जन्म जाळला अवघा समिधा होताना मी...

Submitted by सत्यजित... on 7 January, 2016 - 17:43

टिका-टिप्पणी जो तो करतो आयुष्यावर...
उहापोह का इतका घडतो आयुष्यावर?

कुणी उन्हाची रख-रख म्हणुनी होतो लाही...
कुणी चांदणे अलगद धरतो आयुष्यावर!

टपोर डोळ्यातून सखीच्या झरते कविता...
शेर नेमका तेंव्हा सुचतो आयुष्यावर!

कधी मृत्युही इतका मोहक वाटुन जातो...
जणू श्वासही कलंक ठरतो आयुष्यावर!

जन्म जाळला अवघा समिधा होताना मी...
तरी गंध 'त्या'चा दर्वळतो आयुष्यावर!
—सत्यजित
==============================

कुणी गिरवतो तोच तो धडा आयुष्याचा...
कुणी रोज नव-कविता करतो आयुष्यावर!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे. <<<कुणी उन्हाची रख-रख म्हणुनी होतो लाही...
कुणी चांदणे अलगद धरतो आयुष्यावर>>>
आवडला.

एक मोठी तांत्रिक चूक झाली आहे मतल्यात. करतो आणि होतो हे काफिये चालणार नाहीत. बाकी खयालांमधील नावीन्य आणि शब्दयोजना खूप छान! र्‍हस्वदीर्घाच्या सुटी टाळण्याकडे कल असलेला बरा! शुभेच्छा!

कधी मृत्युही इतका मोहक वाटुन जातो...
जणू श्वासही कलंक ठरतो आयुष्यावर!

जन्म जाळला अवघा समिधा होताना मी...
यज्ञ पेटला तेंव्हा मरतो आयुष्यावर!>>>जबरदस्त !

मनःपूर्वक धन्यवाद बेफिजी...
तांत्रिक चूक संपादित केली आहे!

टिका-टिप्पणी करतो जो-तो आयुष्यावर...
उहापोह का इतका होतो आयुष्यावर?

मूळ मतला असा सुचला होता.लेखनासाठी,कवाफी अधिक सुलभ करण्यासाठी 'जो-तो करतो' असा बदल करताना,'होतो' ऐवजी 'घडतो' असा बदल करणे राहून गेले होते!
पुढील लिखाणात सुटी टाळण्याचा नक्की प्रयत्न करेल.
आपल्या शुभेच्छा तसेच मार्गदर्शनाबद्दल अनेक आभार!

खूप धन्यवाद सत्यजितजी,आनंदयात्रीजी!

मनःपूर्वक धन्यवाद shuma!
माणिकजी आपलेही मनःपूर्वक आभार!

आपल्यासारख्या प्रतिभा-श्रीमंत माबोकरांकडून मिळणारे प्रतिसाद,लेखनाचा हुरुप सतत द्विगुणित करत असतात!
सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार!

पुन्हा एकदा धन्यवाद श्रीपाद!

कविताजी,सुप्रियाजी...मनःपूर्वक धन्यवाद!