दिल्लीतल्या आमदारांची पगारवाढ – काही मूलभूत प्रश्न – केजरीवालांवर उगाच टीका नको

Submitted by Rajesh Kulkarni on 5 December, 2015 - 08:07

दिल्लीतल्या आमदारांची पगारवाढ – काही मूलभूत प्रश्न – केजरीवालांवर उगाच टीका नको
.

मुळात स्वत:चा पगार किती वाढवावा याचे अधिकार स्वत:कडेच असणे हेच हास्यास्पद आहे. दिल्लीतल्या आमदारांचे पगार थेट चौपट करण्यावरून केजरीवालांवर टीका होत आहे, पण याबाबत कोणी बोलत नाही. शिवाय देशातल्या सगळ्याच आमदारांचे पगार सारखे असावेत की नाहीत किंवा किती असावेत हे ठरवण्याचे काहीही निकष नसताना केवळ केजरीवालांवर टीका करण्यात अर्थ नाही.

मुळात आमदार-खासदारांचे वेतन नाममात्र नसावेच. ते चांगलेच असावे, ज्यायोगे इतर कोणाकडे हात पसरायची वेळ त्यांच्यावर यायला नको. हो, आपला विश्वास नसला तरी काही आमदार तसे असतात. पण त्यांनी स्वत:चे वेतन ठरवावे हे खचितच योग्य नव्हे.

याकरता एखादी संसदीय समिती नेमून देशभरातल्या आमदारांचे वेतन ठरवले जावे आणि त्याबाबतची मार्गदर्शक तत्वे आखून दिली जावीत. म्हणजे उद्या दुसरे एखादे राज्य तुमच्याकडे आमदाराला सगळे मिळून दोन-सव्वादोन लाख मिळतात काय, आम्ही दहा लाख देऊ असे म्हणत दिल्ली विधानसभेशी स्पर्धा करणार नाही.

शिवाय हे पैसे या लोकांच्या बापाचे नाहीत, करदात्याचे आहेत, हे पाहता त्यांच्यावर याबाबतीत काही निकषांचे बंधन असलेच पाहिजे.

आणि सगळ्याच आमदार-खासदारांसाठी थोडा अवघड प्रश्न: चांगला पगार जरूर घ्या. पण तुमच्या कामाचे मूल्यमापन करण्याची सोयदेखील करा. आता हे कसे करणार? तुम्ही तुमची जात, तुमच्याकडच्या पैशांची ताकद किंवा इतर कोणत्याही निकषावर भलेही निवडून आले असाल, पण तुमच्या कामाचे मूल्यमापन करण्याची काहीतरी पद्धत हवीच की.

+++++++++++++++++++++++

सकारात्मक कमेंट्स करणा-या सदस्यांसाठी निवेदन:

गेल्या काही दिवसांपासून माझ्या जवळजवळ प्रत्येक पोस्टवर मायबोलीच्या काही सदस्यांनी निव्वळ टवाळखोरी चालू केलेली आहे. एखाद्याने विषयाला सोडून कमेंट करणे व इतरांनी मग त्यावर पुढे तशाच कमेंट करणे असा प्रकार चालू आहे. येथे एखाद्याला ब्लॉक करणे अथवा विषयाला धरून नसलेल्या कमेंट्स काढून टाकण्याची सोय नसल्याचा गैरफायदा काही सदस्य घेत आहेत. काही जण मी लिहूच नये किंवा दुसरीकडे कोठे तरी लिहावे असा आग्रह अजुनही धरत आहेत. यातला विकृत आनंद व त्यातून मिळणारे समाधान त्यांना जरूर मिळू देत. काही सदस्य मात्र विषयाला धरून कमेंट करत असतात व मी काहीवेळा त्यांच्याशी त्यांच्या मतांबद्दल चर्चाही करतो. परंतु येथे टवाळखोरी इतकी वाढलेली आहे की मला अशा सकारात्मक कमेंट शोधणेच अवघड होऊन बसते आहे.

तेव्हा सकारात्मक कमेंट्स करू इच्छिणा-या सदस्यांना माझी विनंती आहे, की ऍडमिनने अशा टवाळखोरीच्या विकृतीचा बंदोबस्त करेपर्यंत माझ्या कोणत्याही पोस्टवर काही कमेंट करू नये. आपण माझ्या पोस्ट वाचण्यासाठी वेळ दिलात एवढेच माझ्यासाठी पुरेसे आहे व त्यासाठी मी आपला आभारी आहे. कमीत कमी मी तरी कोणत्याही कमेंटची नोंद घेऊ शकणार नाही.

मायबोली हे इतर काही संस्थळांप्रमाणे टवाळखोरांचा अड्डा नाही अशी माझी समजूत असल्यामुळे मी येथे लिहित राहिलो आहे. मी कोणाच्याही पोस्टवर जाऊन घाण करत नाही, इतरांकडूनही माझी तेवढीच माफक अपेक्षा आहे. परंतु गेल्या काही दिवसांच्या अनुभवावरून वस्तुस्थिती वेगळी असल्याचे लक्षात आले आहे. या बाबतीत मी व्यक्तीश: फार काही करू शकत नसल्यामुळे हे निवेदन करत आहे.

