माझी पहिली कोकण वारी

Submitted by सर_जाॅन on 28 November, 2015 - 00:22

मा.बो वरिल कोकणातील अनेक फोटो पाहून एकदा तरी कोकण वारी करावी असे वाटत होते. पण योग जुळून येत नव्हता .या दिवाळी सुट्टीत कोकणात देवबाग- तारकर्ली ला जायच ठरवले मा.बो वर सौरभ यांनी त्यांच्या पोस्ट मध्ये हेरंब निवास चा उल्लेख केला होता. ऐक महिना अगोदरच बुक करुन ठेवले होते. पंढरपूर ची वारी जशी पुन्हा पुन्हा करावीशी वाटते तस कोकणाचे इथला निसर्ग तुम्हाला पुन्हा पुन्हा येण्याची साद घालतो.

एक प्रयत्न. ...काही फोटो काढलेत त्याची लिंक https://flic.kr/s/aHskmxwncS

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमचा अनुभव पण लिहा की इथे डिटेलमध्ये. कसे गेलात? काय काय बघितल? हेरंब निवासचा अनुभव.जेवण कसं होत?

फोटो मस्तच.
तुमचा अनुभव पण लिहा की इथे डिटेलमध्ये. कसे गेलात? काय काय बघितल? हेरंब निवासचा अनुभव.जेवण कसं होत?>>>>> हेही लिहा.

धन्यवाद @ मानुषी , प्रज्ञा व चैत्रगंधा
मी पुण्याहून -कोल्हापूर-निपाणी मार्गे अंबोली घाटातून सावंतवाडी ला न जाता कुडाळ मार्गे मालवणला आलो.
मालवणहुन तारकर्ली- देवबाग 6 कि.मी आहे. वरील मार्ग गुगल दाखवतो हा मार्ग इतर मार्गापेक्षा थोडा २०- ३० कि.मी जास्त आहे व एक टोलसुध्दा(कार 40 रू) पण अंबोली घाटासाठी मी हा मार्ग सिलेक्ट केला.

हेरंब निवास हे उत्तम राहण्याचे ठिकाण आहे कारण ह्याला लागुन
असलेला समुद्र किनारा जो मला तेथे इतर हाॅटेलला दिसला नाही हेरंब निवास जर फुल आसेल तर श्रीपाद निवास(नेट वर फोननंबर आहे )हासुद्धा एक उत्तम पर्याय आहे हे हेरंब निवासला चिटकूनच आहे .बहुतेक हे दोन्ही पुर्वी एकाच मालकाचे आसावे.येथील जेवणही छान आहे मला तरी आवडले. एकाद्याला नाही आवडल तर तेथे जवळच भरपुर घरगुती खानावळी आहेत.

तारकर्ली पेक्षा देवबागचा बीच सरस आहे. आम्ही येथे दोन दिवस होतो पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठून डाॅल्फीन पाहण्यासाठी डाॅल्फीन पाॅइंट वर गेलो पण आमच्या दुर्दैवाने डाॅल्फीन दिसल्या नाहीत. तिथुन संगम पाॅइंट , क्रोकोडाइल शेप पाॅइंट पाहुन सुनामी आयलंड वर आलो येथे वाॅटर स्पोर्ट्स आहेत धमाल मजा येते.
दुसर्‍या दिवशी सिंधुदुर्ग किल्ला व मालवण पाहिल कॅमेराची बॅटरी संपल्यामुळे येथील फोटो घेता आले नाही.
तर येथील निसर्ग तुम्हाला पुन्हा पुन्हा येण्याची साद घालतो एकदा अवश्य भेट द्या.