ब्रिगादेरॉ (brigadeiro)- एक ब्राझिलीयन डेझर्ट
मी हे एका इंटरनॅशनल पार्टी मध्ये खाल्लं होतं. आवडलं म्हणून मैत्रिणी कडून लगेच पाकृ मागून घेतली. ही एक पारंपारीक ब्राझिलीयन डिश आहे.
लागणारा वेळ:
७-८ तास
लागणारे जिन्नस:
१ कॅन कन्डेन्सड मिल्क
१ कप Sour cream
३ अंडी
१ कप कोको पावडर
१/२ कप साखर (आवडीनुसार)
१००ग्रॅम मार्गारीन/ बटर
कलरफुल किंवा चॉकलेट स्प्रिंकल्स
इतर साहित्यः
केकचे भांडे किंवा microwave compatible भांडे
क्रमवार पाककृती:
- सर्व जिन्नस एकत्र करुन ब्लेंडरमध्ये मिक्स करुन घ्यावेत
- भांड्याला आतून बटर/ मार्गारीन लावा.
-१०-१२ मिनीटे मायक्रोवेव मधे medium power वर ठेवा.
- थोडे थंड झाल्यावर त्यावर स्प्रिंकल्स पसरुन, फ्रीजमध्ये ७-८ तास ठेवा.
- केक सारखे तुकडे करुन सर्व करा.
वाढणी/ प्रमाण
साधारण ७-८ माणसांना
अधिक टिपा:
- असेही करु शकतो-मिश्रण थंड झाल्यावर ६-७ तास फ्रीजमध्ये ठेवा आणि त्याचे हवे त्या आकाराचे बॉल्स बनवून स्प्रिंकल्स मध्ये घोळवुन सर्व करावेत. लहान मुलांच्या पार्टी साठी छान.
- स्प्रिंकल्स म्हणून सुके खोबरेही वापरु शकता.
- इथे गोड Sour cream मिळते ते मी वापरले आणि साखर कमी घातली.
माहितीचा स्रोत:
ब्राझिलीयन मैत्रिण
मी ट्राय केली, फारच सोप्पी
मी ट्राय केली, फारच सोप्पी रेसिपी आहे. माझ्या मुलांना अगदी रेस्टॉ. स्टाइल फॅन्सी डिझर्ट वाटले
फ्रीजात उरले आहे थोडे. संध्याकाळी फोटो टाकेन.
एक व्हेरिएशन करायचा मोह आवरला नाही - यात थोडे फ्रेश ऑरेन्ज झेस्ट टाकले . अ प्र ति म चव आली आहे!!
गोड पदार्थ मला फार गोड आवडत नाही त्यामुळे साखर कमी - २-३ चमचे टाकली फक्त.
स्प्रिन्कल्स नव्हते , मग नुस्ताच एक त्रिकोणी तुकडा अन वरून थोडे व्हिप्प्ड क्रीम टाकून सर्व्ह केले . मुलांना हर्षवायूच व्हायचा बाकी होता !
या रेसिपीची अजून पण बरीच व्हेरिएशन्स करता येतील असे वाटते आहे ! धन्यवाद रेसिपीबद्दल!
यम्मी दिसतंय...सोपं पण
यम्मी दिसतंय...सोपं पण वाटतंय.
मैत्रेयी तुम्ही गोड सावर क्रीम घेतलं की नेहमीचं?
मी नेहमीचंच सावर क्रीम
मी नेहमीचंच सावर क्रीम वापरलं. तरी भरपूर गोड होतं कन्डेन्स्ड मिल्कमुळे.
ओके धन्स..
ओके धन्स..:स्मित:
मला नाव वाचून (पदार्थ माहित
मला नाव वाचून (पदार्थ माहित नसल्याने) काही तरी बोरिंग असेल असं वाटलेलं म्हणुन बीबी उघडला नव्हता.
आत्ता चुकून इकडे तिकडे क्लिक करताना यावर क्लिक झालं आणि आहाहाहाहाहा
काय सुंदर फोटो आहे.
मला पण हवं
हा फोटू
हा फोटू

स्वाती२, तुमची रेसीपी पण सोपी
स्वाती२, तुमची रेसीपी पण सोपी आहे, रादर आपल्या पेढ्यांचा ब्राझिलीयन कझिन वाटतो आहे.
हा पदार्थ खूप जबरदस्त मोहमय
हा पदार्थ खूप जबरदस्त मोहमय आणि सिनफुल आहे.
tempting दिसतंय… पण किती ते
tempting दिसतंय… पण किती ते कठीण नाव… मी तर नाव वाचूनच दमले

सावर क्रीम ला सबस्टिट्युट काय
सावर क्रीम ला सबस्टिट्युट काय होउ शकते.?
मस्त आणि सोपी आहे ही रेसिपी.
मस्त आणि सोपी आहे ही रेसिपी. फोटो मस्त. मैत्रेयी, कसलं प्रोफेशनल डेझर्ट दिसतंय ते !
इथे सावर क्रीम सहज उपलब्ध नसल्याने बहुतेक जशीच्यातशी केली जाणार नाही. पण मायक्रोवेव्हमध्ये शिजवण्याची कल्पना खूप आवडलेली आहे. काहीतरी प्रयोग करुन बघायची सुरसुरी येतेय
वरुन चॅाकलेट साॅस पसरलाय
वरुन चॅाकलेट साॅस पसरलाय का?>>>>>> हो...
सावर क्रीम शिवाय पण करता येइल असं वाटतयं... करुन बघायला हवी...
मैत्रेयी, मस्तच!!!
Pages