राईस क्रिस्पी चिवडा

Submitted by परदेसाई on 23 December, 2015 - 09:54
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. १ डबा राईस क्रिस्पीचा (ग्रोसरी स्टोरमधे मिळतो).
२. १ १/२ ते २ टेबलस्पून तेल
३. काजू /शेंगदाणे
४. चिमुटभर हिंग
५. १ १/२ चमचा मोहरी
६. २ हिरव्या मिरच्या उभ्या चिरून
७. ८ / १० कढिपत्याची पाने
८. ३ चमचे तीळ
९. २ चमचे तिखटपूड. (लाल मिरची)
१०. १ चमचा हळद.
११. २ चमचे साखर
१२. चवीसाठी मीठ
१३. ३ चमचे जीरे पावडर.
१४. ३ चमचे धणे पावडर.

क्रमवार पाककृती: 

१. एका कढईत तेल गरम करा.
२. त्यात काजू / शेंगदाणे तळून घ्या.
३. त्याच तेलात हिंग, मोहरीची फोडणी करा.
४. त्यात लगेच हिरव्या मिरच्या व कढीपत्ता टाका.
५. गॅस बंद करून तेलात तीळ टाका (तीळ पटकन जळतात , तसे होऊ नये).
६. एका वेगळ्या भांड्यात फोडणी, राईस क्रिस्पी, काजू/दाणे एकत्र करा. फार ढवळू नका.
७. उरलेले मसाले, मीठ , साखर घाला व हलकेच ढवळा..

हा चिवडा मी दर दिवाळीला हाफिसात डब्बे भरून नेतो आणि संध्याकाळ पर्यंत डब्बे रिकामे असतात.

वाढणी/प्रमाण: 
भरपूर जणांसाठी...
अधिक टिपा: 

चवी प्रमाणे अजून तिखट्पूड टाकता येईल...

माहितीचा स्रोत: 
बायको...
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राईस क्रिस्पी म्हणजे इथे मिळतात ते भाजके पोहे वाटतायत. >>> राईस क्रिस्पिज सिरियल आहे ( दुधात घालून खायचे ) त्यामुळे गोडसर असते चवीला. भाजक्या पोह्यांचा भाजका स्वाद तर अजिबातच नसतो ह्याला.

अमेरिकेत आल्या आल्या एका नातेवाईकांनी हा चिवडा शिकवला. त्यानंतर पोह्यांचा कधी केलाच नाही. कायम हाच Happy मस्त लागतो !

ह्याचा किंवा भाजक्या पोह्यांचा चिवडा करताना सगळ्या पोह्यांना मीठ साखर नीट लागण्यासाठी आणि तळाच्या चिवड्यात नुसता खारट मसाला न उरण्यासाठी काही टिप आहे का कुणाकडे ?

अगो + १...
चुरमुरे आणि पोहे या मधला एक प्रकार आहे. मृ ने टाकलेल्या फोटोवरून लक्षात येईलच..
मला स्वत:ला पोह्यांच्या चिवडा आवडत नाही (तेलकट, चिवट वगैरे लागतो).. आणि त्यात शिल्लक राहिलेला मीठ असलेला मसाला तर अजिबात नाही (तो हाताला चिकटतो). तेव्हा मी फक्त हाच चिवडा खातो आवडीने..

अगो, डब्याच्या शेवटी मीठ-मसाला नको असेल तर किस्पी चिवडा त्या हॉटेलमध्ये असतात तशा सिरीयल कंटेनर मध्ये ठेवायचे. की सगळा मसाला पहिल्याच घासाला Proud

वीकेंडला केला हा चिवडा. मस्त कुरकुरीत आणि अक्षरशः १० मिनिटात तयार. तुमच्या रेसिपीत हळद न्हवती आणि 'पदार्थ पिवळा व्हायला हळद हवी' हे क्रिस्पीज घातल्यावर लक्षात आलं. त्यामुळे चिवड्याचा चिवड्याचा रंग नाही आला, पण चव एकदम सही.

राईस क्रिस्पी टाइप ज्वारी मसाला आणि बाजरी मसाला दुकानात मिळतो. पुण्याला 'अग्रज'मध्ये मिळतो. खुपच छान चव आहे. पाकिटावर Roasted अस लिहिल आहे. घरी करता येईल का? plz कोणी सांगू शकेल का?
आवश्यक वाटल्यास कृपया योग्य ठिकाणी प्रश्न हलवावा.

Nice recipe..I want to try this..what size rice crispy box do you use..12 oz..18 oz?

Pages