आपल्या अवतीभवती घडणाऱ्या अनेक घटना कधी कधी आपल्या "इंट्यूशन" च्या किंवा "गट फ़ीलींगच्या" अगदी विरोधी घडतात किंवा त्या घडल्यावर त्याचे बरेच अनपेक्षित परिणाम (अनइंटेण्डेड कोन्सिक्वेन्सेस) दिसून येतात. अशा काही रोचक काउंटर इंट्यूटीव्ह गोष्टींची उदाहरणे इथे देत आहे.
१. पाळणाघरात लेट फी लावावी का ?
हे उदाहरण अनेकांनी "फ़्रीकॉनॉमिक्स" या पुस्तकात वाचले असेल. इस्त्राईल मधील काही पाळणाघरांची ही गोष्ट. या पाळणाघरांची वेळ सकाळी ८ ते संध्याकाळी ५ अशी होती. पण अनेक पालक त्यांच्या मुलांना घरी घेऊन जाण्यासाठी उशीराने येत असत. काहींसाठी तर ६ वगैरे अगदी नेहेमीचीच वेळ असे. पाळणाघरातील कर्मचारी या बेशिस्तीने जाम वैतागले होते. त्यामुळे त्यांनी ठरवले की उशीराने यॆणार्या पालकांना दंड आकारायचा. त्याप्रमाणे त्यांनी दर अर्धा तास उशिरासाठी ५ डॉलर दंड आकारायला सुरुवात केली. त्यांना वाटले दंड भरायला लागू नये म्हणून सर्व पालक वेळेवर येऊ लागतील. पण झाले उलटेच. आधीपेक्षा जास्त पालक उशीरा येऊ लागले आणि राजीखुशी दंड भरू लागले !
तर असे का झाले असावे ? याचं उत्तर इंसेण्टिव्ह थियरी मध्ये दडलेलं आहे. दंड करण्याआधी उशीरा येणाऱ्या पालकांवर एक दडपण असे - की पाळणाघारतील कर्मचारी त्यांचा चांगुलपणा म्हणून आपल्या पोरांना उशीर झाला तरी सांभाळतात. या "मोरल इंसेण्टिव्ह" मुळे थोडेच पालक उशीरा येत असत. पण पाळणाघराने मात्र दंड लावून या " मॉरल इंसेण्टिव्ह" च्या जागी आर्थिक किंवा "इकॉनॉमिक इंसेण्टिव्ह" आणला. आपण पैसे मोजतोय म्हणजे उशीराने जाणं हा आपला हक्क आहे अशी पालकांची समजूत झाली आणि आधी जे उशीराने येत नव्हते ते देखील उशिराने येऊ लागले. या अनपेक्षित परिणामामुळे, पाळणाघराने हा दंड बंद केला - म्हणजे पूर्वीचा "मॉरल इंसेण्टिव्ह" चालेल असे त्यांना वाटले. पण त्याने काही फ़रक पडला नाही - कारण उशीराने आलेले चालते हा एव्हाना एक "सोशल नॉर्म" बनून गेला होता.
२. साप पकडणाऱ्याला इनाम
केरळमधील एका खेड्यात काही कारणाने सापांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली. त्यामुळे सर्पदंशाने जखमी किंवा मृत्यू पावणाऱ्या लोकांची संख्या देखील बरीच वाढली. आता या सापांची संख्या कमी कशी करायची यावर काही स्थानिक नेत्यांनी एका शक्कल लढविली. त्यांनी साप पकडून आणणाऱ्याला दोन रुपये बक्षीस द्यायचे ठरविले. आणि काय आश्चर्य ? ताबडतोब लोकांनी साप पकडून आणण्याचा धडाकाच लावला. हा हा म्हणता शेकडो साप ग्रामपंचायतीत आणून लोकांनी मारले आणि दर सापामागे दोन-दोन रुपये वसूल केले. आता एव्हढे पैसे वाटल्यावर ग्रामपंचायतीकडील पैसे संपले. स्थानिक नेत्यांनाही वाटले लोकांनी एव्हढे साप पकडले त्यामुळे ही समस्या आता दूर झाली असेल. त्यामुळे त्यांनी बक्षीस देणे बंद केले. आणि अहो आश्चर्य ! लगेचच सापांची संख्या आधी होती त्यापेक्षा वाढली !
