सियाचेनच्या त्या १० वीरांना आदरांजली

Submitted by mansmi18 on 4 February, 2016 - 22:51

http://www.rediff.com/news/report/siachen-avalanche-mod-says-chances-of-...

सियाचेनमधील हिमपातात आपले बलिदान देणार्‍या १० वीरांना आदरांजली.
या वीरांंच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या जवानांना श्रद्धांजली. इश्वर त्यांचे आत्म्यास शांति देवो..
त्यांचे कुटुंबियांचे दु:खात सहभागी आहोत.
डिस्कव्हरिवर नुकतेच २६ जानेवारीला थोडक्यात दाखविले होते सियाचिनमधिल जीणे किति अवघड असते ते.

ते जवान १९ मद्रास रेजिमेन्ट्चे होते.

जिथे बर्फ-स्खलन झाल तो भाग सियाचीन मधला सर्वात कठिन क्षेत्र म्हटले तरी चालेल. मी १९८८ मध्ये त्या भागात होतो; तरी अजून माझ्या डोळ्यासमोर तो भूप्रदेश (किंवा बर्फप्रदेश) जसाच्या तसा दिसतो.

महत्वाची गोष्ट म्हणजे तिथे प्रत्यक्षात बर्फाचा कडा कोसळला. बर्फ-स्खलन दोन प्रकारचे असते. एक म्हणजे रात्रभर सतत बर्फ पडल्याने विशिष्ट उतारावर (साधारणतः ५० ते ६५% - त्याच्यापेक्षा जास्त उतार असेल तर बर्फ टिकतच नाही, आणि कमी असेल तर बर्फ-स्खलन होत नाही), विशिष्ट वेळी (सकाळी १० ते २ च्या दरम्यान) पडलेले भुरभुरीत बर्फ (स्नो) खाली घसरत येते. अशा बर्फ-स्खलनात व्यक्ती सापडली तर जगण्याची शक्यता जवळ जवळ नसतेच. कारण बर्फ नाकातोंडात जाऊन गुदमरून म्रूत्यू होतो. दुसरा प्रकार म्हणजे बर्फाचा कडा कोसळणे. हा प्रकार म्हणजे जमिनीचा कडा कोसळण्यासारखेच असते. फक्त दगड्-धोंड्या ऐवजी बर्फ (आईस). यामध्ये माणूस जगण्याची शक्यता बरीच असते. जर डोक्यात बर्फ पडले तरच माणूस मरतो. किंवा त्याखाली गाडला गेला तर थंडीने गोठून जातो.

हा अपघात दुसर्‍या प्रकारात मोडतो. म्हणून आर्मीकडून आणि वृत्तवाहिन्यांकडून काही ठोस माहिती येत नव्हती. पण ३-४ दिवस आणि उणे ४० - ५० डिग्री सेंटिग्रेड तापमानात कुणी जिवंत राहिले असेल याची शक्यता धूसरच आहे.

पण मन वेडे असते!. अजूनही मी श्रद्धांजली अर्पण करणार नाही.

देशासाठी सर्वस्व वाहून शौर्याचे असे सर्वोच्च बलिदान करणे हे केवळ भारतीय जवानांनाच जमते. मन्ःपूर्वक आदरांजली त्या १० वीरांना..

लान्स नायक हणमनथापा कोप्पाड, जो कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील आहे, हा जवान सहा दिवस बर्फाच्या ढिगार्‍याखाली (२५ फूट) अडकून होता....जिवंत सापडला आणि लष्कराच्या तुकडीच्या झालेल्या आनंदाची कल्पना आपण करू शकतो.

अशा कठीण स्थितीतील एक चांगली बातमी म्हणजे पाकिस्तानच्या लष्करी अधिकार्‍यांनी या संदर्भात त्यांच्याकडून जी काही मदत लागेल ती पुरविण्याबाबत आपल्या लष्करी विभागाशी लागलीच संपर्क साधला. त्याबद्दल आपल्या विभागाने त्यांचे आभार मानले आहेत.

