चिकन कुंगपाओ, तोफू कुंग पाओ - चीन ची खासियत!!!( नॉन वेज आणी वेज वर्जन)

Submitted by वर्षू. on 2 February, 2016 - 11:59
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मूळची स छुआन प्रांतातली ही डिश ,चीन मधील सर्वच प्रांतांत लोकप्रिय झालीये.
भारतीय चायनीज रेस्टोरेंट्स मधे मिळते कि नाही, कल्पना नाही!! तसंही इंडियन चायनीज फूड मला अजिबात आवडत नाही. या बाबतीत घरची सर्व मेंब्रं एकदम विरुद्ध टीम मधे आहेत.. Wink पण ऑथेंटिक चायनीज ही त्यांना तितकंच प्रिय आहे Happy

याकरता लागणारे जिन्नस-
१) ५०० ग्राम बोनलेस चिकन ब्रेस्ट, लहान क्यूब्स मधे चिरून घ्या.
२) तेल, शॅलो फ्राय करण्याकरता.
३) १०,१२ वाळक्या लाल मिरच्या- पाण्यात भिजवून तुकडे करून घ्या.
४) लसणा च्या ४,५ कळ्या - ठेचून घ्या.
५) दोनेक इंच लांबीचे कोवळे आले- पातळ काप करून घ्या.
६) १ कप , पाती चा कांदा पातींसकट चिरून घ्या.
७) १०० ग्राम शेंगदाणे - तळून घ्या.
चिकन चे तुकडे मॅरिनेट करण्याकरता-
१) एका अंड्या चा पांढरा भाग
२) १ १/२ टेबलस्पून कॉर्न फ्लोअर
३) १ टेबलस्पून सोया सॉस
४) १ टी स्पून पांढरी मिरपूड

ग्रेवी करता-
१) ३ टेबलस्पून ब्लॅक विनिगर
२) २ टेबल स्पून सोया सॉस
३) १ टी स्पून मशरूम-सोया सॉस ( ऑप्शनल)
४) १/२ टेबलस्पून तिळाचे तेल ( चायनीज कुकिंग मधे वापरले जाणारे तिळाचे तेल )
५) २ टेबलस्पून पाणी

क्रमवार पाककृती: 

१) चिकन चे तुकडे दहा मिनिटे मॅरिनेट करून ठेवा.
२) पसरट पॅन मधे तेल गरम करून, चिकन चे तुकडे , हाय फ्लेम वर शॅलो फ्राय करून घ्या. अ‍ॅब्सॉर्बेंट पेपर वर काढून ठेवा.
३) उरलेल्या तेलात मिरच्यांचे तुकडे , रंग बदलेस्तोवर परतून घ्या. लसूण आणी आल्याचे काप घाला. फ्रेगरंट होईस्तो परता. ग्रेवी करता लागणारे जिन्नस अ‍ॅड करा. थोडी उकळली की चिकन चे तुकडे अ‍ॅड करा.
२,३ मिनिटे परतल्यावर चिरलेले पातीचे कांदे मिसळा. गॅस बंद करा.
४) सर्व करताना वरून तळून ठेवलेले शेंगदाणे घालून सर्व करा.
कुंग बाओ चिकन, स्टीम राईस बरोबर खूप छान लागतो.

रेस्टॉरेंट्स मधे चिकन , डीप फ्राय करतात, पण मी शॅलो फ्राय केले आहे

शॅलो फ्राय करताना चिकन आतून ड्राय आणी चिवट न होऊ देता सेक्युलंट राहावे.

एंड प्रोडक्ट

ही डिश अ‍ॅक्चुली पुरेशी तिखट आहे.. पण आधिक तिखट खाणार्‍यांकरता मी इंडोनेशिअन सांबल ही बनवलंय सोबत
कोथिंबीर, लसूण, आबनेरो मिरच्या , एक लहान कांदा, मिक्सर वर भरड वाटून, थोड्या जास्त तेलात
, तेल सुटेस्तोवर परतले कि झालं जहाल सांबल तयार.. Happy ओह हाँ मीठ घालायला विसरू नका.

व्हेज वर्जन करता
.. . फर्म तोफू चे लहान तुकडे करून आधी मिठाच्या पाण्यात १० मिंटं बुडवून ठेवा. मग पाण्यातून काढून त्यांच्यावर १५ मिनिटे वजन ठेवा जेणे करून त्यांंच्यातले पाणी निघून जाऊन ते जर्रा कोरडे होतील. वर दिलेले मॅरिनेशन चे जिन्नस आणी थोडा कॉर्न फ्लोअर मधे घोळून चारही बाजूने नीट कवर करा ( फार थिक लेयर नको कॉ फ्लो चा) . सोनेरी रंग येईस्तो डीप किंवा शॅलो फ्राय करा.
बाकी प्रोसेस सेम सेम!! Happy

अधिक टिपा: 

१- कृतीत सोया सॉस वापरलंय म्हनून मीठ घातलेलं नाहीये. तरी आपापल्या चवी नुसार अतिरिक्त मीठ घालू शकता.
२- इंडोनेशिअन सांबल , काचेच्या बाटलीत भरून फ्रिज मधे दोनेक महिने स्टोअर करता येतं.

माहितीचा स्रोत: 
चायनीज ओरिजिन ची इंडोनेशियन मैत्रीण.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी रेस्पी आणि फोटोज!

ते सांबल नक्की जमेल करायला. Happy
बाकी चिकन च्या ऐवजी आपले ते हे, त्यांचे गोडुले भाऊ आणि चिवट हे ते घालून करता येऊ शकेल का हा प्रकार?

