पायपर हॅरॉन आणि तिचा थिसीस
गणित म्हटल्यावर बर्याच जणांची प्रतिक्रीया भितीयुक्त असते. 'गणितामध्ये संशोधन' म्हटल्यावर सामान्य माणसाला अगदी आश्चर्य वाटते. 'त्यात संशोधन करता म्हणजे आता कुठली आकडेमोड करता बुवा तुम्ही?' असे काहीसे प्रश्न मला काहीशे वेळा विचारले गेले आहेत. समाजाला असे प्रश्न पडण्यात गैर काहीच नाही. गणित 'योग्य पद्धतीने' करणे म्हणजे काय ते बहुतांशी कुणालाच माहीत नाही. परंतु गणिताबद्दल अशीच काहीशी भावना प्रिन्सटनमधल्या एका पीएचडी विद्यार्थिनीची सुद्धा आहे, हे वाचल्यावर उत्सुकता जास्त चाळवली जाते. गेल्या काही दिवसांत तिच्या थिसीसने गणिताच्या जगात थोडीशी खळबळ माजवली आहे. पायपर हॅरॉन हे तिचे नाव. तिच्या थिसीसची मराठी वाचकांना ओळख करून देण्याचा हा एक लघुप्रपंच.
पायपर हॅरॉन गणितातली एक स्त्री आहे. आधीच गणितामध्ये स्त्रिया अल्पसंख्यांक आहेत. त्यात तिचे वैशिष्ट्य म्हणजे ती अमेरीकेत आफ्रिकन-अमेरीकन गणितज्ञ आहे. ह्यांची संख्या अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी आहे. अशा दोन अत्यल्पसंख्यांकांच्या गटात ती असल्याने तिचा दृष्टीकोन फारच 'युनिक' आहे. आणि हाच युनिक दृष्टीकोन तिच्या थिसीसला वैचारिक बैठक पुरवतो. तिच्या मते गणितातल्या संशोधनात पुरूषी (गोर्या?) मानसिकतेतून आलेल्या दडपशाहीला प्रचंड वाव आहे आणि ह्यामुळे काही विशिष्ट क्लासेसमधले लोक गणितात काँट्रीब्युट करू शकत नाहीत. तिने तिचा थिसीस अशा लोकांसाठी आणि ज्या जनसामान्यांना गणित शिकण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी साध्यासोप्या भाषेत लिहीलेला आहे. पुरूषकेंद्रीत (Phallogocentral) मानसिकतेला कंटाळून तिने तो लिहीला आहे असे म्हणता येईल. तिचा थिसीस
http://www.theliberatedmathematician.com/math/
येथे पाहायला मिळेल. तिच्या थिसीसच्या प्रोलॉगमधून तिची विचारांची दिशा स्पष्ट होईल -
"Respected research math is dominated by men of a certain attitude. Even allowing for individual variation, there is still a tendency towards an oppressive atmosphere, which is carefully maintained and even championed by those who find it conducive to success. As any good grad student would do, I tried to fit in, mathematically. I absorbed the atmosphere and took attitudes to heart. I was miserable, and on the verge of failure. The problem was not individuals, but a system of self-preservation that, from the outside, feels like a long string of betrayals, some big, some small, perpetrated by your only support system. When I physically removed myself from the situation, I did not know where I was or what to do. First thought: FREEDOM!!!! Second thought: but what about the others like me, who don't do math the "right way" but could still greatly contribute to the community? I combined those two thoughts and started from zero on my thesis. What resulted was a thesis written for those who do not feel that they are encouraged to be themselves. People who, for instance, try to read a math paper and think, "Oh my goodness what on earth does any of this mean why can't they just say what they mean????" rather than, "Ah, what lovely results!" (I can't even pretend to know how "normal" mathematicians feel when they read math, but I know it's not how I feel.) My thesis is, in many ways, not very serious, sometimes sarcastic, brutally honest, and very me. It is my art. It is myself. It is also as mathematically complete as I could honestly make."
अनेक उपमांनी आणि विनोदी पंचेसनी हा थिसीस भरलेला आहे. अगदी सुरवातीला गणिती अॅब्स्ट्रॅक्शनविषयी मला आवडलेला एक पंच -
I like to imagine abstraction (abstractly ha ha ha) as pulling the strings on a marionette. The marionette, being "real life," is easily accessible. Everyone understands the marionette whether it's walking or dancing or fighting. We can see it and it makes sense. But watch instead the hands of the puppeteers. Can you look at the hand movements of the puppeteers and know what the marionette is doing?"
