मुर्ग मुसल्लम अर्थात, इंजेक्शन दिलेली कोंबडी.

Submitted by दीड मायबोलीकर on 3 January, 2016 - 13:16
murg musallam
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

प्रमाण १ कोंबडीसाठीचे आहे. मी एकाच वेळी २ होल स्किन्ड चिकन, कॉकरेल जातीचे, सुमारे ७-८०० ग्राम प्रत्येकी वापरले होते. चिकन लिव्हर व आतील खाण्यायोग्य भाग खिम्यात मिक्स केलेले होते.
या प्रकारासाठी अख्खी कोंबडी, खाटकास "मुर्ग मुसल्लम बनवण्यासाठी कापून दे" असे सांगून आणावी लागते. नेक व हेड इंटॅक्ट ठेवलेत तरी चालते, नको असल्यास थोडी नेक शिल्लक ठेवून बाकी डिस्कार्ड करावी.

कांदा भारतीय साईजचा आहे.

चमचा = त्यातल्या त्यात मोठा चहाचा चमचा. टेबलस्पून नव्हे.

स्टफिंगसाठी

खिमा :
खिमा : २०० ग्रॅम
कांदा : १ मध्यम बारीक चिरून
आलं लसूण पेस्ट : १ चमचा
तिखट : १ चमचा
गरम मसाला : अर्धा चमचा
कोथिंबीर : १ ते दीड मुठ बारीक चिरून
पुदिना : अर्धी ते १ मूठ, चवीनुसार. उग्र असला तर कमी घ्या.
मीठ : चवीनुसार. ब्राईन करताना चिकनमधे मीठ घातल्याचे लक्षात ठेवावे.
थोडं तेल. (२-३ चमचे)

६ उकडलेली अंडी

ग्रेव्ही :
बदाम : १२-१४
काजू : ८-१०
खसखस : १ चमचा.
शहाजिरे : २ चिमूट
(काजू, बदाम व खसखस भिजवून, बदाम सोलून, वरील ४री वस्तू कोरड्याच भाजून घ्याव्यात. थोडा खमंग वास येऊ लागला, की त्याची थोडे पाणी घालून मिक्सरमधून पेस्ट करून घ्यावी.)

दही : अर्धी-पाऊण वाटी, फेटून. आंबटपणानुसार कमीअधिक करणे.

टमाटा : १ मध्यम, कमी आंबट.

कांदा : बारीक चिरून २ मध्यम
आलं लसूण पेस्ट : २ चमचे
तेल : ३-४ चमचे
धणेपूड : २ चमचे
जिरेपूड :१ चमचा
मिरेपूड : १ चमचा
तिखट : अर्धा चमचा
गरम मसाला : १ चमचा
हळद : पाव चमचा
थोडं तेल

*

चिकन ट्रसिंग : बांधण्यासाठी दोरा.

२० सीसी डिस्पोजेबल सिरिंज.

*
याक्षणी एकादा आयटम विसरलो असलो तर अ‍ॅड करीन, तोपर्यंत माफ करून ठेवावे. Wink

क्रमवार पाककृती: 

तर लोकहो, पाकृमधे विशारदपदवी मिळवायचीच असा पण करून गेल्या इयरेंडला मुर्ग मुसल्लम करण्याचा कट रचला. याची बेसिक पाकृ वाह शेफने यूट्यूबवर दाखवली होतीच. त्याप्रमाणे करता येईल असा कॉन्फिडन्स होता. प्रॉब्लेम फक्त इतकाच होता, की शेफने "मी कोंबडी ब्राईन करून घेतली आहे" असा ओझरता उल्लेख पाकृ व्हिडूमधे केलेला होता.

त्यानुसार, ब्राईनिंगवर रिसर्च सुरू केला. इथे माबोवरही २-३ धाग्यांवर खालीलप्रमाणे कोंबडी सोडून ठेवली.
>>
नमस्कार!

