प्राणांचे प्रकटन

Submitted by भास्कराचार्य on 7 December, 2015 - 22:59

अंधारलेल्या आकाशात चमकणारी अग्निदळे पाहताना
प्रकाशाशी काळोखाचे अद्वैत
पाहिले आहे तुम्ही?

अवकाशाच्या काळोख्या कोपर्‍याकडे रोखून बघताना
मिणमिणारी अंधुक दिवली
दिसली आहे एकदम?

स्वतःतल्या अंधाराकडे हताश होऊन पाहताना
कल्पनेची अग्निशिखा अशीच चमकते,
आशेचा किरण देऊन.

अज्ञाताच्या पोकळीत दुमदुमला आहे कधी जयघोष?
"प्रज्ञेच्या सूर्या, प्रसन्न हो!"
"प्रतिभेच्या सूर्या, प्रसन्न हो!"

सूर्याने वाळूवर ठेवलेले कण चकाकतात क्षणभर
परंतु त्या प्रकाशमान सावल्यांत
प्रतिबिंब नसते त्याच्या उरातल्या कल्लोळाचे.

तो अनंगरंगी कल्लोळ, तो अनाहत नाद
मी पाहिला आहे
प्राणांचे प्रकटन करून.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अज्ञाताच्या पोकळीत दुमदुमला आहे कधी जयघोष?
"प्रज्ञेच्या सूर्या, प्रसन्न हो!"
"प्रतिभेच्या सूर्या, प्रसन्न हो!"

हे आवडले.