अखिल मायबोली धागाकर्ता मंडळ !

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 December, 2015 - 00:44

उद्देश गरज उपक्रम वगैरे :-

म्हणजे बघा हं,
कोणी, किती, केव्हा आणि कुठले धागे काढावेत याबाबत मायबोली प्रशासनाचे ठाम नियम नाहीत. धागा आक्षेपार्ह वाटला की उडवा आणि सभासद डोक्यात जायला लागला की त्याच्यासकट उडवा, एवढेच ढोबळमानाने ते करतात.
पण यामुळे दोन गोष्टी होतात.
१) धाग्यांचे पीक अमाप येते.
२) कोणीही कोणाच्याही धाग्यावर आक्षेप घेते.
आता यात कधी धागाकर्त्याची चूक असते, तर कधी नसते. पण दोन्ही स्थितीत इतर प्रतिसादकांना ते त्याला सुनवायची गरज वा हक्क नसतो. मग वाद होतात. कोणाला कसलाच हक्क वा अधिकार नसल्याने वातावरण गढूळ होते. आणखीनच...

त्यामुळे धागाकर्त्यांनीच एकत्र जमून काहीतरी नैतिक नियमावली तयार केली पाहिजे असे मला आतून कुठेतरी वाटते.

तसेच,
धागा काढणे एक कला आहे... कशी ते वेगळ्या धाग्यात सांगतो... पण मग कलाकारांची एक युनियन हवीच.

आता,
काही जण धागा काढायची इच्छा राखून असतात, पण धागा काढायला बिचकतात. तर काही जण त्या बिचकण्यावर मात करून धागा काढण्यात यशस्वी झालेले असतात, पण त्यावर आलेल्या नकारात्मक प्रतिसादांनी हिरमोड झालेला असतो. अश्यांसाठी मंडळ दोन गोष्टी करू शकते.
१) प्रशिक्षण
२) प्रोटेक्शन
म्हणजे काय ते साधारण समजले असेलच. नेमके कसे ते मंडळ स्थापन झाल्यावर सभासदांनाच सांगूया.

तर,
काही हौशी लेखक असतात. काही टीआर्रपी पिपासूंना ढिगाने आलेले प्रतिसाद लुभावतात. तर काही लोचटांना सतत आपलाच धागा वर राहावा असे वाटत असते. असे लोक मग या कामासाठी डुप्लिकेट आयडी बाळगतात. हेच डुप्लिकेट आयडी मग ईतर धाग्यांवरही गोंधळ घालतात.
पण जर मंडळ बनले तर त्यातील सभासद संगनमताने एकमेकांचे आवडीचे धागे अधूनमधून वर येत राहतील याची काळजी घेतील आणि एकंदरीतच ड्यू आयडींचा सुळसुळाट पहिल्यापेक्षा कमी होईल.

ना धागा काढणे, ना धागा वाचणे, ना धाग्यावर प्रतिसाद देणे...
तर धागा भरकटवणे आणि त्यावर धागाकर्त्याला अपेक्षित चर्चा होऊ न देणे, यासाठीच काही आयडी सोशलसाईटसवर भटकत असतात.
अश्यांविरुद्ध एकत्र येत आघाडी उघडू शकतो. एकट्याचा आवाज अ‍ॅडमिनपर्यंत पोहोचत नसला तरी संघटनेचा नक्की पोहोचेन.

वर एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे धागा काढणे ही एक कला असली तरी बरेच विषय असे असतात की त्यावर धागा काढायला अभ्यास करावा लागतो,
बरेचदा आपण उत्साहात एखादा धागा काढतो आणि त्यावर पहिलाच प्रतिसाद येतो.. "अभ्यास करून या".. जो कधी आपण शाळेतही केला नसतो.
तर मग अश्या अभ्यासू विषयांवर धागा काढण्याअगोदर सर्वांनी मिळून ग्रूप स्टडी करता येईल. माझी ईंजिनीअरींग अशीच झाली आहे.

विविध विषयावर सतरंगी अतरंगी धागे निघावेत यासाठी सर्वच धागाकर्त्यांना प्रोत्साहन द्यायला फिल्लमफेअर अ‍ॅवार्ड किंवा स्टार परीवारच्या धर्तीवर विविध पुरस्कार आदान प्रदान करू शकतो.

ढोबळमानाने मंडळाचा ढाचा साधारण खालीलप्रमाणे राहावा असे माझे वैयक्तिक मत आहे.
मंडळात कोणीही पदाधिकारी नसावे. फक्त धागा काढण्याची हुक्की या एका निकषावर सभासदांना खालील प्रकारे विभागण्यात यावे.
व्हाइट कार्ड मेंबरशिप - धागा काढायची इच्छा आहे पण कधीही धागा न काढलेले.
ग्रे कार्ड मेंबरशिप - किमान एक धागा.
येल्लो कार्ड मेंबरशिप - किमान ७ धागे.
ग्रीन कार्ड मेंबरशिप - किमान एक शतकी धागा. (पहिलाच धागा शतकी झाल्यास थेट ग्रीन कार्ड)
रेड कार्ड मेंबरशिप - वर्षाला किमान ७०-७५ धागे. (अश्या सभासदांना वैतागून कधी मायबोली प्रशासन ‘रेड कार्ड’ दाखवून बाहेर काढेल याची शाश्वती नसल्याने मंडळातर्फे अश्यांना स्पेशल इन्शुरन्स देण्यात यावे)

विशेष नोंद घेणे - धागा आला म्हणजे मंडळ स्थापन झाले असे नाही. तसेच धागा मी काढला म्हणजे मी त्यात कोणता पदाधिकारी आहे असेही नाही. तर हा मंडळ स्थापनेचा प्रस्ताव आहे. मान्य झाल्यास अधिकृतरीत्या एक अनधिकृत मंडळ उभे राहील.. किंवा व्हायसे वर्सा होईल..