वर्षांतास मटन खिमा व अंडी स्टफ केलेली कोंबडी मुर्ग मुसल्लम स्टाईलने शिजवण्याचे योजिले आहे.(वाह शेफ + मॉड्स) या कोंबडीस ब्राईनिंग करावे किंवा कसे, याबद्दलची मते मागविण्यात येत आहेत.
ड्राय व्हर्सेस वेट ब्राइनिंग. किती वेळ. किती प्रमाण इ. सल्ले स्वीकारार्ह आहेत.
भारतीय प्रकाराने मॅरिनेट करणे व ब्राइनिंग याची तुलना केलीत तर अत्याधिक आनंद होईल.
आपल्या सल्ल्यांमुळे ज्युसी व टेंडर तसेच सक्युलंट (किंवा जे काय होईल ते) होणारे चिकन निजस्थळी पोहोचल्यावर दिलेले आशिर्वाद व शुभेच्छा आपल्यापर्यंत लवकरच (ASAP) पोहचविण्यात येतील.
धन्यवाद!
<<

याच्या उत्तरादाखल माबोवरच्या सुगरणींनी मला भरपूर मदत केली, पण ब्राइनिंगचा अनुभव कुणाला नव्हता. एक्सेप्ट एक, त्यांनी फार खारट होईल म्हणून ब्राईन करू नये असे सांगितले. सर्वच सुगरणींची नावं लिहिली नाहीत म्हणून न रागावता मोठ्या मनाने माफ करावे ही नम्र विनंती.

तर ब्राइन करणे = चिकन, टर्की इ.ना रात्रभर (किमान १२ तास) पाण्याच्या वजनाच्या ६% मीठ घातलेल्या पाण्यात बुडवून फ्रीजात ठेवणे. यामुळे चिकन कोरडे व तोंडात पावडरी न लागता ज्यूसी व सकुलंट लागते. हे प्रकरण करणे कठीण वाटत होते. तेव्हा ड्राय ब्राइनिंगचा विचार केला, पण तेही मनाला पटेना. अन रेस्पी फॉलो करायची तर ब्राईन करायलाच हवे, म्हणून नेटाने रिसर्च करू जाता एक मध्यम मार्ग सापडला.

त्या मार्गानुसार, १ पेलाभर (सुमारे २०० मिली) पिण्याच्या पाण्यात १ चमचा (सुमारे १०-१२ ग्रॅम) समुद्राचे मीठ मिसळून, (याला ६% हायपरटोनिक सलाइन म्हणता येईल) २० सीसीच्या सिरींजने इंजेक्शन दिल्याप्रमाणे सर्व चिकनला टोचले. सुई टोचण्याच्या जागेत १ इंचाचे अंतर ठेवत, प्रत्येक वेळी सुमारे २-३ मिली सलाईन टोचले.

यानंतर चिकनला चिरे देऊन, थोडे दही व आलं-लसूण पेस्ट, मीठ, मिरची चोळून फ्रीजात ठेवून दिले.
संध्याकाळी चिकन करायला घेतले, त्या आधी १ तास चिकन फ्रीजबाहेर काढून ठेवले होते.

mm00.jpg

पहिली स्टेप स्टफिंग.
नॉनस्टिक पॅनमधे थोडं तेल घेऊन त्यात चिमूटभर मिठासोबत कांदा परतावा.
आलं लसूण पेस्ट टाकून कचवट वास जाइपर्यंत परतावे.
कोथिंबीर, पुदिना, तिखट, गरम मसाला व खिमा घालून परतावे.
खिमा जाडसर असावा, नाहीतर गचका होईल. फार जास्त शिजवू नये. कारण नंतर कोंबडीच्या पोटात बसून सुमारे पाऊण तास शिजवला जाणारे. कच्चाही ठेवू नये.
mm01.jpg
खिमा एका प्लेटमधे काढून गार व्हायला ठेवा. त्यात उकडलेली अंडी सोलून ठेवुन द्यावीत.
mm02.jpg

दरम्यान ग्रेव्हीची तयारी करावी.
बदाम सोलून, बदाम, काजू, खसखस व शहाजिरे भाजून, त्याची पेस्ट करून घेणे.
कांदा, टमाटा चिरून ठेवला आहे की नाही ते पहाणे. ग्रेव्हीसाठीची इतर उस्तवार पूर्ण करून ठेवा.

आता कोंबडी स्टफ करायला घ्यावी.
mm03.jpg
आधी एक अंडे भरावे, ज्यामुळे नेककडील ओपनिंग बंद होईल, त्यानंतर थोडा खिमा, पुन्हा एक अंडे पुन्हा खिमा व शेवटी १ अंडे भरून कोंबडी बांधावी.

