मी १२ डिसेंबरला चिंचवड हुन सिंहगड एक्सप्रेस ने दादरला जायचे ठरवले. ११ डिसेंबरला आय आर सी टीसी वरुन बुकींग केले. माझ्या दुर्दैवाने एसी चेअर कार मध्ये वेटींग लीस्ट १ आणि २ असे नंबर आले. सध्या नुकतेच रेल्वेने काही नियम बदलल्याचे कळले म्हणुन आय आर सी टी सी ला क्लेरीफिकेशन मागीतले.
Dear Sir/Madam,
Just now I have booked following ticket.
What are the rules for boarding into Train where status is CKWL ?
1) If tickets are not confirmed till last movement , can we enter the Train and Travel using II class ( General )?
2) We need to carry open tickets or Coach Attendant can give us confirmation on the spot or provide II class tickets?
I am expecting answer today.
Regards,
नविन नियमा प्रमाणे वेटींग असेल तर वेळेच्या आधीच बुकिंग रद्द करणे गरजेचे होते. अथवा पैसे १००% टक्के कापले जाणार होते. परंतु १२ डिसेंबरला पहाटे एस एम एस वर पण स्टेटस समजेना की तिकीट कन्फर्म झाले अथवा नाही.
अश्या वेळी मी ओपन तिकिट काढुन डब्यात घुसतो आणि टिकीट कन्फर्म झाले तर ओपन तिकीटाचे पैसे वाया जातात. या वेळेला मी तसे केले नाही. कारण वेटींग १-२ खात्रीने कन्फर्म होईल असा विश्वास होता.
बायकोला घेऊन मी चिंचवडला एसी चेअर कार मधे घुसलो. दरवाज्यातच कोच कंडक्टर भेटला. तो म्हणाला कन्फर्म झाले नाही खाली उतरा. ओपन तिकीट न काढल्यामुळे जनरल डब्यात जागा असुन तिकीट काढायला वेळ नव्हता.
ना इलाजाने खाली उतरुन शेवटी शिवनेरीने दादरला गेलो. परत आल्यावर आय आर टी सी च्या पैसे परत मागण्याच्या साईटवर गेलो पण तो ऑप्शन काम करेना कारण रिफंड मागण्याचा वेळ संपला होता.
मी परत एक इमेल आय आर सी टी सी ला केला आणि रिफंड मिळवण्यासाठी दाद मागीतली.
To,
Customer Care,
You have failed to reply on time as results I entered the train without ticket confirmation.
If railway fails to refund booking amount, this email will be used as evidence against Indian Railway.
या वेळेला मी पैसे परत न मिळाल्यास ग्राहक न्यायालयात जाण्याचा निर्धार केलेला होता कारण बुकिंगच्या वेळी मागीतलेले क्लेरिफिकेशन वेळेत आले नाही तसेच चार्ट लागण्यापुर्वी बुकींग स्टेटस समजणारी सर्व यंत्रणा बंद पडलेली होती म्हणुन मी तिकीट रद्द करु शकलो नाही.
अहो आश्चर्य ? चक्क एका इमेलवर दाद मिळाली व काही भाग वाय जाऊन जवळ जवळ ८५% रक्कम परत आली.
Dear Customer,
We wish to inform you that your ticket against PNR Number: 8742264708 has been cancelled successfully. The refund amount of Rs. 730 will be refunded back to your respective account shortly.
For any problem please contact us 24x7 Hrs. Customer Support at 011-39340000, Fax No. 011-23345900, Chennai Care No. 044-25300000
Warm Regards,
Customer Care
Internet Ticketing
IRCTC
भारतात आजतरी ट्रेन रद्द झाली/ उशीरा आली म्हणुन आपोपाप पैसे परत मिळत नाहीत. पण रेल्वेची चुक असेल आणि दाद मागीतली तर पैसे परत येतात ही गोष्ट जराश्या प्रयत्नाने समजली.
माहितीसाठी धन्यवाद.
माहितीसाठी धन्यवाद.
ट्रेन रद्द झाली तर पैसे परत
ट्रेन रद्द झाली तर पैसे परत मिळतात, पण आपल्याला त्यासाठी फॉर्म भरुन द्यावा लागतो... आणि नक्की पैसे मिळतात.. आमच्या एका ट्रीप मध्ये ट्रेन पुण्याहून येणे कॅन्सल झाले, त्यामुळे आम्ही त्या ट्रेनने जाऊ शकलो नाही.. पण लगेचच आम्ही तिकीट कॅन्सलेशन चे फॉर्म भरुन दिल्यामुळे लगेचच पैसे परत मिळाले होते..
नविन नियमा प्रमाणे वेटींग
नविन नियमा प्रमाणे वेटींग असेल तर वेळेच्या आधीच बुकिंग रद्द करणे गरजेचे होते. अथवा पैसे १००% टक्के कापले जाणार होते. <<< हा नियम कधी झाला?
माझ्या माहितीप्रमाणे तिकिट वेटींगच राहिले तर ( काही कपात असेल तर ती करून ) पैसे आपोआप कोणत्याही पत्रव्यवहार/अर्जाशिवाय खात्यात जमा केले जातात. ही माहिती बरोबर आहे का?
