व्हायरस ...

Submitted by कविता क्षीरसागर on 20 December, 2015 - 09:54

लग्न नावाचा व्हायरस ...

सगळाच गुंता झालाय
नावाचा , भावनांचा
नात्यांचा ....
अगदी आयुष्याचाच ....

'लग्न' नावाच्या
वरून मोहक वाटणाऱ्या व्हायरसने
पोखरून टाकलेय
या जीवनाच्या पीसीला ....

नाहकच तयार होऊ लागल्यात
संशयाच्या फाईल्स
शोषून घेतायत त्या
हळुहळू जीवनरस ...

खाऊन टाकतायत झपाझप
आपल्यातले प्रेमाचे मेगाबाईट्स
आणि त्या ठिकाणी
आपोआपच तयार होतायत
विसंवादाची क्लीष्ट जाळी .....

कितीही वेळा जरी वापरला
सामंजस्याचा , सोशिकतेचा अँटीव्हायरस
तरी त्यालाही आता तो
दाद देईनासा झालाय .....

गुदमरतोय आतल्या आत
मनातला सगळाच डेटा ....

आता नाईलाजाने
पीसी Format करण्याशिवाय
गत्यंतर च उरले नाहीये ...

कविता क्षीरसागर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचली..
लग्न इतका कोंडमारा करतंय का खरंच तुमचा? Sad
आणि पीसी फॉरमॅट म्हणजे काय? लग्न तोडणे कि आयुष्य संपवणे?

शादी का लड्डू..

प्रतिसादाबद्दल धन्यवाद पियु ...

ही कविता वैयक्तिक अजिबातच नाहिये ....

अनेकदा आपल्या आजुबाजुला घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब संवेदनाशील कवींच्या कवितेत आढळते ....

माझ्या मते format करणे म्हणजे आधीचे सारे पुसून नव्याने सुरुवात करणे ... हो ना ...

ह्म्म.. छान आहे कविता.. (म्हणजे तुम्ही नाही Happy )
खरंच एखादीच्या आयुष्यात असा व्हायरस शिरुन सगळं पोखरू शकतो..
रुपक छान आहे. अश्याच लिहित रहा.