मदत हवी आहे- मे महिन्यात जाण्यासाठी हटके ठिकाण सुचवा

Submitted by मोहन की मीरा on 19 January, 2016 - 22:36

काहीही प्रश्ण पडला की माबो कडे धाव घ्यायची सवय लागली आहे. मे महिन्यात आम्हा नवरा बायकोला ६ दिवस मोकळे आहेत. मुलगी स्टुडंट एक्शेंज प्रोग्रॅम मधे लंड्न ला जाते आहे १० दिवस. त्यामुळे रान मोकळे आहे !!!

मे महिन्यात जाणार म्हणुन मस्त कुल प्लेस पाहिजे पण जरा हटके!!!! एखादे रीसॉर्ट पण चालेल.... कारण नेहेमीच्या प्लेसेस म्हणजे हिमाचल, सिक्कीम, दार्जीलींग, काश्मिर म्हणजे गर्दीची आगरं!!!!!

भारतात कुठेही चालेल.... चला तर मग एक्स्पर्ट लोक सुचवा पटापट......

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Coorg

मोकिमी

कुठेही जा गर्दी असणारच. हटके ठिकाणी गेलात तर गैरसोयीला पण तोंड द्यावे लागेल. तसंच तिथे बोअर होऊ नये म्हणून तुम्हाला कशा प्रकारच्या ठिकाणांना भेट द्यायला आवडेल, काय प्रोग्राम आहे हे सांगा , म्हणजे सिलेक्टेड पर्याय समोर येतील.

मला लदाख मधलं ह्युंदेर हे गाव आवडलं होतं. तुम्हाला ते आवडेल का हे सांगू शकत नाही. संथ जीवन आणि उणे तापमान. ऑक्सीजनची कमी. पण आजूबाजूला फिरणे आणि फोटोग्राफीचा छंद असेल, सायकल नेऊ शकलात तर आवडूही शकेल.

Neemrana Fort - Big No in summer. It will be too hot and this is very crowded place now a days.
Check landsdowne in uttarakhand. It's good place.

१. लोणावळ्याजवळ तुन्ग ला महिंद्रा क्लब चे रेझॉर्ट आहे.
२. चिकमंगलोर ताज
३. खजुराहो ताजः अगदी महबळेश्वर मधली सामान्य हॉतेल्स चार्ज करतात त्यापेक्षा कमी मध्ये चांगले पॅकेज आहे. एप्रिल ते सप्टेंबर ऑफ सीझन असतो.(पण कूल नाही.)
४. मसूरी डेहराडून (गर्दी भरपूर असेल)
५. कोवालम
६. कुन्नूर
७. कबिनी अभयारण्य बंगलुरु जवळ

मो की मी,

मे महिन्याकरता उत्तराखंड बेस्ट ऑप्शन आहे. काही दिवस तुम्ही नीमराणाच्या रामगढ बंगल्यात राहू शकता. आणि त्यानंतर आनंदा स्पा मध्ये मस्त रिजुविनेट होऊन सुट्टीचा आनंद घेऊ शकता.

दोन्ही ठिकाणी गर्दी नसेल आणि नेहमीची टुरिस्टी पब्लिक नसेल.

दहा दिवस हा मोठा कालावधी आहे. त्यामुळे हवं तर तुम्हाला कॉर्बेट नॅशनल पार्कही करता येईल. एका सुट्टीत ३ वेगवेगळे अनुभव घेता येतील.

अहो मंदारडी, समरमधे राजस्थान किंवा तामीळनाडू/ गोव्यासारखी ठिकाणं न निवडण्याइतक्या मोकीमी नक्कीच सूज्ञ आहेत Happy
हृषिकेश किंवा मामीने सुचवलेल्या उत्तराखंडमधेही टू हॉट असेल काय?

केरळ मधे जा, मुन्नार, थेक्कडी , फार गर्दी नाही फार गरम वा थंडही नाही, शांत ! आम्ही मे मधेच गेलो होतो.

