लेख २ - उद्योग भरारी, लोकसत्ता - चतुरंग पुरवणी - जयश्री रामाणे, ठाणे

Submitted by सावली on 27 January, 2016 - 08:47

"तीनेक कोटींचे हे दुकान विकत घ्यायचे म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हती. पण या वेळी सगळा कर्मचारीवृंद मदतीला आला, त्यांनी हिंमत दिली. इतके वर्ष इथे काम करणारे सगळेच आपुलकीने आणि प्रेमाने खांद्याला खांदा लावून उभे राहिले. त्यांच्या आधाराने पंखांना बळ आले आणि मोठी भरारी घेत हे मोठे तीन मजली दुकान घ्यायचा सौदा पक्का झाला. एकदा हा निर्णय पक्का झाल्यावर मात्र आलेल्या सगळ्या अडीअडचणींना तोंड देत त्यांनी समर्थपणे हे शिवधनुष्य पेलले."

Jayashree Ramanehttp://www.loksatta.com/udyogbharari-news/success-story-ofjayashri-colle...

आयुष्याचा आणि करिअरचा मूलमंत्र
‘‘माझ्यासारखी अजून एक तरी ‘जयश्री’ तयार झाली तर माझ्या अनुभवाचे सार्थक होईल.’’

उद्योग करू इच्छिणाऱ्यांसाठी सल्ला
‘‘व्यवसायात फायदा-तोटा होतच असतो पण आपण चिकाटी न सोडता कष्ट करत राहिलं पाहिजे. स्त्रियांचे जीवन कष्टप्रद असते पण तरीही त्यांनी जिद्दीने स्वावलंबी बनत अडचणींवर मात करायला शिकलं पाहिजे.’’ - See more at: http://www.loksatta.com/udyogbharari-news/success-story-ofjayashri-colle...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे दुकान येता-जाता अनेकदा बघितले आहे. पण त्यामागची कथा माहिती नव्हती. जयश्रींची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद Happy

सावली, लेख खुपच आवडला .. चतुरंग पुरवणीत हे सदर चालवण्याची आणि त्यानिमित्ताने ह्या यशस्वी, जिद्दी, हार्ड वर्कींग बायकांची ओळख करून घेण्याचीसंधी तुला मिळाली ह्याबद्दल अभिनंदन आणि हे सर्व आमच्यापर्यंत पोचवत आहेस त्याबद्दल आभार ..

जयश्रीताईंची ओळख अगदी थोडक्यात झाली असं वाटलं .. चतुरंग पुरवणीचे स्वतःचे नियम असतील हे समजते .. पण त्यांच्याबद्दल अजून जाणून घ्यायला खूप आवडेल .. एव्हढा मोठा व्यवसाय शुन्यातून उभा करताना अनंत अडचणी आल्या असतील .. त्याबद्दल आणि त्यावर त्यांनीं कशी मात केली ह्याबद्दल अजून जाणून घ्यायला खूप आवडेल .. तुझी लेखनशैली मला खूप आवडते .. कदाचित ह्यातून एखादं पुस्तक निघू शकेल ज्यामध्ये जास्त तपशिलांत वाचता येईल?

शुभेच्छा आणि परत एकदा अभिनंदन .. Happy

(ती आसाम्/नॉर्थ इस्ट मधल्या प्रवासाची मालिका पूर्ण नाही का करणार? :))