कलियुगाची न्यारी त-हा - वाल्मिकीचा वाल्या होणे

Submitted by Rajesh Kulkarni on 6 December, 2015 - 02:39

कलियुगाची न्यारी त-हा - वाल्मिकीचा वाल्या होणे
.

काही दिवसांत महाराष्ट्रातल्या एका मोठ्या नेत्याची पंचाहत्तरी साजरी केली जाईल. त्याने आयुष्याच्या पूर्वार्धात बरीच पुण्याई कमावली होती. त्यानंतर मात्र सत्ता हेच एक ध्येय डोळ्यासमोर ठेवल्यामुळे मग जातीयता, गुंडगिरी यांच्या बळावर तेथे टिकून राहणे हे ओघाने आलेच. त्या नादात समाजाची पर्यायाने देशाची परिमित हानी झाली. या सर्व प्रकारात सुरूवातीला मिळालेली पुण्याई कधीच संपली आणि सामान्यांचे – गरीबांचे शिव्याशाप व तळतळाट मात्र त्यांना लागलेत. एरवी शाप आणि तळतळाट लागण्यावर माझा विश्वास नाही.

देशाचे नेतृत्व करण्याची महत्त्वाकांक्षा असली तरी राज्यपातळीवरही ते स्वत:चे सर्वांना मान्य होऊ शकेल असे स्वत:चे नेतृत्व निर्माण करू शकले नाहीत. त्यातूनच मग बेरजेचे राजकारण या नावाखालची विकृतता जन्माला आली. पण तरीही त्यांना मिळालेली लोकप्रियता काही कमी नव्हती. या लोकप्रियतेचा व स्वत:च्या व्यासंगाचा पुरेपूर फायदा राज्याला मिळू देण्याचे त्यांनी व्रत – व्रत हा मोठा शब्द झाला – घेतले असते, तेवढे नाही तरी स्वार्थ-परमार्थ साधण्याचा मार्ग स्विकारला असता तरी या राज्याचे फार भले झाले असते. त्यांच्या भाटांनी त्यांना जाणता राजा हे बिरूद चिकटवले खरे, पण त्यापोटी त्यांनी अंशत: का होईना जनतेचे उतराई होण्याचे ठरवले असते तर सहकाराच्या गोंडस नावाखाली शेतक-यांचे जे शोषण दशकानुदशके झाले, आजही होत आहे, ते थांबून शेतक-यांच्या मूलभूत स्थितीत फरक पडून आत्महत्यांचा दाहक डाग या राज्याला लागला नसता.

सगळ्याच घटनांना त्यांना जबाबदार धरणे योग्य नव्हे, पण आज ते स्वत:ची पंचाहत्तरी साजरी करत आहेत, तेव्हा मागे वळून पाहताना हे अपयश त्यांना वैयक्तिक अपयश वाटायला हवे. साधी कृषी उत्पन्न बाजार समिती या नावाखाली सहकाराचे जे भूत निर्माण केले गेले, त्यातल्या कमिशनपोटी शेतक-यांचे जे शोषण केले गेले व अजुनही केले जात आहे, त्याबद्दल त्यांना काहीही करावेसे वाटले नाही, उलट या समित्यांवर राजकीय कब्जा जमवून शेतक-यांचे रक्त पिण्याचे काम त्यांनी केले आहे. म्हटले तर शेतमालाचा रास्त भाव शेतक-याला मिळवून देणे ही किती सोपी व सहजसाध्य बाब आहे. पण ते धाडस न दाखवता शेतक-यांचे भले करण्याचा त्यांचा मानस कधीच नव्हता हे त्यांनी दाखवले. धार्मिक रूढीपरंपरांचे जाऊ दे, सामाजिक पातळीवरचा पुरोगामीपणा दाखवण्यासाठी अशी पावले न टाकता त्यांनी इतकी दशके स्वत:ला गब्बर करत राज्याला रसतळाला नेण्याचे काम मात्र इमाने इतबारे केले.

सगळ्याच राजकारण्यांनी मिळून वर्मा कमिशनचा अहवाल संसदेत आणू देण्याचे ‘कारस्थान’ हाणून पाडले. अन्यथा आज ते राजकारणात दिसलेच नसते इतके ते गंभीर प्रकरण आहे.

या जन्मात केलेले याच जन्मात फेडायचे असते यावर माझा विश्वास नाही. तशी समजुत हतबलतेतून निर्माण होते. एका व्यक्तीचे आयुष्य हे समाजाच्या – देशाच्या आयुष्यापुढे-भवितव्यापुढे क:पदार्थ असते हे लक्षात घेतले, तर त्या व्यक्तीला तिच्या कर्माची सजा त्याच जन्मात मिळाली काय वा न मिळाली काय, समाजाचे व देशाचे जे प्रचंड नुकसान झालेले असते, त्यापुढे त्या वैयक्तिक आयुष्याची किंमत काहीच नसते. हे लक्षात घेतले, तरी मी त्यांच्या उर्वरीत आयुष्यात काही वाईट व्हावे अशी कामना करत नाही.

