
प्रमाण १ कोंबडीसाठीचे आहे. मी एकाच वेळी २ होल स्किन्ड चिकन, कॉकरेल जातीचे, सुमारे ७-८०० ग्राम प्रत्येकी वापरले होते. चिकन लिव्हर व आतील खाण्यायोग्य भाग खिम्यात मिक्स केलेले होते.
या प्रकारासाठी अख्खी कोंबडी, खाटकास "मुर्ग मुसल्लम बनवण्यासाठी कापून दे" असे सांगून आणावी लागते. नेक व हेड इंटॅक्ट ठेवलेत तरी चालते, नको असल्यास थोडी नेक शिल्लक ठेवून बाकी डिस्कार्ड करावी.
कांदा भारतीय साईजचा आहे.
चमचा = त्यातल्या त्यात मोठा चहाचा चमचा. टेबलस्पून नव्हे.
स्टफिंगसाठी
खिमा :
खिमा : २०० ग्रॅम
कांदा : १ मध्यम बारीक चिरून
आलं लसूण पेस्ट : १ चमचा
तिखट : १ चमचा
गरम मसाला : अर्धा चमचा
कोथिंबीर : १ ते दीड मुठ बारीक चिरून
पुदिना : अर्धी ते १ मूठ, चवीनुसार. उग्र असला तर कमी घ्या.
मीठ : चवीनुसार. ब्राईन करताना चिकनमधे मीठ घातल्याचे लक्षात ठेवावे.
थोडं तेल. (२-३ चमचे)
६ उकडलेली अंडी
ग्रेव्ही :
बदाम : १२-१४
काजू : ८-१०
खसखस : १ चमचा.
शहाजिरे : २ चिमूट
(काजू, बदाम व खसखस भिजवून, बदाम सोलून, वरील ४री वस्तू कोरड्याच भाजून घ्याव्यात. थोडा खमंग वास येऊ लागला, की त्याची थोडे पाणी घालून मिक्सरमधून पेस्ट करून घ्यावी.)
दही : अर्धी-पाऊण वाटी, फेटून. आंबटपणानुसार कमीअधिक करणे.
टमाटा : १ मध्यम, कमी आंबट.
कांदा : बारीक चिरून २ मध्यम
आलं लसूण पेस्ट : २ चमचे
तेल : ३-४ चमचे
धणेपूड : २ चमचे
जिरेपूड :१ चमचा
मिरेपूड : १ चमचा
तिखट : अर्धा चमचा
गरम मसाला : १ चमचा
हळद : पाव चमचा
थोडं तेल
*
चिकन ट्रसिंग : बांधण्यासाठी दोरा.
२० सीसी डिस्पोजेबल सिरिंज.
*
याक्षणी एकादा आयटम विसरलो असलो तर अॅड करीन, तोपर्यंत माफ करून ठेवावे.
तर लोकहो, पाकृमधे विशारदपदवी मिळवायचीच असा पण करून गेल्या इयरेंडला मुर्ग मुसल्लम करण्याचा कट रचला. याची बेसिक पाकृ वाह शेफने यूट्यूबवर दाखवली होतीच. त्याप्रमाणे करता येईल असा कॉन्फिडन्स होता. प्रॉब्लेम फक्त इतकाच होता, की शेफने "मी कोंबडी ब्राईन करून घेतली आहे" असा ओझरता उल्लेख पाकृ व्हिडूमधे केलेला होता.
त्यानुसार, ब्राईनिंगवर रिसर्च सुरू केला. इथे माबोवरही २-३ धाग्यांवर खालीलप्रमाणे कोंबडी सोडून ठेवली.
>>
नमस्कार!
वर्षांतास मटन खिमा व अंडी स्टफ केलेली कोंबडी मुर्ग मुसल्लम स्टाईलने शिजवण्याचे योजिले आहे.(वाह शेफ + मॉड्स) या कोंबडीस ब्राईनिंग करावे किंवा कसे, याबद्दलची मते मागविण्यात येत आहेत.
ड्राय व्हर्सेस वेट ब्राइनिंग. किती वेळ. किती प्रमाण इ. सल्ले स्वीकारार्ह आहेत.
भारतीय प्रकाराने मॅरिनेट करणे व ब्राइनिंग याची तुलना केलीत तर अत्याधिक आनंद होईल.
आपल्या सल्ल्यांमुळे ज्युसी व टेंडर तसेच सक्युलंट (किंवा जे काय होईल ते) होणारे चिकन निजस्थळी पोहोचल्यावर दिलेले आशिर्वाद व शुभेच्छा आपल्यापर्यंत लवकरच (ASAP) पोहचविण्यात येतील.
धन्यवाद!
