भल्ला/दहि भल्ला कसा करायचा ?

Submitted by गंगी on 27 January, 2016 - 12:28

मी औरंगाबाद ला खाल्ला होता दहि भल्ला... कसा बन्वायचा कोणाला माहितेय का...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दहीवडे फॅन क्लब मध्ये दिलेली रेसीपी फॉलो करा.
यात उडदाचे वडे करतांना त्यात ओलं खोबरं / पनीर + बेदाणे + काजू + कोथिंबीर + मिरची असं स्ट्फिंग करायचं. बाकी कृती सेम वर दिलेल्या लिंक प्रमाणे

निशा मधुलिका या साईट्वरही दहीभल्ल्याची कृती + व्हिडिओ आहे.

अंदाज अपना अपनाची डीव्हीडी घ्या, भल्ला ज्या ज्या सेगमेंट मध्ये दिसेल तेव्हा तेव्हा त्यावर पळीने दही घाला. झाला दही भल्ला Wink Happy

एक रॉबर्ट आणि एक तेजा पातेल्यात घालून चांगला घुसळून घ्या.
हे सगळं वास्को दि गामाच्या गनच्या नळीत भरा.
गनच्या दोन्ही बाजूला गोगोच्या मिशीचे दोन-दोन केस चिकटवा.
सगळी तयारी झाल्यावर 'ढाक्कीचि़की ढाक्कीचिकी' असा आवाज येईपर्यंत शिजवा.
मग पिलान के मुताबिक टाईमबाँबने उडवा, झाला भल्ला तयार!

Light 1

योकु.. पण भल्ले वेगळे असतात बहुतेक...त्यात काबुली चण्यांची ग्रेव्हीअसते...औ"बाद ला जे खाल्ले होते ते असे नव्हते...

मथुरावासी चा दहिभल्ला..
आहाहा..
आज खाऊनच येते.. यवतमाळला आहेत..पुण्यात नै दिसले मला स्टॉल्स..
उकडलेल्या आलुला किसुन मग बनवतात ते माझ्या माहितीप्रमाणे.. गजब लागतात .. तोंपासु..

दही भल्ला म्हणजे खरं तर दही वडा पण औरंगाबादच्या मथुरावासीकडचा भल्ला म्हणजे आलु टिक्की आणि छोले.
दही वडा बहूतेक तिथे गुजिया या नावाने दिला जातो. (गुजिया ला काय म्हणत असतिल कोण जाणे?)

http://www.spiceupthecurry.com/aloo-tikki-chole-recipe/ आणि http://nishamadhulika.com/snacks/aloo_tikki_recipe.html इथे बघा. मथुरावासीकडची आलु टिक्की-छोले डिश जवळपास पहिल्या लिंकमधल्यासारखी असते मायनस कांदा. त्यांच्याकडे कांदा, लसुण, गुळ आणि चिंच वापरत नाही. आंबट-गोड चटणी पण खजुर आणि आमचुर वापरून बनवतात.
https://www.facebook.com/New-Mathurawasi-Chat-center-415649298549397/?fr... हे त्या मथुरावासीचं फेसबुक पेज.

पुण्यात फर्ग्युसन कॉलेज रोडला मनमीतमध्ये पूर्वी दहीभल्ला अनेकदा खाल्ला होता. नंतर तिथे खाल्लेला नाही. छान असतो. निशामधुलिकाच्या साईटवरचा भल्ला करायला मुहूर्त कधीचा लागतो ते बघायचं आहे.

भल्या माणसासारखे उत्तर द्यायचे सोडून धाग्याचा भल्लात्कार का करत आहात.
भल्लाईका का जमाना ही नही रहा Sad

नेट वर गुगलले तर भल्ला म्हणून साधा दहिवदाच दाखवत आहेत, मग ही भल्ला भल्ली का चालू आहे?
खरा भल्ला म्हणजे रगडा पॅटिस च्या पॅटिस वर दहि शेव वगैरे टाकलेला प्रकार असतो काय?

अनु, उत्तर प्रदेशात काही ठिकाणी आलु टिक्की ला भल्ले पण म्हणतात. धागा लेखकानी जे भल्ले खाल्ले आहेत ते आलु टिक्की-छोले चाट. औरंगाबादचं ते चाटचं फेमस दुकान आहे. दुकानाच्या नावातच मथुरावासी असल्याने आग्रा-मथुरा भागात मिळणारे देसी घी वाले भल्ले= आलु टिक्की मिळते तिथे. Happy

पंजाबात दही वड्यांना भल्ले (उच्चारताना प आणि भ च्या मधला उच्चार असतो) म्हणतात. त्यात योकुनी वर लिहिल्याप्रमाणे किसमिस घालतात. तिथे (पंजाबात) श्राद्धाच्या जेवणात हे भल्ले कंपल्सरी असतात.

आय होप क्लिअर झालं असेल.

तिथे (पंजाबात) श्राद्धाच्या जेवणात हे भल्ले कंपल्सरी असतात.
<<
श्राद्धाच्या जेवणात उडदाचे वडे कंपल्सरी का असतात?
उडीद सामिष जेवणाला पर्याय मानले जातात अ‍ॅक्चुअली..

Pages