मुंबईकर.. स्साला जीवाला काही किंमतच नाहीये ईथे..

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 November, 2015 - 16:18

आताच हा विडिओ पाहिला व्हॉटसपवर. https://www.youtube.com/watch?v=WdgRPCi_nGU
गर्दीच्या ट्रेनमध्ये दारावर लटकत असलेल्या मुलाचा हात सुटला.
ही संबंधित बातमी - http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan/accident-...

विडीओ पाहताना अंगावर नाही आला. रोजचेच गर्दीचे द्रुश्य बघतोय असे वाटले. अगदी सहज पडला. त्याला स्वतालाही काही कळायच्या आधी हात सुटला. विडिओ पाहताना असे वाटले की रेल्वेट्रॅकलगतच्या झुडुपात पडला असेल, कपडे झटकेल आणि उठून पुन्हा मागची ट्रेन पकडेल. पण नाही. गेलाच. विडिओ बघून बातमी चेक केली. तेव्हा समजले की जागीच मेला. ऑन द स्पॉट. काय लाईफ आहे. एकीकडे देश असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून सुरक्षित आहे की नाही चर्चा चालू आहेत. एकीकडे हे.. रोजचा रेल्वेप्रवास इथे सुरक्षित नाही. जो पोटापाण्यासाठी करावाच लागतो. एक मुंबईकर म्हणून मी हे स्वत: अनुभवत नसलो तरी रोज ट्रेनच्या दाराला लटकलेल्या लोकांचे गुच्छ नजर मेल्यासारखे बघणे नशीबी असते. मग एके दिवशी हे असे काही घडते. आणि त्यातील गांभीर्य लक्षात येते. पण फारसा विचार करत बसायला वेळ कोणाकडे आहे ईथे. उद्याही त्या सर्वांचे हेच रूटीन असणार. एकाला ठेच लागल्याने दुसरा कोणी घाबरून दाराला लटकायचे बंद करणार नाहीये. कारण त्यांच्याकडे तसा पर्यायच नाहीये. थ्री ईडियटस मध्ये एक स्टुडंट अभ्यासाच्या प्रेशरने आत्महत्या करतो तेव्हा आमीर खान प्रोफेसर बोमन इराणीला म्हणतो, सर ये सुसाईड नही, मर्डर है मर्डर. इथेही तसेच म्हणावेसे वाटतेय. हा अपघात नाहीये, खून आहे खून. परिस्थितीने केलेला खून. आणि जे जे या परिस्थितीला जबाबदार आहेत त्या सर्वांवर हा आरोप आहे. मध्यंतरी रेल्वे प्रशासनाने ट्रेनचे मासिक पास भाडे दुप्पट केले होते. मुंबईकरांनी एकजुटीने आवाज उठवलेला, भाडेवाढ मागे घेण्यात आली होती. तेव्हा एक मुंबईबाहेरचा मित्र म्हणालेला. ही भाडेवाढ नसून आधीच तुम्हाला मासिक पासात सूट दिली होती, ती काढली आहे, बस्स. तेव्हाही त्याला विचारले होते. नक्की कसले पैसे द्यायचे अपेक्षित आहे लोकांनी? जिथे साठ-सत्तर आसनक्षमता असेल तिथे दोनशे जणांनी चढायचे? असे दाराला लटकत जीव डावाला लावत प्रवास करायचे? आणि एक दिवस ही असली मौत मरायचे! बोलायला बरेच काही आहे, एक मुंबईकर म्हणून चीड दुख संताप हळहळ.. पण हे सारे व्यक्त करून काही फरक पडणार नाही ही हतबलताही सोबत आहे. पण तरी एका गोष्टीचा त्रास होतोच, स्साला जीवाला काही किंमतच नाहीये ईथे..
आजच्या त्या तरुणाला, आजवर ट्रेनमधून पडून मृत्यु पावलेल्यांना, आणि इथूनही पुढे जे कोणी असे जातील त्या सर्वांना श्रद्धांजली ..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता रेल्वेगाड्यांत कोणी विसरून गेलेल्या सामानाबद्दल सावध राहण्याच्या घोषणेची जागा फुटबोर्डावरून प्रवास न करण्याच्या आणि चालत्या गाडीतून शरीराचा कोणताही भाग बाहेर न काढण्याच्या घोषणांनी घेतलीय.