लान्स नायक हणमनथापा कोप्पाड, जो कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील आहे, हा जवान सहा दिवस बर्फाच्या ढिगार्‍याखाली (२५ फूट) अडकून होता....जिवंत सापडला आणि लष्कराच्या तुकडीच्या झालेल्या आनंदाची कल्पना आपण करू शकतो.<<< +१००००

मला मिळालेली आणखी एक बातमी. सत्यता पडताळून पहावी लागेल.
आणखी दोन जवान जिवंत सापडले आहेत! Happy

बर्फाचा संपूर्ण कडा कोसळून त्याखाली एक पूर्ण पोस्ट दबली गेली होती; ज्यात १० सैनिक होते.

पाकिस्तानचे सुद्धा आभार मानले पाहिजेत. त्यांनी जर गोळीबार आणि तोफांचा मारा सुरू ठेवला असता तर कठिण झाले असते!

जिवंत असलेले जवान लवकर दुरुस्त होवोत, असाच चमत्कार होऊन अजून काही जवान जिवंत सापडून्देत....

या दुर्घटनेतील मृत जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली ..... _____/\_____

१९ मद्रास रेजिमेन्ट्च्या एका अधिकार्‍याची व्हॉट्स अ‍ॅप वर आलेली एक पोस्ट (मराठी भाषांतर करत आहे) इथे आपल्यासमोर सादर केली नाही; तर मी माझ्या धर्मकर्तव्यात चुकलो असे मला आयुष्यभर वाटत राहीलः--

.................................................................................................
"माझ्या युनिट्चा एक ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर (जेसीओ) आणि ९ जवान सियाचेनमध्ये एका भयंकर हिमस्खलनाच्या संकटात सापडले. तो जेसीओ 'घातक' प्लाटूनचा (घातक म्हणजे इन्फन्ट्री बटालियनचा कमांडो प्लाटून) जेसीओ होता. नुकताच प्रमोशन मिळून जेसीओ बनला होता. सर्व जवान माझ्याच कंपनीचे! Sad

पंतप्रधान, रक्षामंत्री आणि सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांनी त्यांना मृत घोषित केले; तरी माझे कमांडिंग ऑफिसर (सी.ओ.) जोपर्यंत सर्व जवान सापडत नाहीत, तोपर्यंत तिथून हालायला तयार नव्हते. त्यांनी तिथेच एक एक तंबू ठोकून बर्फाच्या वर्षावात आणि वादळात आणि थंडीच्या कडाक्यात थांबून राहिले. शोध आणि बचाव पथकाच्या अथक परिश्रमांना शेवटी यश आले. सर्व नऊ शहीद जवानांच्या शवांचा शोध लागला.... आणि लान्स नायक हनुमन्तप्पा तर अजून जिवंत आहे! अन्न्-पाण्याच्या अभावी त्याची किडनी आणि लिव्हर काम करायची थांबली असली; तरी तो अजून जिवंत आहे!... त्याने आपली जगण्याची इच्छा कधीही सोडली नाही! त्याला ठाऊक होते.... जर त्याने आपली जगण्याची उमेद सोडली नाही; तर त्याचे साथीदार त्याला बाहेर काढण्यासाठी आकाश-पाताळ एक करतील....

पायदळाच्या दुर्दम्य आशावादाला, प्रयत्नांना आणि कुठल्याही संकटाबरोबर सामना करून त्याला मात देण्याच्या इच्छेला माझे लाख लाख सलाम!

अजून आपल्याला खूप काही करायचे आहे.

१९ मद्रास ... अशा आशावादी आणि प्रयत्नवादी पलटनचा हिस्सा असल्याबद्द्ल मला अभिमान वाटतो!

नमश्कारम!"
...................................................................................

१९ मद्रासचा नाही पण ४ मद्रासचा मी शिपाई आहे. मलाही माझ्या रेजिमेन्ट्चा आणि मी त्या रेजिमेन्टचा भाग असल्याचा अभिमान वाटतो. Happy

__/\__

आताच समजलेल्या बातमीनुसार लान्स नायक हणमनथापा कोप्पाड यांचा देहान्त झाला.
ईश्वर सर्व मृतात्म्यांना सद्गती देवो!! Sad

Pages