सियाचेनच्या त्या १० वीरांना आदरांजली

Submitted by mansmi18 on 4 February, 2016 - 22:51

http://www.rediff.com/news/report/siachen-avalanche-mod-says-chances-of-...

सियाचेनमधील हिमपातात आपले बलिदान देणार्‍या १० वीरांना आदरांजली.
या वीरांंच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपले सैनिक सहजासहजी हार मानत नाहीत - अगदी मृत्यु समोरसुद्धा !! हे सिद्ध करणार्‍या हनुमंतप्पा कोप्पड यांना आणि ईतर सर्वांना श्रध्दांजली _/\_ _/\_.

दोन्ही देशांच्या धुरीनांच्या अकलेचे दिवाळे वाजले आहे. आपले हजारेक सैनिक सियाचेनमध्ये न लढता मृत्युमुखी पडले आहेत निसर्गाने त्यांचा बळी घेतला. पाकिस्तानचे १५० सैनिक मध्यंतरी असेच एकगठ्ठा मेले. शत्रुचे असले तरी ती काय माणसे नाहीत काय? निर्जीव सीमांचे रक्षण करण्यासाठी जिवंत माणसांचे बळी कशासाठी द्यायचे. ? कित्येक दशके हा प्रश्न सोडव ता येत नसेल तर ह्या सिविलियन पुढारी ढुढ्ढाचार्यांच्या अकलेला काय अर्थ आहे. ?या मध्ये काहीतरी कॉम्प्रोमाईज करणे आवश्यक नाही काय. संपूर्ण काश्मीर आता कोणालाही मिळणे शक्य नाही हे सत्य दोन्ही बाजू का मान्य करीत नाहीत ? पोपट मेला आहे हे जोवर दोन्ही बाजूचे सुखात लोळणारे राज्यकर्ते मान्य करीत नाहीत तोवर अशीच जिवंत हाडामांसाची माणसे बर्फाखाली ढकलत राहायची का आणि ती ढकलायला मिळावीत म्हणू दोन्हीकडच्या मातांनी वीरांना जन्म द्यायचा का? ::राग:

Pages