अखिल मायबोली धागाकर्ता मंडळ !

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 December, 2015 - 00:44

उद्देश गरज उपक्रम वगैरे :-

म्हणजे बघा हं,
कोणी, किती, केव्हा आणि कुठले धागे काढावेत याबाबत मायबोली प्रशासनाचे ठाम नियम नाहीत. धागा आक्षेपार्ह वाटला की उडवा आणि सभासद डोक्यात जायला लागला की त्याच्यासकट उडवा, एवढेच ढोबळमानाने ते करतात.
पण यामुळे दोन गोष्टी होतात.
१) धाग्यांचे पीक अमाप येते.
२) कोणीही कोणाच्याही धाग्यावर आक्षेप घेते.
आता यात कधी धागाकर्त्याची चूक असते, तर कधी नसते. पण दोन्ही स्थितीत इतर प्रतिसादकांना ते त्याला सुनवायची गरज वा हक्क नसतो. मग वाद होतात. कोणाला कसलाच हक्क वा अधिकार नसल्याने वातावरण गढूळ होते. आणखीनच...

त्यामुळे धागाकर्त्यांनीच एकत्र जमून काहीतरी नैतिक नियमावली तयार केली पाहिजे असे मला आतून कुठेतरी वाटते.

तसेच,
धागा काढणे एक कला आहे... कशी ते वेगळ्या धाग्यात सांगतो... पण मग कलाकारांची एक युनियन हवीच.

आता,
काही जण धागा काढायची इच्छा राखून असतात, पण धागा काढायला बिचकतात. तर काही जण त्या बिचकण्यावर मात करून धागा काढण्यात यशस्वी झालेले असतात, पण त्यावर आलेल्या नकारात्मक प्रतिसादांनी हिरमोड झालेला असतो. अश्यांसाठी मंडळ दोन गोष्टी करू शकते.
१) प्रशिक्षण
२) प्रोटेक्शन
म्हणजे काय ते साधारण समजले असेलच. नेमके कसे ते मंडळ स्थापन झाल्यावर सभासदांनाच सांगूया.

तर,
काही हौशी लेखक असतात. काही टीआर्रपी पिपासूंना ढिगाने आलेले प्रतिसाद लुभावतात. तर काही लोचटांना सतत आपलाच धागा वर राहावा असे वाटत असते. असे लोक मग या कामासाठी डुप्लिकेट आयडी बाळगतात. हेच डुप्लिकेट आयडी मग ईतर धाग्यांवरही गोंधळ घालतात.
पण जर मंडळ बनले तर त्यातील सभासद संगनमताने एकमेकांचे आवडीचे धागे अधूनमधून वर येत राहतील याची काळजी घेतील आणि एकंदरीतच ड्यू आयडींचा सुळसुळाट पहिल्यापेक्षा कमी होईल.

ना धागा काढणे, ना धागा वाचणे, ना धाग्यावर प्रतिसाद देणे...
तर धागा भरकटवणे आणि त्यावर धागाकर्त्याला अपेक्षित चर्चा होऊ न देणे, यासाठीच काही आयडी सोशलसाईटसवर भटकत असतात.
अश्यांविरुद्ध एकत्र येत आघाडी उघडू शकतो. एकट्याचा आवाज अ‍ॅडमिनपर्यंत पोहोचत नसला तरी संघटनेचा नक्की पोहोचेन.

वर एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे धागा काढणे ही एक कला असली तरी बरेच विषय असे असतात की त्यावर धागा काढायला अभ्यास करावा लागतो,
बरेचदा आपण उत्साहात एखादा धागा काढतो आणि त्यावर पहिलाच प्रतिसाद येतो.. "अभ्यास करून या".. जो कधी आपण शाळेतही केला नसतो.
तर मग अश्या अभ्यासू विषयांवर धागा काढण्याअगोदर सर्वांनी मिळून ग्रूप स्टडी करता येईल. माझी ईंजिनीअरींग अशीच झाली आहे.

विविध विषयावर सतरंगी अतरंगी धागे निघावेत यासाठी सर्वच धागाकर्त्यांना प्रोत्साहन द्यायला फिल्लमफेअर अ‍ॅवार्ड किंवा स्टार परीवारच्या धर्तीवर विविध पुरस्कार आदान प्रदान करू शकतो.

