कथा 3

Submitted by Abhishek Sawant on 13 January, 2016 - 03:43

कथा ३
जय, अमोल,आकाश असे हे तिघे मित्र थ्रिल अनुभवण्यासाठी बदामी च्या रोड trip ला गेलेले होते. त्यांनी बदामी मध्येच एक स्वस्त असा लॉज पकडला आणि ते सामान ठेवायला रूम मध्ये जाणार तेव्हड्यात आकाशला काहीतरी कुजल्यासारखा वास आला, आकाश तेथे काहीतरी अनैसर्गीक असे जाणवत होते आधीच तो लॉज आणि टाऊन परिसर भयानक वाटत होता, आता हा वास म्हणजे आकाशला अगदी नकोसे झाले. तेथील वातावरणामध्ये एक वेगळा जडपणा होता, असे वाटत होते कि येथे काहीतरि अघोरी घडलय. सभोवताली झाडे तशी कमीच होती पण तेथे एकही प्राणी किंवा पक्षी वावरताना दिसत नव्हता, जय आणि अमोलला त्याचे काही वाटले नाही पण आकाश मनातून चरकला होता त्याला एक विचीत्र भिती वाटत होती. सगळे काही एखाद्या हॉरर चित्रपटाचा सेट शोभेल असे वातावरण होते जय आणि अमोल तर हे सर्व एंजॉय करत होते पण आकाशला येणाय्रा संकटाची चाहुल लागली असावी.
लॉजच रूम तशी फारशी वाईटही नव्हती बाहेरून लॉजची अवस्था बघून असे वाटत नव्हते की रूम एव्हढी चांगली असेल. सामान ठेवून तिघेही फ्रेश झाले, आकाश आणि अमोलने बीयर च्या बाट्ल्या येतानाच आणल्या होत्या आणि चिकन फ्राय खात ते दोघे एक एक सीप मारू लागले, जय बीयर पीत नसल्याने तो चिकनवरच तुटून पडला, अमोल जयला नेहमी शिव्या देत असे ह्या साल्याला प्यायची तर नसते पण साला आमचा चकणा मात्र संपवतो. असा हा त्यांचा कार्यक्रम चालू असताना त्यांना बाहेरुन आरडाओरडा ऐकू आला. तसे ते तिघे बाहेर गेले तर चार पाच लोक टेरेस च्या दिशेने जाताना दिसले. टेरेस वर गेल्यावर त्यांना धक्काच बसला, लॉजवरील एका ईसमाला एक तुटलेला मानवी हात टेरेस वर दीसला होता. तेथील स्टाफ त्या माणसाची समजूत घालण्याचा प्रयत्न करत होता त्याने सांगीतले की इथे बाजुला एक स्मशान आहे तेथुन कावळ्याने किंवा कोणत्यातरी पक्षाने आनला असेल. पण त्या हाताकडे पाहून असे वाटत नव्हते की तो पक्षाने आणला असावा तो हात थोडासा कुजला होता आणि तरीही त्यातून रक्त गळत होते असे वाटत होते कि लॉजचा स्टाफ काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. तो माणूस जाम घाबरला होता तो समजुन घ्यायला तयारच नव्हता त्याने आपले सामान घेतले आणि बाहेर पडला. आतातर आकाशला घामच फूटला, नशेत असताना देखील त्याला आता जाणवू लागले की आपण इथे राहून मोठी चौक केली. अमोल आणि जय अजूनही हे सगळे लाईट घेत होते. हळू हळू लोक पण पांगू लागले, तिन्हीसांजेला पडलेला तो मळकट प्रकाशही आता त्यांची साथ सोडत होता, जोरजोरात वाहनारा वारा भयान वाटत होता. त्यांना जाणवले की तिथे काम करणारी माणसे सुद्धा निघून गेली बहुदा आपापल्या घरी गेली असतील आता तिथे एकच म्हातारा माणूस राहिला होता, त्याने काउंटर च्या पलीकडे जाऊन आपली खुर्ची ओढली आणि मळकट सदर्‍याच्या खिशातून बीडी चा बंडल काढला त्यातली एक बीडी त्याने शिलगावली आणि ती तोंडाला लाऊन झुरका मारण्याआधी