चिकन ट्रसिंगचे अनेक व्हिडू नेटवर उपलब्ध आहेत, इथे देत नाही. मुद्दा इतकाच की सुती दोरा, ज्याला पूर्वी 'पुड्या बांधायचा दोरा' म्हणत, तो किंवा या कमासाठी मिळतो तो स्पेशल दोरा वापरावा, व चिकन शिजवताना आतला मसाला बाहेर निघणार नाही, असे बांधावे.

mm04.jpgtruss1.jpg

आता जाऽड बुडाच्या एका मोठ्ठ्या कढईत ग्रेव्ही करायला घ्यावी.
स्टेप्स त्याच. कांदा परतणे. त्यात आलं लसून पेस्ट घालून परतणे.
त्यात बदाम-खसखस पेस्ट घालून परतणे.
टमाटा घालून तो गळे पर्यंत परतावे. त्यातच तिखट, गरम मसाला.
शेवटी फेटलेले दही घालून परत शिजवावे. चव पाहून थोडे कमीच मीठ घालावे.

mm05a.jpg

इथवर तयार झालेली ग्रेव्ही पूर्ण व्हेज आहे. व्हेज मेंब्रांसाठी यात पनीरबिनीर घालून बाजूला काढू शकता. Wink

आता ग्रेव्हीत आपण तयार करून ठेवलेल्या कोंबड्या पोहायला सोडाव्या.
mm05.jpg

दर २-३ मिनिटांनी कोंबडी खाली लागू नये म्हणून थोडी वर उचलून पातेल्यात गोल फिरवावी. इतर वेळी झाकण ठेवावे. चमच्याने ग्रेव्ही चिकनवर टाकत रहावी. सुमारे २० मिनिटांनी कोंबडी उलटवावी. व गोल बेबी गोल प्लस आंघोळ सुरू ठेवावी.

अधून मधून टूथपिकने टोचून पहावे.

अल्टिमेटली कोंबडी शिजून तयार होईल. अतीशय अंगच्या रश्शातली कोंबडी बनेल. झाकण ठेवून थोडी रेस्ट होऊ द्यावी. तोपर्यंत तीर्थप्रसादाचा कार्यक्रम उरकावा. नंतर कोंबडी ताटात काढावी.

mm06.jpg

परतीचे सर्व दोर कापून टाकावेत.

एका हाताने जस्ट लेग बाजूला केला की आपोआप उघडेल इतकी डेलिकेटली शिजली होती. चित्रात खिमा व अंड्याची स्टफिंग दिसते आहे. :
mm07.jpg

यापुढचा सॅफ्रॉन राइसवर सजवून वगैरे फोटो काढण्याचा बेत हाणून पाडत ५-६ मिनिटांच्या आत कोंबडी गायब झाल्याने फोटोग्राफीचे मार्क ऑप्शनला टाकण्यात आले आहेत. Sad

वाढणी/प्रमाण: 
१ कोंबडी = खाणार्‍यांनुसार २ ते ४ जण.
अधिक टिपा: 

१. फोटो मार्क मिळवण्यासाठी नव्हेत तर मी केल्याचा पुरावा म्हणून टाकलेले आहेत.

२. हाच प्रकार अत्यंत तेलकट्ट करता येतो, त्यासाठी कांदा परतायच्या आधी भरपूऽर तेल टाकावे. शिजलेली कोंबडी नंतर तेलात तळून घेण्याचाही प्रघात काही ठिकाणी आहे.

३. खिमा व एग्जच स्टफ केले पाहिजेत असं काही नाही. भरपूर बदाम काजू किसमीस घातलेला भात किंवा आपल्या आवडीच्या भाज्या भरून व्हेज कोंबडीही करता येईल.

अधिक टिपा सुचतील तशा लिहितो, आधी सेव्ह करू देत.

माहितीचा स्रोत: 
वाह-शेफ @ वाहरेवाह.कॉम, इंटरनेट, मायबोलीवरील सुगरणींच्या टीपा. प्लस माझ्या काड्या.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुर्ग मुसल्लम गुगल इमेज शोधल्यात तर बटर चिकन पासुन तंदुरी चिकन पर्यन्त सगळे आलेत.

हे अख्खी कोंबडी घेउनच करावी लागते की पिसेस चालतात? (खिमा अंडी न घालता?)