तर असे का झाले असावे ? याचं उत्तरही इंसेण्टिव्ह थियरीतच दडलेलं आहे. दोन रुपये मिळतायत म्हणून अनेक लोकांनी आपापल्या घरात साप पाळण्यास आणि त्यांची पैदास करण्यास सुरुवात केली ! पण बक्षीस देणे बंद केल्यावर मात्र ही सापांची पैदास अर्थात परवडेनाशी झाली. मग या लोकांनी हे साप दिले सोडुन आणि सापांची संख्या आधीपेक्षाही वाढली. थोडक्यात कोणत्याही धोरणाची अंमलबजावणी करताना त्याचे मॉनिटरींग आणि ईव्हॅल्युएशन आवश्यक ठरते.
३. स्मार्ट एसी लगाओ… बिजली बचाओ
काही वर्षांपूर्वी कॅलिफोर्निया मधील वीज कंपन्यांनी ऊर्जा बचतीसाठी एक नवीन प्रोग्रॅम सुरु केला. यात तुमच्या घरातील विजेची उपकरणे तुम्ही इंटरनेटवरून ऑन / ऑफ करू शकता (स्मार्ट अप्लायन्स) अशी सोय काही ग्राहकांना करून देण्यात आली. ह्याचा उद्देश असा की ग्राहक वीजेच्या वापरा बाबत अधिक जागरूक होतील, इंटरनेटवरून घरातील कोणती उपकरणे चालू आहेत याचा अंदाज घेतील आणि घराबाहेर असताना जर काही उपकरणे चालू राहिली असतील तर ती बंद करू शकतील. या सर्वांमुळे वीज वाचेल आणि कंपन्याना महागडी वीज बाहेरील राज्यांकडून विकत घ्यावी लागणार नाही अशी अपेक्षा होती. जुलै - ऑगस्टच्या कडक उन्हाळ्यात हा प्रोग्रॅम सुरु केला. आणि अहो आश्चर्य! पहिल्या महिन्यातच वीजेचा वापर कमी होण्याऐवजी वाढलाच !
तर असे का झाले असावे? कडक उन्हाळ्यामुळे घर गार करून ठेवण्यसाठी, लोक जेव्हा ऑफिस मधून निघत तेव्हाच इंटरनेटवरून एसी ऑन करून ठेवत असत. घरी येण्यासाठी लागणाऱ्या पाऊण ते एक तासात घर छान गार होत असे ! एरवी याच लोकांनी एसी घरी परत आल्यावर लावला असता पण या प्रोग्रॅम मुळे एसीचा वापर सुमारे एक तासाने वाढला आणि पर्यायाने वीजवापरही वाढलाच !
४. विमानांची दुरुस्ती कुठे करायची ?
हे उदाहरण दुसऱ्या महायुद्धातील आहे आणि बऱ्याच जणांना माहिती असेल. जर्मनीवर बॉम्बहल्ले करून जी ब्रिटीश विमाने परत येत असत त्यांना अनेक ठिकाणी विमानभेदी बंदुकांनी मारलेल्या गोळ्या लागलेल्या असत. तर या विमानांची दुरुस्ती नेमकी कशी करायची आणि कुठे अजून स्टील वापरून ती रीइन्फ़ोर्स करायची हा प्रश्न रॉयल एअर फोर्सला पडला होता. त्यासाठी त्यांनी प्रसिद्ध संख्याशास्त्रज्ञ एब्राहम वाल्डला पाचारण केले. वाल्डसाहेबांनी या सर्व परतून आलेल्या विमानांचा अभ्यास केला आणि आपले उपाय सांगितले. त्यांनी सांगितले की ज्या भागाला गोळ्या लागल्या आहेत ते रीइन्फ़ोर्स कराच पण ज्या भागांना लागलेल्या नाहीत ते अधिक क्षमतेने रीइन्फ़ोर्स करा !
असे का ? तर ही गोळ्या लागलेली विमाने सुखरूप परतली होती. म्हणजे ज्या भागांवर गोळ्या लागल्या होत्या ते भाग अजूनही उडण्यायोग्य होते. म्हणजे जी विमाने कोसळली असतील ती कदाचित उरलेल्या भागांवर गोळ्या लागल्यामुळेच कोसळलेली असण्याची शक्यता आहे. म्हणूनच ते भाग (परतलेल्या विमानांचे गोळ्या न लागलेले भाग) अधिक रीइन्फ़ोर्स करा !
