युक्ती सुचवा युक्ती सांगा- ५

Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04

युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वत्सला ,
कमी प्रमाण घ्या.पोळ्या मोठ्या साईजच्या असतील असा अंदाज आहे.

फालूदाचं आईस्क्रीम? आवडत नाही म्हणजे फ्लेवर आवडत नसेल तर मग कदाचित आईस्क्रीम पण आवड्णार नाही . शेवया, सब्जा असं आवड्त नसेल तर ते मिक्स मधून काढून टाकता येइल.

ते सगळं मिक्सर मधून काढून सगळ्याची एक फाईन पावडर बनवून मग मिल्क शेक करता येईल का?? म्हणजे शेवया आणि सब्जा डोळ्याला न दिसता लोकांच्या पोटात घालता येईल.

नजाकतीचा फालुदा असा मिक्सरात घालायचा म्हणजे Sad पेक्षा सरळ फालुदा ग्लास बरोबर एक एक "आयमास्क" च दे. आंधळी कोशिंबीर सारखं आज "आंधळ डिझर्ट" घोषित कर... Wink

Happy मागच्या वेळी फुकट मिळालेला आईला दिला होता.तिला आवडतो.
फुकट वाली वस्तू नाकारायची पण सोय नाही कारण तो केकमिक्स खोक्यातच असतो.
(शेवया आणि सब्जा निवडून बाजूला काढून बाकी पावडर केक मिक्स मध्ये खपवली तर :):) )\

स्मित मागच्या वेळी फुकट मिळालेला आईला दिला होता.तिला आवडतो.>>>> मग आता पण आईलाच दे की.:स्मित: तू भी खुश क्योकी तुम्हारी मा भी खुश.:दिवा:

शेवया आणि सब्जा निवडून बाजूला काढून बाकी पावडर केक मिक्स मध्ये खपवली तर >> केक फुगणार नाही. त्यापेक्षा फालूदा बनवून ऑफिसात टीमसाठी ने, तुझ्या डोळ्यांनाही दिसणार नाही.

निवडून नको नको गं! किती वेळ जाईल. ते मिक्स जाड गाळण्यावर टाकले तर शेवई व सब्जा वर राहिल. पावडर खाली पडेल त्याचे आईसक्रिम सारखे डिझर्ट होईल.

बनवून नेण्यापेक्षा ऑफिस मध्ये अख्खे पाकिटच न्यायचं. वॉटर कुलर-किचन असं कुठेतरी पाकिट विसरून सोडून द्यायचं.. Wink

माझे सोया ग्रॅनुअल्स संपत नाहीये. एखादी टेस्टी आणि फास्ट रेसिपी सुचवा ना. मायक्रोवेव्हमध्ये करण्यासारखी असेल तर बरं.

माझ्याकडेही २ फालुदा पडली आहेत .
ते सगळं मिक्सर मधून काढून सगळ्याची एक फाईन पावडर बनवून >> आईस्क्रीम बनवाव का???

सोया ग्रॅन्युल्स पावडर करुन आप्प्यात खपवता येतील.
बाकी तांदूळ उडीद आणि थोडे सोया पावडर असे.(आप्प्यात आतापर्यंत ओट, बेसन, उरलेले आंबोळी मिक्स असे बरेच यशस्वीपणे खपवले आहे.)

वत्सला , बरें झाले आधी अर्ध्या किलोच्या केल्यात ते.मी आधी तुम्हाला नकळत मिसगाईड केले होते.

विकतची कुकर केक मिक्स वापरते, केक बाकी चवीला ई.चांगला होतो पण शिजवताना हवा निसटून एक भेग पड़ते, कधीकधी रिलायंस टाटा मार्केट मधल्या रेडी केक्स ना पण असते.ही भेग न पड़ता केक कसा कुकरमधे शिजवता येईल? ढोकळ्याला अशी भेग पडत नाही कुकरमधे बनवल्यास.

अनु, मी कधी कुकरमधे केक केला नाहिये पण केकचे मिश्रण गरजेपेक्षा जास्त प्रमाणात फेटले गेल्यास असे होते. केक चे मिश्रण भांड्यात घातल्यावर भांडे जरासे ओट्यावर ठोकायचे अतिरीक्त हवा बाहेर जावी म्हणून. ओवनमधे एकसमान तापमान नसेल तरी भेग पडणे होते पण तुम्ही कुकर वापरत आहात त्यामुळे त्याबाबत माहित नाही.

शर्मिला,
मॅकेडेमिया नट्स कुकीज, ब्राउनी, बनाना मफिन्स्/ब्रेड, स्मुदी यापैकी कशातही छान लागतात.

ओके. पण मी यातलं काहीच घरी बनवत नाही. म्हणजे नुसते संपवणं मस्ट आहे. Proud व्यसन लागू शकतील इतके आवडले आहेत आणि क्यालरीज भरपूर आहेत त्यात Proud

व्हिट ममरा म्हणून पटेल कडून गव्हाचे मुरमुरे आणलेत, त्याला तिखट लावलेलच होत , वरुन फार तिखट असतील अस वाटल नाही पण खाल्ल्यावर तिखट जाणवतायत काय करावे ...मुरमुरे चविष्ट आहेत आणी मोठा पॅक आहे( लहान पॅक मिळत अस्ता तर बर असत जरा ट्राय केले अस्ते आधी!) काय करता येइल

Pages