इंटरेस्टींग फोटो आहे .. तू म्हणतेस तसा ब्राइनचाच असावा पण नुसतंच मीठ घातलेल्या पाण्याचा वाटत नाही ..

>>पहिला फोटो कसला आहे? >>
मुरवत ठेवलेले चिकन फ्रीज मधून बाहेर काढून ठेवलय.

अच्छा हे का ते मुर्ग मुस्सलम. बराच खटाटोप दिसतोय. आयती मिळाली तर खाईन. एकंदरित या सुट्टीत रांधा-वाढाचा अतिरेक झालाय की काहीही बनवायची इच्छा होत नाहीये.

फायनल प्रॉडक्टचा फोटो जरा चांगला येऊ शकला असता. योग्य रिसोर्सला ही कृती दाखवेन. कधी चारेक डोकी आणखी खाणारी असतील हु क्नोज प्रयत्नही करता येईल. पण अवांतर मला ही डिश रेस्ताँमध्ये तरी एकदा ट्राय मारायला हवी असं वाटतंय.

पहिला फोटो नवीन सापडलेल्या ग्रहाचा उपग्रहाद्वारे घेतलेला फोटो म्हणून वृत्तपत्रांना पाठवून देता येईल.

पहिला फोटो - <<१ पेलाभर (सुमारे २०० मिली) पिण्याच्या पाण्यात १ चमचा (सुमारे १०-१२ ग्रॅम) समुद्राचे मीठ मिसळून>> ह्याचा असावा.

डॉक्टरान्कडे जबरदस्त पेशन्स असल्याने ते असली पाकृ करु शकले. बाकी आम्ही व्हेजमध्ये विचार करुन दमलो. डॉक्टराना नमस्कार.

तो पहिला फोटो फोडायचा प्रयत्न करतेय, डॉ़ कदाचीत शाब्दिक मार देतील.:दिवा: आतमध्ये मुरवलेली अख्खी मुर्गी दिसतीय, वरुन बहुतेक क्लिन्ग फिल्म गुन्डाळुन आत मुर्गीला आरपार इन्जेक्शने दिलीत. कारण वरुन नुसती भोके भोके दिसतायत.( पाण्याला भोके दिसणार नाहीत) पण भान्ड्या च्या बाजूला अल्युमिनीअम फॉईल गुन्डाळल्यासारखी वाटतेय.

बाकी मेडीकलमधले काही कळत नसल्याने बरेचसे लिखाण डोक्यवरुन पळुन गेले.

सुई टोचण्याच्या जागेत १ इंचाचे अंतर ठेवत, प्रत्येक वेळी सुमारे २-३ मिली सलाईन टोचले.

यानंतर चिकनला चिरे देऊन, थोडे दही व आलं-लसूण पेस्ट, मीठ, मिरची चोळून फ्रीजात ठेवून दिले.
संध्याकाळी चिकन करायला घेतले, त्या आधी १ तास चिकन फ्रीजबाहेर काढून ठेवले होते.>>>>>>> त्यामुळे मला वाटतय की तो फ्रीझ बाहेर काढलेल्या कोम्बडीचा फोटु असावा . आणि ती भोकं नाही आहेत , बाष्प आहे . क्लिन्ग फॉईल च्या आत .

अरे हा, पण असे वाटतेय की आधी इन्जेक्शन दिलेल्या जागी ते बाष्प जमले असावे, त्यामुळे भोके ठळक व उठुन दिसतायत. पण मला तो फोटो आवडला. सस्पेन्स असलेले फोटो नेहेमीच हटके असतात.

रश्मी, त्या फिल्मवरुन इंजेक्शन का देतील ते? कोंबडीला झोपवून डायरेक्ट का नाही देणार? इन्जेक्शन देवून, चिरा देवून, लेप लावून मग ते पातेल्यात ठेवलं असेल आणि मग फिल्म लावली असेल. ते फिल्मवर धरलेलं बाष्पच असेल.

फिल्मवरुन नेम धरुन कोंबडीला २-२ इंचांवर इंजेक्शन देणे म्हणजे खाली पाण्यात पाहून वरच्या टांगलेल्या माश्याचा डोळा फोडणे टाईप गेम वाटतो.