त्याने या तिघांकडे एक कटाक्ष टाकला तसे ते तिघेही त्यांच्या रूमकडे वळाले, रूममध्ये आल्यानंतर ते तिघे मक्ख चेहर्‍याने बसून राहीले, कोणीच कोणाशी बोलेना झाले. जय तिथेच एका झुनाट खुर्चीवर बसला आणि विचारात गढून गेला, त्याने कशासाठी ही ट्रिप प्लॅन केली होती आणि आता काय चालले होते. थ्रिल अनुभवण्याच्या नादात आपण आपला जीव धोक्यात घातला असे त्यालाही एकदा वाटून गेले, अमोल तर अजून बीयर ची बाटली घेऊन बेड वर एक एक सीप मारत बसला होता त्याच्या चेहर्‍यावर भितीचा लवलेशही नव्हता. आकाश अजूनही धक्क्यातून सावरला नव्हता तो मनातून खुप घाबरला होता.
शेवटी अमोल ने सुरुवात केली तो बोलला “ ईथले लोक सगळे फट्टू आहेत साले, भूता खेतांवर माझा तर विश्वास नाही” जय त्याची री ओढली तोही म्हणू लागला असे काही नसते मी तर अजून कोठेही असला प्रकार बघीतला नाही. आकाशही मनात नसताना त्यांचे बोलणे मान्य केले आणि ते तिघे जेवणाच्या तयारीला लागले. तीघे रूममधून बाहेर आले, त्यांची रूम वरच्या मजल्यावर होती, तिथे एकूण सहा रुम होत्या पण या तिघांना सोडून एकही रुम कोणीही घेतली नव्हती, तसेच कॉरीडॉर मध्ये एकही बल्ब किंवा प्रकाश नव्हता. एकच काय तो मिणमिणता बल्ब होता त्याचाही फारसा ऊजेड पडत नव्हता त्यामुळेच ते वातावरण आणि ती वास्तू अधीकच भयानक वाटत होती. ते धडपडत जीन्यापाशी आले तीथेही अशीच अवस्था होती, जीना ऊतरून खाली आले आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला कारण तिथे लॉज समोर एकही माणूस नव्हता. लॉजच्या बोर्डवर असणारा दीवा पण आता बंद झाला होता त्यांनी आजूबाजुला पाहिले तिथे एकपण हॉटेल नव्हते मग त्यांनी बाईक काढली आणि ५ ते ६ किमी आल्यानंतर एक धाबा दिसला तिथे ते मनसोक्त जेवले भुकेपुढे तांची भिती फार वेळ टिकली नाही. अमोल तर आता अगदी सातवे आसमानपर होता, २-३ बॉटल दारू, पोटभरुन जेवण आणि त्यात हवेत असणारा बोचरा गारवा यामूळे अमोलला खुपच चढली होती. जय आणि आकाश पण आता त्या भितीच्या सावटातून बाहेर आले होते. धाब्यावरच्या एका वेटरला जयने लॉजबद्दल विचारले तेव्हा वेटरने सांगीतले की “ साहेब त्या लॉजच्या बाबतीत एक अफवा प्रसिद्ध आहे की तिथे राहीलेले लोक परत कधी दिसले नाहीत त्या लोकांचे काय झाले काय कळतच नाही”. जयला वाटले अफवा असेल म्हणून त्याने त्याचा विचार सोडून दीला, जेवून ते परत लॉजवर जायला निघाले. ईकडे तिकडे टाईमपास न करता ते सरळ रूमकडे गेले,
थंडी आणि दिवसभराचा थकवणारा प्रवास यामूळे त्यांना पडल्यापडल्या झोप लागली. रात्री एकच्या सूमारास अमोलला कसल्याश्या आवाजामुळे जाग आली, पहील्यांदा त्याने दुर्लक्ष केले पण तो आवाज हळुहळु वाढु लागला. अमोलने जय आणि आकाश कडे नजर टाकली ते दोघेही गाढ झोपेत होते, त्याने त्या आवजाकडे लक्ष देऊन ऐकल्यावर त्याला कळाले की तो आवाज म्हंजे घोघर्‍या आवाजातील कूजबूज आहे. रूम मध्ये झीरो बल्ब मुळे अंधूक प्रकाश पसरला होता त्याने सर्वत्र एक नजर टाकून अंदाज घेतला कि कोणी रूम मध्ये शिरले तर नाही ना त्याला कहीच हालचाल जाणवली नाही, त्यामुळे अमोलला काहीच विक्षिप्त वाटले नाही. पण थोड्या वेळाने तो आवाज खुपच तीव्र झाला आता मात्र अमोल ला रहावले नाही त्याने पांघरुन बाजूला सारले आणि तो बाहेर जायला निघाला, आकाश हे सगळे बघत होता पण त्याने जाणीवपुर्वक त्याकडे दुर्लक्ष केले.