५. ट्रॅफ़िक जाम होत आहे ? नवीन रस्ते बांधा !
अशी कल्पना करा की आपण आपल्या घरातून ऑफिसला आपल्या खाजगी वाहनातून चाललो आहोत. खालच्या आकृतीत दाखविल्याप्रमाणे घर म्हणजे बिंदू "START" आणि ऑफिस म्हणजे बिंदू "END". म्हणजेच ऑफिसला जायला आपल्याला दोन रस्ते आहेत - एक जातो "A" मार्गे आणि दुसरा जातो "B" मार्गे. पण ह्या दोन्ही रस्त्यांवर एकेक चिंचोळा भाग आहे (START ते A, अणि B ते END हे चिंचोळे भाग). हे चिंचोळे रस्ते पार करायला लागणारा वेळ हा ट्रॅफिक वर अवलंबून आहे; रस्त्यावर असणारी वाहने जर T इतकी असतील तर T भागिले १०० इतकी मिनिटे लागतात. दुसरा रस्ता पार करायला ४५ मिनिटे लागतात (कितीही ट्रॅफिक असला तरी). आता कल्पना करा आपल्यासारखेच इतर ४००० जण एकाच वेळी निघतात - तर घरापासून ऑफिसला पोचायला किती वेळ लागेल ? दोन्ही रस्त्यांवरून सारखाच वेळ लागत असल्याने निम्मे (२०००) जातील A मार्गे आणि निम्मे (उरलेले २०००) B मार्गे. म्हणजे ६५ मिनिटे लागतील. (४५ + २०००/१०० = ६५). आता हा वेळ वाचविण्यासाठी महानगरपालीकेने A ते B जोडणारा एका रस्ता बांधला. या रस्त्यावरून A ते B हे अंतर जायला काहीही वेळा लागत नाही (शून्य मिनिटे). आता ह्या नवीन रस्त्यामुळे ऑफिसला जायचा वेळ वाचला का ? नाही. उलट, वाढला ! ज्या अंतरासाठी ६५ मिनिटे लागायची त्यालाच आता ८० मिनिटे लागू लागली !
स्त्रोत: https://en.wikipedia.org/wiki/Braess%27_paradox#/media/File:Braess_parad...
असे का झाले ? तर घरून निघणारा माणूस विचार करणार की सर्वच्या सर्व ४००० लोक जरी START पासून A ला चिंचोळ्या रस्त्यावरून गेले, तरी वेळ लागणार जास्तीत जास्त ४० मिनिटे (४०००/१००). त्यामुळे ४५ मिनिटांच्या रस्त्यावरून कोणीही जाणार नाही. तसेच, A पाशी पोहोचल्यावर सर्वच जण नवीन रस्त्यावरून B मार्गे जाणार कारण त्या रस्त्यावरूनही जास्तीत जास्त ४० मिनिटे लागणार. म्हणजेच एकूण वेळ = ८० मिनिटे ! या सगळ्यात जर एखादा ४५ मिनिटांच्या रस्त्यावरून जरी गेला तरी त्याला वेळ लागणार ८५ मिनीटे; कारण उरलेले ३९९९ लोक चिंचोळ्या रस्त्यावरूनच जाणार ! ह्याला ब्रेस पॅराडॉक्स (Braess' Paradox) म्हणतात. कोरिया, न्युयॉर्क अशा अनेक ठिकाणी नवीन रस्त्यामुळे झालेल्या ट्रॅफिक जामची उदाहरणे आहेत.
६. मायबोलीवर निघणाऱ्या धाग्यांना काही निर्बंध असावेत का ? असल्यास काय ?
या प्रश्नावर आमचा विचार चालू होता पण फारच काउंटर इंट्यूटिव्ह उत्तरे येऊ लागल्याने प्रश्नच बाद करण्यात आला आहे
तुमच्या क्षेत्रामधील अशी इंटेरेस्टिंग काउंटर इंट्यूटिव्ह गोष्टींची उदाहरणे काय आहेत ?
मॅगी वर बंदी आल्यावर सगळे
मॅगी वर बंदी आल्यावर सगळे नूडल अंडरडॉग्ज पुढे सरसावले आता मॅगी नाही तर आपणच राज्य करु म्हणून. पण विरक्त मॅगी फॅनांनी 'तू नही तो कोई नही' म्हणून नुडल्स खाणेच सोडले.