ढोबळमानाने मंडळाचा ढाचा साधारण खालीलप्रमाणे राहावा असे माझे वैयक्तिक मत आहे.
मंडळात कोणीही पदाधिकारी नसावे. फक्त धागा काढण्याची हुक्की या एका निकषावर सभासदांना खालील प्रकारे विभागण्यात यावे.
व्हाइट कार्ड मेंबरशिप - धागा काढायची इच्छा आहे पण कधीही धागा न काढलेले.
ग्रे कार्ड मेंबरशिप - किमान एक धागा.
येल्लो कार्ड मेंबरशिप - किमान ७ धागे.
ग्रीन कार्ड मेंबरशिप - किमान एक शतकी धागा. (पहिलाच धागा शतकी झाल्यास थेट ग्रीन कार्ड)
रेड कार्ड मेंबरशिप - वर्षाला किमान ७०-७५ धागे. (अश्या सभासदांना वैतागून कधी मायबोली प्रशासन ‘रेड कार्ड’ दाखवून बाहेर काढेल याची शाश्वती नसल्याने मंडळातर्फे अश्यांना स्पेशल इन्शुरन्स देण्यात यावे)

विशेष नोंद घेणे - धागा आला म्हणजे मंडळ स्थापन झाले असे नाही. तसेच धागा मी काढला म्हणजे मी त्यात कोणता पदाधिकारी आहे असेही नाही. तर हा मंडळ स्थापनेचा प्रस्ताव आहे. मान्य झाल्यास अधिकृतरीत्या एक अनधिकृत मंडळ उभे राहील.. किंवा व्हायसे वर्सा होईल..

तरी जाता जाता एवढेच सांगेन..
घर हे दगड विटांनी नाही, तर माणसांनी बनते. तसेच मंडळ हे फुकटच्या सल्यासूचनांनी नाही, तर सभासद आणि कार्यकर्त्यांनी बनते.
तर सल्ला आणि सूचनेसोबत नावेही नोंदवा Happy

आभारी आहे विथ बेस्ट रिगार्डस,
- कु. ऋ.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला आता रस्सीखेच सुरू झालेली दिसत असून एका बाजूला ऋन्मेष आणि एका बाजूला राकु दिसत आहेत. मध्ये सर्व्हर स्पेस नावाची विकलांग, गलितगात्र झालेली सुतळी जिवाच्या आकांताने ओरडत असून ती दोन्ही बाजूंनी ताणली जात आहे. आजूबाजूने बघ्यांचा हल्लकल्लोळ चाललेला असून कोणी एक ती सुतळी मधूनच कापता येते का ह्याचाही प्रयत्न करत आहे.>>>>>> निनाद दादा किन्वा जयंत कुठे आहेत ???? होउन जाउद्या आणखी एक चित्र Happy

ऋन्मेष, मी तुझ्या फॅनक्लबात आहे.
पण धागाक्लबात नाही येणार.
स्मित
या क्लबाची संकल्पना भारी आहे.
तू स्वतःवरची टीकापण भारी हसतखेळत घेतोस हे मला फार म्हणजे फारच आवडते. >>>>>>>. + १००००

तर काही जण त्या बिचकण्यावर मात करून धागा काढण्यात यशस्वी झालेले असतात, पण त्यावर आलेल्या नकारात्मक प्रतिसादांनी हिरमोड झालेला असतो. अश्यांसाठी मंडळ दोन गोष्टी करू शकते.
१) प्रशिक्षण
२) प्रोटेक्शन >>>>>>
अशा हिरमोड झालेल्यांसाठी सपोर्ट ग्रुप ही स्थापन करण्यात यावा ही सूचना .

आमचे सदस्य नाम अस कुठेही वापरु नये. रॉयल्टी लागेल
>>
आजवर अश्या नोटीशाच पाठवल्या असतील आपण. पण मंडळ बनले तर पुढच्या वेळी एकजुटीने मिळवूनही देता येईल.
एकीचे बळ आणि मंडळाची बळ जबरी हे युक्तीपेक्षाही श्रेष्ठ

अशा हिरमोड झालेल्यांसाठी सपोर्ट ग्रुप ही स्थापन करण्यात यावा ही सूचना.
>>
छान सूचना.
चाटे कोचिंग क्लासेस प्रस्तुत नापासांची चिंता सारखे काही सुरू करता येईल.

बरेचदा आपण उत्साहात एखादा धागा काढतो आणि त्यावर पहिलाच प्रतिसाद येतो.. "अभ्यास करून या".. जो कधी आपण शाळेतही केला नसतो.
तर मग अश्या अभ्यासू विषयांवर धागा काढण्याअगोदर सर्वांनी मिळून ग्रूप स्टडी करता येईल. माझी ईंजिनीअरींग अशीच झाली आहे. >> Lol

मी सगळा धागा वाचला. खुसखुशीत शैलीत शालजोडीतली मारली आहे. सुरुवातीचे मुद्दे तर पटले बाबा, नंतरचं ह्या डोळ्यानी वाचलं आणि त्या डोळ्यानी सोडून दिलं Happy (जनरली अ‍ॅडमिनची, कदाचित ठरवून केलेली, निष्क्रीयता पाहता असं काही शक्य वाटत नाही, आणि नुसत्याच मेंबर्सनी असं काही करायचं ठरवलं तर सगळा सावळा गोंधळ) . असो.