<<
याच्या उत्तरादाखल माबोवरच्या सुगरणींनी मला भरपूर मदत केली, पण ब्राइनिंगचा अनुभव कुणाला नव्हता. एक्सेप्ट एक, त्यांनी फार खारट होईल म्हणून ब्राईन करू नये असे सांगितले. सर्वच सुगरणींची नावं लिहिली नाहीत म्हणून न रागावता मोठ्या मनाने माफ करावे ही नम्र विनंती.
तर ब्राइन करणे = चिकन, टर्की इ.ना रात्रभर (किमान १२ तास) पाण्याच्या वजनाच्या ६% मीठ घातलेल्या पाण्यात बुडवून फ्रीजात ठेवणे. यामुळे चिकन कोरडे व तोंडात पावडरी न लागता ज्यूसी व सकुलंट लागते. हे प्रकरण करणे कठीण वाटत होते. तेव्हा ड्राय ब्राइनिंगचा विचार केला, पण तेही मनाला पटेना. अन रेस्पी फॉलो करायची तर ब्राईन करायलाच हवे, म्हणून नेटाने रिसर्च करू जाता एक मध्यम मार्ग सापडला.
त्या मार्गानुसार, १ पेलाभर (सुमारे २०० मिली) पिण्याच्या पाण्यात १ चमचा (सुमारे १०-१२ ग्रॅम) समुद्राचे मीठ मिसळून, (याला ६% हायपरटोनिक सलाइन म्हणता येईल) २० सीसीच्या सिरींजने इंजेक्शन दिल्याप्रमाणे सर्व चिकनला टोचले. सुई टोचण्याच्या जागेत १ इंचाचे अंतर ठेवत, प्रत्येक वेळी सुमारे २-३ मिली सलाईन टोचले.
यानंतर चिकनला चिरे देऊन, थोडे दही व आलं-लसूण पेस्ट, मीठ, मिरची चोळून फ्रीजात ठेवून दिले.
संध्याकाळी चिकन करायला घेतले, त्या आधी १ तास चिकन फ्रीजबाहेर काढून ठेवले होते.
पहिली स्टेप स्टफिंग.
नॉनस्टिक पॅनमधे थोडं तेल घेऊन त्यात चिमूटभर मिठासोबत कांदा परतावा.
आलं लसूण पेस्ट टाकून कचवट वास जाइपर्यंत परतावे.
कोथिंबीर, पुदिना, तिखट, गरम मसाला व खिमा घालून परतावे.
खिमा जाडसर असावा, नाहीतर गचका होईल. फार जास्त शिजवू नये. कारण नंतर कोंबडीच्या पोटात बसून सुमारे पाऊण तास शिजवला जाणारे. कच्चाही ठेवू नये.
खिमा एका प्लेटमधे काढून गार व्हायला ठेवा. त्यात उकडलेली अंडी सोलून ठेवुन द्यावीत.
दरम्यान ग्रेव्हीची तयारी करावी.
बदाम सोलून, बदाम, काजू, खसखस व शहाजिरे भाजून, त्याची पेस्ट करून घेणे.
कांदा, टमाटा चिरून ठेवला आहे की नाही ते पहाणे. ग्रेव्हीसाठीची इतर उस्तवार पूर्ण करून ठेवा.
आता कोंबडी स्टफ करायला घ्यावी.
आधी एक अंडे भरावे, ज्यामुळे नेककडील ओपनिंग बंद होईल, त्यानंतर थोडा खिमा, पुन्हा एक अंडे पुन्हा खिमा व शेवटी १ अंडे भरून कोंबडी बांधावी.
चिकन ट्रसिंगचे अनेक व्हिडू नेटवर उपलब्ध आहेत, इथे देत नाही. मुद्दा इतकाच की सुती दोरा, ज्याला पूर्वी 'पुड्या बांधायचा दोरा' म्हणत, तो किंवा या कमासाठी मिळतो तो स्पेशल दोरा वापरावा, व चिकन शिजवताना आतला मसाला बाहेर निघणार नाही, असे बांधावे.
आता जाऽड बुडाच्या एका मोठ्ठ्या कढईत ग्रेव्ही करायला घ्यावी.
स्टेप्स त्याच. कांदा परतणे. त्यात आलं लसून पेस्ट घालून परतणे.
त्यात बदाम-खसखस पेस्ट घालून परतणे.
टमाटा घालून तो गळे पर्यंत परतावे. त्यातच तिखट, गरम मसाला.
शेवटी फेटलेले दही घालून परत शिजवावे. चव पाहून थोडे कमीच मीठ घालावे.
इथवर तयार झालेली ग्रेव्ही पूर्ण व्हेज आहे. व्हेज मेंब्रांसाठी यात पनीरबिनीर घालून बाजूला काढू शकता.
आता ग्रेव्हीत आपण तयार करून ठेवलेल्या कोंबड्या पोहायला सोडाव्या.
