बरे झाले ..

Submitted by कविता क्षीरसागर on 24 January, 2016 - 01:16

बरे झाले ...

नव्याने भाग्य रेखू ... दैव देणे विसरले तर
कुणी काही करू शकते मनाने ठरवले तर

खुशाली पत्र केव्हाचे उराशी घट्ट धरले
खुळी अजुनी कशी रडते ... कितीही हसवले तर

सुईचे शस्त्रही होते, सुईने सांधता येते
कसा करशील वापर हृदय माझे उसवले तर

कुठे अन्याय होता .. फक्त बघतो, भ्याड आम्ही
लढू शकणार कैसे, हेच हृदयी ठसवले तर ?

बरे झाले मनाला घट्ट करणे जमत आहे
तरी पण व्हायचा तो त्रास होतो .. फसवले तर

मनाचा कौल मोठा, जात नाही, धर्म नाही
नका आणू मधे कोणी गणपती बसवले तर

कविता क्षीरसागर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरे की खोडण्याचा मार्गही उपलब्ध आहे
दगडरेषा नसे ही काव्य ओंगळ प्रसवले तर >>>>

हे जरा विनोदी वाटले Happy

धन्यवाद

मलाही तो शेर एवढा नीट जमला नाहीये असेच वाटतेय ... बरे की खोडण्याचा मार्ग उपलब्ध आहे .... खोडून टाकते ...

प्रतिसादाबद्दल आभार जव्हेरगंजजी ...

छान