युक्ती सुचवा युक्ती सांगा- ५

Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04

युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रिया, नाही करत. कारण आपला चेहरा उन्हात फिरल्यामुळे कित्य्रेक वर्षे न घासलेल्या तांब्यासारखाच लाल काळा पडलेला असर्तो. असे आयते सौदर्य मिळत अस्ताना वेगळा लेप कशाला???

अग, काय ग मुलींनो, ३-४ एका वेळी पकडून उगाळा की, बदाम उगाळत नाही का आपण तसेच. चारोळी तर नाही पण मी कॉलेजात असताना बदाम अरधा अन हळदीचे ४-५ वळ्से रोज रात्री लावत असे. चेहरा चकचकीत - अगदी घासलेल्या तांब्यासारखा दिसतोय असे माझी मावशी म्हणायची - चिडवायची Wink

अनघा, अगं बदाम केवढा! ३-४ चारोळ्या एकावेळी पकडून उगाळताना त्या चिमटीतून सटकत राहतील Wink त्यापेक्षा असं करायचं. बदामाला वरुन चारोळ्या चिकटवायच्या आणि उगाळायचं. बदाम चारोळी पॅक तयार!!! नुसत्या घासलेल्याच नाही, तर पॉलिश केलेल्या तांब्यासारखा दिसेल चेहरा :खोखो:. आवरा!!!! (हे स्वतःलाच Happy ).

आता उगाळायचा मोह आवरत नाहीय. चकचकित्/गुळगुळीत चेहर्‍याकरता कुछ भी Wink

तर कृपया सांग अनघा की दुधात उगाळायचं की पाण्यात? (हा प्रश्न इथे अस्थानी आहे त्यामुळे उत्तर मिळाल्यानंतर उडवेन किंवा यो.स्था.ह.)

मात्र माझ्या (भव्य) चेहर्‍यालाच दोनशे ग्राम चारोळ्या लागणार नाहीत ना अशीही शंका येतेय Lol

शर्मिला, एक भा. प्र.
तु श्रिखंड बासुंदी घरी करत नाहीस तर मुळात चारोळ्या घरी आणल्याच कश्याकरता होत्या? Happy

चारोळ्यान्वर बर्‍याच ओळ्या लिहून झाल्या.:फिदी: अनघाचे बरोबर आहे आणी अश्विनीचे पण सल्ले सही आहेत. पण समजा १०-१५ चारोळ्या, २-४ बदाम दुधात घालुन मिक्सरमध्ये वाटुन ती पेस्ट फ्रिझमध्ये ठेवुन वापरा की. त्यात चेहेर्‍याला लावायच्या आधी पाव चमचा मध, २-४ लिम्बुरसाचे थेम्ब घालुन लावायचे. शाही फेशीयल होईल.:डोमा:

हो मी पण कॉलेजमध्ये असताना ( त्या वयात ) हे उद्योग बरेच वेळा केले आहेत.

उगाळण्याच्या क्रियेतून मिळालेले फायदे, गुणधर्म वेगळे असतात.

मेधाव्ही- अगं आत्ता करत नाहीये श्री.-बा. घरी, तेव्हा करत होते जेव्हा आणली होती Wink . जोक्स अपार्ट, मध्यप्रदेशातल्या एका अभयारण्यात आदिवासींचा स्टॉल होता, तिथून मध, चारोळ्यांची पाकिटं वगैरे घेतली होती. काही कुणाकुणाला वाटण्यात संपली. एक दोन शिल्लक राहिली ती फ्रीजमधे ठेवून दिली डब्यात भरुन ती आता उत्खननात मिळाली.

दुधात. Happy मलाही आता अठ्ठेचाळीशीत चारोळी उगाळावी वाटून राहिली की Happy
सिरीयल पहाताना उगाळा आणि लावा. उगाच शॉर्ट्कट्स नको, ठंडीत शीतकपाटातली चारोळी लावू नका.

मध्यप्रदेशातल्या एका अभयारण्यात आदिवासींचा स्टॉल
<<
ऑथेंटिक सातपुडा चारोळी आहे.

शर्मीला, श्री बा म्हटल्यावर मला श्रीबाळ आठवलं Happy तसेही गोखले श्री आणि बा चाच बिजनेस करतात त्यामुळे आता बाळाचे नाव देखील गो गृ. उ साठी समर्पक झाले तर ! Happy

आप्पे पात्रात केक केला आहे का कोणी? केला असल्यास प्लीज इथे रेसिपी देणार क? किंवा लिंक द्या प्लीज
ऑल्ररेडी कुठे असेल तर....

नाही. चारोळीच काय, कोणत्याही तेलबिया खवट झाल्या की त्यांचा वास जात नाही. भाजा, उन्हात ठेवा काही करा. लागलेल्या दुधाचा वास जसा काहीही केलं तरी जातच नाही, तसेच हे.

होका? Sad
स्वानंदीच्या काकुने (नांदा सौख्य भरे) सांगितली होती ही आयडिया त्या दिवशीच्या एपिसोडमधे. मला खुप आनंद झाला होता कि आता आपल्या चारोळ्या उपयोगी येईल म्हणुन. Sad

कणकेच्या केक ची हामखास पाक्रु कोणाला माहिती असल्यास प्लिज.
मी केलेला आधी मस्त फुगतो, पण नंतर मात्र पुन्हा बसतो. Uhoh

>>आप्पे पात्रात केक केला आहे का कोणी?>>
पॅनकेक पफ्स छान होतात. मला अमेरीकेत अप्पेपात्र पॅनकेक पफ्स पॅन म्हणूनच मिळाले होते.त्यासोबत रेसीपी चे पुस्तकही आले. जालावर पॅनकेक पफ्स असे शोधल्यास रेसीपी मिळतील.

माझ्याकडे बारीक रव्याला जाळी पडायला लागली आणि बदलत्या हवेमुळे तो अजून खराब होईल असं वाटलं म्हणून मी तो निवडून, चाळून हलका शेकवून ठेवायचा विचार केला. प्रत्यक्षात उरका पाडताना तो अगदी नीट सोनेरी-तांबूस असा मस्त भाजलाच गेला. आता झालंय असं की शिरा किंवा उपमा तिप्पट पाण्यातही कोरडाच लागतोय खाताना कारण शिर्‍यासाठी तुपात किंवा उपम्यासाठी फोडणीत तो आधीच भाजलेला रवा अजून थोडातरी भाजला जातोच आहे. शिरा दूध-साय घालून केला तरी कोरडा. उपम्यावर तूप सोडलं तरी कोरडा.

काय करता येईल?

उपमा करताना एक वाफ आली की दही घालायच १ चमचा मग हलवुन आणखी एक वाफ आणायची, शिर्यामधे केळ ,आमरस घालुन फरक पडेल अस वाटतय..

शिरे उपमे Wink करायचे नसतील तर जास्त विचार न करता सरळ त्यात दही आणि कां टो को चिरून घालून धिरडी टाईप्स बनवायचे / क्विक रवा डोसा इत्यादी. असा पदार्थ करायचा ज्यात रवा भिजवून, सरसरीत करून वापरायचा आहे Happy

Pages