परत मॅगी बाजारात आल्यावर बदनामीने खप कमी होण्याऐवजी बाजारात आलेली मॅगी सर्वांनी ४-४, ८-८ पाकिटे घेतली. आजही रिलायन्स किंवा स्टार बाजारात गेल्यावर रिलायन्स आणि स्टार चे अगदी मॅगीसारखे रंग आणि पॅक असलेले(पाकिटावर 'मसाला' लिहीण्याची जागा पण तीच) नुडल्स ढिगाने नुसतेच पडून असतात. त्यातल्या त्यात लोक टॉप रामन ला आपलं करत होते मधल्या काळात, या विदेशी कंपन्या काय जादू फॉर्म्युला बनवतात बघायला पाहिजे.
बोर्नव्हिटा,मॅगी, ब्रिटानिया मारी, डेटॉल,कॅडबरी यांच्या 'सारखे' बरेच आले पण यांचा खप कमी झाला नाही. त्यातल्या त्यात पतंजलीनेच टक्कर दिली.
मस्त धागा.
मस्त धागा.
फ्रीकॉनोमिक्स मध्ये वाचल्याचं
फ्रीकॉनोमिक्स मध्ये वाचल्याचं माझा कलिग सांगत होता .
जेन्व्हापसून कार सेफ्टी देव्हाईसेस वाढली आहेत , किन्वा कार्स मध्ये सूधारणा झाल्या आहेत , कार अॅक्सिड्न्ट्स वाढले आहेत . कारण लोक जरा जास्तच बेपर्वा होउन ड्राईव करू लागले.
मस्त! (मला लगे रहो मुन्नाभाई
मस्त! (मला लगे रहो मुन्नाभाई मधले सर्किट आणि त्याचे दत्तक पालक आठवले!)
* सत्यवती व भीष्म ... तूउ
* सत्यवती व भीष्म ...
तूउ लग्न करु नकोस , तुझे मूल माझ्या मुलाबरोबर लढेल , ही भीती घालून भीष्म ब्रह्मचारी राहील याची व्यवस्था केली.
पण भीश्मासारखा फुकट दास मिळाल्यावर सत्यवतीने स्वतः दोन मुले काढली.
पुढे महाभारत तिच्या स्वतःच्याच वंशजात झाले.
.....
* बाजीराव मस्तानी...
राज्यामध्ये वाटणी वा वारसाहक्काचा सन्मान द्यायचा नाही या कुटिल कारस्थानाने बाजीराव मस्तानीच्या मुलाला हिंदु धर्मात स्थान दिले नाही.
गंमत म्हणजे पेशव्यांच्या ब्राह्मण वंशातील पिढ्या पुढे नष्ट झाल्या. वंश संपला.
बाजीराव मस्तानीचा मुसलमान वंश मात्र ' नारायण ' होण्यापासून वाचला व आजही तो शाबूत आहे!
चांगला लेख. विपरित विचारसरणी
चांगला लेख.
विपरित विचारसरणी नाही म्हणता येणार पण शास्त्रज्ञ आणि जनमानस यातील तफावत याचे एक उदाहरण आठवते:
एचपीव्ही लसीकरण वयाच्या १२ व्या वर्षापासून सुरू केले तर पुढे त्या व्हायरस पासून संरक्षण होते. शास्त्रज्ञ लोकांचे गृहितक मुली १३ वर्षाच्या पुढे लैंगिक दृष्ट्या सक्रिय होवू शकतात ह्यावर आधारित होते. पण ही लस मुलींना दिली तर त्यांना लैंगिक दृष्ट्या सक्रिय होण्यास उत्तेजन मिळेल म्हणून पालकांनी उलट ह्या लशीकडे पाठ फिरवली. आजही फक्त ३०% पालक ही लस मुलींना देतात.
एक पेक्षा जास्त बॉयफ्रेंडस झाले असतील/होणार असतील तर लस घ्या इतका सोपा संदेश असताना पालक मात्र लस घेतली तर मुली एक पेक्षा जास्त बॉयफ्रेंडस करतील अशा विपरित विचारसरणी वर अंम्मल करताना दिसतात.
मस्त धागा आहे.
मस्त धागा आहे.