रश्मी ताई ,
सुई टोचण्याच्या जागेत १ इंचाचे अंतर ठेवत, प्रत्येक वेळी सुमारे २-३ मिली सलाईन टोचले.
यानंतर चिकनला चिरे देऊन, थोडे दही व आलं-लसूण पेस्ट, मीठ, मिरची चोळून फ्रीजात ठेवून दिले.>>>>

क्लिन्ग लावलेल्या कोम्बडीला कसा काय मसाला लावणार Happy .

अश्विनी पटतय ग, पण काय माहीत हे प्रकार ( ब्रॉईनिन्ग वगैरे ) आधी पण कधी वाचले नव्हते, त्यामुळे नीट कळले नाही. पण जेव्हा आपण एखादी विकतची फ्रोझन गोष्ट ( पदार्थ ) मायक्रोव्हेव्ह मध्ये गरम करतो तेव्हा वरचे कव्हर काढण्या आधी मी बर्‍याच ठिकाणी कव्हरला छिद्रे बघीतलीत. त्यामुळे मला तसे वाटले, आणी बाष्पाची कल्पना आधी डोक्यात आलीच नाही.:अओ:

नाही ग स्वस्ति, मला वाटले कोम्बडी मॅरीनेट करुन मग भान्ड्याला वरुन शेवटी ( फ्रिझमध्ये ठेवण्या आधी) क्लिन्ग फिल्म लावलीय. नवरा मटणाला तसे ठेवायचा ना मॅरीनेट करुन म्हणून वाटले.

शाकाहारी मूर्ग मुसल्लम!

बाकी रेसिपी वरिल प्रमाणेच.
फक्त -
कोंबडी ऐवजी - बुटका पण जरासा पसरट दूधी भोपळा! दोन्ही टोकाच्या चकत्या कापून टाकून आतून बिया आणि गर पोखरून घ्यावा.
(याची साले सोलण्याने काढल्यावर मीठाच्या पाण्यात बुडवून ठेवल्यास पुरते. इंजेक्शन द्यायची गरज नाही. ऑस्मॉसिस होते यात. कारण दूधीतलं पाणी हायपोटोनिक असतं. खारट होऊ नये म्हणून ३% सलाईनच घ्यावे.

उकडलेल्या अंड्यांऐवजी- उकडलेले बाळबटाटे.

खिम्याऐवजी- कॉलीफ्लॉवर अगदी बारिक चिरून मग एकदा उकळत्या पाण्यात ३-४ मिनिटे ठेवून घ्यावा.

बाकी सगळे मसाले तेच.
माझ्याकडे आत्ता फोटो सापडत नाही आहेत.
पण कुणीतरी हौशी व्यक्तीने करून पहा. भारी लागतं!

लौकी मुसल्लम म्हणतात याला.

रश्मी धन्यवाद!
पण यात ना उगाच खवा बिवा वापरलाय.
त्यामुळे रेस्पितला सौम्य झणझणीतपणा कमी होऊन उगाच गुळमट चव येते.
आमचा तो खास फ्लेवर येत नाही.

मात्र फिजिक्सचा ( की केमिस्ट्रीचा कोण जाणे!)वापर करत त्यात ब्राईनिंगचे कष्ट कमी केलेयत.
साल काढलेल्या दूध्याला नुसते मीठ चोळले आणि ठेवले तरी आपोआप ब्राईनिंग होते हे छान आहे.

हो, खवा मुळात गोडच लागतो, त्यामुळे मला कुर्मा पण आवडत नाही. त्या बाबाजीने बेदाणे पण घातलेत.

आमच्या चविष्ट कोंबडीचा पाणचट्ट भोपळा बनवणार्‍या शाकाहार्‍यांचा झणझणीत णिषेढ!

वाकड भुजबळ चौकाकडून हिंजवडी चौकाकडे जाताना डावीकडे मधुबन नावाचा दारूड्यांचा अड्डा आहे (सौंदर्य च्या विरुद्ध फुटपाथ कडे) तिथे मस्त मुर्ग मुसल्लम मिळतं. चिकन, खिमा आणि उकडलेल्या अंड्यासकट सगळं साग्रसंगीत. बरोबर एक प्लेट भात पण कोंप्लिमेंटरी देतात. कधी मित्रांबरोबर बैठकीला गेलो तर ४ घास जास्तच खातो मी.