पण मागे वळून पाहताना आपण काय करू शकलो असतो, पण अंगात शिरलेल्या कलीमुळे आपण होत्याचे नव्हते केले, ते निस्तरण्याची बुद्धी आपल्याला आपल्याला उर्वरीत आयुष्यात होणार आहे का, ती झाली तरी प्रत्यक्षात आपण ते करणार आहोत का, हे त्यांचे त्यांनीच ठरवायचे आहे. एरवी निस्वार्थीपणे समाजसेवेसाठी आपले सारे धन देऊन आदर्श निर्माण करणारे अझीझ प्रेमजी असोत, किंवा ते परदेशी झकरबर्ग, बफेट असोत, त्यांच्यासारखी अशी उर्मी यांच्यामध्ये कधी जागेल का आणि गतकाळातील चुकांचा नव्हे, तर माफ करता येणार नाही अशा पापांचा पश्चाताप किंवा उपरती होऊन पूर्णपणे राजकारणनिरपेक्ष असे निव्वळ समाजोपयोगी निर्णय घेण्याची काम करण्याची बुद्धी त्यांना मिळेल का हा प्रश्न या अमृतमहोत्सवानिमित्त पडला आहे.

कारण अशी बुद्धी आता नाही झाली, तरी यापुढे कधीच होणार नाही. सगळेच कोर्टाच्या भाषेत मोजता येत नाही, नाही म्हटले तरी प्रत्येक माणसाला थोडी तरी सदसदविवेकबुद्धी म्हणून अशी काही असतेच की.

आपल्याकडे वाल्याचा वाल्मिकी झाल्याची उदाहरणे सांगितली जातात. येथे तर वाल्मिकीचा वाल्या झाल्याचे उदाहरण आहे. त्यातला क्रूर विनोद असा की या वाल्याचे भाट तरीही तो वाल्मिकीच असल्याचे भासवत आहेत. त्यामुळे स्वत: वाल्याला त्याची जाणीव केव्हा होते ते पाहणे महत्त्वाचे.

+++++++++++++++

सकारात्मक कमेंट्स करणा-या सदस्यांसाठी निवेदन:

गेल्या काही दिवसांपासून माझ्या जवळजवळ प्रत्येक पोस्टवर मायबोलीच्या काही सदस्यांनी निव्वळ टवाळखोरी चालू केलेली आहे. एखाद्याने विषयाला सोडून कमेंट करणे व इतरांनी मग त्यावर पुढे तशाच कमेंट करणे असा प्रकार चालू आहे. येथे एखाद्याला ब्लॉक करणे अथवा विषयाला धरून नसलेल्या कमेंट्स काढून टाकण्याची सोय नसल्याचा गैरफायदा काही सदस्य घेत आहेत. काही जण मी लिहूच नये किंवा दुसरीकडे कोठे तरी लिहावे असा आग्रह अजुनही धरत आहेत. यातला विकृत आनंद व त्यातून मिळणारे समाधान त्यांना जरूर मिळू देत. काही सदस्य मात्र विषयाला धरून कमेंट करत असतात व मी काहीवेळा त्यांच्याशी त्यांच्या मतांबद्दल चर्चाही करतो. परंतु येथे टवाळखोरी इतकी वाढलेली आहे की मला अशा सकारात्मक कमेंट शोधणेच अवघड होऊन बसते आहे.

तेव्हा सकारात्मक कमेंट्स करू इच्छिणा-या सदस्यांना माझी विनंती आहे, की ऍडमिनने अशा टवाळखोरीच्या विकृतीचा बंदोबस्त करेपर्यंत माझ्या कोणत्याही पोस्टवर काही कमेंट करू नये. आपण माझ्या पोस्ट वाचण्यासाठी वेळ दिलात एवढेच माझ्यासाठी पुरेसे आहे व त्यासाठी मी आपला आभारी आहे. कमीत कमी मी तरी कोणत्याही कमेंटची नोंद घेऊ शकणार नाही.

मायबोली हे इतर काही संस्थळांप्रमाणे टवाळखोरांचा अड्डा नाही अशी माझी समजूत असल्यामुळे मी येथे लिहित राहिलो आहे. मी कोणाच्याही पोस्टवर जाऊन घाण करत नाही, इतरांकडूनही माझी तेवढीच माफक अपेक्षा आहे. परंतु गेल्या काही दिवसांच्या अनुभवावरून वस्तुस्थिती वेगळी असल्याचे लक्षात आले आहे. या बाबतीत मी व्यक्तीश: फार काही करू शकत नसल्यामुळे हे निवेदन करत आहे.