मस्त विषय आहे! एकदा आम्ही
मस्त विषय आहे! एकदा आम्ही मैत्रीणी चर्चा करत असताना भारतात रस्त्यावर/फूटपाथवर डावीकडून चालणे किती चुकीचे आहे असे जाणवले होते. आपण डावीकडून चालत असताना वाहने आपल्या पाठीमागून येत असतात आणि आपल्याला या दिसू शकत नाहीत. ह्या उलट जर आपण रस्त्याच्या उजव्या बाजूने चाललो तर आपण वाहनांना आणि वाहने आपल्याला दिसतील.
हा नियम म्हणजे मर्फीज लॉ ची
हा नियम म्हणजे मर्फीज लॉ ची एक करोलरी आहे.
Whatever has to go wrong , will go wrong.
पदपथ नसल्यास पायी
पदपथ नसल्यास पायी चालणार्यांनी रस्त्याच्या कडेला वाहनांच्या उलट दिशेने चालायचे असते, असा नियम वाचल्याचे आठवते.
मस्त धागा....आवडला.
मस्त धागा....आवडला.
पदपथ नसल्यास पायी
पदपथ नसल्यास पायी चालणार्यांनी रस्त्याच्या कडेला वाहनांच्या उलट दिशेने चालायचे असते, असा नियम वाचल्याचे आठवते. >> हो मी ही कायम तसेच समजत आलो आहे. आणि पदपथ असला तरी उलट्या दिशेने चालण्यात काही चुकीचे वाटत नाही.
त्या इक्विलिब्रियम वरून एक जे लेनो ची कॉमेण्ट आठवली. कोणत्यातरी हॉस्पिटल्/युनि मधे कॅडेव्हर्स(योग्य मराठी शास्त्रीय शब्द माहीत नाही. प्रेत्/बॉडी म्हणत नसावेत) मिळत नसल्याने तेथून पास होणार्या डॉक्टर्सचे कौशल्य/अनुभव कमी असू शकेल अशी भीती व्यक्त करणारी बातमी - तिचा संदर्भ देउन त्याने म्हंटले होते "It's a self-fixing problem"
मस्त लेख निकित. फ्रिकोनॉमिक्स
मस्त लेख निकित. फ्रिकोनॉमिक्स मधल्या उदाहरणावरून तू आत्ता इथे फ्रिकोनोमिक्स चे दोन भाग लिहितोस कि काय असे वाटलेले
योग्य मराठी शास्त्रीय शब्द माहीत नाही. प्रेत्/बॉडी म्हणत नसावेत >> शव ?
कोणत्यातरी हॉस्पिटल्/युनि मधे
कोणत्यातरी हॉस्पिटल्/युनि मधे कॅडेव्हर्स(योग्य मराठी शास्त्रीय शब्द माहीत नाही. प्रेत्/बॉडी म्हणत नसावेत) मिळत नसल्याने तेथून पास होणार्या डॉक्टर्सचे कौशल्य/अनुभव कमी असू शकेल अशी भीती >>
उलट ज्या हॉस्पिटल मध्ये शव (धन्यवाद असामी) मिळत नाही तेथील डॉक्टरांचे स्किल बरेच चांगले असले पाहिजे
भरत मयेकर: काल तुम्हाला रिप्लाय द्यायचा राहिला.
केरळमधील उदाहरण काल्पनिक आहे - किंवा खरे घडले कि नाही हे निश्चित माहित नाही असे म्हणूया.
दिल्लीमधील एव्हन-ऑड नंबर्ड गाड्यांबद्दल:
आपल्यासारख्या कमकुवत अंमलबजावणीच्या देशात अशा धोरणांचे परिणाम चांगलेच काउंटर इंट्यूटीव्ह असू शकतात.
एकट्या बायकांना सूट आहे. मग - ज्या बायका पूर्वी कारपूल करत असत त्या आता करणार नाहीत.
टॅक्सिचालकांना सूट आहे. मी माझी गाडी उबर / ओला अशा ठिकाणी रजिस्टर करुन ठेवतो आणि मी कॅब मधून जातो आहे असेच दाखवतो.
बाहेरील राज्यातील गाड्यांना सूट: मी माझी गाडी गुरगाव नॉयडा ला रजिस्टर करून घेतो.
अर्थात याचा कोणताच विदा नाही त्यामुळे सर्व स्पेक्युलेशनच आहे. आणि या सर्व कायदेशीर पळवाटा आहेत.