पाकृ पोस्ट करतांना घ्यावयाची काळजी : चाकोंबाम

डॉक्टरांनी मुर्गमुसल्लमची रेसिपी टाकून वाहव्वा मिळविली असली तरी मुख्य गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्याचे आमच्या ध्यानात आलेले आहे. ही रेसिपी मित्रमंडळींपुरती मर्यादीत नसून जगभरातल्या वाचकांपर्यंत ती पोहोचणार आहे हे ध्यानात घ्यायला हवे होते. स्टीलची ताटं, एल शेप ओटा या मिडलक्लास स्टेटस सिम्बॉल्स मुळे पाकृ चे प्रेझेन्टेशन व्यवस्थित झाले नाही असे आमचे मत झालेले आहे.

आपण जर टीव्हीवरचे कुकरी शोज बघत असाल तर आपल्या ध्यानात येईल की टीव्हीवर प्रशांत दामले ज्यांच्या ज्यांच्या घरी जातो (हा बोलतो कमी , खातो जास्त) त्यांच्याकडे लोखंडी किंवा अ‍ॅल्युमिनियम अ‍ॅलॉयच्य कढया नसतात. हल्ली बाजारात नक्षीकाम असलेली रंगीबेरंगी भांडी मिळतात. अगदी शिजवण्यासाठी कढयाही मिळतात. त्यावर ठेवण्यासाठी काचेचे सुंदर झाकण असते. तर पाकृ अपलोड करण्यासाठी सर्वप्रथम अशी भांडी विकत आणावीत. सुरूवातीला त्याची प्रॅक्टीस करून घ्यावी. आम्ही असेच राहतो हे दिसून आलं पाहीजे,

सर्व्ह करण्यासाठी स्टीलची ताटे वापरून फार मोठा फाऊल झालेला आहे. त्यासाठी अलीएक्सप्रेसवरून बोन चायना क्रोकरी मागवावी.
images[1].jpg

जिरे, हिंग, मिरी, मीठ, मसाला यासाठी काचेच्या उभ्या छोट्या छोट्या बरण्या मिळतात. त्यांची झाकणे अतिशय सुंदर असतात. ते लोकल मार्केटमधून आणले तरी चालेल.

आता फोटोमधे काय काय येईल याचा अंदाज घ्यावा. तर किचन लहान असेल, तर हा एल शेप ओटा सजवण्यासाठी अनेक डिजाईन्स उपलब्ध आहे. आधी आपल्या किचनचा कायापालट करून घ्यावा. फोटोसाठी हे किचन चालेल.
MRZOYQ6525_pdp-1444732131_ixia-l-shaped-modular-kitchen[1].jpg

पण जर युट्यूब वर व्हिडीओ टाकायचा असेल अगर प्रशांत दामले किंवा संजीव कपूर सारखा शेफ घरी येणार असेल तर मात्र सेंट्रल ओटा मस्ट. त्यासाठी घराचे इंटीरीयर बदलावे. हॉलची काही जागा गेली तरी चालेल.

images.jpg

डायनिंग टेबलची जागा वापरली तरी चालेल. डायनिंग टेबल बैठकीच्या जागेत स्थलांतरीत करता येईल. जर सेंट्रल ओटा असेल तर फोर बर्नर वाल्या दोन शेगड्या बसतील एव्हढा मोठा असावा . मागे अडीच तीन लाख घालवून बनवलेलं किचन व्हिडीओत दिसेल असा कॅमे-याचा अँगल असावा.

ही बेसिक तयारी झाल्यानंतर मग पाकृ कडे नीट लक्ष द्यावे. प्रदा किंवा संक नाही आले तर मिलिंद गुणाजीला बोलवावे . तो ही उपलब्ध झाला नाही तर राणी गुणाजी किंवा मग कुठलाही दाढीवाला चालेल. अशी तयारी झाली की तुमची पाकृ उठावदार झालीच म्हणून समजा.

एक ऑप्शनल सल्ला : हातावरचे केस यासाठी राकुंचा धागा वाचून काढावा. गरज पडेल न पडेल...

मस्तं टिपा कपोचे.
पण डॉक्टर साहेब मनावर घेतील असं वाटत नाही.
'बेचव मॉड्यूलर कीचन आणि चविष्ट साधं स्वैंपाकघर' असं 'लुळीपांगळी श्रीमंती, धट्टीकट्टी गरिबी' च्या चालीवर कित्येकांना वाटतं!
Wink

Pages