वास्तविक या टवाळखोरांपैकी एकहीजण माझ्या पोस्टकडे फिरकला नाही तरी मला काडीचाही फरक पडत नाही. परंतु येथे त्यांच्यावर कोणतेही निर्बंध नसल्यामुळे त्यांना त्यांचे उपद्रवमूल्य दाखवून द्यायचे आहे. या प्रकारातून मायबोलीची प्रतिष्ठा वाढणार असेल तर त्यांनी तसे जरूर करत रहावे. माझी हरकत नाही. तेव्हा टवाळखोरांनो, वर म्हटल्याप्रमाणे तुमची विकृती येथे जरूर दाखवा. तुम्हाला कसलेही भय नाही. तुम्हाला कसलीही लाजलज्जा असेल याची मला अपेक्षाही नाही. तेव्हा तुमचे चालू द्या. उलट हे निवेदन पाहिल्यावर तुम्ही आणखीच चेकाळाल याची मला खात्री आहे.

यापुढे येथील माझ्या प्रत्येक पोस्टमध्ये मी हे निवेदन टाकत जाणार आहे.

धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

साहेबांना पंचाहत्तरीत सुबुद्धी सुचो व महाराष्ट्रालातिल शेतकर्‍यांना चांगले दिवस येवो.

यशवन्तराव चव्हाणान्नान्चा केलेला विश्वासघात (याला काही लोक पाठित खन्जिर खुपसणे असेही म्हणतात) करुन प्रथम सत्ता बळकावली आणि तेथुनच अधोगतीला सुरवात झाली...

अनेक वेळा उड्या, कोलान्ट्या मारल्या....

एन डी. तिवारी, अर्जुनसिन्ग आणि शरद पवार अशा तिन विरान्मधे मधे प्रधान पदासाठी अटिअतटीची स्पर्धा होती... साहेबान्च्या नावाला दिल्लीत बरेच वजन होते... कलमाडी आदी अहोरात्र झटत होते, अनेक फोन खणखणत होते, थैल्या सैल होत होत्या... सर्वोच्च पद अगदी आवाक्यात आहे असे वाटतही होते... पण शेवटी बाजी नरसिन्हरावान्नी मारली. साहेबान्ना रक्षामन्त्री पदावर समाधान मानावे लागले, पुढे महाराष्ट्रातली राजकारणाची परिस्थिती नाजुक बनली आहे आणि घडी निस्तरायची जबाबदारी नरसिन्हरावान्नी पवारान्ना दिली आणि पुन्हा मुख्यमन्त्री पदाची जबाबदारी गळ्यात पडली. मुरब्बी नरसिन्हाने दिल्लीतुन स्पर्धक आणि कुठल्याही क्षणी धोका असणार्‍या साहेबाला घालवलेच तसेच स्पर्धक असणार्‍या तिवारी आणि अर्जुन्सिन्हाला पण घालवले... राज्यातली सत्तेची विस्कटलेली घडी निस्तरणे हे गोन्डस नाव मिळाले होते तरी परतणे शिक्षाच होती.

कॉन्ग्रेसमधे जो पर्यन्त सोनिया गान्धी नव्हत्या तोपर्यन्त त्यान्ना सर्वोच्च पदाची मोठी आशा होती, पद खुणावत होते.... पण ज्या क्षणी सोनियान्चा पक्षप्रवेश आणि पुढे अध्यक्षपदी नेमणुक झाली त्याक्षणी साहेबान्च्या त्या आशेवरही पाणी पडले... मग काही तरी खुसपट काढायचे म्हणुन "परदेशी जन्म" या मुद्द्यावर अजुन दोन (सन्गमा, तारिक अन्वर) असन्तुष्टान्ना सोबत घेत वेगळी चुल मान्डली.

कालान्तराने त्याच कॉन्ग्रेसपक्षासोबत त्याच परदेशी जन्मघेतलेल्या व्यक्ती सोबत युती करावी लागली व पुढे अनेक वर्षे युतीचे, बेरजेचे राजकारण अनिच्छेने करावे लागले... परदेशी जन्माचा मुद्दा किती निरर्थक होता हेच सामान्यान्ना त्यातुन दिसले.

