सार्वजनिक कार्यक्रम आणि प्रसंगावधानाचे महत्त्व

Submitted by Rajesh Kulkarni on 1 December, 2015 - 12:53

सार्वजनिक कार्यक्रम आणि प्रसंगावधानाचे महत्त्व
.
अरोरा नावाचे पुण्यातल्या कॅंपातले गृहस्थ पूर्वी मोटीव्हेशन करणारे एकपात्री कार्यक्रम करत. कंपनीतील कर्मचा-यांसाठी हे कार्यक्रम असत.

नावे लक्षात ठेवण्यात काही अडचण येत असेल तर एखादे नाव एखाद्या संदर्भाला जोडून लक्षात ठेवावे, म्हणजे ते सहसा विसरत नाही अशी युक्ती त्यांनी सांगितली होती.. मी त्यांना विचारले, परंतु तो संदर्भच विसरला तर काय करायचे? त्यावर ते निरूत्तर झाले. गंमत म्हणजे आजही अनेक कार्यक्रमांमध्ये ही युक्ती सांगितली जाते. नाही म्हटले तरी त्यात थोडे तथ्य आहे, पण तो काही अशा सवयीवरचा पूर्ण उपाय होऊ शकत नाही.

काही काम करताना कंटाळा आला तर सरळ दाढीचा एक हात करावा, म्हणजे ताजेतवाने वाटते असे त्यांनी सांगितल्याचे आठवते.

त्यांच्या कार्यक्रमात दृष्टीभ्रमाची काही चित्रे दाखवण्याचा एक भाग असे. एका चित्रामध्ये दोन चित्रे समाविष्ट असतात. एकदा एखाद्याच्या नजरेला एक चित्र दिसले, की सहसा दुसरे चित्र डोळ्यांसमोर येत नाही. फार अवघड जाते. पण त्यांनी दाखवलेल्या एका चित्रातली दोन्ही चित्रे माझ्या मित्राला दाखवता आली तर हे महाशय थोडे चिडले. अस्वस्थ झाले. म्हणून त्यांनी तावातावाने आणखी एक चित्र दाखवले, तेव्हा त्यातली दोन्ही चित्रे मला दिसली. त्यामुळे त्यांची अस्वस्थता आणखी वाढली.

आमच्या कंपनीसाठी तो कार्यक्रम करेपर्यंत कितीतरी हजार लोकांना मोटिव्हेट (प्रेरित) केले, अशी त्यांची जाहिरात असे. तरीही आमच्यासाठीच्या सत्रामध्ये तीन-चारवेळा असे झाल्यामुळे त्यांना याआधी खरोखर असे अनुभव आलेच नव्हते का, असे वाटले. की त्यांच्या अनुभवाची त्यांची जाहिरातच बोगस होती कोणास ठाऊक. अखेर जेथे लोकांशी थेट संपर्क होत असतो, अशा कार्यक्रमांमध्ये असे आणीबाणीचे प्रसंग येणारच. पण तरीही तुम्ही किती लगेचच सावरता यातले तुमचे कौशल्य महत्त्वाचे असते. तेथे अनुभवास आलेले अडचणीचे प्रसंग तुम्ही मनाला फारच लावून घेतले तर पुढच्या कार्यक्रमावर त्याचा विपरीत परिणाम होणारच.

आजही वर्तमानपत्रात अधूनमधून त्यांची जाहिरात दिसते. असो.

या निमित्ताने आणखी एक प्रसंग आठवतो.

बी.एड.च्या लेसनसाठी उमेदवारांना प्रत्यक्ष शाळेत जाऊन पाठ घ्यावा लागे. एका वर्गातल्या मुलांना त्याचा विषय आधीच कळला होता. चहा. प्रस्थापित दंडकांप्रमाणे थेट विषयाला हात घालायचा नसतो. त्यामुळे या शिकाऊ शिक्षकांनी विषयाची प्रस्तावना करताना मुलांना विचारले, मुलांनो, तुम्ही सकाळी उठल्यावर काय करता? मुले उत्तरली की ब्रश करतो, आंघोळ करतो, केस विंचरतो, धुतलेले कपडे घालतो, वगैरे वगैरे. खाण्यापिण्याकडे गाडी वळेचना. अखेर हे शिक्षक म्हणाले, छान, छान. बरे, आता मला सांगा, तुम्ही सकाळी आटोपून झाल्यावर काय खाता पिता? झाले, मुलांनी खाद्यपदार्थांची जी यादी सुरू झाली, ती संपेचना. शिक्षक अस्वस्थ. मुलांवर रूष्ट होऊनही फायदा नाही. शेवटच्या रांगेत बसलेले परीक्षक थेट नापास करणार. मग मुलांना मध्येच थांबवून ते म्हणाले, छान, ही झाली खाद्यपदार्थांची नावे. आता सांगा तुम्ही सकाळी सकाळी काय पिता. मुलांनी दूध, कॉफी, बोर्नव्हिटा अशी नावे सांगितली. ती यादी फार मोठी होईना. तेव्हा चक्क थांबली. पण कोणीही तोंडातून चहा हा शब्द काही काढला नाही.

अखेर शिक्षकांना या चक्रव्युहातून बाहेर पडण्याची युक्ती सुचली. अन्यथा प्रस्तावनेवर फार वेळ घालवला म्हणूनही गुण कमी होण्याचा धोका होता. ते म्हणाले, तुम्ही जसे दूध, कॉफी, वगैरे पिता, तसेच काहीजण चहा पितात. झाले. मुलांचा पराक्रम तेथेच संपला. त्यांना आणखी द्वाडपणा करणे शक्य नव्हते. मग देशात चहा कोठे पिकतो, चहाला कोणत्या प्रकारचे हवामान लागते, वगैरे मुद्द्यांवर ही शिकाऊ गाडी सुखरूप मार्गस्थ झाली.

वर्षभरानंतर ते उमेदवार शिक्षक म्हणून त्याच शाळेत रूजू झाले व मुलांवर त्यांचीच विद्या उलटवली गेली हे वेगळे सांगायला नको.

तुमच्या पाहण्यात असे चांगलेवाईट अनुभव आले आहेत का? अशा काही गमतीजमती तुमच्या स्मरणात आहेत का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दाढी करायला रेझर, ब्रश, आणि दाढीची पेस्ट/साबण वगैरे ठेवण्यापेक्षा वॅक्सिंग मधे मेण वापरतात ते ठेवलं तर चालेल का? किंवा मग टीव्हीवर जाहीराती दाखवतात त्या पट्ट्या? खच्याक्कन् पट्टी काढली की केस गायब आणि त्या झटक्यामुळे कंटाळाही.

Rofl
कंटाळा आल्यावर ह्या धागाकर्त्याचे धागे उघडून वाचले तरी चालतील .
रेसिड्यु राहिलाच तर गुगल त्रन्स्लेटर आहेच .

Lol Lol Lol

कंटाळा आल्यावर ह्या धागाकर्त्याचे धागे उघडून वाचले तरी चालतील>>>
अहो इथे लिहिलय ना की दाढी करा म्हणुन.. Wink

त्यांना त्यांच्या 'नसलेल्या दाढीवर हात फिरवला' असे म्हणायचे असेल कदाचीत. >>>> हो. म्हणजे हनुवटिवरुन

आणि मला अजुन अहो नाहित. Angry

Pages