भान …

Submitted by कविता क्षीरसागर on 10 December, 2015 - 13:42

गझल हा प्रकार मला नवा आहे ,प्रयत्न करतेय , येथील दिग्गजांनी कृपया सांभाळून घ्यावे

भान …

बाहेरुनी पहाता सारेच छान आहे
काटे न दाखवावे रानास भान आहे

वास्तूत कोंडलेले दु:खी अनाथ टाहो
मोकाट वासनांचे शापीत दान आहे

ना ऐकती कुणाचे बडवेच माजलेले
त्यांच्याविना विठूचे अडते दुकान आहे

नाचून पाय थकले, गाऊन ओठ सुकले
आयुष्य का तरीही बेसूर तान आहे

अर्ध्यात हात सुटला कळ काळजात रुतली
दाबून दु:ख सारे जगण्यात शान आहे

कविता क्षीरसागर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>वास्तूत कोंडलेले दु:खी अनाथ टाहो
मोकाट वासनांचे शापीत दान आहे

ना ऐकती कुणाचे बडवेच माजलेले
त्यांच्याविना विठूचे अडते दुकान आहे

नाचून पाय थकले, गाऊन ओठ सुकले
आयुष्य का तरीही बेसूर तान आहे <<<

अतिशय सुरेख शेर! शुभेच्छा!

सर्वाचे मनापासून आभार

तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रियांमुळे थोडा हुरूप आला .

आता अजून चांगले लिहिण्याचा नक्की प्रयत्न करेन .

सुरेख गजल!
गझलेचा पहिला प्रयत्न म्हणताय तर विशेष अभिनंदन!
वाचताना जराही कुठे असं जाणवलंच नाही खरंतर!

आत्ताशी कुठे गझल लिहायचा प्रयत्न करतेय …
तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रियेतूनच कळेल... माझी दिशा बरोबर आहे की नाही ते ….
खुप धन्यवाद सत्यजित .....

सुरेख