वास्तविक या टवाळखोरांपैकी एकहीजण माझ्या पोस्टकडे फिरकला नाही तरी मला काडीचाही फरक पडत नाही. परंतु येथे त्यांच्यावर कोणतेही निर्बंध नसल्यामुळे त्यांना त्यांचे उपद्रवमूल्य दाखवून द्यायचे आहे. या प्रकारातून मायबोलीची प्रतिष्ठा वाढणार असेल तर त्यांनी तसे जरूर करत रहावे. माझी हरकत नाही. तेव्हा टवाळखोरांनो, वर म्हटल्याप्रमाणे तुमची विकृती येथे जरूर दाखवा. तुम्हाला कसलेही भय नाही. तुम्हाला कसलीही लाजलज्जा असेल याची मला अपेक्षाही नाही. तेव्हा तुमचे चालू द्या. उलट हे निवेदन पाहिल्यावर तुम्ही आणखीच चेकाळाल याची मला खात्री आहे.

यापुढे येथील माझ्या प्रत्येक पोस्टमध्ये मी हे निवेदन टाकत जाणार आहे.

धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे मतः
५०,००० पगार पाहिजे घ्या, हल्ली खाजगी कंपनीत ऑफिसर ला पण ५०,००० रुपये मिळतात.

पण....
१.> १०% पगार वाढ कशाला? भारतातिल ९९% लोकाना fix पगार वाढ नाही. ज्या प्रमाणात दिल्ली सरकारचे/ लोकाचे उत्त्पन्न वाढेल त्याप्रमाणात वाढ घ्यावी.
२> पेन्शन कशाला. भारतातिल ९९% जनतेला पेंशन मिळत नाही.
२> एवढे भत्ते कशाला? १२ लाख कार लोन? वॅगर आर ला १२ लाख लागतात (केजरीवाल नी वॅगर आर वापरणार असे निवडणुकित सांगितले होते) ? ३ लाखापर्यन्त ट्रॅव्हल खर्च कशाला, १०००० रुपये टेलि कम्युनिकेशन ला लागतात? आणी बरेच काही. सगळे भत्ते घेतले तर वर्षाचा पगार २५ लाखाच्या वर जातो. आणि सरकारचा खर्च आमदारामागे ४०- ५० लाखापर्यन्त जातो (पेंशन आणि कार लोन चे व्याज जमा करुन).

पगार भरपुर घ्यावा आणि दोन नं पैसे घ्यायचे बंद करावे
..........च्या कमाई पेक्षा कष्टाची कमाई असावी व कष्टाचेमुल्यमापण होऊन ती मिळावी.

आमदारांचे पगार चौपट म्हणजे आता किती झाले कल्पना नाही, पण वाढवणे योग्य निर्णय.

आता पोलिसांचेही पगार वाढवायला हवेत.

या दोन्ही खात्यात पुरेसा पगार आणि फॅसिलिटी सुरुवातीपासूनच दिली व सोबत भ्रष्टाचाराचे कायदे कडक करत चोख अंमलबजावणी केली तर मिळणार्‍या घसघशीत पगारात हे खुश राहून गैरमार्गाने उत्पन्न कमवायला जाणार नाहीत, भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकणार नाहीत.

केजरीवाल यांनी हा धाडसी अन ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन !

शनका - फक्त आपच्या आमदारांचे पगार वाढले की भाजपाच्या तीन आमदारांचेही वाढले. ??

पोलीसान्चेच पगार वाढवा, या ऐतखाऊ फुकट्यान्चे कशाला वाढवायचे? ४. ५० लाखाची वॅगन आर १२ लाखात झाली म्हणजे बि एम् डब्लु १ कोटीची असेल.:फिदी: आता का एवढे वाढवले मैतीय का? तर ५ वर्षानन्तर निवडुन येतील याची गॅरन्टी अजीबात नाही, कारण गॅरन्टी तेव्हाच असते, जेव्हा आपले काम चोख आणी प्रामाणीक असेल तर.

पगार चौपट झाले आहेत , चांगली गोष्ट आहे,
सगळ्यांचेच होणार असतील तर दिल्लीला जॉब करायला जाव म्हणतू ...........
अरे हो , पण सगळ्यांचे कसे होतील ,सगळे थोडेच विधानभवनात जावू शकतील ठराव पास करायला...............
आपण फक्त मतदान करायचे पुढच्या ५ वर्षात शे पाचशे पगार वाढला तरी बास म्हणायचे , काय गरज पडली त्यास्नी किती पगार वाढलाय ते इचारायची, तसबी त्यांना पगाराची गरज हाये का हा एक भाप्र

पोलीसान्चेच पगार वाढवा,>>>>>>>>

आणि पोलिसांची संख्या पण वाढवा. प्रगत जगात भारताच्या ५ पट पोलिस असतात. संख्या वाढली तर पोलिस दिसतील तरी सगळीकडे.
पोलिसांना १२-१६ तासाच्या ड्युट्या आणि सुट्टी पण नाही मिळत.