तरी जाता जाता एवढेच सांगेन..
घर हे दगड विटांनी नाही, तर माणसांनी बनते. तसेच मंडळ हे फुकटच्या सल्यासूचनांनी नाही, तर सभासद आणि कार्यकर्त्यांनी बनते.
तर सल्ला आणि सूचनेसोबत नावेही नोंदवा Happy

आभारी आहे विथ बेस्ट रिगार्डस,
- कु. ऋ.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धागा काढणे एक कला आहे... कशी ते वेगळ्या धाग्यात सांगतो... >>>> ळॉळ! Rofl

ग्रूप स्टडी >>> Lol

माझी ईंजिनीअरींग अशीच झाली आहे. >>> धन्य आहे! Lol

रंगित कार्डं मेंबरशिप जबरदस्त आहे. पण काही जणांकरता एक 'अल्ट्रा-रेड कार्ड' मेंबरशिप पण ठेवा बुवा!

पण त्या धागाकर्त्यांच्यातल्या आपापसातल्या स्पर्धेचं काय करणार ?

मामी आणि अश्विनी...
धागा वाचण्याच्या तुमच्या पेशन्सला साष्टांग नमस्कार..म्या तर त्या दोन गोष्टी वाचुन सरळ प्रतिक्रियांवरच आलो..

मला आता रस्सीखेच सुरू झालेली दिसत असून एका बाजूला ऋन्मेष आणि एका बाजूला राकु दिसत आहेत. मध्ये सर्व्हर स्पेस नावाची विकलांग, गलितगात्र झालेली सुतळी जिवाच्या आकांताने ओरडत असून ती दोन्ही बाजूंनी ताणली जात आहे. आजूबाजूने बघ्यांचा हल्लकल्लोळ चाललेला असून कोणी एक ती सुतळी मधूनच कापता येते का ह्याचाही प्रयत्न करत आहे.

सध्या तरी मला धागा कर्ते म्हणुन राकु पहील्या नंबर वर ऋन्मेश दुसर्‍या नंबर वर आणि बेफि तिसर्‍या नंबरवर दिसतायत,

बाकी माबो वर फार काही कोणी धागे काढत नसावे.

ऋ, मला धागा काढायची कला शिकायची आहे.
अजुन पर्यन्त एक पण धागा काढला नाही
लवकरात लवकर नविन धागा काढुन कला शिकवावी ही विनंती.

ऋन्मेष, मी तुझ्या फॅनक्लबात आहे.
पण धागाक्लबात नाही येणार.
Happy

या क्लबाची संकल्पना भारी आहे.
तू स्वतःवरची टीकापण भारी हसतखेळत घेतोस हे मला फार म्हणजे फारच आवडते.

सकुरा हे जमवता येईल. मंडळ स्थापन झाल्यावर जमवूया, जेणेकरून त्याला एक जडत्व येईल.

इथे अजून एक मुद्दा, अजून एक धागाकर्त्यांची गोड समस्या ध्यानात येत आहे ती अशी,
बरेचदा धागाकर्त्याचे नाव बघूनच धाग्याचा पोत ठरवला जातो, आणि त्या भ्रामक प्रतिमेनुसारच तो वाचला / न वाचला जातो. त्यानुसारच प्रतिसाद दिले / न दिले जातात.

ऋन्मेष, या समस्येकरिता 'मंडळातर्फे सामूहिक आय्डीने धागे काढून धाग्याच्या शेवटी बारिक अक्षरात धागालेखकाचे नाव लिहिणे'
असा उपाय सूचत आहे.

कापोचे हे व्यंगचित्र इथेही टाकल्याबद्दल धन्यवाद Proud
हा आपला लोगो, आपली थीम राहील. शेवटचे समाधानाचे गोड हास्य हिच आपली पावती.

किंवा काही काळासाठी नाव प्रकाशित न होणे .. न करणे ..<<
व्हॉटॅन आयड्या सर्जी
सरळ ...................................टींब मारुन द्यायचे.

विविध विषयावर सतरंगी अतरंगी धागे निघावेत >>>>>>> णीषेध...... ( आमचे सदस्य नाम अस कुठेही वापरु नये. रॉयल्टी लागेल Happy

ह्या आठ दहा दिवसातलं एकंदर वातावरण आणि निनाद यांचा धागा वाचल्या मुळे ह्या धाग्याची निखळ मजा घेता आली .. Happy बढ़िया लेखन..मजा आ गया

Pages