भारतासारख्या कृषीप्रधान देशाचे केन्द्रिय कृषीमन्त्री पद अशा अत्यन्त जबाबदारीच्या मन्त्रालयाची जबाबदारी मिळाल्यावरही साहेबान्चा डोळा BCCI, ICC मधे होता.... शेतकरी पिचत होता आणि साहेब शारजा आणि लन्डनचे दौरे करत होते. जर खेळामधेच रस होता तर कृषीमन्त्रीपद सोडायचे आणि खुशाल पुर्ण वेळ खेळासाठी द्यायचा.... पण खेळापेक्षाही त्यात वहाणार्‍या पैशावर साहेबान्चा डोळा होता असे म्हणातात. यातुन कृषी प्रश्न त्यान्नी किती गन्भिरपणे घेतला होता हेच दिसते.

विरोधक तसेच स्वपक्षाच्याच किव्वा युतीच्याच लोक्कान्ना निवडणुकात पाडायचे कसब त्यान्च्याकडे होते.... सर्व काही मिळवले (असेलही) पण जनतेचा आणि सहकार्‍यान्चा गमावलेला विश्वास काही मिळवता आला नाही.

साहेबान्ना आरोग्यदायी आणि दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा.

<<इतकं असुनही मोदी बारामतीला दर्शनाला जातात.>>
---- कधी कधी (अनुभवी आहेत, प्रश्न्नान्ची जाण आहे म्हणुन) सल्ला पण घेतात.

गांभिर्याने नोंदवावे लागत आहे की, किती धागे काढावेत याचं भान असावं. मायबोलीवर बिचारे मालक,प्रशासक यांनी त्यांच्या पूर्ण माबोकारकिर्दीत जेव्हढे लिहीलेले नाही तितकं तुम्ही अल्पावधीत लिहून ठेवलंय.

भरमसाठ पद्धतीने धागे काढत सुटणे ही विचारांती केलेली कृती वाटत नाही. ही टवाळखोरीच आहे. अर्थात सांगून काही उपयोग होईल असं वाटत नाही. मिसळपाव वरून याच कारणांसाठी हकालपट्टी होऊनही दुस-या ठिकाणी तेच ते करण्यामागची बुद्धी कळत नाही..

>>यशवन्तराव चव्हाणान्नान्चा केलेला विश्वासघात<<

मुमं पदासाठि ज्यांचा विश्वासघात केला ते वसंतदादा पाटिल; यशवंतराव चव्हाण राजकिय गुरु...

साहेबांना दिर्घायुष्य चिंतीतो. जे काय घडतय त्यात साहेबांचा काही दोष नाही. मोरारजी आयुष्यभर निस्पृहपणे वागले. महाराष्ट्राने दिलेले घर त्यांच्या मागे सरकार जमा व्हावे अशी अट घालुनच ते सरकारी घरात रहायला गेले.

आता तसा काळ नाही. लोक प्रतिमा पाहुन मतदान करत नाहीत.

उदय, लिहीलेले आवडले. ते जयन्त भाऊ सारखे कोणा न कोणाचे अभिनन्दन करत आहेतच. काल-परवा लिम्बु भाऊ रिन्गणात होते, आज तुम्ही आहात. उद्या मी पण असेन कदाचीत.:फिदी:

जयन्त १ Light 1

उदय आपले अभिनंदन,

साहेबांना अनेक प्रश्नांची जाण आहे. राजकारणी लोकांच्या अडचणी तर फारच चांगल्या समजतात. इतकच काय तर एका इंडस्ट्रीयलीस्ट मित्राच्या संपत्तीतल्या वाटणीचा प्रश्न त्यांनी निकाली लावला आहे.

आज साहेबांची प्रतिमा नेत्यांचे नेते अशी आहे. सर्व सामान्यांना त्यांच्या नेत्रुत्व गुणाचा फारसा फायदा घेता येत नाही. हा दोष त्यांचा नाही.

माणूस चुकला की मी अभिनंद्न करतो रश्मीताई Happy
उदय यांची चुक मी त्यांना दाखवून दिली आहे आणि त्यांनी ती अंशतः मान्य केली आहे.

साहेबांबद्दल एवढेच सांगता येइल की ज्या झाडाला गोड रसाळ फळे लागतात त्यालाच लोक जास्त दगड मारतात हा तर दुनियेचा शिरस्ता आहे. वास्तविक पाहता गोड-रसाळ फळे ज्यांना चाखायला मिळाली ते त्या झाडाचे गुणगाण करतात आणि ज्यांना मिळाली नाहीत असे व जी गोड फळे निर्माण करु शकत नाहीत अशी झाडे त्या गोड फळे देणार्‍या झाडाचा दुस्वास करत त्याला शिव्याशाप देतात.. हे तर असेच चालायचे..!

+++++++++++++++

राकु : काही आयडींना इग्नोर करा.. आणि नाही करु शकलात तर कमित कमी त्रास तरी करुन घेउ नका..! कारण '+++' च्या वर दिलेले आहेच Happy Wink