माझ्या माहितीप्रमाणे तिकिट
माझ्या माहितीप्रमाणे तिकिट वेटींगच राहिले तर ( काही कपात असेल तर ती करून ) पैसे आपोआप खात्यात जमा केले जातात. ही माहिती बरोबर आहे का?
<<
बरोबर! नियम असाच आहे, ऑनलाईन तिकिट चार्ट निघाल्यावरही वेटींगच राहिले तर पैसे आपोआप खात्यात जमा केले जातात. आणि आरक्षित तिकिट, गाडी सुटल्यानंतर रद्द केले तर मात्र संपुर्ण १०० टक्के पैसे कापले जातात.
आरक्षित तिकिट, गाडी
आरक्षित तिकिट, गाडी सुटल्यानंतर रद्द केले तर मात्र संपुर्ण १०० टक्के पैसे कापले जातात.
>>
काहीतरी टीडीआरची भानगड असते. आयडिया नाही.
जर तिकीट कन्फर्म झालेच
जर तिकीट कन्फर्म झालेच नव्हते, वेटींगच होते तर पैसे आपोआप परत येतात ना?
वेटींगचे तिकिटही कॅन्सल करा ही काय नवीन भानगड सुरू केलीय का? मध्यंतरी कसलासा नियमबदल वाचलेले ते हे होते का?
तुमच्याच अकाउंटला कन्फर्म न
तुमच्याच अकाउंटला कन्फर्म न झालेल्या तिकिटाचे पैसे परत जातात.गोलमाल काही नाही.नवीन नियम साइटवर आहेत.
टिडिआर :जेव्हा काउंटर बंद होतो तरीही त्या तिकिटाला स्टेशन मास्तरकडून रद्द करण्याची पावती ( ticket deposit receipt)घेऊन नंतर पैसे परत ( वेळेचा नियम लागू होतोच) मागता येतात.रेल्वेकडून गाडी रद्द झाली तर टिडिआर घेऊन ठेवावा आणि नंतर रिफंड मागावा.टाइमटेबलात दिलेल्या नियमानेच रिफंड मिळेल.
http://www.indianrail.gov.in/
http://www.indianrail.gov.in/refund_Rules.html
लोक बरीच अगोदर तिकिटं उगाचच
लोक बरीच अगोदर तिकिटं उगाचच काढून अगदी शेवटी रद्द करायचे म्हणून आता वेटिंग लिस्टकर आणि तात्कालकरांच्या सोयीसाठी रद्द करण्याच्या कालावधित आणि कापल्या जाणाय्रा रकमेत बदल केले आहेत.
नवीन माहिती http://www.railnewscenter.com/?m=1 या ब्लॅागवर सतत येत असते. बुकमार्क अथवा RSS करून पहाता येते.
सेंट्रलचे प्रेस रिलिस : http://www.cr.indianrailways.gov.in/view_section.jsp?lang=0&id=0,4,268
4. Refund on unused RAC/WL
4. Refund on unused RAC/WL tickets:
पूर्वी : Upto 3 hours of the actual departure of the train subject to deduction in clerkage charge. No refund after the abO\/f3 prescribed time limit. Refund on unused RAC/WL tickets:
आता : Upto half an hour before the scheduled departure of the train subject to deduction of clerkage charge. No refund after the above prescribed time limit.
हा अन्याय नाही का? प्रवासी वेळ जात नाही म्हणून तिकीट काढा आणि ते रद्द करा असा खेळ खेळत असतात का?
गाडी सुटण्याच्या वेळेस ते दुसरं तिकीट किंवा अन्य पर्यात शोधण्यात बिझी असतील ना?
रेल्वेच्या येनकेनप्रकारेण उत्पन्नात भर घालायचा प्रकार वाटतोय.
आता हे सगळं एजन्ट्सचे गैरव्यवहार थांबवायला करतात हे स्पष्टीकरण असेल. पण सुक्याबरोबर ओलंही जळतंय त्याचं काय?
सर्वांचे धन्यवाद, एखाद्या
सर्वांचे धन्यवाद,
एखाद्या नियमात बदल करतात जेव्हा त्या प्रक्रियेचा संबंध कर्मचार्याचे प्रमोशन इ. सारख्या प्रक्रियेशी नसुन जनसामान्याना दिल्या जाणार्या सेवेशी असतो तेव्हातरी किमान जनसामान्यांच्या अडचणी/आक्षेप नोंदण्याची प्रक्रिया होणे गरजेचे आहे.
सर्वांचे धन्यवाद, एखाद्या
सर्वांचे धन्यवाद,
एखाद्या नियमात बदल करतात जेव्हा त्या प्रक्रियेचा संबंध कर्मचार्याचे प्रमोशन इ. सारख्या प्रक्रियेशी नसुन जनसामान्याना दिल्या जाणार्या सेवेशी असतो तेव्हातरी किमान जनसामान्यांच्या अडचणी/आक्षेप नोंदण्याची प्रक्रिया होणे गरजेचे आहे.
नविन नियमा प्रमाणे वेटींग
नविन नियमा प्रमाणे वेटींग असेल तर वेळेच्या आधीच बुकिंग रद्द करणे गरजेचे होते. अथवा पैसे १००% टक्के कापले जाणार होते. >> हा असा नियम झाला आहे?
शोधायला पाहिजे.
सर्वांचे धन्यवाद, >>> ही
सर्वांचे धन्यवाद,
>>>
ही कुठली मराठी?::अओ: