गोल्डी फेस्ट (न वाहता धागा)

Submitted by नीधप on 12 January, 2016 - 06:50

शीर्षकानंतर अजून काही लिहायची गरज आहे का?
गोल्डी आणि त्याच्या सिनेमांबद्दल सर्वकाही...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मृणाल १ | 12 January, 2016 - 10:13

राम बलराम विजय आनंदचा आहे आज कळले. अजिबातच त्याचा टच नाहीये . कधीतरी लहानपणी बघितला होता आणि पार विस्मरणात गेला. खरतर बहुदा गोल्डीचा हाच एकमेव चित्रपट कि जो थेटरात बघितला आहे . बाकी सगळे आधीचे असल्यामुळे घरीच बघितले आहेत.
अरे हो गाईड आम्हाला शाळेतर्फे खास शो दाखवला होता. रिलीज झाल्यावर बर्याच वर्षांनी .

नीधप | 12 January, 2016 - 10:22

अरे हो गाईड आम्हाला शाळेतर्फे खास शो दाखवला होता. <<
आम्हाला पण फिदीफिदी

संपादन

सीमंतिनी | 12 January, 2016 - 10:27

बहुतेक सिनेमे टीव्हीवर किंवा यूट्यूब वर पाहिले. पण कुठल्याशा गणेशोत्सवात ज्वेलथीफ बिगस्क्रिनवर पाहिला होता. सिक्कीम जाम आवडले होते. वैजयंतीमालाची गोंड्या गोंड्याची साडी कुठल्या फ्याशनीत बसते देव जाणे पण मस्त दिसते!! स्मित https://www.youtube.com/watch?v=TYjy6StBg3E

आगाऊ | 12 January, 2016 - 10:44

http://www.maayboli.com/node/17358

पादुकानन्द | 12 January, 2016 - 10:51

ज्या काळात चित्रपट पाहणे हे भिकारधंदे समजले जायचे आणि 'अभ्यास करा अभ्यास , सिनेमा परिक्षेत येणार नै काही' असे डायलॉग ऐकावे लागत . त्या काळात आर के नारायण ( आर के लक्ष्मण यांचे भाऊ) यांची द गाईड ही इंग्रजी कादम्बरी एफ वाय बी ए ला अभ्यासासाठी लावलेली होती. याच कादंबरी वरून गाईड बनवला होता.तेव्हा आमच्या अभ्यासाला आहे असे सांगून गाईड ऑफिशियली घरून पैसे घेऊन पाहता येई :फिदीफिदी

गम्मत म्हणजे कादम्बरी आणि चित्रपट यात बरीच तफावत होती. सेन्ट्रल थीम वगळता. सिनेमा पुरता बॉलीवूडी होता आणि त्याचा परिक्षेच्या अभ्यासासाठी अथवा साहित्यिक आकलनासाठी काडीचाही उपयोग होत नसे. ( आताही नटसम्राट नाटक कुठेतरी बी ए ला आहे म्हणे. मांजरेकरांचा नटसम्राट पाहून त्याच्या रसग्रहणासाठी किंवा साहित्यिक आकलनासाठी जसा काडीचाही उपयोग होणार नाही, तसेच)

पादुकानन्द | 12 January, 2016 - 10:59

अरे आगाऊ अत्युत्तम लेख. कसा सुट्ला नजरेतून कुणास ठाऊक. आता काही लिहायची गरजच राहिली नाही.

कांदापोहे | 12 January, 2016 - 12:10

आगाऊ भारीच. स्मित

आत्ममग्न | 12 January, 2016 - 12:37

सहज शेअर करत आहे,

'गाईड' माझ्या मामाने ४० पेक्षा जास्त वेळा पाहिलेला आहे. त्यामुळे मित्रपरिवारात त्याला आजही(तो ६५ वर्षाचा आहे) गाईड म्हणूनच बोलवतात.

खरोखर अप्रतिम सिनेमा आहे!

नीधप | 12 January, 2016 - 12:57

तुमचे मामा आमच्या फॅमिलीतले दिसतात. स्मित
माझे आजोबा, बाबा, धाकटा काका आणि मी हे सर्व गाईडफ्यान!
काकाने बहुतेक ४०+ वेळा पाह्यला असावा गाईड.
एकदा टिव्हीवर दाखवला होता तेव्हा काळापांढरा इसी टिव्ही आणि बुशचा टू इन वन आणि काहीतरी वायर जुगाड करून क्यासेटींवर आख्ख्या सिनेमाचा ऑडिओ टेप करून ठेवलेला होता बाबांनी. दोन क्यासेटी पाठपोट भरल्या होत्या. या क्यासेटी मलातरी ५-६ वी पासून आठवतायत. म्हणजे त्या आधी कधीतरी केल्या असणार.
त्यामुळे मी गाईड हा प्रत्यक्ष पाहण्याआधी कैकवेळा ऐकलेला होता. स्मित

संपादन

आत्ममग्न | 12 January, 2016 - 13:04

त्याच्याशी संबंधित एक गंमत,

मामी लग्न करून नव्याने घरात आलेली होती आणि मामा नेमका बाहेर असताना त्याच्या मित्रांपैकी कुणीतरी एकजणाने घरी येऊन विचारले 'गाईड' आहे का? मामीने डिक्लेअर केले की इथे गाईड म्हणून कुणी राहत नाही खो खो

नीधप | 12 January, 2016 - 13:17

हाहा

संपादन

आशूडी | 12 January, 2016 - 13:26

मस्त धागा. पुन्हा पुन्हा बघावेसे वाटणारे सिनेमे.

अमा | 12 January, 2016 - 14:07

गाइड मध्ये त्यांच्यात दुरावा आल्यानंतरचा एक प्रसंग आहे. अप्रतिम सीन घेतला आहे. तो गाइडच्या ड्रेसात घराबाहेर बसला आहे. ती घरातून येते. गाडीत बसते व त्याला म्हनते नाटकं बस्स झाली शो का वक्त हो चुका है. चलो कपडे बदल कर गाडी में बैठो. हे सर्व ड्रायवर शी बोलल्या सारखे.

तर तो खाली झुकतो व दार बंद करतो. दोघांच्या मध्ये काच येउ लागते मग तो म्हणतो. " वक्त हो चुका . शो हो चुका. हम देख चुके. " व तिला सोडून दूर जातो. एका सीन वर जीव कुर्बान.

शेवटी तो मरायला टेकलेला असतो व वहिदा येते. त्याला ती एक क्षण तो प हिल्यांदा तिच्या प्रेमात पडतो तेव्हा ती दिसलेली असते तीच प्रतिमा दिसते. तेव्हा अगदी कासावीस होते. हे एक प्रेम आहे जे सत्यात येउ शकलं असतं दोघे एकमेकांबरोबर सुखी राहु शकले असते पण ते झाले नाही. आता ती वेळ गेली गेलीच. जगाचाच निरोप घ्यायची वेळ आली. I wonder how anyone can live with that sort of pain.

मोसे छल किये जाय. गाण्यात तिच्या नाचाच्या ड्रेस मध्ये एक काळी मधली पट्टी घातली आहे.
आणि ती कशी नाक उडवून निघून जाते. त्याला समजूनच घेत नाही. हर हर. चलो सुहाना भरम तो टूटा. जाना के हुस्न क्या है.... वॉव.

ह्यात अजून एक दिग्दर्शकाची बारकाई आहे. प्रेमात पडतो तो तो. तेरे मेरे सपने अब एक रंग है. हे एकट्यानेच म्हटलेले आहे. तिचा फक्त मूक सहभाग आहे. ती स्वतःच्या डिस्कव्हरीत मश्गुल आहे. हा फक्त तिचा सह प्रवासी आहे. पण हा आपण एकत्र आहोत असे समजून बसतो. फक्त रफीचा आवाज.
आज फिर जीने कि तमन्ना ला फक्त तिचा आवाज. तो मूक आहे. बघतो आहे तिला फुलताना.

मला पण गाइड ४०+ वेळा च्या क्लब मध्ये घाला.

अश्विनी के | 12 January, 2016 - 14:11

अमा, मस्त पोस्ट आहे स्मित

पादुकानन्द | 12 January, 2016 - 14:19

केसांचा भला मोट्ठा फुगा असलेला शामळू ब्लॅक व्हाईट देव आणि तारुण्याचे सोंग आणलेला १९७५ च्या नन्तरचा देव याच्या मधला देव जो आहे म्हणजे ज्वेल थीफपासूनचा म्हणा हवे तर, खूपच हँडसम दिसत असे. तेरे मेरे सप्ने, प्रेमपुजारी , जॉनी, गॅम्बलर चा काळ. नीरज -एस डी -गोल्डी - देव कॉम्बो असलेली गाणी पाहणं कसला आनन्द आहे....

निल्सन | 12 January, 2016 - 14:19

लिंकबद्दल धन्यवाद सीमंतीनी.

आत्ममग्न | 12 January, 2016 - 14:23

https://www.youtube.com/watch?v=Ryh_WBc6eP0

हा घ्या गाईड - यू ट्युब वर

धागा वाहता आहे तो लवकरच थांबवायला हवाय.

पूनम | 12 January, 2016 - 14:31

धागा वाहता आहे तो लवकरच थांबवायला हवाय.>>
हो ना राव. आमच्या पोस्टी वाहून गेल्या की अरेरे

अमा स्मित

नीधप | 12 January, 2016 - 14:53

अ‍ॅडमिनना विनंती केलीये पण ते अजून पोचले नसावेत या टु डु पर्यंत.

संपादन

सस्मित | 12 January, 2016 - 14:54

अमा, मस्त लिहिलंत स्मित

आत्ममग्न | 12 January, 2016 - 15:08

नवा लेखनाचा धागा काढून इथे वाचलेल्या(survived) पोस्ट तिथे टाकता येतील

हे बरे केलेत.

------------------------------------------------------------

सस्मित | 11 January, 2016 - 12:31
१. ज्वेल थीफ
२. गाइड
३. तिसरी मंजिल
ग्रेट मुवीज!

नीधप | 11 January, 2016 - 12:34
धागा वाहता केलाय. का बंधारा घालू?

------------------------------------------------------------
कांदापोहे | 11 January, 2016 - 12:41
भारी. मधे 'एक होता गोल्डी' नावाचा कार्यक्रम होता पुण्यात. काही कारणाने जाता आले नाही. परत वाट पहातोय.

------------------------------------------------------------
पूनम | 11 January, 2016 - 12:47
'दिल का भंवर करे पुकार' इज अल्टिमेट गोल्डी. त्याच सिनेमातल्या 'तेरे घरके सामने' गाण्यात नूतन काचेच्या ग्लासमध्ये दिसते तो ईफेक्टही काळाच्या पुढचा!
'ओ मेरे सोना रे सोना'मध्ये बॅग आणि त्याच्या बंदांचा वापर
'पलभर के लिये कोई हमे प्यार करले' मध्ये खिडक्यांचा वापर
'होठोंपे ऐसी बात'मधला ड्रम्सचा सस्पेन्ससाठी वापर...
गाणी शूट करणं ही खासियत वाटते मला त्याची.
धागा काढलाच आहेस, तर होऊदे की अर्काईव्ह (खर्च!)

सस्मित | 11 January, 2016 - 12:51
हा धागा वाहता राहु नये. कारण यावर येणार्या पोस्टी/प्रतिसाद माझ्यासारख्या बर्याच जणांचा आवडीचा/जिव्हाळ्याचा विषय असतील. बाकी आपली मर्जी.

------------------------------------------------------------
नीधप | 11 January, 2016 - 12:55
आता गप्पांचे पान हे लेखनाचा धागामधे कसे कन्व्हर्ट करायचे ते सांगा कुणीतरी. मला सापडला नाही ऑप्शन.

------------------------------------------------------------
पादुकानन्द | 11 January, 2016 - 12:58
गोल्डी शेवटी शेवटी रजनीश बाबाच्या नादी लागून पार भंजाळला होता. त्याचे शेवटच्या टप्प्यातील सिनेमे पाहता बहुधा त्याने सर्व घोंगडे असिस्टंतवर टाकले असावे असे म्हणायला वाव आहे.
छुपा रुस्तुम हा यडपट चित्रपट कोणत्याच बाजूने गोल्डीचा वाटत नाही. तो बहुधा देव महाशयांनी स्वतःच 'डायरेक्ट "केला असावा. मॅकेनाज गोल्डची चौथी पाचवी कार्बन कॉपी असलेला हा लैच बोगस माल होता. त्यात गोल्डीचे आणि बहुधा बिंदूचे एक विनोदी गाणेही होते.
तीच तर्हा राम बलराम . धर्मेन्द्र आणि अमितभ बच्चन असलेला हा मसाला पट ही फसलेलाच होता. मुळात गोल्डीचे वैशिष्ट्य जे की गाण्यांचे टेकिंग या चित्रपटात अगदीच थर्ड्क्लास होते.
ब्लॅक मेल चालला चांगला पण त्याला गोल्डी टच नव्हता . विनोद खन्नाबरोबर त्यानेही रजनीश बाबाच्या नादी लागून करीअरचा विचका करून घेतला . दोघानाही म्हातरपणी शहाणपण आले.
गोल्डीचे डोल्यात चमक नव्ह्ती उदास दिसायचे ते. त्यामुळे लीड अभिनेता म्हणून तो अॅक्सेप्ट झाला नाही. कोरा कागज मध्ये त्याला चष्मा चढवावा लागला. अर्थात तो चित्रपट गाजला अॅज अ हीरो पण त्याचा दिग्दर्शक अनिल गांगुली होता.
तेरे मेरे सपने चालला नसला तरी उत्कृष्ट होता. मसालापट नसूनही.

------------------------------------------------------------
गजानन | 11 January, 2016 - 13:00
गप्पांचे पान हे लेखनाचा धागामधे कसे कन्व्हर्ट करायचे << त्यासाठी अॅडमिनांना सांगायला लागेल. तोपर्यंत इथले प्रतिसाद कुठेतरी साठवून ठेवावे लागतील.
• संपादन

------------------------------------------------------------
नीधप | 11 January, 2016 - 13:03
ओके अॅडमिनांना सांगितलंय.

------------------------------------------------------------
टीना | 11 January, 2016 - 14:30 नवीन
मी खुपच ढ दिसतेय या बाबतीत..
आत्ता विकी पुराण घेतल वाचायला तेव्हा कळल कि देव आनंद न हे भाऊ आहेत.. चला न पाहिलेल्या जुन्या चित्रपटांच्या लिश्टीत बरेच नाव अॅड होतील

------------------------------------------------------------
मृणाल १ | 11 January, 2016 - 14:33 नवीन
tina - ज्वेल थीफ, गाइड & तिसरी मंजिल हे तर नक्की बघ .

------------------------------------------------------------
कांदापोहे | 11 January, 2016 - 14:45 नवीन
विनोद खन्नाबरोबर त्यानेही रजनीश बाबाच्या नादी लागून करीअरचा विचका करून घेतला . दोघानाही म्हातरपणी शहाणपण आले.>> +१००१
शेवटच्या टप्प्यात संगीताची धुरा बर्मनदांकडुन लक्ष्मी-प्यारे, कल्याणजी-आनंदजी यांच्याकडे गेल्याने पण संगीताच मेजर सेटबॅक बसला असावा.

------------------------------------------------------------
स्वस्ति | 11 January, 2016 - 14:41 नवीन
दिल का भंवर करे पुकार' इज अल्टिमेट गोल्डी. त्याच सिनेमातल्या 'तेरे घरके सामने' गाण्यात नूतन काचेच्या ग्लासमध्ये दिसते तो ईफेक्टही काळाच्या पुढचा! >>> त्या चित्रपटातली सगळीच गाणी मस्त वाटतात .
तु कहां ये बता ...

अँकी नं.१ | 11 January, 2016 - 15:09 नवीन
गोल्डीनी रजनिशच्या नादानी अन देव नी खुशमस्कर्यांच्या वा अतिरेकी ओव्हरकाँफिडन्सपाई स्वतःमधल्या कलाकाराचा गळा घोटला...
दोघं एकत्र राहिले असते तर अजून बरेच मास्टरपीसेस पहायला मिळाले असते...
हा हन्त हन्त...

------------------------------------------------------------
पादुकानन्द | 11 January, 2016 - 15:22 नवीन
तसे नव्हे. तेरे मेरे सपने नन्तर देवला दिग्दर्शक होण्याची स्वप्ने पडू लागली. प्रेमपुजारी त्याची पहिली फिल्म अॅस अ डायरेक्टर. हा काळ सत्तरच्या आसपास. त्यामुळे त्याची व गोल्डीची युती संपली. बर्याच आपट्या खाल्ल्यावर देवभाऊंनी गोल्डीला साकडे घातले आणि छुपा रुस्तम काढला. तोवर गोल्डी ला सिने सृस्।टीतच रस राहिला नव्हता. त्याने त्यात पाट्या टाकल्या. स्वतःतले १०० टक्के दिलं नाही.. एस डी बर्मन यांनीदेखील चक्क पाट्या टाकल्या. देव स्वतःला लिजंड समजू लागला असल्याने त्याने नवकेतनसाठी नन्तर गोल्डीचे साह्य घेतले नाही. देवचा अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून वकूब बेताचाच होता म्हणजे अगदीच सी ग्रेड.

------------------------------------------------------------
प्रसन्न हरणखेडकर | 11 January, 2016 - 15:22 नवीन
येस्स्स !! गोल्डी गाण्यांच्या टेकींग साठी फार फेमस होता
माझे सगळ्यात आवडते गाणे म्हणजे ब्लॅकमेल मधले पल पल दिल के पास आणि दिल का भंवर

------------------------------------------------------------
पादुकानन्द | 11 January, 2016 - 15:24 नवीन
गाण्यच्या टेकिंगसाठी राजकपूर, गोल्डी, मणिरत्नम ही नावे पटकन आठवतात...

------------------------------------------------------------
मृणाल १ | 11 January, 2016 - 15:26 नवीन
तु कहां ये बता ...
आहा !!

------------------------------------------------------------
दक्षिणा | 11 January, 2016 - 15:48 नवीन
मला आवडलेले त्यांचे चित्रपट म्हणजे
तिसरी मंझिल (बेस्ट सस्पेन्स थ्रिलर आय हॅव एव्हर सीन)
हम दोनो
गाईड
तेरे घर के सामने
ज्वेल थीफ (फार लहान असताना पाहिल्याने आता लक्षात नाही) पुन्हा पहावा लागेल.
जॉनी मेरा नाम पण अर्धाच पाहिला ( झी क्लासिक ला क्वचित लागतो, लक्ष ठेवा)

------------------------------------------------------------
अमा | 11 January, 2016 - 15:50 नवीन
मला पहिले गोल्डी हॉन नटी वाटले.
गाइड, तीसरी मंझील फेवरिट इथेच लिहीते गाइड वर. एक परिपूर्ण चित्रपट कलाकृती.
पण आपले जिव्हाळ्याचे म्हणजे वहिदाचे कपडे. ओ एम जी. विस्ताराने लिहीते.
मैं तुलसी तेरे आंगन की सिनेमात गोल्डी आहेत. असा जुन्या पधतीने प्रेम करणारा पती किती गोड वाट्तो व त्यांचे आशाचे प्रेम फार गोड दाखवले आहे. शॉर्ट लिव्ह्ड. आशा पारेखचे पात्र वारल्यावर
तिचा जनाजा घरावरून घ्यायला सांगतात ही एक अस्सल भारतीय सिच्युएशन बघताना अगदी कासावीस होते. ते गाणे देखील खूप अर्थगर्भ आहे.
दिल का भवर पण फेवरिट. तू कहां पण.
ज्वेल थीफ एका वीकांताला बघते. होटो पे ऐसी बात फेवरिट.

------------------------------------------------------------
नीधप | 11 January, 2016 - 16:41
धाग्याला बांध घातला का अॅडमिननी? धागा वाहता आहे अजून बहुतेक.

------------------------------------------------------------
निल्सन | 11 January, 2016 - 17:36
आताच तिसरी मंजिल पाहिला. मस्त चित्रपट. खुनी कोण असेल हे प्रेडिक्ट करता आलं मलातरी कदाचित रहस्यमय चित्रपट, क्राईल पॅट्रोल जास्त बघण्याचा परिणाम असेल
योगायोग असा की आजच सकाळी ऑफिसला येताना FM वर अनु कपुर विजयआनंदच्या कारकिर्दीबद्दल सांगत होते ते ऐकतच आले आणि इथे आले तर 'चित्रपट कसा वाटला' या धाग्यावर त्यांचीच चर्चा सुरु होती, हातोहात नीधपने नविन धागापण काढला. या सगळ्यांना धन्यवाद. जे उत्तम चित्रपट बघायचे राहुन गेलेत ते या निमित्ताने बघण्यात येतील.
ज्वेल थीफ नाहीये यु ट्युबवर

------------------------------------------------------------
सीमंतिनी | 11 January, 2016 - 19:23 नवीन
https://www.youtube.com/watch?v=s1psCeMTG04&list=PLIrq87pfqk-oA99cnjHl_Y...

------------------------------------------------------------
निल्सन फार तुकड्यात आहे पण आहे!!

------------------------------------------------------------
सीमंतिनी | 11 January, 2016 - 19:26 नवीन
विजय आनंदचे दिग्दर्शित सिनेमे तसे कमी आहेत - हाता पायाच्या बोटावर मोजता येतील इतकेच. पण एकदम धमाल आहेत.

------------------------------------------------------------
पादुकानन्द | 11 January, 2016 - 19:56 नवीन
विजय आनंदचे दिग्दर्शित सिनेमे तसे कमी आहेत
>>> एकूण बारा.

------------------------------------------------------------
पादुकानन्द | 11 January, 2016 - 20:05 नवीन
गोल्डीच्या चित्रात गाणी कधी उपरी वाटली नाहीत. दुधात साखर मिसळावी तशी कथानकात गाणी अशी बेमालूम मिसळलेली असत की तो स्क्रीन प्लेचा, स्टोरीचा भागच वाटावा.उदा. जॉनी मेरा नाम मधले नालन्दा येथे शूट झालेले ओ मेरे राजा. हे गाणे बघा. एक छेडछाडीचे, लडिवाळ रोमँटिक ड्युएट वाटले तरी अॅक्च्युअली त्यांच्या आजूबाजूला पोलीस त्याना शॅडोइंग करत असतात. आणि त्या भेटीत एक गुप्त कागदांची की हिर्यांची ब्रीफकेस ची अदलाबदल केली जाते.पोलीसही गोंधळून जातात की हे खरेच लव्ह बर्ड्स आहेत की काय.
गाण्यातूनही स्टोरी पुढे नेण्याचे त्याचे कसब औरच.
ह्या आनन्द मंडळींचा तेरे मेरे सपने फारच उच्च होता. त्यात गोल्डीचीही भूमिका आहे . त्यातल्या गाण्यांवर तर स्पेशली लिहायला पाहिजे.

------------------------------------------------------------
शूम्पी | 11 January, 2016 - 20:14 नवीन
तेरे मेरे सपने बघायचा राहिलाय तर आता बघावा लागणार.

------------------------------------------------------------
पद्मावति | 12 January, 2016 - 01:37 नवीन
गोल्डी..बस नाम ही काफ़ि है.
इतक्यातच तेरे मेरे सपने बघितला...अप्रतिम. ज्वेल थीफ पुन्हा पाहुनही, रहस्य माहीत असूनही तेव्हडाच आवडला. हकिकत, तीसरी मंजील.....
दिग्दर्शक म्हणून तर ग्रेटच होताच पण मला अभिनेता म्हणूनही आवडायचा.
<<< गोल्डी गाण्यांच्या टेकींग साठी फार फेमस होत>>> अगदी, अगदी. गोल्डीच्या चित्रपटातली गाणी याच्यावर एक लेखमालीका होऊ शकेल.

------------------------------------------------------------
फारएण्ड | 12 January, 2016 - 05:34 नवीन
मस्त धागा.
तीच तर्हा राम बलराम . धर्मेन्द्र आणि अमितभ बच्चन असलेला हा मसाला पट ही फसलेलाच होता. मुळात गोल्डीचे वैशिष्ट्य जे की गाण्यांचे टेकिंग या चित्रपटात अगदीच थर्ड्क्लास होते. >>> गोल्डीचे इतर चित्रपट बघितल्यावर हा चित्रपट हे दोघे तेव्हा फॉर्मात असलेले नग घेउनही याने असा कसा काढला याचे आश्चर्य वाटत होते. त्याचे उत्तर 'एक होता गोल्डी' वाचल्यावर सापडले. त्याच्या इतर अनेक पिक्चर्स प्रमाणे एकदम स्मार्ट असलेले कथानक व दिग्दर्शन 'आणीबाणी' (हो - या चित्रपटाचे काम तेव्हा सुरू झाले होते) मुळे त्यातील अनेक भाग सेन्सॉर संमत होणार नाही असे इतरांना वाटल्यामुळे बदलावे लागले - डंब डाऊन करावे लागले. त्यामुळे जो फायनल प्रॉडक्ट तयार झाला तो मूळ कल्पनेपेक्षा वेगळाच होता. त्यात शोले नंतर अमिताभ ची लोकप्रियता वाढल्याने धरम ला इन्सिक्युरिटी येउ लागली होती व तो ही नाटके करू लागला. अशा अनेक प्रॉब्लेम्स मुळे तो फसला. आणखी माहिती त्या पुस्तकात मिळेल.
बाय द वे गोल्डीच्या पिक्चर्सच्या तुलनेत तो 'फसला'. एक टाईमपास म्हणून ओके आहे. बच्चन-रेखा ची केमिस्ट्री व धरमही मस्त आहे यात. गाणीही टाईमपास आहेत. मात्र बच्चन चे तेव्हाचे इतर पिक्चर्स कायम डोक्यात आहेत तसा तो राहात नाही. नाहीतर सत्तर च्या दशकातील धरम, अमिताभ आणि गोल्डी सारखा दिग्दर्शक यातून काहीतरी अजरामर निर्माण व्हायला हवे होते.
गोल्डी ने म्हणे असेच दिलीप-राज-देव ला घेउन एक चित्रपट तयार करायला सुरूवात केली होती. तो ही बारगळला.

------------------------------------------------------------
सीमंतिनी | 12 January, 2016 - 10:13 नवीन
गोल्डीच्या हिरवीणी बर्यापैकी डान्सर्स असायच्या. राखीला कशी काय घेतली ब्लॅकमेल मध्ये देव जाणे !!

------------------------------------------------------------
मृणाल १ | 12 January, 2016 - 10:13 नवीन
राम बलराम विजय आनंदचा आहे आज कळले. अजिबातच त्याचा टच नाहीये . कधीतरी लहानपणी बघितला होता आणि पार विस्मरणात गेला. खरतर बहुदा गोल्डीचा हाच एकमेव चित्रपट कि जो थेटरात बघितला आहे . बाकी सगळे आधीचे असल्यामुळे घरीच बघितले आहेत.
अरे हो गाईड आम्हाला शाळेतर्फे खास शो दाखवला होता. रिलीज झाल्यावर बर्याच वर्षांनी .

------------------------------------------------------------
नीधप | 12 January, 2016 - 10:22
अरे हो गाईड आम्हाला शाळेतर्फे खास शो दाखवला होता. <<
आम्हाला पण

------------------------------------------------------------
सीमंतिनी | 12 January, 2016 - 10:27
बहुतेक सिनेमे टीव्हीवर किंवा यूट्यूब वर पाहिले. पण कुठल्याशा गणेशोत्सवात ज्वेलथीफ बिगस्क्रिनवर पाहिला होता. सिक्कीम जाम आवडले होते. वैजयंतीमालाची गोंड्या गोंड्याची साडी कुठल्या फ्याशनीत बसते देव जाणे पण मस्त दिसते!! https://www.youtube.com/watch?v=TYjy6StBg3E

------------------------------------------------------------
आगाऊ | 12 January, 2016 - 10:44
http://www.maayboli.com/node/17358

------------------------------------------------------------
पादुकानन्द | 12 January, 2016 - 10:51
ज्या काळात चित्रपट पाहणे हे भिकारधंदे समजले जायचे आणि 'अभ्यास करा अभ्यास , सिनेमा परिक्षेत येणार नै काही' असे डायलॉग ऐकावे लागत . त्या काळात आर के नारायण ( आर के लक्ष्मण यांचे भाऊ) यांची द गाईड ही इंग्रजी कादम्बरी एफ वाय बी ए ला अभ्यासासाठी लावलेली होती. याच कादंबरी वरून गाईड बनवला होता.तेव्हा आमच्या अभ्यासाला आहे असे सांगून गाईड ऑफिशियली घरून पैसे घेऊन पाहता येई :
गम्मत म्हणजे कादम्बरी आणि चित्रपट यात बरीच तफावत होती. सेन्ट्रल थीम वगळता. सिनेमा पुरता बॉलीवूडी होता आणि त्याचा परिक्षेच्या अभ्यासासाठी अथवा साहित्यिक आकलनासाठी काडीचाही उपयोग होत नसे. ( आताही नटसम्राट नाटक कुठेतरी बी ए ला आहे म्हणे. मांजरेकरांचा नटसम्राट पाहून त्याच्या रसग्रहणासाठी किंवा साहित्यिक आकलनासाठी जसा काडीचाही उपयोग होणार नाही, तसेच)

------------------------------------------------------------
पादुकानन्द | 12 January, 2016 - 10:59
अरे आगाऊ अत्युत्तम लेख. कसा सुट्ला नजरेतून कुणास ठाऊक. आता काही लिहायची गरजच राहिली नाही.

------------------------------------------------------------
कांदापोहे | 12 January, 2016 - 12:10 नवीन
आगाऊ भारीच.

------------------------------------------------------------
आत्ममग्न | 12 January, 2016 - 12:37 नवीन
सहज शेअर करत आहे,
'गाईड' माझ्या मामाने ४० पेक्षा जास्त वेळा पाहिलेला आहे. त्यामुळे मित्रपरिवारात त्याला आजही(तो ६५ वर्षाचा आहे) गाईड म्हणूनच बोलवतात.
खरोखर अप्रतिम सिनेमा आहे!

------------------------------------------------------------
नीधप | 12 January, 2016 - 12:57 नवीन
तुमचे मामा आमच्या फॅमिलीतले दिसतात.
माझे आजोबा, बाबा, धाकटा काका आणि मी हे सर्व गाईडफ्यान!
काकाने बहुतेक ४०+ वेळा पाह्यला असावा गाईड.
एकदा टिव्हीवर दाखवला होता तेव्हा काळापांढरा इसी टिव्ही आणि बुशचा टू इन वन आणि काहीतरी वायर जुगाड करून क्यासेटींवर आख्ख्या सिनेमाचा ऑडिओ टेप करून ठेवलेला होता बाबांनी. दोन क्यासेटी पाठपोट भरल्या होत्या. या क्यासेटी मलातरी ५-६ वी पासून आठवतायत. म्हणजे त्या आधी कधीतरी केल्या असणार.
त्यामुळे मी गाईड हा प्रत्यक्ष पाहण्याआधी कैकवेळा ऐकलेला होता.

------------------------------------------------------------
आत्ममग्न | 12 January, 2016 - 13:04 नवीन
त्याच्याशी संबंधित एक गंमत,
मामी लग्न करून नव्याने घरात आलेली होती आणि मामा नेमका बाहेर असताना त्याच्या मित्रांपैकी कुणीतरी एकजणाने घरी येऊन विचारले 'गाईड' आहे का? मामीने डिक्लेअर केले की इथे गाईड म्हणून कुणी राहत नाही

------------------------------------------------------------
नीधप | 12 January, 2016 - 13:17 नवीन

------------------------------------------------------------
आशूडी | 12 January, 2016 - 13:26 नवीन
मस्त धागा. पुन्हा पुन्हा बघावेसे वाटणारे सिनेमे.

------------------------------------------------------------
अमा | 12 January, 2016 - 13:29 नवीन
गाइड मध्ये त्यांच्यात दुरावा आल्यानंतरचा एक प्रसंग आहे. अप्रतिम सीन घेतला आहे. तो गाइडच्या ड्रेसात घराबाहेर बसला आहे. ती घरातून येते. गाडीत बसते व त्याला म्हनते नाटकं बस्स झाली शो का वक्त हो चुका है. चलो कपडे बदल कर गाडी में बैठो. हे सर्व ड्रायवर शी बोलल्या सारखे.
तर तो खाली झुकतो व दार बंद करतो. दोघांच्या मध्ये काच येउ लागते मग तो म्हणतो. " वक्त हो चुका . शो हो चुका. हम देख चुके. " व तिला सोडून दूर जातो. एका सीन वर जीव कुर्बान.
शेवटी तो मरायला टेकलेला असतो व वहिदा येते. त्याला ती एक क्षण तो प हिल्यांदा तिच्या प्रेमात पडतो तेव्हा ती दिसलेली असते तीच प्रतिमा दिसते. तेव्हा अगदी कासावीस होते. हे एक प्रेम आहे जे सत्यात येउ शकलं असतं दोघे एकमेकांबरोबर सुखी राहु शकले असते पण ते झाले नाही. आता ती वेळ गेली गेलीच. जगाचाच निरोप घ्यायची वेळ आली. I wonder how anyone can live with that sort of pain.
मोसे छल किये जाय. गाण्यात तिच्या नाचाच्या ड्रेस मध्ये एक काळी मधली पट्टी घातली आहे.
आणि ती कशी नाक उडवून निघून जाते. त्याला समजूनच घेत नाही. हर हर. चलो सुहाना भरम तो टूटा. जाना के हुस्न क्या है.... वॉव.
मला पण गाइड ४०+ वेळा च्या क्लब मध्ये घाला.

------------------------------------------------------------
अश्विनी के | 12 January, 2016 - 14:11 नवीन
अमा, मस्त पोस्ट आहे

------------------------------------------------------------
पादुकानन्द | 12 January, 2016 - 14:19 नवीन
केसांचा भला मोट्ठा फुगा असलेला शामळू ब्लॅक व्हाईट देव आणि तारुण्याचे सोंग आणलेला १९७५ च्या नन्तरचा देव याच्या मधला देव जो आहे म्हणजे ज्वेल थीफपासूनचा म्हणा हवे तर, खूपच हँडसम दिसत असे. तेरे मेरे सप्ने, प्रेमपुजारी , जॉनी, गॅम्बलर चा काळ. नीरज -एस डी -गोल्डी - देव कॉम्बो असलेली गाणी पाहणं कसला आनन्द आहे....

------------------------------------------------------------
निल्सन | 12 January, 2016 - 14:19 नवीन
लिंकबद्दल धन्यवाद सीमंतीनी.

------------------------------------------------------------
आत्ममग्न | 12 January, 2016 - 14:23 नवीन
https://www.youtube.com/watch?v=Ryh_WBc6eP0
हा घ्या गाईड - यू ट्युब वर
धागा वाहता आहे तो लवकरच थांबवायला हवाय.

ओके काम झालेले आहे, मागील पानावरून पुढे करा सुरूवात आता!

१९८५ साली "मै तुलसी तेरे आंगन की" बघितला तेव्हा हा बिटल्स राखलेला नट 'गोल्डी' आहे हे माहीतच नव्हते. विनोद खन्ना आणि नूतन परीचयाचे होते.

पडद्यावरील परीचयाचे बरें!

गाईड मध्यंतरी परत पाहीला. आणी तो शेवट (देव-आनंद साधू होतो, उपोषणात मरतो वगैरे) खूप खेचल्यासारखं वाटलं. पूर्वी आवडलेल्या गोष्टी आठवणीत तशाच राहू द्याव्या, परत तिकडे जाऊ नये हेच खरं.