दर २-३ मिनिटांनी कोंबडी खाली लागू नये म्हणून थोडी वर उचलून पातेल्यात गोल फिरवावी. इतर वेळी झाकण ठेवावे. चमच्याने ग्रेव्ही चिकनवर टाकत रहावी. सुमारे २० मिनिटांनी कोंबडी उलटवावी. व गोल बेबी गोल प्लस आंघोळ सुरू ठेवावी.
अधून मधून टूथपिकने टोचून पहावे.
अल्टिमेटली कोंबडी शिजून तयार होईल. अतीशय अंगच्या रश्शातली कोंबडी बनेल. झाकण ठेवून थोडी रेस्ट होऊ द्यावी. तोपर्यंत तीर्थप्रसादाचा कार्यक्रम उरकावा. नंतर कोंबडी ताटात काढावी.
परतीचे सर्व दोर कापून टाकावेत.
एका हाताने जस्ट लेग बाजूला केला की आपोआप उघडेल इतकी डेलिकेटली शिजली होती. चित्रात खिमा व अंड्याची स्टफिंग दिसते आहे. :
यापुढचा सॅफ्रॉन राइसवर सजवून वगैरे फोटो काढण्याचा बेत हाणून पाडत ५-६ मिनिटांच्या आत कोंबडी गायब झाल्याने फोटोग्राफीचे मार्क ऑप्शनला टाकण्यात आले आहेत.
१. फोटो मार्क मिळवण्यासाठी नव्हेत तर मी केल्याचा पुरावा म्हणून टाकलेले आहेत.
२. हाच प्रकार अत्यंत तेलकट्ट करता येतो, त्यासाठी कांदा परतायच्या आधी भरपूऽर तेल टाकावे. शिजलेली कोंबडी नंतर तेलात तळून घेण्याचाही प्रघात काही ठिकाणी आहे.
३. खिमा व एग्जच स्टफ केले पाहिजेत असं काही नाही. भरपूर बदाम काजू किसमीस घातलेला भात किंवा आपल्या आवडीच्या भाज्या भरून व्हेज कोंबडीही करता येईल.
अधिक टिपा सुचतील तशा लिहितो, आधी सेव्ह करू देत.
लय भारी रेसिपी! फोटो बाबत
लय भारी रेसिपी! फोटो बाबत कापोचे आणी म्रुणशी सहमत ,तुम्ही दिनेशदाकडुन रेसिपी प्रेझेन्ट करायच ट्रेनिन्ग घ्या पाहु!
ही रेसिपी आल्यापासून माझा जीव
ही रेसिपी आल्यापासून माझा जीव तळमळतोय. कधी मार्गशीर्ष संपतोय म्हणून.
रेसिपी भारी आणि प्रतिसाद
मी काय म्हणतो, फोटोचं काम
मी काय म्हणतो, फोटोचं काम झालं असेल तर ज्याचे हात त्याला शिवून टाकले असतील ना सर्जनसाहेबांनी ?
कळवा प्लीज(च) ! जिवाची नुसती उलघाल होतेय हो ...
अरे काय चावट लोक आहेत राव. ते
अरे काय चावट लोक आहेत राव. ते हात डॉकचेच असावेत. कारण ग्लोव्हज घातलेत, ते पण सर्जीकल. दुसरा असता तर त्याने ते पातळ, पारदर्शी ग्लोव्हज घातले असते. आता सर्जन माणुस सर्जीकलच घालणार ना.
ग्लोव्हज वरून पुन्हा
ग्लोव्हज वरून पुन्हा शंका.
हल्ली टकलावर केस उगवण्यासाठी सिलिकॉनच्या बेसवर केस उगवून तो सगळा जुगाड डोक्यावर बसवून टाकतात (सल्लूमिया). तर सर्जनसाहेबांनी पण स्कीन कलरच्या ग्लोव्हज वर रविवारी कापलेले डोईचे केस गोळा करून आणून चिकटवले असतील आणि ते ग्लोव्हज चढवले असतील तर ?
म्हणजे दीडमा मेल की फिमेल इथपासून पुन्हा सुरूवात करावी लागणार. हे राम !!!
शोधलं की सापडतं म्हणे
>>"हात" कुणाचा स्पर्धेसाठी
>>"हात" कुणाचा स्पर्धेसाठी पुढील प्रवेशिका मागविण्यात येत आहेत <<
अनिल कपुर?
बादवे... या इंजेक्षन ने
बादवे... या इंजेक्षन ने कोंबडी सक्युलंट झाली होती कि ड्रायच होती?
अतीशय मस्त झाली होती. सॉफ्ट &
अतीशय मस्त झाली होती. सॉफ्ट & ज्यूसी.
Pages