ह्यापेक्षा कारपूल न करणार्यांना दंड हे बरे धोरण वाटते. त्याचीही अंमलबजावणी देशात कशी करायची हा यक्षप्रश्न आहेच.
उलट ज्या हॉस्पिटल मध्ये शव
उलट ज्या हॉस्पिटल मध्ये शव (धन्यवाद असामी) मिळत नाही तेथील डॉक्टरांचे स्किल बरेच चांगले असले पाहिजे >> नाही हे बहुधा शिकाऊ डॉ च्या बाबातीत होती बातमी, नाहीतर हे लॉजिक बरोबर आहे. अर्थात ती लेनो ची सुरूवातीच्या मोनोलॉग मधली कॉमेण्ट होती, एवढा अॅनेलिसीस काय करणार त्याचा
मी तिकडे बेकरीत कम्युट बद्दल लिहीले आहे त्यातही हा इफेक्ट आहे. लांबून येणार्यांना सोय म्हणून मोठ्या कंपन्यांनी बसेस, वायफाय वगैरे सुरू केले. पण ती सोय उपलब्ध झाल्याने लोक लांब राहूही लागले जास्त, विशेषतः सिटी मधे राहून सबर्ब मधे काम करणारे.
Unintended effect चे एक उदाहरण म्हणजे कारपूल लेन मधे एकापेक्षा जास्त लोक असतील तरच चालवू देणे. हे अनेक लोक कार्स शेअर करतील व ट्रॅफिक कमी होईल म्हणून केले गेले. पण काही लोकांनी मुलांची डे केअर ऑफिस जवळ घेउन मुलांनाच बरोबर घेउन जाणे चालू केले. त्यात काही कंपन्यांनी ऑन साईट डे केअर उपलब्ध केल्याने हे आणखीनच वाढले. त्यामुळे जे लोक (मुले) या ट्रॅफिक मधे मुळातच नव्हते ते ही अॅड झाले.
सॉफ्टवेर एंजिनियरिंग एक उत्तम
सॉफ्टवेर एंजिनियरिंग एक उत्तम उदाहरण आहे काउंटर इंट्युशनचं. स्ट्रक्चर्ड डायग्राम्स, फ्लो चार्टचा वापर करुन कितिहि होनी/अनहोनी टाळण्याचा प्रयत्न केला तरीहि एखादि फ्रिकिंग युज केस सीएमेमआय लेवल ५ चा डोलारा कोसळायला कारणिभुत ठरते...
इंत्रेस्तिंग निकित. मला ते
इंत्रेस्तिंग निकित.
मला ते एसीचं उदा. विशेष पटलं नाही म्हणजे निदान घरांच्या बाबतीत. आम्ही दोन्ही कोस्टला पाहिलं हीटर आणि एसी टाइमिंग्प्रमाणॅ टेंप मॅनेज करता येतं. सध्या दिवस्भर आमचं घर ६०फ ला असतं आणि ४ ला ब्म्प होतं ७० ला आणि रात्री ६६ ला पुन्हा पहाटे दोन तासासाठी ६९. त्या थर्मोस्टॅटला सगळे पर्याय असतात. सेम विथ समर टाइम. पर्टिक्युलरली केळफोर्णे या बाबतीत इतकं मागास असेल काही वर्षांपुर्वी असं पटत नाही
>>मला ते एसीचं उदा. विशेष
>>मला ते एसीचं उदा. विशेष पटलं नाही म्हणजे निदान घरांच्या बाबतीत.<<
सहमत. विशेषतः हल्ली स्मार्ट थर्मोस्टॅट्स्ची (दे ट्वीक स्केड्युल ऑटोमॅटिकली) चलती असताना...
Unintended effect चे एक
Unintended effect चे एक उदाहरण म्हणजे कारपूल लेन मधे एकापेक्षा जास्त लोक असतील तरच चालवू देणे. हे अनेक लोक कार्स शेअर करतील व ट्रॅफिक कमी होईल म्हणून केले गेले. पण काही लोकांनी मुलांची डे केअर ऑफिस जवळ घेउन मुलांनाच बरोबर घेउन जाणे चालू केले. त्यात काही कंपन्यांनी ऑन साईट डे केअर उपलब्ध केल्याने हे आणखीनच वाढले. त्यामुळे जे लोक (मुले) या ट्रॅफिक मधे मुळातच नव्हते ते ही अॅड झाले.>>>
यावरून आठवले. माझी एक कलिग बॉडी डमी घेऊन जायची कारपूल लेन मधे. अगदी पॅसेंजर सीटमधे व्यवस्थित बेल्ट लावून. एकदा पोलिसानं थांबवलं. खिडकीतून डोकाऊन पाहिलं आणि काही बोलण्याकरता उघडलेलं तोंड परत मिटलं, मग तिच्याकडे सरळ पहात फक्त एकच शब्द बोलला "रीअली?". तिकीट फाडून हातात ठेवलं.
