बीट बीट बीट....बीट है वंडरफुल...!!!

Submitted by निसर्गा on 25 January, 2016 - 03:54

एकदा बाजारात ताजे-ताजे बीट आवडले म्हणून घेतले. घरी येईपर्यंत बरेच कल्पनांचे इमले बांधून झालेले, वेगवेगळ्या आकाराचे बीट डिशमध्ये दिसत होते... मग घरी आल्यावर आनंदाने ते फ्रीजमध्ये ठेवले. जसा आठवडा सुरु झाला तसे बीट महाशय डोक्यातून बाहेर गेले, पण फ्रीजमध्ये बिचारे गारठून गेलेले. Sad
४-५ दिवसांनी अचानक आठवण झाली. बाहेर काढून बघते तर, ते बिचारे केविलवाणे माझ्याकडे बघत होते... पटपट साल काढून ताटात वाढले पण पतीराजानी कशीबशी एक फोड संपवली... Angry
आता काय करायचे!! पुन्हा प्रश्न???

मग गूगल महाराजाना साद घातली... साध्या कोशिंबीरीत बरेच बदल आणि काही प्रयोग केल्यावर ही डिश तयार झाली...
आमच्या घरातल्या बीटाने असा आकार घेतला. जी आमच्या घरात नंबर एकची मागणी असलेली डीश आहे

बीट रायतं

लागणारा वेळ:
१५ मिनिटे

लागणारे जिन्नस:
१ मध्यम आकाराचे बीट
१ कप दही
३ चमचे साखर(दह्याच्या आंबटपणा नुसार)
१/२ चमचा मीठ
तेल

फोडणीसाठी:
१-२ लाल किंवा हिरव्या मिरच्या
कडीपत्ता
मोहरी
जीरे
हिंग

क्रमवार पाककृती:
- प्रथम बीट स्वच्छ धुवून, साल काढून किसून घ्यावे.

- कढईत २ चमचे तेल तापवून, किसलेले बीट त्यात टाकावे. २-३मिनिटे छान भाजावे.

- त्यात १ कप पाणी घालुन शिजवावे. बीट शिजून कोरडे झाल्यावर गॅस बंद करावा व गार करावे.

- थोडे गार झाल्यावर बाऊल मधे काढून त्यात दही घालावे.

- त्यात चवीनुसार साखर आणि मीठ घालावे.

- वर १-२ लाल किंवा हिरव्या मिरच्या, कडीपत्ता, मोहरी-जीरे, हिंगाची फोडणी द्यावी.

- फ्रीजमधे थंड करून खायला घ्यावे.

वाढणी/प्रमाण:
साधारण २-३ माणसांना

अधिक टिपा:
- शिजवताना बीटात पाणी राहू देउ नये. साखर आणि मीठामुळे पुरेसा पातळपणा येतो.
- कोथिंबीर घालू शकता.
- दह्याचे प्रमाण जास्त असले तरी चालेल, छान बेबी पिंक कलर येतो.

माहितीचा स्रोत:
माझे प्रयोग

10686861_900779923279982_8023181879388578654_n_0.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त दिसतोय फोटो. बीट आणि स्ट्रॉबेरी असले की रंग काय भारी खुलतात पदार्थांचे!
रायते आमच्याकडेही साधारण असेच करतात.

आमची पण एक रिक्शा या 'बीट'वर फिरवण्याचा मोह होतोय Happy

http://www.maayboli.com/node/41744

धन्यवाद सर्वांना....
दीमा टाकतेच वॉटरमार्क Happy

बी हे बघा...या गाण्याचा तुनळी दुवा
https://www.youtube.com/watch?v=NAyW9XGOna0 Happy

ही डीश बनवायला सुरुवात केली आणि आमच्याकडे बीट महाराजांचे आगमन रेग्युलरली सुरु झाले आहे

Pages