मस्त दिसत आहे कुंग पाउ चिकन Happy .. पाण्डा एक्प्रेस वाले घालतात तशा पेप्पर्स, झ्युकिनी घालून मला फार आवडतं .. पण ते लोक चिकन चं डार्क मीट वापरतात असं वाटतं ..

योकु, इकडे काही ठिकाणी कुंग पाउ टोफू ही मिळतो .. आपले ते हे तळून चिकन ऐवजी घातलं की झालं .. Wink

सशल.. ती लांब पाने Culantro ची आहेत. कोथिंबीर चा वास पण कोथिंबीरी पेक्षा जास्त स्वाद आणी फ्रेगरंस आहे या पानांचा. इकडे मिळत असलेली कोथिम्बीर बिन वासाचीये.. दिसायला मात्र अगदी आपल्या कोथिंबिरी सारखी असते.

इंडोनेशियन्स, सांबल मधे त्यांच्या कडे वर्षभर मिळत असलेल्या तिखट लाल ( तीन प्रकारच्या) ओल्या मिरच्या वापरतात. त्यांना सब्स्टिट्यूट केलंय ( सुपर जहाल) आबनेरो मिरच्यांनी.. Happy

@ योकु.. आत्ताच व्हेज वर्जन ,पाकृ मधेच अ‍ॅड केलंये.. तोफू आवडत नसल्यास , बाळ बटाटे वापरून करा.. हाकानाका.. Happy

आमच्याकडे ह्या अशा असतात .. आणि हिरव्याच फक्त मिळतात (म्हणजे मी तरी मोस्टली हिरव्याच बघितल्या आहेत) ..

https://www.google.com/search?q=jalapeno+peppers&espv=2&biw=1679&bih=877...

तुझ्या फोटोतल्या ( अमेरिकेतल्या) हॅबानेरो पेपर्स वाटत आहेत ज्या हालापिन्यो पेक्षा खूप जास्त तिखट असतात ..

https://www.google.com/search?q=habanero+peppers&espv=2&biw=1679&bih=877...

मस्त दिसतंय.
पांडा गार्डन छाप रेस्टो मधलं नाही आवडत. चिवट असतं, पण हा फोटो भारी दिसतोय. Happy
सशलचा मिरच्यांचा फोटो तर जबराट. आता खावीशी वाटत्येय.

मस्त डिश आहे, चिकन तसे फ्राय करायला खुप अनुभव हवा.. खुपजण चिवट करुन ठेवतात ( मी खात नाही पण खाणार्‍यांची तोंडे बघून सांगू शकतो ) संबल साठी कसली पाने वापरलीत ?

माझी फार आवडती डिश!! मला सगळीकडची आवडते. पांडा एक्स्प्रेस्स.. पीएफ चँग.. इथली काही लोकल हाटिलं..
घरी केले कधी तर ही रेस्पी वापरेन गं नक्की.. Happy

Photo lai bharee! ton pa su agadee!!

non veg premee nasunahee ha prakar mala aavadato! aani tehee ekdam khas chinee restaurant madhalach!

एंड प्रॉडक्ट फारच छान आहे. पी.एफ चँगमध्ये गेल्यावर हे मागवलं जातंच. कधीतरी बनवावं लागेल.

वरती हा प्रश्न विचारला गेलाय का माहित नाही. पण कॉर्नफ्लोअर नसेल वापरायचं तर काय वापरावं?

Culantro हे Cilantro ची बहिण असं काहीसं वाटतं Wink

बस्के,, शार्लेट च्या पी एफ मधे ट्राय की मै.. नै आवडलं.. ते थोडसं स्वीटिश झालं होतं..

वत्सला.. तोफू कुंग पाओ पण छान लागतं.. Happy

वेके.. इत्कुश्या कॉर्नफ्लोअर ला तू शोधतेयेस पर्याय.. क्यूं???

अगं मी कॉर्नफ्लोअर विकतच आणत नाही म्हणून Happy आणा आणि मग एकदा इत्कुसं वापरून पँट्रीत हरवा किंवा ते नाही म्हणून ट्रायच करू नका म्हणून... (अजून कारणं हवीत तर वेळ काढून शोधेन :P) तुझे तंग किए बिना हमें कुछ मजा नही आयेगा म्हणून हे पण एक Happy

वेका तांदळाच पिठ , गव्हाच पिठ , ऑल पर्पझ पिठ , झालच तर भाजणी कैपण वापर. Wink
इतकुसच आहे.
वर्षूतै , झकास है! तुम भी और चिकन कुंग्पाओ भी .

मी एकदा ट्रेडर्स जो मधुन ह्याचा रेडीमेड सॉस आणुन केलेल. अगदीच चांगल झाला नाही. बाहेर बर्‍याचदा हिच डिश खाल्ली जाते. आता ह्या रेसीपीने करुन बघणार

फायनल प्रॉडक्ट्चा फोटो मस्तच

वर्षुतै.. मस्त रेसिपी! Happy
ह्यातली व्हेज डिश मी पीएफ चँगमधे खाल्ली आहे .. अब करके देखेंगे!

ही इन्ना पण ना.. Biggrin वेके आता मिळालीत ना तुला भर्पूर ऑप्शन्स!!!

अदिती,जाई,चनस.. जर्रूर ट्राय करो और फोटो शेअर करो Happy

Minced chicken rice with spicy beans ya padarthachee recipe mahit aahe ka Tula?
Te hee schuang (?) prantatalee dish aahe.

Pages