यावरूनच आताच आलेल्या बातमीचे
यावरूनच आताच आलेल्या बातमीचे उदाहरण आठवले.
सगळीकडे कंजेशन वाढले की हायवेला लेन वाढवा, रस्ते मोठे करा असं करणं चालू असतं. तर आता पहिल्यांदाच कॅलिफोर्निया डीओटी नी हे बरोबर नाहीये मान्य केलय. त्यांनी म्हंटलंय की जास्ती रस्ते असतील तर ट्रॅफिकही तितकेच वाढेल.
http://www.citylab.com/commute/2015/11/californias-dot-admits-that-more-...
विषय मस्त आहे .. प्रतिसादांत
विषय मस्त आहे ..
प्रतिसादांत आलेली काही उदाहरणं खूपच इंटरेस्टींग आहेत ..
मला पण हा बाफ फार आवडला.
मला पण हा बाफ फार आवडला. इन्टरेस्टिंग किस्से.
मस्त झालाय लेख एकदम. वर
मस्त झालाय लेख एकदम.
वर कारपूलचे उदाहरण आलय. इथेपण कारपूल लेन मधून पीक टाइम ला एकटे रायडर्स बरेचदा जातात. पोलीस कधीतरीच असतो, अन मी असं बघितलंय की पोलीस असेल त्यादिवशी जास्तच लोक वापरतात ती लेन. कारण पोलीस एकच येतो, अन त्याला सावज मिळालेलं असतंच. मग कडेला उभी असलेली त्याची लाईट्स लागलेली कार अन बाहेर तो तिकीट देताना दिसला की "अरे हा तर इथे तिकीट देत बसलाय, चला म्हणजे पुढे कारपूल लेनमधे काही धोका नाही" असा विचार करुन बाकी बरीच लोकं बिनधास्त कारपूल लेन मधे शिरतात.
वेका आणि राज: अजूनही बर्याच
वेका आणि राज: अजूनही बर्याच जुन्या घरांत सेंट्रल एअर कंडीशनिंग नाही. फोर्सड एअर सेंट्रल हीटींग आहे - त्यामुळे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे घर टायमर प्रमाणे हीट करता येतेच.
फारेण्ड, मंदार : इंटेरेस्टिंग.
धनि: तू जे हायवे च्या बाबतीत म्हणतोस तेच पाण्याच्या बाबतीतही लागू आहे. दुष्काळावर उपाय योजना म्हणून आहे ते पाणी धड न वापरता नवीन धरणे बांधत बसणे म्हणजे सद्ध्याच्या अकार्यक्षमतेला प्रोत्साहन देण्यासारखे आणि भविष्यात अजून दुष्काळांना आमंत्रण देण्यासारखेच आहे.
ऊर्जा बचतीबद्दल बोलत आहोत
ऊर्जा बचतीबद्दल बोलत आहोत म्हणून अजून एक काउंटर इंट्यूटीव्ह उदाहरण आठवले:
जर ऊर्जा बचत करणारी उपकरणे आपण वापरू लागलो तर आपण त्या उपकरणांचा अधिक वापर करु लागतो ! अखेरीस ऊर्जा बचत जरी होत असेल तरीही जेव्हढी इंटेंडेड आहे त्यापेक्षा बरीच कमी होते.
असे का होते ? तर, एफिशियन्सी वाढणं म्हणजे बचत होणं. म्ह्णजेच एका अर्थाने इन्कम वाढणे. त्यामुळे जोपर्यंत किमती वाढत नाहीत तोपर्यंत एफिशियन्सी नेहमीच कन्झम्प्शन वाढवत राहणार. ह्याला रीबौंड इफेक्ट म्हणतात. अर्थात, रीबौंड इफेक्टमुळे कन्झम्प्शन वाढतं म्हणजे त्या वस्तूचं कन्झम्प्शन वाढतं - उर्जा वापर वाढतो असे नव्हे. एनर्जी एफिशियन्सी वाढल्याने उर्जा वापर (आणि म्हणूनच ग्रीनहाउस एमिशन्स) कमीच होतो.
कारचा विषय निघाला आहे म्हणून त्याचच एक सोपं उदाहरण पाहू.
कारचं मायलेज ३० माइल्स पर गॅलन असं पकडू. आणि समजा मी दर दिवशी ३० माइल्स गाडी चालवतो. म्हणजे माझा फ्युएल वापर झाला दिवसाला १ गॅलन. १ गॅलन फ्युएल ची किंमत समजा ३ डॉलर. त्यामुळे रोजचा खर्च ३ डॉलर. आता मी एक फ्युएल एफ़िशियनट गाडी विकत घेतली. फ्युएल एफ़िशियनट गाडीचं मायलेज दुप्पट म्हणजे ६० मैल प्रति गॅलन पकडू. याचा अर्थ माझा फ्युएल वापर अर्धा व्हायला हवा. म्हणजे रोजचा खर्च निम्मा म्हणजे १.५ डॉलर व्हायला हवा. पण माझं आधीचं बजेट ३ डॉलर असल्यानं माझ्याकडे १.५ डॉलर शिल्लक राहतात म्हणजेच माझं उत्पन्न १.५ डॉलरने वाढतं. तर या वाढीव उत्पन्नामुळे माझा कारचा वापर वाढतो (३० मैलांच्या ऐवजी समजा ४० मैल चालवतो, म्हणजेच रीबौंड = ~३३%) आणि त्याचबरोबर मी इतरही काही वस्तू विकत घेतो ज्या मी आधी घेतल्या नसत्या (हा इफेक्ट तुलनेने छोटा असतो पण तो थोडा वेगळा विषय आहे). तर, कार चा वापर वाढला. पण तो दुप्पट नाही झाला. तो ३३%च वाढला. त्यामुळे माझं फ्युएल कन्झम्प्शन अर्ध्या गॅलनच्या ऐवजी ०.६७ गॅलन झालं. म्हणजे कारचं कन्झम्प्शन वाढलं पण उर्जा वापर कमीच झाला.
विजेची उपकरणे एफिशियंट केल्यानंतर कॅलिफोर्नियात सुमारे २०-३०% रीबौंड आढळला होता. मेक्सिकोतहि जवळजवळ ३०%. म्हणजे उर्जावापर इनटेन्डेड बेनेफिटच्या १००% नाही पण ७०-८०% कमी झाला.
वॉव, मस्त धागा!!! वेरी
वॉव, मस्त धागा!!! वेरी इंटरेस्टिंग
मस्त!! अंजलीचे 'रियली' फार
मस्त!! अंजलीचे 'रियली' फार मजेशीर.
अंजली
अंजली
बाहेरील राज्यातील गाड्यांना
बाहेरील राज्यातील गाड्यांना सूट: मी माझी गाडी गुरगाव नॉयडा ला रजिस्टर करून घेतो.
>>> All NCR number plates are covered under this rule (UP16 Noida,HR26 Gurgaon, HR51 Faridabad etc.).
मस्त धागा. काही वेगळे वाचायला
मस्त धागा. काही वेगळे वाचायला मिळाले.
एक उदाहरण आहे मलाही माहीत. आमच्या एअरपोर्टवर सोडायला येणारी गाडी 7 मिनिटात बाहेर गेली तर एंट्री फी अथवा पार्किंग चार्ज आकारत नाहीत(जागाटंचाई असलेल्या इतर ठिकाणीही असे असावे). पार्किंग लिमिटेड असल्याने एकटेदुकटे किंवा कमी सामानवाले लोक लगेच उतरून जातील आणि वाहतूक कोंडी होणार नाही असा उद्देश असणार.
पण आता बहुसंख्य गाड्या विशेषतः पिकपसाठी येणाऱ्या अप्रोच रोडवर लांब लांब रांगा धरून थांबतात आणि विमान आले की सगळ्या आत एकदम वेगाने येतात ज्यामुळे अपघात, टर्मिनल समोर कोंडी आणि भांडणे प्रचंड वाढली आहेत. 7 मिनिटे साधायला, एरवी जे लोक सामान-ट्रॉली घेऊन पार्किंग पर्यन्त जात होते, तेही भर रस्त्यात गाडी थांबवून सामान भरतात.
Pages