Lol भारतभर बर्‍याच ठिकाणी आहे असंही लिहिलं होतं. बरं माझं चुकलं. असो!

मोकीमी, तुम्ही नीमराणा हॉटेल्स सर्च करा Wink

नीमराणा मस्त वाटतय.... कुन्नुर ची साइट छान वाटते आहे.....गर्दी नसावी त्या वेळात बहुदा.... आणि थंड पण असते त्या काळात.... कारण हनीमुन ला उटी ला मे महिन्यात गेलो होतो तेंव्हा सॉल्लीड थंडी होती (२० वर्षां पुर्वी)

मामी..... कुमाउला दोनच वर्षां पुर्वी गेलो होतो.

मुन्नार चांगले वाटते आहे.... थंड आहे त्या काळात... रीसॉर्ट पण चांगली वाटत आहेत. मुक्तेश्वर तुम्ही कोणत्या हॉटेलात उतरला होतात?

साउथ मधे हैद्राबाद आणि बंगलोर सोडल्यास काहीच माहित नाही......

पहाते नीधप......

पण होम स्टे च अनुभव नाही..... इकडे कोणाला आहे का? म्हणजे स्वच्छता, जेवण इ. बाबतीत.....

Vythiri. Check for wind flower resort and spa. Stay in the villa property, it's has outdoor jacuzzi overlooking valley, the valley can be seen from any corner of the room.

मी कधी गेले नाहीये होम स्टे मधे पण तो जो होमस्टेचा धागा आहे त्यावर काही महत्वाची माहिती आहे होमस्टेबद्दल. सोनचाफाने दिलीये. ती बघ. ट्रिपअ‍ॅडव्हायजरवरतरी बहुतेक सगळे होम स्टे एकदम भारी वाटतायत.

मीरा, श्रीलंकेला जा... खुप वेगळा अनुभव आहे. म्हंटलं तर भारतच, म्हंटलं तर फॉरेन. माझी मालिका पहा. तिथेही मस्त थंड हवेची ठिकाणे आहेत. ( नुवारा एलिया वगैरे )

मुन्नार चांगले वाटते आहे.... थंड आहे त्या काळात... रीसॉर्ट पण चांगली वाटत आहेत. मुक्तेश्वर तुम्ही कोणत्या हॉटेलात उतरला होतात?>> नाव आठवत नाहीत परंतु सगळीच चांगली मिळालीत. या सिझन मधे मुन्न्नारला मधुन मधुन रिमझिम पाऊस असतोच आपण येवढ्या उंचीवर असतो की ढग आपणाला स्पर्शुन जातात.

कुठेही जा, केरळात जाऊ नका.

दारूबंदी केलिये हो Sad दारूच मिळणार नाही तिथे तर काय करणार जाऊन?40.gif

गोव्याच्या अलिकडे वाईल्डरनेस्टला जा चोरला घाटात. २-३ दिवस आरामात रहा.

किती दिवस, हवा कशी हवी, बजेट किती असेल, प्रवासाची वेळ काय हवी असे अनेक प्रश्न पण आहेत.

दारूबंदी केलिये हो <<< हे कधी? आम्ही अलीकडेच जाऊन आलो, आमची कुठे (कसून किंवा कशीच) चौकशी केली गेली नाही.

कोणी केरळ केले आहे का?? मुलांना बरोबर घेवून जाण्यासारखे आहे का..> हो बिनधास्त घेऊन जा !

हटके हवे असेल तर कान्हा नॅशनल पार्क ला जा ...अगदी ऐन मे मधे सुद्धा सकाळच्या सफारीला छान गार असते . दुपारची सफारी पण सुसह्य असते...
गेल्या मे मधे आम्ही 2रात्री भेडाघाट आणि 3रात्री कन्हा असा बेत केला होता ...या मोसमात जंगली प्राणी छान दिसतात ....
infact आम्ही गेलले 3मेमहीने कान्हा ला जात आहोत ...तीनही वेळा फारच मज्जा आली.