्याने उदबत्ती पण पेटवून आणून दिली. गंगाजल दिले. ( एक बाई आहेत त्या गंगाजल आणून देतात असे तो म्हणाला. ) इलेक्ट्रिक क्रिमेटोरिअम मध्ये
पुढील क्रियाकर्म आटोपून बाहेर आले. हे कायम चालू असते सकाळी आठ ते दुपारी चार परेन्त. माझ्या मागे नंबर लागलेच होते. अश्या ठिकाणी आपण फार वेळ राहू शकत नाही. विचित्र वातावरण
असते ते व मनःस्थिती ही उद्विग्न असतेच.

अ‍ॅम्ब्युलन्स वालया मुलाला परत पवईला जायचे होते. मी सोडतो तुम्हाला म्हटला. व कांजूर परेन्त सोडले पण. एका नव्या चांगल्या केनेलचा पत्ता दिला. अगदी रात्री दोन वाजता पेट इमरजन्सी आली
तरी आम्ही जातो तेवढीच प्राण्यांची सेवा होते असे म्हणाला. सच अ काइंड सोल.!!

मुविंच्या लेखाला पूरक असा हा लेख आहे. सर्व पत्ते फोन माझ्याकडे आहेत. लागल्यास विपू करावी.
मी आता काही दिवसांनी रेस्क्यू किटन/ पपी अ‍ॅडॉप्ट करणार आहे. मिस यू वीनी. यू वेअर लव्हड.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुत्रा पाळणे आणि एक लहान मूल वाढवणे यात काही फरक नाही.>>>

अगदी, अगदी!!

आमच्याकडे ग्रेस नावाची लॅब आहे. ८ वर्षांची आहे. पण सगळ्या लकबी लहान मुलांसारख्या! म्हणून तर जाताना वेड लावून जातात!

मामी , छान आठवणी लिहिल्या आहेत.
पेटससाठीपण दहनाची चांगली व्यवस्था आहे पाहून बरे वाटले.

मुविंचा लेख वाचून पहिली तुमचीच आठवण आली होती.

अमा, सुंदर आठवणी. आमच्याकडे एकाचवेळी दोन कुत्री होती. खुप जीव लावला होता. नैसर्गिक रित्याच वारली.
त्यावेळी हे असे काही असते, याची कल्पनाच नव्हती. त्यांना कधीही आम्ही घराबाहेर ठेवले नाही.

चांगला अनुभव मधली अ‍ॅम्ब्युलन्स सेवा नवी मुंबई मधे पण उपलब्ध आहे का?

अमा,
केनलचा वाईट अनुभव आला त्याबाबत तसेच लसीकरणाचा बनावट डॉक याबाबत तक्रार वगैरे केली का? अशी तक्रार करण्याची काही सोय आहे का?

घरच्या कुत्राची आठवण झाली..
माझ्याकडे डॉबरमॅन होता.. तो गेला तेव्हा मी कॉलेजमधे शेगावला होती.. काही सुचेना बातमी ऐकल्यावर..
त्याला आम्ही घरालगतच पुरलं Sad
वेड लावुन जातात..अगदी खरयं.. Sad

हम्म..
वाईट वाटले ऐकून. आमची पामेरिअन कुत्रीही अशीच मरण पावली होती. Sad कुत्र्यांना योग्य श्वानवैद्याकडे(च) घेऊन जाणे योग्य असते.

सॉरी फॉर युवर लॉस अमा. एखाद्या जवळच्या माणसांइतकेच प्राणीही जीवाला चट्का लावुन जातात.

सर्वांचे मना पासून धन्यवाद. आम्ही वॉकला जाताना एकदम शिस्तीत व कुठे कोणाला त्रास न पोहचू देता जात असू व लिफ्ट मध्ये पण बेस्ट बिहेविअर. खाली मान वगैरे. तरीही नंतर वॉक ला जाताना लिटरली किती शाळकरी मुले, कामवाल्या स्त्रिया, दूधवाले. ऑफिस गोइंग ममाज, वॉचमेन सुपरवायझर, इस्त्रीवाले, गाडी पुसणारे, बरोबरीचे डॉग ओनर्स सुटाबुटातले ऑफिसला जाणारे साहेब ह्या व इतर प्रोफाइलच्या लोकांनी हमखास दूसरा किधर है असे विचारले. इट मीन्स सो मच यू नो.

यू के मध्ये एका कपलने त्यांचे कुत्रे वारल्यावर काहे लाख डॉलर/ पाउंड खर्च करून त्याचे क्लोन करून पपी बनवून घेतले असे वाचनात आले. ते काही मला शक्य नव्हते पण वीनीची मुलगी स्वीटी
सध्या घरी आहे. व एकदम राणीच्या रुबाबात राहते आहे.( पहिले आईला दबून राहत असे.) तिलाच सोबत म्हणून काही आणायचे आहे. जेव्हा रेस्क्यू अडॉप्टो थॉन असेल तेव्हा जाईन.

हा सर्व क्रायसिस एकदम बारावीची परीक्षा तोंडावर असताना झाल्याने मला काळजी वाट्त होती पण दोघी मुली बर्‍यापैकी रिकव्हर व अ‍ॅडजस्ट झाल्या आहेत नव्या लाइफला. त्याना उलटे मी म्हातारी टिपे गाळत बसते कि काय डिप्रेशन मधे जाते कि काय अशी काळजी वाट्त होती. तसे काहे झालेले नाही.
इअर्लिंग पुस्तकात फ्लॅग चे जे ज्योडी च्या जीवनात स्थान असते तेच वीनीचे माझ्या जीवनात असणार आहे. एक पर्सनल ग्रोथचा टप्पा राहून गेला होता तो पूर्ण झाला.

मार्ली एंड मी, एट बिलो ,हाचिको वगिअरे फारच आधी बघून झाले आहेत. इथे एक धागा पण आहे त्यावर. जिथे कुत्रे मरते ते पिक्चरच बघत नाय हामी. बारके यू ट्यूब बघतो बघतो खोड्या वगैरेचे व स्नूपी स्ट्रिप फॉलो करतो.

अमा, विनीबद्दल लिहा नक्की.
माझ्या घरी शेरी होती. अन मी दहावीत असताना गेली. माझ्या घरासमोरच पुरल तिला अन गुलमोहराच झाड लावल तिथं.
तेव्हापासून अजून कोणाला घरी आणायची हिम्मत होत नव्हती. पण सध्या एक बोकोबा आहेत. जिंजर. ( अ डार्लिंग हू कन्व्हर्टेड मी Wink )

Pages