तिने हा थिसीस 'रीअल लाईफ' गोष्टींनी लोकांना गणित समजता यावे ह्या उद्देशाने लिहीलेला आहे हे सांगणे नलगे.
माझे मत -
गणितामध्ये संस्थात्मक पातळीवर पुरूषसत्ताक पद्धती अगदी आताआतापर्यंत होती, ह्यात काही प्रश्नच नाही. ती बदलण्यासाठी प्रयत्न चालू झाले आहेत. मला स्वतःला तिच्यासारखा दृष्टीकोन येणे अशक्यच आहे, त्यामुळे तिच्या मतांवर मी सध्याच्या अल्प जागेत आणि वेळेत तरी काही टिप्पणी करणे उचित ठरणार नाही. किंबहुना इट इज गुड टू हॅव अ व्हॉईस ऑफ डिसेंट. तिचा मार्जिनल पॉप्युलेशनला साईडलाईन करण्याबाबतचा मुद्दा काही अंशी व्हॅलिड आहे, हे खरे.
एक मात्र मला वाटते, की हा थिसीस वाचण्याला सोपा आणि रसपूर्ण आहे हे खरे असले, तरी अजूनही तो सामान्य माणसाच्या कक्षेत पूर्णपणे आलेला नाही. In other words, she has written her thesis in a way that a Princeton graduate student would *think* that laypeople would understand, but in reality they may not understand. हा एकच थोडासा आक्षेप घेतला, तरी त्यातही तिची चूक नाही. शालेय किंवा महाविद्यालयीन गणितातील त्रुटी त्याला जास्त कारणीभूत आहेत असे मला वाटते. येथील लोकांनी थिसीस वाचण्याचा प्रयत्न करून ह्या मताबद्दल लिहीले, तर आनंदच आहे.
पायपरचा हा प्रयत्न अगदीच अनोखा आणि सुंदर आहे. एक लग्न झालेली, मुले असलेली स्त्री गणितज्ञ म्हणून तिची मते अत्यंत वेगळी आहेत. (ती स्वतःच्या मुलांना टंग-इन-चीक थँक्स न म्हणता पुढे जाते.) तिने हा प्रयत्न केला ह्याबद्दल अनेक लोकांनी तिचे आभार मानले आहेत. त्यात माझीही एक भर.
तळटीप - http://mathbabe.org/2015/12/11/piper-harron-discusses-her-artistic-and-w... येथे तिच्या थिसीसची गोष्ट तिच्या स्वतःच्या शब्दांत वाचावयास मिळेल.
आतिवास, सांगड घालणे म्हणजे
आतिवास, सांगड घालणे म्हणजे काय ह्याची बरीच इंटरप्रीटेशन्स असतील, पण माझ्या इंटरप्रीटेशनमध्ये नाही.
पण थिसीस हा एखाद्या
पण थिसीस हा एखाद्या पुस्तकासारखा असतो. गणितातल्याच पण त्या क्षेत्रात नसलेल्या माणसाला पुरेसा वेळ दिल्यावर तो थिसीस बराचसा समजायला हवा अशी कदाचित अपेक्षा करता येईल. >> अगदी मला समजणार्या विषयातले थिसीस सुद्धा वाचताना कधी कधी पार डोक्यावरून जात आहेत असे वाटले होते म्हणून हे थोडे धाडसी वाटले रे. अर्थात तू म्हणतोस तर असेलही.
पायपरचा वाचायला हवा. लिंकबद्दल धन्यवाद रे!
असामी, वेळ किती आहे त्यावरही
असामी, वेळ किती आहे त्यावरही ते अवलंबून आहे. आजच्या काळात ही अपेक्षादेखील पूर्ण होणे कठीण आहे हेही खरेच. परंतु थिसीस तुमच्या विषयातली एक्झिस्टिंग बॅकग्राउंड आणि तुमची त्यात केलेली प्रगती सविस्तर दाखवणारा असावा अशी सर्वसाधारण अपेक्षा तर पारंपरिकरीत्या असते असे वाटते. तळटीपेतले तिचे ब्लॉगपोस्ट पण जरूर वाचा.
आपल्याला समजू शकेल कदाचित,
आपल्याला समजू शकेल कदाचित, अशी आशा वाटली. थँक्स फॉर शेअरिंग.
वाचायचा प्रयत्न करणार.
मस्त! लेखाबद्दल पडलेल्या अनेक
मस्त! लेखाबद्दल पडलेल्या अनेक प्रश्नांची खाली झालेल्या चर्चेतून उत्तरे मिळाली. पायपरने अशा प्रकारे थिसीस लिहून जोखीमच घेतली, कौतुक आहे. इथे ही ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
धन्यवाद!
धन्यवाद!
Pages