कमी आसनांच्या डब्यांचा प्रयोगही सुरू झालाय. प.रे.वर असे डबे होते असं आठवतंय. एका डब्यात तीन आसनांऐवजी दोनच आसने असत. तर एका डब्यात बहुतांश जागा उभं राहायला आणि आसने फक्त खिडक्यांशी (खिडक्यांना पाठ लावून) आणि डब्याच्या शेवटच्या भिंतीशी असत.

काही दिवसांनी ती आसनेही जातील आणि मालगाडीच्या डब्यासारखे जनावर कोंबल्यागत प्रवास करावा लागेल. अजून पाहिला नाही तो डब्बा, चढाउतरायला सोयीचे असणे गरजेचे आहे, होपफुली ते तसे असावे..

पहिले तर भारतीय जनता ही mature नाही.
भारतीय जनता ही फक्त भावनिक आहे .बुद्धी वापरणे त्यांस जमत नाही
देशात अनेक राज्य आहेत त्या राज्याचा कारभार स्थानिक राज्य सरकार सांभाळत असतात.
प्रत्येक राज्याची राज्य सरकार आणि प्रत्येक राज्याची कुवत वेगळी आहे.
एक देश एक न्याय किंवा परिस्थिती हे साफ खोटे आहे
कोणत्याच बाबतीत ह्या देशात
समानता नाही.
देशातील काही भाग अतिशय मागास आहे ,अगदी जगातील सर्वात मागास देशा पेक्षा पण मागास आहे .
सर्व बाबतीत.
सामाजिक,आर्थिक,एज्युकेशन सर्व बाबतीत.
आणि हाच भाग प्रचंड लोकसंख्येचा आहे.
देशात काहीच मोजकीच शहर आणि राज्य विकसित आहेत.
त्या राज्यातील जनता पण काळा बरोबर चालणारी आहे.
त्या एका राज्यातील मुंबई एक शहर.
ज्या देशात जगातील सर्वात मागास देशा पेक्षा पण वाईट अवस्था असणारी राज्य आहेत.
त्या राज्यातील जनता मिळेल ते वाहन पकडुन मुंबई मध्ये येतात.
विकसित राज्यात येतात,दिल्ली,बंगलोर सारख्या शहरात येतात.
आणि ह्या शहरांचा,राज्यांचा कचरा करतात.
आम्ही सर्व एक आहे,कोणी कुठे ही जावू शकतो, सर्व भारतीय एक आहेत
एक तर हे बकवास आहे.
मागास राज्य आणि त्या राज्यांचे राज्य करते असले बकवास दावे करत असतात.
आणि unmature बाकी भारतीय mana डोलवत astat.

Mumbai ch nahi pan प्रगत राज्यातील प्रत्येक शहर नरक झालेली आहेत.
मागास राज्य ओरिजनल नरक आहेत च

जगातील सर्वात मागास देशांपेक्षा पण मागास राज्य ज्या देशात असतील ..
त्या देशातील शहर .. कचरा कुंडी, गर्दी नी ओसंडलेली,किती ही सुविधा केल्या तरी स्थिती खराब च होत जाणारी च असणार.
मुंबई त्याच देशात आहे

बरेच अंशी खरे आहे हे. कोणीही कुठूनही येऊन मुंबईत राहते. झोपडपट्टी वाढवते. आणि कालांतराने ईथलाच भाग बनून जाते. यावर अंकुश ठेवायचे सोडून राज्यकर्त्यांनी आपली वोटबॅंक बघितली आणि मुंबईची वाट लागली. यात दोष त्या झोपडपट्टीवाल्यांनाही द्यायची बिलकुल ईच्छा नाही.

पराकोटीची सामाजिक आणि आर्थिक विषमता आहे या देशात. मुंबईत ती अधिकच जाणवते.

सरकार काही डोंबल करत नाही.
आता वेळ आली आहे की जनतेतल्याच कुणितरी पुढे येऊन काहितरी केले पाहिजे.
दोन महत्वाच्या गोष्टी - बॉलिवूड व क्रिकेटमधे जाणार्‍या पैशातील निदान १० टक्के तरी पैसे मुंबईच्या लोकल ट्रेन बांधण्यासाठी ठेवायचे.आणि आय आयएम नि आय आय टीसारख्या संस्थांच्या प्रोफेसरांनी मुलांना हाताशी धरून हा कार्यक्रम राबवावा.
भारतात संख्येने, हुषार लोक इतर सर्व देशातील लोकांपेक्षा जास्त आहेत, पण योजकस्तत्र दुर्लभः म्हणून मी आय आय एमचे नाव घेतले.

Pages