तुरटी ....

Submitted by कविता क्षीरसागर on 29 January, 2016 - 05:14

तुरटी ..

खुबीने चेहरा तू झाकला
लपविला का घरोबा आपला

गुलाबी पाश सारे तोडले
पुन्हा हाकारती स्वप्नी मला

कुठे मिळते पहा तुरटी अशी
मनाशी गाळ आहे साचला

मनाचा कोपरा देते तुला
व्यथांनी भाग बाकी व्यापला

खुशीने राहुया वृद्धाश्रमी
कुणाचा मोह नाही चांगला

कविता क्षीरसागर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>मनाचा कोपरा देते तुला
व्यथांनी भाग बाकी व्यापला>>>मस्त मस्त!

>>>व्यापला आयुष्यभर लक्षात रहावा असा शेर !>>>अगदी! याहून वेगळं कौतुक काय करावं!

मतला,गुलाबी पाश आणि तुरटी हे शेरही आवडले!

>>>व्यापला आयुष्यभर लक्षात रहावा असा शेर !>>>अगदी! याहून वेगळं कौतुक काय करावं!...
खरे आहे सत्यजीतजी .... तुम्हा सर्वांसारखे जाणकार अशी भरभरून दाद देताय म्हणून लिहिण्याचा हुरुप वाढतोय....
प्रतिसादाबद्दल मनापासून आभार ...

वाह !