बाकी तुझ्या कोणाला न दुखावण्याच्या, तुझ्यावर वैयक्तिक केलेल्या टिकेलाही हसत खेळत घेण्याच्या आणि इन जनरल पॉझिटीव्ह अ‍ॅटीट्युडचं परत कौतुक.

बाकी तुझ्या कोणाला न दुखावण्याच्या, तुझ्यावर वैयक्तिक केलेल्या टिकेलाही हसत खेळत घेण्याच्या आणि इन जनरल पॉझिटीव्ह अ‍ॅटीट्युडचं परत कौतुक.>> याच गोष्टींमुळे ऋन्मेऽऽष हा ऋन्मेऽऽष आहे. Happy

मला ऋन्मेषच लेखन खूप आवडत. विचार आणि शैली दोन्ही आवडत. हे सुध्धा तु किती विचार करुन लिहीले आहेस. खूप आवडल.

ऋन्मेष, डोकं लईच सुप्पीकेरे बाबा तुझं.... तुझी लिहिण्याची स्टाईल तर आवडतेच पण तुझी पॉझिटिविटी जास्त इंप्रेसिव आहे..
.. अर्र खरंच की रे हा तर तुझं कौतुक करण्याचा धागा निर्माण झाला.. आपसूकच..

Happy

ऋन्मेष, डोकं लईच सुप्पीकेरे बाबा तुझं.... तुझी लिहिण्याची स्टाईल तर आवडतेच पण तुझी पॉझिटिविटी जास्त इंप्रेसिव आहे..>>> +१

ऋन्मेष, डोकं लईच सुप्पीकेरे बाबा तुझं.... तुझी लिहिण्याची स्टाईल तर आवडतेच पण तुझी पॉझिटिविटी जास्त इंप्रेसिव आहे..>>> +१

खरेच ऋन्मेष मायबोलीचा स्वप्नील जोशीच आहे. सर्वांना आपलाच वाटणारा.

<<सध्या तरी मला धागा कर्ते म्हणुन राकु पहील्या नंबर वर ऋन्मेश दुसर्‍या नंबर वर आणि बेफि तिसर्‍या नंबरवर दिसतायत,

बाकी माबो वर फार काही कोणी धागे काढत नसावे.>>

-----
एका मायबोलीकरान्नी २ दिवसात शेकडो धागे काढले होते... पहिल्या तिन पानावर त्यान्चेच काही तास (१-२ दिवस) राज्य होते. एकाला वाचुन पुर्ण करायच्या आधी पाच नवे धागे तयार झालेले असायचे. मला सुरवातीला वाटले होते स्पॅम आहे...

<<अरे बस्स.. कौतुकाला धागा नाहीये हा, आवरा फिदीफिदी>>
------- कौतुकाचा धागा केव्हा काढणार आहे ?

<<थप्पड से डर नही लगता साबजी, प्यार से लगता है डोळा मारा>>
------ हे म्हणजे कौतुक करण्यासाठी मायबोलीकरान्ना तुम्ही प्रोत्साहन देत आहात Happy

उदय, हो. काही तासांतच शंभर धागे. आणि मग एका धाग्यात विषय मांडून त्यानुसार सर्व धाग्यांची लिंक दिलेली.
पण त्यात कोणती टवाळपंथी नसून भक्तीपंथी होती. ते त्यांच्या गुरुंचे आध्यात्मिक विचार होते बहुधा.

कोणीतरी तीट लावा रे गालावर. सगळेच काय जॉन्सनपावडर लावताय?

(जॉन्सन पावडरीशी सहमत. माझ्यातर्फे आणखी एक पफ.)

ऋन्मेष, तू माझा लाडका आहेचेस तू स्वतःवरची टीका नेहेमीच हसतखेळत घेतोस हे त्याचे कारण.
इतके लोकं तुझं जाहीर कौतुक करताना बघून मला लय भारी वाटतंय.

अजूनही काय काय लिहायचंय पण इतकं चांगलं वाचून (त्यामुळे) लोकांनाच काय तुलाही एखादवेळी ते खोटं वाटेल त्यामुळे इथेच थांबतो. Happy

Pages