बाहेर आल्यानंतर अमोलला दिसले की दोन आक्रुत्या त्यांच्या रुमच्या बाजुला दबक्या आवाजात बोलत होत्या. त्या आक्रुत्या अगदी विचीत्र होत्या, एकाच्या हतात कुर्हाड तर दुसर्‍याच्या हातात धारधार चाकू होता अमोल ला वाटले हे दोघे कोणीतरी दरोडेखोर वैगेरे असतील पण जेव्हा अमोलची चाहूल लागल्याने त्यातील एक आकृती मागे वळली तेव्हा अमोलला आश्चर्याचा धक्काच बसला. तो माणूस अतिशय विचीत्र आणि भयानक दिसत होता, त्याचे दात जंगली श्वापदा सारखे बाहेर आलेले आणि रक्ताने माखलेले होते. त्याचे डोळे खोल गेलेले आणि पांढरे होते, चेहर्‍यावर ठिकठिकाणी वार झालेल्या जखमा होत्या आणि त्याचा अतिशय घान वास येत होता. त्याचे हे असे रूप पाहुन अमोलची तर बोबडीच वळली, त्याच्या अंगात एकच भीतीची लहर उठली, भीतीमुळे त्याला हालचालही करता येइना तेव्हड्यात त्या माणसाने अमोलच्या डोक्यावर अवजड वस्तुने वार केला. आणि अमोलच्या डोळ्यापूढे अंधारी आली. अकाशला बाहेर काय घडतय याची कल्पना होती पण भीतीने तो हालचालही करत नव्हता त्याला अता दरदरुन घाम फुटला होता. भितीपुढे त्याला आपला मित्राचा जीव धोक्यात आहे याच भान देखील राहील नाही, आता त्याला फक्त आपला जीव वाचवायचा होता.
डोक्याला लागलेल्या वर्मी घावामुळे अमोल बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला, त्याच्या डोक्यातून रक्ताची धार लागली होती रक्त सगळे रूम च्या बाहेर कॉरीडॉर मध्ये फरशीवर रक्त पसरले होते. एका माणसाने अमोलचे पाय धर्ले आणि त्याला फरफटत तो घेऊन जाऊ लागला तेव्हढ्यात दुसरा माणूस त्याच्यावर खेकसला तसे त्याने अमोलला पोत्यात भरले आणि ते पोते ऊचलून ते चालु लागले. त्यांच्या चेहर्‍यावर एक क्रुर हास्य आणि समाधान होते आजचे सावज सापडल्याचे.

समाप्त.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे
याचा आहट चा एक एपिसोड चांगला बनेल. तुम्ही प्रत्येक परिच्छेदांनंतर एक एंटर मारले तर वाचायला सोपे पडेल.

मी लेखिका नाही, मात्र इथल्या जवळपास सगळ्या कथा मनापासून वाचते. या कथेबद्दलची माझी काही निरीक्षणं:

१. शेवटाला येता येता कथेतली सगळी मजा, सगळा थरार अगदीच संपून जातो.
२. जय आणि आकाशचं नक्की काय हे कळत नाही.
३. अभद्रतेची वातावरणनिर्मिती खूपच कमी पडते.
४. सुरु होता-होता अचानक संपतेच कथा, मध्ये गेलेला वेळ वाचकाला जाणवत नाही.
५. उत्कंठा जिथे शेवटी (एकदाची) वाढायला लागते, तिथे कथा अतिशय अ‍ॅब्र्प्टली संपते.

Bhanupriya tumache salle mi nkkich lakshat theven pudhchi katha lihitana..mi pn lekhak nhi..mazi hi dusrich katha aahe..sorry